मिर्ची भजी

Submitted by गंगी on 29 October, 2009 - 07:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५/६ लांब हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचा कुट
१ चमचा गोडा मसाला
३/४ चमचे सुक्या खोबरर्‍याचा किस
२/३ चमचे चिंचेचा कोळ अथवा लिंबाच रस
१ चमचा भाजलेले बेसन
मीठ
तळणीसाठे तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम मिरच्या धुवुन पुसुन घ्याव्यात. देठे अजिबात काढायची नाहीत.
मिरच्यांना मध्यभागी सुरीने काप देउन बी काधुन टाकावे( दोन्ही टोके न चिरता) . बी ठेवल्यास जास्त तिखट होतात.
आता सारणासाठी भाजलेल्या तिळाचा कुट, सुक्या खोबर्‍याचा कीस, गोडा मसाला, कोरडे भाजलेले बेसन, मीठ एकत्र करुन चिंचेच्या कोळात अथवा लिंबाच्या रसात कालवावे.
हे सारण मिरच्यामधे भरपुर भरावे.
भज्यासाठी बेसनात हळद मीठ घालुन थोडेसे तेलाचे मोहन घालुन नेहमीप्रमाणे कालवावे.( जास्त पातळ नको आणि एकदम घट्टपन नको )
ह्या पीठात मिरची नीट बुडबुन तेलात तळुन घ्याव्यात.

अधिक टिपा: 

सोबत ता़क वा मठ्ठा तयार असावा.. Happy

माहितीचा स्रोत: 
वहिनी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किट्टु मस्त पाककृती आणि मला माहित्ये हा फोटो.. Happy आता आज भजी कर आणि तयार भजीचा फोटो टाक..
बाकि वरच्या मिरच्या सॉलीड यम्मी दिसतायत.
मी अशी भजी कधी केली नाहिये.. नक्कि करेन आता.

बापरे पण मिरच्या बघून तिखट असाव्यात असं वाटतं आहे.. खाताना जळजळ होत नाही का? मला वाटलं भज्यांची मिरची वापरायची असेल जी कमी तिखट असते.

मी हेच विचारणार होते.. ही नेहेमीच्या मिरचीची भजी आहे, की थोड्या बुटक्या, जाड्या मिरच्या मिळतात (भरून, वाळवायच्या) त्याची आहे? बीया काढल्यानंतर मॉडरेट तिखट होते का भजी?

तो फोटो मात्र फार टेम्प्टींग आलाय Happy

पूनम, लांब, साधारण पोपटी रंगाच्या फुगीर मिरच्या असतात. भाजीवाल्यांकडे भज्यांच्या मिरच्या अश्या नावानेच मिळतात त्या.
तो फोटो लईच भारी आलाय.

मला वाटलं भज्यांची मिरची वापरायची असेल जी कमी तिखट असते.>>> सोनचाफा.. psg..ही पण भज्यांचीच आहेत मिरची.... ह्या हिरव्यागार असतात आणि उंचपन ...बीया काढल्यावर मॉडरेट होते आणि चिंच्/लिंबुने पन तिखट्पना कमी होतो..पण खुप कमी तिखट खाणार्‍यांनी जरा जपुनच..

मंजु...त्या पोपटी मिरच्यांना अजिबातच चव नसते.. त्यापेक्षा ह्या चांगल्या... बी काढली की नाही होत फार तिखट.. आणि तिखटच नसतील तर ती मिर्ची भजी कसली...

आमच्याकडे सगळे जमलो की एकदातरी होतातच मिर्ची भजी तेही जेवनात्..मग बाकी काही नसते... नंतर मग थोडा दहीभात बस्स्स... Happy

मैसुर ला व्रुंदावन गार्डन मधे मिरची भजी दिसली म्हनुन हावरटासारखी घेतली..पन सगळा अपेक्षा भंग झाला... त्यात मसाला काहीच् नव्हता..आणि पोपटी मिरची असल्यामुळे अगदीच मिळमिळीत Uhoh

हैद्राबाद्ला ही भजी खूप छान मिळतात असे एकुन आहे..

बाप रे किट्टू, त्या पोपटी मिरच्यांची भजीच एवढी सणसणीत तिखट होतात तर त्याहीपेक्षा तिखट मिरच्यांची भजी तू कशी काय खाऊ शकतेस Happy

ठाण्यात एक वडापाव वाला एक घाणा तळून झाला की बचकभर मिरच्या तळणीत टाकतो आणि वरून त्यावर मीठ शिँपडतो. असा सही ठसकेदार घमघमाट पसरतो ना की बस् ... मला वाटतं की वड्यांपेक्षा ह्या मिरच्यांसाठीच त्याच्या गाडीवर गर्दी होत असावी.

किट्टू. बरोबर. ते चिकन ६५ बरोबर हैद्राबाद चे राष्ट्रीय खाद्य आहे. काही लोक आणि वरून आमचूर पावडर वगैरे टाकतात. जीभ खवळलीच पाहिजे. एकदा घरी करीन आता.

अरे काय हा छळ मांडलाय तुम्ही लोकांनी Happy

इथे आमच्याकडे फक्त चिली पॅडी ह्या थाईलंडकडच्या मिरच्या मिळतात त्या लवंगी असतात.

कमी तिखट असलेल्या, लांब, भरपुर बीया असलेल्या, पोपटांना आवडणार्‍या मिरच्या असतात त्या मिरच्यांची भजी छान होतात. विदर्भात मी शाळेत असताना अगदी शाळेसमोर रोज पहाटे थंडीच्या दिवसात ह्या मिरच्या तळताना मी पाहिले आहे.

हादग्याच्या फुलांची आणि दोडक्याची भजी एक अगदी छान होतात.

खरय मंजु..वडापाव बरोबर तळलेली मिर्ची ..अहाहा..काय लागते म्हणुन सांगु Happy

हैद्राबाद चे राष्ट्रीय खाद्य >>> Proud हो... आमच्या नातेवाइक मधल्या एकाच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा लग्नातपन जेवनात हा पदार्थ होता...आमच्या वाटयाला येइपर्यंत सगळ्यानी त्याचा चट्टामट्टा केला..

मी आजवर जेवढ्याही पंगती आणि पार्ट्या पाहिल्यात त्यात जर भजी असेल जेवणाला तर नंतर जेवणार्‍या लोकांना उरतचं नाहीत भजी Happy