नोटबंदी घोटाळा उलगडणा-या स्टिंग मोहीमा

Submitted by किरणुद्दीन on 31 May, 2019 - 10:36

हा धागा राजकारण या ग्रुपात उघडताना दु:ख होतंय. पण घोटाळे, भ्रष्टाचार यासंबंधीचा ग्रुप सापडला नाही.

नोटबंदी मधे भ्रष्टाचार झाला असावा याची शंका ३१ मार्च ही दिलेली मुदत उलटून ग्गेल्या नंतरही रिजर्व्ह बँकेने हिशेब देण्यात टाळाटाळ सुरू केली तशी येऊ लागली. जून महीन्याच्या दरम्यान अनेक जण पैसे बदलताना सापडले. काही अ‍ॅक्सिज बँकेत तर काही थेट रिझर्व्ह बँकेतून. तरी सुद्धा घोटाळा कसा झाला असावा याची काही एक कल्पना येत नव्हती. अगदी अमित शहा यांचे एक सहाय्यक म्हणवल्या जाणा-या गुजराती व्यापा-याकडे १६००० कोटींची नव्या नोटांची रोख रक्कम सापडली तरीही.

या दरम्यान काही पत्रकारांनी या सर्व घोटाळ्याचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याचे व्हिडीओज अपलोड करण्यासाठी त्यांना दोन महीन्यांपूर्वी मुहूर्त मिळाला. पहिल्या भागाची लिंक इथे देत आहे. इतर भाग त्याच पेजवर आजूबाजूलाच मिळतील.

कंटाळा आला तरी शेवटपर्यंत पहा. कारण हे व्हिडीओज काढून घेतले जाण्याची शक्यता जास्त आहे.
ट्रोल्स भकरटवण्याचा प्रयत्न करणार हे शंभर टक्के. आपण दुर्लक्ष करूयात.

https://tnn.world/tsunami-of-stings-modis-bjp-unmasked-part-1/?fbclid=Iw...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पकौडेवाला. धाग्याशी संबंधित नाही प्रतिसाद. तुम्हाला सांगू शकतोय.
Submitted by किरणुद्दीन on 1 June, 2019 - 12:40
<<

तुम्ही जी मागच्य पानावर लिंक टाकलेय तीच अन धाग्याचा काय संबध आहे, ते सांगता का ?

हा धागा राजकारण या ग्रुपात उघडताना दु:ख होतंय. पण घोटाळे, भ्रष्टाचार यासंबंधीचा ग्रुप सापडला नाही.>>>>>

उगीच दुःखी होऊ नका, अडमीनना सांगून घोटाळेग्रुप बनवून घ्या. नवा ग्रुप बनवायला अडमिनना खर्च येतो का ते माहीत नाही पण जर येत असेल तर आपल्या सर्वांसाठी अडमीन आनंदाने हा खर्च उचलतात, आपल्याला तोशीस देत नाही.

अजून बरेच घोटाळे लोकसत्तासारख्या वृत्तपत्रांना छापायचे आहेत. त्या सगळ्यांनी गेली 5 वर्षे पुरावे गोळा करण्यात घालवले. 'आयेगा तो मोदीच' यावर सामान्य जनतेपेक्षा त्यांचा जास्त विश्वास असल्याने त्यांनी हे सगळे पुरावे मोदींनी परत सत्ताग्रहण केल्यावर बाहेर काढायचे असे एकमताने ठरवले होते. उगीच आधीच छापले, लोकांनी ते वाचून विश्वास ठेवला आणि चुकून राहुलला निवडून आणले तर.... ही भीती होतीच. तरी काहीजण म्हणत होते, छापुया आधीच, आपली विश्वासार्हता तशीही धुळीला मिळाली आहे, हे छापून फारसा फरक पडणार नाही. तरी असो, लोकसत्ताकरांचा निर्णय सर्वोच्च.

निवडून आलेल्या एनडीएच्या खासदारांपुढे मोदींनी जे विचार मांडले, ज्या प्रकारचे सहकार्य खासदारांकडून मागितले, ते सर्व प्रत्यक्षात झाले तर देशाचा कायापालट होईल आणि 2024 साली परत मोदीच डोक्यावर येऊन बसतील यात काहीही शंका नाही.

त्यामुळे मोदी म्हणाले तसे आता विरोधकांना फाटक्या तोंडाच्या काही वाचाळवीर भाजप खासदारांचाच काय तो आधार आहे. त्यांनी तोंड उघडून काही विचार यांच्या अंगावर टाकले तर विरोधकांचे दोन दिवस बरे जातील. तसे होईपर्यंत विश्वासार्हता शून्य झालेल्या वृत्तपत्रे व पत्रकारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा सहारा घेऊन दिवस ढकलायचे.

>>तुम्ही जी मागच्य पानावर लिंक टाकलेय तीच अन धाग्याचा काय संबध आहे, ते सांगता का ?<<

असे नेमके प्रश्न विचारु नका त्यांना!
प्रश्न विचारलेले आवडत नाहीत अश्या लोकांना Proud

निवडून आलेल्या एनडीएच्या खासदारांपुढे मोदींनी जे विचार मांडले, ज्या प्रकारचे सहकार्य खासदारांकडून मागितले, ते सर्व प्रत्यक्षात झाले तर देशाचा कायापालट होईल आणि 2024 साली परत मोदीच डोक्यावर येऊन बसतील यात काहीही शंका नाही. >>>>

२०१४ मध्ये निवडून आलेल्या एनडीएच्या खासदारांपुढे मोदींनी जे विचार मांडले होते ते बघा आणी त्यातील किती प्रत्यक्ष झाले त्याचा अभ्यास करा आणी इथे मांडा आधी.

बाकी २०२४ काय, आता मोदी देश डुबवल्याशिवाय जाणारच नाहित हे आम्हालाली माहिती आहे.

साधनाताई यांना ट्रोल म्हणून जाहीर करताना वाईट वाटतेय.. पण त्यांनीच हा बहुमान कमावला आहे. नाईलाज.>>>>>

ट्रोल म्हणजे काय ते आधी सांगा.

ट्रोल म्हणजे काहीही कारण नसताना फक्त त्रास द्यायच्या हेतूने एकच (न)मुद्दा घेऊन वाद घालणारी व्यक्ती असे मी वाचलेय. या व्याख्येत मी कुठे बसतेय? मी दिवसभर गोल गोल जिलब्या पाडत नाही, कोणावरही व्यक्तिगत हल्ले करत नाही की नसलेले मुद्दे घेऊन भांडत नाही. मग मी ट्रोल कशी?

एनी वेज, तुमची मर्जी. तुम्हीही एकदा आरसा पाहून घ्या एवढेच बोलू शकते.

२०१४ मध्ये निवडून आलेल्या एनडीएच्या खासदारांपुढे मोदींनी जे विचार मांडले होते ते बघा आणी त्यातील किती प्रत्यक्ष झाले त्याचा अभ्यास करा आणी इथे मांडा आधी.>>>>

त्यातले खूप काही केले. सगळेच करणे शक्य नाही.

बाकी २०२४ काय, आता मोदी देश डुबवल्याशिवाय जाणारच नाहित हे आम्हालाली माहिती आहे.>>>

थांक्यु. 2024 मध्येही मोदीच.

साधनाजी
तुम्ही काय करत आहात हे तुम्हालाही समजत नाहीये. प्रभू तुम्हाला माफ करो.

प्रत्येक धाग्यावर चकल्या पाडताना विषयाशी संबंधित एखादा शब्द जरी आला असता तर. उदा. या धाग्यावर व्हिडीओतले कंटेट !!!
तुमच्या दृष्टीने तुम्ही जे लिहीले आहे त्याला मुद्देसूद म्हणत असतील तर आरशाची तरी काय गरज ? दर्पण झूठ ना बोले

ट्रोल किंग किरणउद्दीन, तुम्ही काही आठवड्यांपूर्वी "साडीत साडी मोदी साडी" नावाची विकृत जिलबी पाडलेली.त्याला मी मायबोलीवरील ट्रोलची हाईट म्हणेन.

त्यामानाने बाकी जे काही करताहेत ते फार सौम्य आहे.

सांगा ना काय केले ! मुद्देसुद बोला !

Submitted by पकौडेवाला on 1 June, 2019 - 19:35 >>> इथे मायबोलीवरच योग नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी तुझ्या प्रश्नाचं मुद्देसूद उत्तर देण्यासाठी आधीच एक अख्खा धागा काढला होता. तो शोध नि वाच.

इथे दिलेल्या माहीतीचा उपयोग होत नाही हे तुम्हाला ठाऊक असेल तर या तात्पुरत्या आयडीसहीत ओरिजिनल देखील उडवून घ्या आणि एखाद्या चांगल्या कार्याला वाहून घ्यावे. हा अत्यंत तळामळीने दिलेला सल्ला आहे.
Submitted by किरणुद्दीन on 31 May, 2019 - 15:59

हाच सल्ला तुम्ही स्वतः ला देऊन बघितलाय का ?
काही फरक पडला का?

आणि दिला असेल तर फरक पडलेला दिसत नाही.

त्यामुळे फुकाचे सल्ले इतरांना देण्याचे सोडून पोटापाण्याचे बघावे हि विनंती

https://tnn.world/tsunami-of-stings-modis-bjp-unmasked-part-1/?fbclid=Iw...

ह्यात जो वरचा दुवा तुम्ही दिलेला आहे वादग्रस्त आहे. tnn.world ही ईंग्लंडम्ध्ये २०१८ नोव्हेंबर बनवलेली कंपनी असुन त्याचे मालक कपिल सिब्बल आहे. त्या नंतर स्व:ता कपिल सिब्बल ईंग्लंड मध्ये EVM hacking conference कर ण्यासाठी जाने २०१९ ला पोहोचतात. तिथे ह्या EVM hacking conference चा विचका होतो.
Under attack from BJP, Kapil Sibal tries to save face after EVM hacking drama
https://www.indiatoday.in/elections/story/kapil-sibal-ravi-shankar-prasa...

एप्रिल २०१९ मध्ये नोटबंदीच्या दरम्यान घोटाळा झाला असा दुर्प्रचार करणारे कपिल सिब्बल स्वःताच tnn.world
वरील एका व्हिडीयोचा हवाला देतात. तिथेही ते स्वःताच फसतात.
The history of shady website behind Demonetisation ‘sting’ video https://rightlog.in/2019/04/tnn-kapil-sibal-demonetisation-01/

१. The history of shady website behind Demonetisation ‘sting’ video
https://rightlog.in/2019/04/tnn-kapil-sibal-demonetisation-01/

२. Behind Opposition’s sting video: London firm, Romanian director, and one Catherine
https://indianexpress.com/elections/behind-oppositions-sting-video-londo...

३. https://theprint.in/india/governance/kapil-sibal-backed-htn-news-is-tira...
ib-ministry-rejecting-its-application/196852/

४. https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-truth-behind-the-v...

@विवेक नाईक,
या धाग्याचा उद्देश फक्त ट्रोलिंग करणे इतकाच आहे.
तेंव्हा असल्या चिरकुट धाग्यावर, अभ्यासू दुवे देण्याला काहीच अर्थ नाही.

विवेक नाईक
इतक्या लिंका दिल्या आहेत तेव्हां या स्टिंग ऑपरेशन मधे जे दिसतंय त्याबाबतचा खुलासा असेल अथवा स्टिंग कसे चुकीचे आहे हे दर्शवले असेल असे वाटले होते. ते चालले असते. कारण धुके निवळले पाहीजे.

पण इथे तुम्ही सर्वात पहिली जी लिंक दिलेली आहे ती इंडीया टुडेची आहे. तीत कपिल सिब्बल यांनी लंडन येथे जी कॉन्फरन्स अटेण्ड केली होती त्याबाबतची बातमी आहे. या धाग्यात कुठेही सय्यद शुजाच्या कॉन्फरन्सचा उल्लेख नाही. कारण शुजा आणि डिंडा हे फ्रॉड आहेत यावर माझा विश्वास आहे. एका भाजप्येयाने लिंक न देता त्यांचा भांडाफोड झाला आहे असे म्हटल्याने मी तसा सर्च दिल्यावर मला डिंडाच्या ऑडीओ टेपचा खुलासा झाला. माझ्यासाठी ते महत्वाचे ठरले. हा विषय तिथे संपला. इतकेच नाही जेव्हां कुणी सय्यद शुजाचा उल्लेख केला त्याला या लिंक्स मी दिल्या आहेत.

इथे त्याचा उल्लेख करण्याचे किंवा त्याच्याशी संबंधित कॉन्फरन्स कपिल सब्बल यांनी अटेण्ड केली ही अनावश्यक माहिती देण्याचे आणि त्या अनावश्यक माहितीच्या लिंका चिकटवण्याचे कारण समजले नाही. तुम्ही कपिल सिब्बल यांच्यावर वेगळा धागा काढू शकता किंवा इथेही देऊ शकता. मात्र सय्यद शुजा आणि स्टिंग ऑपरेशनचा संबंध काय ?

दुसरी लिंक जी दिली आहे ती धडधडीत राईट विंग या ब्लॉकची आहे. अतुल कुमार मिश्रा , द फ्रस्टेटेड इंडीयन म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे एका समुदायावरचे लेख वादग्रस्त ठरले आहेत. ते ओपनली संघ परिवाराशी संबंधित आहेत. इतके की थोडा सर्च दिला की सापडेल.
असेनात का, कुठल्या परिवाराशी संबंधित.

पण त्यांनी त्यात हवेतल्या गप्पाच हाणल्या आहेत.
कसलाच ठोस पुरावा नाही.

आता कपिल सिब्बल आणि त्या वेबसाईटच्या कनेक्शनचा दावा खरा जरी धरला तरी व्हिडीओत जे दिसते आहे ते कसे बदलते हे मला समजत नाही. म्हणजे गुजरातेतले भाजपचे हेडक्वार्टर, भाजप कार्यकर्ते, व्हिडीओतले भाजपशी संबंधित हे लोक सुद्धा सिब्बल यांच्या मालकीचे असतील का ? की भाजप हा पक्षच सिब्बल यांच्या मालकीचा आहे असे म्हणायचे आहे ?

तसे असेल तर सिब्बल यांनी भाजपच्या नेत्यांना जे सिब्बल यांच्या मालकीचे आहेत, सूचना देऊन व्हिडीओत अभिनय करायला सांगितला असावा हे निष्कर्ष निघू शकतो.

पुढचे व्हिडीओज तरी तर्काला धरून आहेत की असेच ?

घोटाळा म्हणायच्या आधी, त्याबाबतीत एफ आय आर दाखल झाली का , न्यायालयात खटला उभा राहीला का व हे व्हिडिओ न्यायालयात पुरावे म्हणुन दाखल झालेत का हे धागालेखकाने सान्गाव...

नाहीतर कोन्स्पीरसी थिअरि म्हणुन सोडुन देउया.

मिश्चलनीकरणामुळे बहुसंख्य जनतेला काहीही त्रास झाला नाही. बहुसंख्य जनता ही अडीच वर्षांपूर्वीची घटना केव्हाच विसरून पुढे गेली. निवडणुकीत या मुद्द्यावर रान उठवण्याचा प्रयत्न झाला, पण जनतेने तो हाणून पाडला. निश्चलनीकरण, वस्तू व सेवा कर, राफेल असे जनतेच्या दृष्टीने शून्य महत्त्व असलेले मुद्दे प्रचारात आणून पप्पू तोंडावर आपटला. आता निकाल लागून मोदी अजून सामर्थ्यवान होऊन परतल्यानंतरही त्याच शिळ्या कढीला उत आणण्याचा वेडपट प्रयत्न सुरू आहे.

लावा रे तो व्हिडिओ!

चिरणुद्दीन. मंजो उर्फ मी माझा उर्फ खपु उर्फ कबीर उर्फ वीक्ष यांनी आता तुम्हाला जन्म दिला का? चालू द्या.

मित्रा ... भ्रमिष्ठ होत चालला आहेस. लवकरात लवकर औषधोपचार करून घे अन्यथा काही दिवसांनी कपडे फाडून मोदींना शिव्या देताना दिसशील.

ते ओपनली संघ परिवाराशी संबंधित आहेत. इतके की थोडा सर्च दिला की सापडेल.

अरे त्रस्त जीवा.... ओपनली संघ परिवाराशी संबंधित असणे यात चुकीचे काय आहे ?
ती पण एक विचारसरणी आहे. जसा तू ओपनली मी कोंगी विचारसरणी चा आहे असे सांगून एका घराण्याची जाहीर गुलामी करतोस त्या पेक्षा संघाचे म्हणवले जाणे कितीतरी पटीने चांगले !

ओपनली संघ परिवाराशी संबंधित असणे यात चुकीचे काय आहे ? >>> काहिच चुकीचे नाहि. पण चड्डी वाले घाबरतात. संघ परिवार कधी उलटेल सांगता येत नाहि .

https://www.youtube.com/watch?v=bRP0JVtXDjU

ओपनली संघ परिवाराशी संबंधित असणे यात चुकीचे काय आहे ? >>> असंबद्ध प्रश्न, असंबद्ध प्रतिसाद, असंबद्ध प्रतिवाद यांनी ट्रोलिंग चालू आहे.
एक विवेक नाईक म्हणतात ज्या वेबसाईटवर स्टिंग ओपरेशनचे व्हिडीओ आहेत ती वेबसाईटच कपिल सिब्बल यांच्या मालकीची आहे म्हणून स्टिंग ओपरेशनवर ते शंका घेतात.
पण ज्या वेबसाईटचा हवाला देऊन सांगितले ती भगव्यांची आहे यात चुकीचे काय असा प्रश्न आणखी तिसरे विचारतात. त्या वेळी ज्याने पहिला प्रतिसाद दिला तो पुढे येत नाही. मी त्या प्रतिसादातच या संभाव्य प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तरीही हे प्रश्न विचारत राहतात कारण ४० पैशांसाठी त्यांना ते करावे लागते. पुन्हा पुन्हा तीच तीच उत्तरे काय द्यायची यांना ? आता शंभर प्रतिसादानंतर यांची कोल्हेकुई चालू होईल, एक धड प्रश्नाचे उत्तर दिले नाही म्हणून..

कारण ४० पैशांसाठी त्यांना ते करावे लागते.

४० पैसे हा आकडा कुठून मिळाला ?अशी व्यवस्था अस्तित्वात आहेत याचे पुरावे देता येतील का ?
समजा,अशी व्यवस्था आहे असे मानले, आणि त्याच न्यायाने विचार केला तर किरण दादा इथे ज्या पद्धतीने वांत्या झाल्यासारखे धागे काढत आहे त्याचे कितीक पैसे मिळत असतील ? ४ पैसे ?कारण पक्ष तर आता कंगाल झाला आहे.
पैसे मिळत असतील तर त्याचा तपशील किरण ने इथे जाहीर करावा.

त्या पेक्षा निवडणुकीच्या आकड्यात फरक कसा आला यावर बोला.
व्हिडीओत पैसे घेताना बदलून देताना स्पष्ट दिसत आहेत त्या भाजपेयींबद्दल बोला.

त्याचे खुलासे झाले की बोलू हां आपण. मग तुम्हाला पाहीजेत ती उत्तरं हजर स्टॉक मधे मिळतील.

कॉंग्रेसींचा चिवटपणा कौतुकास्पद आहे. जनतेने इतक्या वेळा जोरदार तोंडावर आपटवून सुद्धा यांचा मूर्खपणा कमी होत नाही.

निश्चलनीकरणावरून रान उठवून झाले, वस्तू व सेवा करावरून थापेबाजी करून झाली, राफेलवर धडधडीत खोटे आरोप करून झाले, असंख्य व्यक्तिगत आरोप करून चारित्र्यहनन करून झाले, प्रियांका नावाचे ब्रह्मास्त्र सोडून झाले (ते शेवटी फुसका लवंगी फटाका निघाले), मतदान यंत्रावर असंख्य शंका घेऊन झाल्या, कपाळावर टिळा लावून सदऱ्यावरून जानवे परिधान करून झाले, डोक्यावर जाळीदार टोपी परिधान करून हलाल हाडे मोडून झाली, ७२००० चे आश्वासन देऊन झाले . . . पण जनतेने यांना कोणतीही भीक न घालता सणसणीत तोंडावर आपटवले.

पण तरीही चिवटपणा कायम आहे.

Submitted by Kabeer on 9 June, 2019 - 22:53. >>>

माझ्या मते तरी नाहीत.
एका ठिकाणी ज्यांचा राजकीय विरोध करतात त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणे व दुसऱ्या ठिकाणी ते ज्यांना राजकीय समर्थन करतात त्यांचे नाव इतरांना माहीत न पडू देणे अशा कसरती करण्यासाठी त्यांना ठोस भूमिका ना घेता वारंवार संभ्रम निर्माण करावा लागतो. शहरी नक्षलवादीही संभ्रम निर्माण करतात , परंतु तो विचारधारेचा / इतिहासाचा संभ्रम असतो. इथे आपले भाऊ अजून स्वतःच्या व्यक्तिगत संभ्रमात अडकलेत. त्यांना शहरी नक्षलवादी स्वतःच्या कंपूत घेणार नाहीत. याच कारण म्हणजे त्यांचा ठाम मत व्यक्त करण्याबाबतचा कमकुवतपणा !

Pages