मेळघाट शैक्षणिक प्रकल्प - ‘मैत्री शाळा २०१९-२०२०’

Submitted by हर्पेन on 19 June, 2019 - 07:24

नमस्कार मंडळी

पुण्यामधील ‘मैत्री’ संस्था अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हातरु या मेळघाटमधील भागामध्ये गेली २० वर्षे काम करीत आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, संघटन अशा विविध पातळ्यांवर हे काम चालते. धडक मोहिमेसोबतच गेली काही वर्षे आपण राबवत असलेले शैक्षणिक उपक्रमही मेळघाटातल्या मुलांकरता लाभदायक ठरत आहेत.

मैत्रीचे एक कार्यकर्ते जोडपे श्री. रवींद्र व सरिता गोडबोले यांनी जानेवारी २०१८ मध्ये घेतलेल्या ‘विज्ञानातील गंमत’ ह्या तीन दिवसांच्या कार्यशाळेनंतर गेल्या शैक्षणिक वर्षभर, विज्ञान व गणित यासाठी एक उपक्रम राबवायला आपण सुरुवात केली आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट्य अगदी साधे आहे, ते म्हणजे - मुलांच्या मनातील गणित आणि विज्ञान या विषयांविषयीची भीती काढून टाकावी आणि त्यांच्यातील कुतूहल जागे करून हे विषय शिकायला त्यांना उद्युक्त करावे.

असा उपक्रम या ही वर्षी दर महिन्यात राबवण्याचे योजिले आहे.

तर मंडळी सादर करत आहे.
मेळघाट शैक्षणिक प्रकल्प - ‘मैत्री शाळा २०१९-२०२०’

तुम्हाला मेळघाट मध्ये जावून प्रत्यक्ष काही कामाचा अनुभव घ्यायचाय?
तिथल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुलांना काही शिकवण्याची इच्छा आहे?
आपलं अनुभव विश्व त्यांच्यासमवेत वाटून घ्यावं असं वाटतंय?

‘मैत्री शाळा’ तुम्हाला ही संधी देतेय.

स्थानिक कोरकू ‘गावमित्रांच्या’ मदतीने आपण तिथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी पूरक ठरतील व मुलांच्या शिक्षणाला मदत करतील असे उपक्रम वर्षभर करतो.

तेथील एका आश्रमशाळेमध्ये माध्यमिकच्या मुलांना विज्ञानातील प्रयोग करून दाखवतो.

गणिताच्या काही युक्त्या शिकवून त्या विषयाची भीती कमी करतो

इतिहास, भूगोल, इंग्रजी व इतरही विषयांमध्ये येणा-या अडचणी दूर करण्यासाठी मदत करतो.

सुट्टीमध्ये मुलांच्या सर्जनशीलतेला (creativity) वाव देण्यासाठी आनंदमेळावा घेतो.

याकरता दर महिन्यातून एक आठवडा काही स्वयंसेवक आपल्याला पुण्यामधून हवे आहेत.

खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुमच्या सोयीचा महिना ठरवा आणि आम्हाला कळवा. तुमची इच्छा असेल तर तुमचे एखादे विशेष कौशल्य पण तुम्ही त्या मुलांना शिकवू शकाल.

१३ ते १९ जुलै
३ ते ९ ऑगस्ट
१४ ते २० सप्टेंबर
१२ ते १८ ऑक्टोबर
२३ ते २९ नोव्हेंबर
२१ ते २७ डिसेंबर
१८ ते २४ जानेवारी
१५ ते २१ फेब्रुवारी
मार्च व एप्रिल – परीक्षेनुसार

दर महिन्याला किमान ४/५ स्वयंसेवक आपल्याला ह्या कामाकरता लागणार आहेत.

तरी आपणा सर्वांस विनंती आहे की या संधीचा लाभा घ्यावा.

अधिक माहिती करता संपर्क साधा:
मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२ (लीनता),
अश्विनी धर्माधिकारी ९४२२० २५४३१,
ओंकार भोपळे : ९८२३३ ०३०६५

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणिक एक स्तुत्य उपक्रम हर्पेन. माणसं जोडण्याचे हे मैत्रीपूर्ण आवाहन जरूर भोवतालच्या उत्सुक परिचितांपर्यंत पोहोचवेन आणि स्वतःदेखील याबाबत विचार करेन. शुभेच्छा.

प्राचीन +११
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करते.

मी यावेळी विचार करून महिना आणि तारीख कळवतो. मागच्या वर्षी सारखे होणार नाही.
फेसबुकवर शेअर करत आहेच.

धन्यवाद प्राचीन, वावे, शाली.
शाली नक्की कळवा. खूप छान अनुभव असतो.

ही माहिती मित्रमंडळींमधे पोहोचवताय ह्याकरता विशेष आभार

पुण्याला होते तेव्हा ‘मैत्री’ संस्था अमरावती बद्दल काहीच माहीत न्हवत.
आता पुण्याला येण क्वचितच होत. सध्या २ वर्षा पासुन मी मुम्बई मध्ये आहे. तरिही मला आवडेल यायला.

सिद्धी - तुमच्या सोयीचा महिना ठरवा आणि त्याप्रमाणे जरूर कळवा. मेळघाटात काम करण्यासाठी म्हणून आपले काही स्वयंसेवक अमेरिकेतूनही आले आहेत / येतात.

हर्पेन - तुमच्या सोयीचा महिना ठरवा आणि त्याप्रमाणे जरूर कळवा. मेळघाटात काम करण्यासाठी म्हणून आपले काही स्वयंसेवक अमेरिकेतूनही आले आहेत / येतात.
- हो नक्की कळवते.

@ हर्पेन --- याची कल्पना आहे का? की वर दिलेल्या संपर्क व्यक्तींना विचारायचे?
दर महिन्याचा कार्यक्रम काय असेल? काय विषय, काय शिकवायचे हे पूर्वनियोजित आहे की जाणार्‍या व्यक्तीने आपल्या इच्छेप्रमाणे वर्ग घ्यायचे आहेत?
दिवसाला किती तास आणि १ वर्ग किती वेळाचा असेल?
प्रत्यक्ष न जाता, मुलांच्या शंका / प्रश्न यांची लेखी उत्तरे देणे, किंवा स्टडी नोट्स बनवणे असे स्वरूपही असते का?
अभ्यासक्रमाशी / पाठ्यपुस्तकाशी निगडीत शिकवणे असेल पण विषययाचे आकलन होण्याच्य दृष्टीने की फक्त अवांतर -- विष्याची भीती कमी आणि आवड निर्माण करणे यासाठी?

धन्यवाद अंजू, सुनिधी, कारवी
कारवी, मला सर्वसाधारण कल्पना आहे. पूर्वनियोजित आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी उपक्रम असेच स्वरूप असते परंतु अधिक माहिती करता धाग्यात दिलेल्या व्यक्तींंसोबत संपर्क साधावा हे उत्तम.

३ ते ९ ऑगस्ट करता दोन स्वयंसेवक कमी पडताहेत. स्वतः जायला जमणार असेल तर जा कृपया, नाहीतर आपापल्या मित्र मंडळींमधे हे फिरवून स्वयंसेवक मिळवायला मदत करा.

आपण ह्या उपक्रमांतर्गत जानेवारी महिन्यात दिनांक २२ जानेवारी ते २६ जानेवारी २०२० या दरम्यान विज्ञान मेळावा घेणार आहोत. सहभागी होण्यास इच्छूक असणार्‍यांनी ओंकार भोपळे यांच्याशी ९८२३३ ०३०६५ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.