Submitted by गंगी on 29 October, 2009 - 07:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
५/६ लांब हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचा कुट
१ चमचा गोडा मसाला
३/४ चमचे सुक्या खोबरर्याचा किस
२/३ चमचे चिंचेचा कोळ अथवा लिंबाच रस
१ चमचा भाजलेले बेसन
मीठ
तळणीसाठे तेल
क्रमवार पाककृती:
प्रथम मिरच्या धुवुन पुसुन घ्याव्यात. देठे अजिबात काढायची नाहीत.
मिरच्यांना मध्यभागी सुरीने काप देउन बी काधुन टाकावे( दोन्ही टोके न चिरता) . बी ठेवल्यास जास्त तिखट होतात.
आता सारणासाठी भाजलेल्या तिळाचा कुट, सुक्या खोबर्याचा कीस, गोडा मसाला, कोरडे भाजलेले बेसन, मीठ एकत्र करुन चिंचेच्या कोळात अथवा लिंबाच्या रसात कालवावे.
हे सारण मिरच्यामधे भरपुर भरावे.
भज्यासाठी बेसनात हळद मीठ घालुन थोडेसे तेलाचे मोहन घालुन नेहमीप्रमाणे कालवावे.( जास्त पातळ नको आणि एकदम घट्टपन नको )
ह्या पीठात मिरची नीट बुडबुन तेलात तळुन घ्याव्यात.
अधिक टिपा:
सोबत ता़क वा मठ्ठा तयार असावा..
माहितीचा स्रोत:
वहिनी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडतात ही भजी. छान
मला आवडतात ही भजी. छान पाककृती.
हे घे प्रिती..
हे घे प्रिती..
किट्टू, हा भज्यांआधीच्या
किट्टू, हा भज्यांआधीच्या मिरच्यांचा फोटो आहे का ? मग भज्यांचा कोठे आहे ?
किट्टु मस्त पाककृती आणि मला
किट्टु मस्त पाककृती आणि मला माहित्ये हा फोटो.. आता आज भजी कर आणि तयार भजीचा फोटो टाक..
बाकि वरच्या मिरच्या सॉलीड यम्मी दिसतायत.
मी अशी भजी कधी केली नाहिये.. नक्कि करेन आता.
भजी संsssपली... हा फोटु तसा
भजी संsssपली...
हा फोटु तसा जुनाच आहे..मी शीट्टीत असतांना एका gtg ला केली होती..
नाशिक जवळ (औरंगाबाद हायवेवर)
नाशिक जवळ (औरंगाबाद हायवेवर) 'वडाळ-भोई' नावाचे गाव आहे तिथे क्लासिक मिरचि भजी मिळतात.
बापरे पण मिरच्या बघून तिखट
बापरे पण मिरच्या बघून तिखट असाव्यात असं वाटतं आहे.. खाताना जळजळ होत नाही का? मला वाटलं भज्यांची मिरची वापरायची असेल जी कमी तिखट असते.
मी हेच विचारणार होते.. ही
मी हेच विचारणार होते.. ही नेहेमीच्या मिरचीची भजी आहे, की थोड्या बुटक्या, जाड्या मिरच्या मिळतात (भरून, वाळवायच्या) त्याची आहे? बीया काढल्यानंतर मॉडरेट तिखट होते का भजी?
तो फोटो मात्र फार टेम्प्टींग आलाय
पूनम, लांब, साधारण पोपटी
पूनम, लांब, साधारण पोपटी रंगाच्या फुगीर मिरच्या असतात. भाजीवाल्यांकडे भज्यांच्या मिरच्या अश्या नावानेच मिळतात त्या.
तो फोटो लईच भारी आलाय.
मला वाटलं भज्यांची मिरची
मला वाटलं भज्यांची मिरची वापरायची असेल जी कमी तिखट असते.>>> सोनचाफा.. psg..ही पण भज्यांचीच आहेत मिरची.... ह्या हिरव्यागार असतात आणि उंचपन ...बीया काढल्यावर मॉडरेट होते आणि चिंच्/लिंबुने पन तिखट्पना कमी होतो..पण खुप कमी तिखट खाणार्यांनी जरा जपुनच..
मंजु...त्या पोपटी मिरच्यांना अजिबातच चव नसते.. त्यापेक्षा ह्या चांगल्या... बी काढली की नाही होत फार तिखट.. आणि तिखटच नसतील तर ती मिर्ची भजी कसली...
आमच्याकडे सगळे जमलो की एकदातरी होतातच मिर्ची भजी तेही जेवनात्..मग बाकी काही नसते... नंतर मग थोडा दहीभात बस्स्स...
मैसुर ला व्रुंदावन गार्डन मधे मिरची भजी दिसली म्हनुन हावरटासारखी घेतली..पन सगळा अपेक्षा भंग झाला... त्यात मसाला काहीच् नव्हता..आणि पोपटी मिरची असल्यामुळे अगदीच मिळमिळीत
हैद्राबाद्ला ही भजी खूप छान मिळतात असे एकुन आहे..
बाप रे किट्टू, त्या पोपटी
बाप रे किट्टू, त्या पोपटी मिरच्यांची भजीच एवढी सणसणीत तिखट होतात तर त्याहीपेक्षा तिखट मिरच्यांची भजी तू कशी काय खाऊ शकतेस
ठाण्यात एक वडापाव वाला एक घाणा तळून झाला की बचकभर मिरच्या तळणीत टाकतो आणि वरून त्यावर मीठ शिँपडतो. असा सही ठसकेदार घमघमाट पसरतो ना की बस् ... मला वाटतं की वड्यांपेक्षा ह्या मिरच्यांसाठीच त्याच्या गाडीवर गर्दी होत असावी.
किट्टू. बरोबर. ते चिकन ६५
किट्टू. बरोबर. ते चिकन ६५ बरोबर हैद्राबाद चे राष्ट्रीय खाद्य आहे. काही लोक आणि वरून आमचूर पावडर वगैरे टाकतात. जीभ खवळलीच पाहिजे. एकदा घरी करीन आता.
अरे काय हा छळ मांडलाय तुम्ही
अरे काय हा छळ मांडलाय तुम्ही लोकांनी
इथे आमच्याकडे फक्त चिली पॅडी ह्या थाईलंडकडच्या मिरच्या मिळतात त्या लवंगी असतात.
कमी तिखट असलेल्या, लांब, भरपुर बीया असलेल्या, पोपटांना आवडणार्या मिरच्या असतात त्या मिरच्यांची भजी छान होतात. विदर्भात मी शाळेत असताना अगदी शाळेसमोर रोज पहाटे थंडीच्या दिवसात ह्या मिरच्या तळताना मी पाहिले आहे.
हादग्याच्या फुलांची आणि दोडक्याची भजी एक अगदी छान होतात.
खरय मंजु..वडापाव बरोबर तळलेली
खरय मंजु..वडापाव बरोबर तळलेली मिर्ची ..अहाहा..काय लागते म्हणुन सांगु
हैद्राबाद चे राष्ट्रीय खाद्य >>> हो... आमच्या नातेवाइक मधल्या एकाच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा लग्नातपन जेवनात हा पदार्थ होता...आमच्या वाटयाला येइपर्यंत सगळ्यानी त्याचा चट्टामट्टा केला..
मी आजवर जेवढ्याही पंगती आणि
मी आजवर जेवढ्याही पंगती आणि पार्ट्या पाहिल्यात त्यात जर भजी असेल जेवणाला तर नंतर जेवणार्या लोकांना उरतचं नाहीत भजी
माझे पप्पा मस्त करतात मिरची
माझे पप्पा मस्त करतात मिरची भजी. झणझणीत लागते पण अति तिखट अजिब्बात होत नाही...