Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 June, 2019 - 11:27
************
मनाचा किनारा
चिवट चिकट
सोडता सोडत
नाही कधी ॥
रंगांचे विभ्रम
दाखवी अनेक
घडती कित्येक
भास नवे ॥
भय दलदल
कधी दाखवून
घेतसे ओढून
स्वतः कडे ॥
कधी अधिकार
कवण्या पदाचा
संतांच्या मठाचा
महाथोर ॥
कधी अनुभूती
ध्यानी ज्या येती
त्याची संगती
बांधुनिया ॥
रंग रूप रस
अवघे इमले
मनाने बांधले
असे जगी ॥
दत्ताने दाविले
म्हणूनी कळले
विक्रांता घडले
पाहणे ही ॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुरेख.
खुप सुरेख.
तुमच्या कविता (अभंग) नेहमी भावतात.
शाली..अनेक धन्यवाद
शाली..अनेक धन्यवाद
मस्त....
मस्त....
थॅंक्स
थॅंक्स
फारच सुंदर ... आपण नेहमी गुरु
फारच सुंदर ... आपण नेहमी गुरु दत्तावर लिहिता आणि एकदम मनाला भावेल असेच लिहिता
खूप धन्यवाद !
खूप धन्यवाद !