हा धागा राजकारण या ग्रुपात उघडताना दु:ख होतंय. पण घोटाळे, भ्रष्टाचार यासंबंधीचा ग्रुप सापडला नाही.
नोटबंदी मधे भ्रष्टाचार झाला असावा याची शंका ३१ मार्च ही दिलेली मुदत उलटून ग्गेल्या नंतरही रिजर्व्ह बँकेने हिशेब देण्यात टाळाटाळ सुरू केली तशी येऊ लागली. जून महीन्याच्या दरम्यान अनेक जण पैसे बदलताना सापडले. काही अॅक्सिज बँकेत तर काही थेट रिझर्व्ह बँकेतून. तरी सुद्धा घोटाळा कसा झाला असावा याची काही एक कल्पना येत नव्हती. अगदी अमित शहा यांचे एक सहाय्यक म्हणवल्या जाणा-या गुजराती व्यापा-याकडे १६००० कोटींची नव्या नोटांची रोख रक्कम सापडली तरीही.
या दरम्यान काही पत्रकारांनी या सर्व घोटाळ्याचे स्टिंग ऑपरेशन केले. त्याचे व्हिडीओज अपलोड करण्यासाठी त्यांना दोन महीन्यांपूर्वी मुहूर्त मिळाला. पहिल्या भागाची लिंक इथे देत आहे. इतर भाग त्याच पेजवर आजूबाजूलाच मिळतील.
कंटाळा आला तरी शेवटपर्यंत पहा. कारण हे व्हिडीओज काढून घेतले जाण्याची शक्यता जास्त आहे.
ट्रोल्स भकरटवण्याचा प्रयत्न करणार हे शंभर टक्के. आपण दुर्लक्ष करूयात.
https://tnn.world/tsunami-of-stings-modis-bjp-unmasked-part-1/?fbclid=Iw...
किरणुद्दीन,
किरणुद्दीन,
तुम्ही बातम्यांचे जे दाखले देत आहात (ईथे आणि ईवीएमच्या धाग्यांवर) त्यांना न्यूज नाही कॉन्स्पिरसी थिअरी म्हणतात. आपल्या सोयीचे पुरावे गोळा करुन काहीतरी कट शिजत असल्याचा देखावा ऊभा करायचा. तुम्ही तो करत आहात असे नाही पण तुम्ही त्यांना बळी पडत आहात.
नॅशनल प्रिंट मिडिया वाचत चला बर्यापैकी जबाबदार वार्तांकन, बर्यापैकी विश्वसनीय माहिती मिळेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळेचा सदुपयोग झाल्याचे समाधानही मिळेल.
हा मित्रत्वाचा सल्ला आहे तुम्ही तो खिलाडू वृत्तीने घेतल्यास मला सुखद वगैरे काय म्हणतात तसा धक्का बसेल.
हायझेनबर्ग +१
हायझेनबर्ग +१
यात मेन्स्ट्रीम मिडिया सुद्धा मागे नाहि. यालाच विचहंट हि म्हणतात. हल्ली अशा गोष्टिंकरता सोशल मिडीया अगदि सुपिक जमिन झालेली आहे...
@हाब, +१
@हाब, +१
तुम्ही बातम्यांचे जे दाखले
तुम्ही बातम्यांचे जे दाखले देत आहात (ईथे आणि ईवीएमच्या धाग्यांवर) त्यांना न्यूज नाही कॉन्स्पिरसी थिअरी म्हणतात. आपल्या सोयीचे पुरावे गोळा करुन काहीतरी कट शिजत असल्याचा देखावा ऊभा करायचा. तुम्ही तो करत आहात असे नाही पण तुम्ही त्यांना बळी पडत आहात. >>>>
मग १६००० करोड आणी महेश शहा याचे काय झाले हे तुम्हि सांगा !
या स्टिंग ऑपरेशन वाल्यांना
या स्टिंग ऑपरेशन वाल्यांना अटक व्हायला हवी खोटे असेल तर...
हे सगळे व्हिडीओज पहायला कमीत
हे सगळे व्हिडीओज पहायला कमीत कमी एक दिवस नक्कीच लागेल. संपूर्ण पाहील्यानंतर आणि कुठल्याही एका पक्षासाठी बायस्ड न राहता मत बनवले तर ते नक्कीच ग्राह्य ठरेल. हे व्हिडीओज पाहून आपण कुणीही न्यायदान करू शकत नाही. फक्त हे व्हिडीओज कसे खोटे आहेत यावर तर्क देऊ शकता.
तर्कशुद्ध प्रतिसादांचे स्वागतच असेल.
हाब - आपल्या खिलाडू वृत्तीला दाद दिलीच पाहीजे... पण दम धरावा असे माझे मत आहे. प्रेमात नको कुणाच्या.
हायजेन बर्ग
हायजेन बर्ग
ईव्हीएमच्या धाग्यावर अकोल्याची बातमी मी कन्फर्म केलेली आहे. तक्रारदाराशी स्वतः बोललो आहे. टोटल जुळत नाही हे कन्फर्म केलेले आहे. तुम्ही ते केलेय का ?
तक्रार करण्याला कॉन्स्पिरन्सी थेअरी म्हणतात का ?
हायझेनबर्ग +१
हायझेनबर्ग +१
किरणउद्दीन, जेव्हा पत्रकार
किरणउद्दीन, जेव्हा पत्रकार लिहीत आणि लोक विश्वास ठेवीत ते दिवस कधीच निघून गेलेत. पत्रकारही विकाऊ आहेत, भ्रष्टाचारी, खंडणीखोरी व अत्याचारी (तरुण तेजपाल) आहेत हे कितीतरी घटनांमधून सिद्ध झालेय.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या पत्रकारांना 2 महिन्यांपूर्वीचाच मुहूर्त का मिळाला? नोटबंदीला तर 3 वर्षे झालीत. असो, ते स्टिंग व्हिडीओ टाकूनही त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही.
पण मग दोन महिने तुम्ही काय करत होता ते कळलं नाही. की आता भारतीय जनतेने पार आपटून पिळून काढलयावर काहीतरी मुद्दे शोधूनशोधुन काढायचे नि सगळीकडे अराजक माजवायला बघायचं हे करणाऱ्या टोळीचे तुम्ही सदस्य आहात?
हे सर्व पत्रकार एव्हढे दिवसभर बघायचे व्हिडीओ घेऊन न्यायालयात का गेलेले नाहीत? एव्हढे दिवस हे लोक पुरावे दाबून का बसले होते ? कुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी की निवडणुकीत फायदा मिळवायला? अर्थातच तुमच्या भाषेत, जनतेने या लोकांना फाट्यावर मारलेलं दिसतंय.
राफेलवरून काँग्रेसचं तोंड सुजलंय तरीही बाकीच्या भामट्यांना अजून शहाणपण आलेलं दिसत नाहीय. प्रत्येक मोदीविरोधकाला न्यायालय व जनतेकडून स्वतंत्र चपराक खाण्याची हाव सुटलीय असे दिसतेय.
आदळ आपट करून काही उपयोग नाही.
आदळ आपट करून काही उपयोग नाही. ते व्हिडीओज सर्व दाखवत आहेत.
बाकीच्या शंकाकुशंकांना काही एक अर्थ नाही.
मला वैयक्तिक बोल लावून मनाचे समाधान होत असेल तर माझी हरकत नाही. पण जर धुके निवळले पाहीजे असे वाटत असेल तर या प्रश्नांची उत्तरे संबंधितांकडून मिळाली पाहीजेत असे ज्यांना वाटते त्यांच्याशी चर्चा होऊ शकते.
बाकीच्या शंकाकुशंकांना काही
बाकीच्या शंकाकुशंकांना काही एक अर्थ नाही. >>>
आयला, खरंच की काय? मग स्वतःला कधी समजवताय हे?
किरणउद्दीन, हाब ने केलेली
किरणउद्दीन, हाब ने केलेली विनंती खरंच मनावर घ्या ही माझीपण तुम्हाला प्रांजळ विनंती. तुम्ही जे करत आहात त्यात तुमची बरीचशी शक्ती खर्च होतीये आणि अमूल्य वेळही वाया जातोय असं दिसतंय. इथे माहिती टाकून फारसा उपयोगही नाही. झाला असता तर काँग्रेसच्या निदान महाराष्ट्रात तरी १० -१५ सीट्स वाढल्या असत्या कारण निवडणुकीपूर्वी इथे मोदींविरोधात जोरदार मोहीम उघडली गेली होती. असो.
मला वाटते तुम्ही टाकलेल्या लिंकचा इथून पुढे कोणी पाठपुरावा करत नाही की ते घेऊन कोणी सरकारला जाब विचारत नाही. एवढाच काय तर त्याची विश्वासार्हताही कोणी तपासून पाहत नाही.वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे स्टिंग ऑपरेशन खरअसतं तर आत्तापर्यंत त्याचा गाजावाजा नक्कीच झाला असता. अहो जेंव्हा काश्मीर मध्ये seperatist यांचा दगडफेक टोळीला पैसे पाकिस्तानातून येतात हे दाखवणारा स्टिंग ऑपरेशन विडिओ व्हायरल झालेला, अगदी सगळ्या मोठ्या न्युज चॅनेल वर सुद्धा ते दाखवत होते तरीही कित्येक दिवस कोणावर कारवाई झाली नव्हती. तिथे तुम्ही टाकलेल्या स्टिंगचा अगदी खरे असले तरी कुठे निभाव लागणार? इथे आलेल्या प्रतिसादातून समजते की कोणालाच त्याविषयी आता healthy चर्चा करायची इच्छा नाहीये (तशीही ती बाकी तुम्ही टाकलेल्या धाग्यांवर सुद्धा फार होती असे नाही) 9० टक्के प्रतिसादातून तुम्हाला हवे असलेले उद्दिष्ट साध्य होत नाही असेच दिसते. चर्चा पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप यावर येऊन चिखलफेक सुरु राहते. त्यामुळे इथे टाकण्यापेक्षा तुमची खरोखर इच्छा असल्यास एकतर वेगळ्या मार्गाने नेटाने पाठपुरावा करा किंवा तुमचा अमूल्य वेळ आणि एनर्जी इतर ठिकाणी सत्कारणी लावा. इथे भारंभार धागे काढून खरंच काही होईल असे वाटत नाही. काही दिवसांनी लांडगा आला रे आला सारखी अवस्था मात्र नक्की होईल.
कोणताही आकस ना ठेवता सांगतो आहे. बघा पटलं तर.
कोहंसोहं
कोहंसोहं
इथे दिलेल्या माहीतीचा उपयोग होत नाही हे तुम्हाला ठाऊक असेल तर या तात्पुरत्या आयडीसहीत ओरिजिनल देखील उडवून घ्या आणि एखाद्या चांगल्या कार्याला वाहून घ्यावे. हा अत्यंत तळामळीने दिलेला सल्ला आहे. कारण एकापेक्षा जास्त आयडीज बाळगताना दुप्पट तिप्पट वेळ जातो. अर्थात नेटपॅकसहीत तुमच्या ऐहीक गरजा भागत असतील तर इतर कुणी त्याची काळजी करणे चुकीचे आहे.
इथे खरंच प्रामाणिकपणे चर्चा करण्याची हिंमत असलेला एक तरी असेल ज्याला पक्षापेक्षा देश मोठा वाटत असेल. नोटबंदी हा घोटाळा असेल तर हा देशाला दिलेला धोका आहे, नसेल तर या पत्रकारांना अटक व्हावी. खरे असेल तर आपण कुणाला मोठे करतो याचा विचार अंधाप्रमाणे भक्ती करणा-यांनी करावा.
अर्थात अशा काही अपेक्षा नाहीत. देशापेक्षा प्रत्येकाला पक्ष मोठा आहे. नाहीतर व्हिडीओ पाहूनही मानभावीपणा कुणी केला असता असे वाटत नाही.
"इथे दिलेल्या माहीतीचा उपयोग
"इथे दिलेल्या माहीतीचा उपयोग होत नाही हे तुम्हाला ठाऊक असेल तर या तात्पुरत्या आयडीसहीत ओरिजिनल देखील उडवून घ्या आणि एखाद्या चांगल्या कार्याला वाहून घ्यावे. हा अत्यंत तळामळीने दिलेला सल्ला आहे. "---> हा सल्ला तुम्ही स्वतःला द्या...माझी चांगली कार्ये सुरूच आहेत. तुम्हीपण पण ती करावीत अशी माझी इच्छा होती म्हणून प्रामाणिकपणे सांगितले कारण सध्या त्याची गरज तुम्हाला जास्त आहे. मी एकाच आयडी ने लिहितो आणि यापुढेही लिहीत राहीन. माझा कोणताही डयूआयडी नाही आणीन त्याची गरजही नाही. मी एकाच आयडी ने लिहितो.
तसेच मी तो विडिओ पहिला नाही...मला त्याची गरजही वाटत नाही....त्याआधी मी प्रतिसाद वाचले आणि मला 'मी-माझा' यांचा प्रतिसाद पटला. असे १०० खरे खोटे विडिओ रोज निघत असतात. खरा असला असता तर काँग्रेस ने आत्तापर्यन्त ह्या मुद्य्यावरून जीवाचे रान केले असते. त्यांना मोदींच्या विरोधात एक साधा मुद्दा मिळत नव्हता निवडणुकीत प्रचाराला.तेच ते राफेल च गुऱ्हाळ रोज सुरु होतं. अश्या वेळी नोटबंदी चा भ्रष्टाचार जर खरंच असता तर ही संधी काँग्रेस ने सोडली नसती. हे सगळे समाजात भ्रम पसरवण्यासाठी पेरलेले असतात आणि नंतर याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही कारण त्यांना माहित असत कि हे घेऊन जाऊन न्यायालयात काहीच प्रूव्ह करता येणार नाही. जी या सर्वाला बळी पडतात (तुमच्यासारखी) ती फक्त स्वतःचा वेळ वाया घालवतात आणि हाती काहीच लागत नाही. जर एवढा साधा मुद्दाही तुमच्या लक्ष्यात येत नसेल तर तुमचे सुरु ठेवा. आधी तुमची तगमग बघून फक्त वाईट वाटायचे आता दया यायला लागली आहे.
" नोटबंदी हा घोटाळा असेल तर हा देशाला दिलेला धोका आहे, नसेल तर या पत्रकारांना अटक व्हावी"---> मग करा तुम्ही प्रयत्न त्यांना अटक करण्याचा.तुम्हाला आवाज उठवायचा असेल तर हा विडिओ घेऊन पोलिसात जा, न्यायालयात जा, अगदी जमल्यास वर्तमानपत्र किंवा चॅनेल वर पण जा...इथे नुसती चर्चा करून काहीच उपयोग नाही. इथे तुमच्याशी चर्चा केली तरच देशाविषयी काळजी आहे असे भ्रम निर्माण करून सर्टिफिकेट वाटत फिरू नका.. आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे १० प्रतिसादात फार फार तर एक प्रतिसाद चर्चेसाठी रस दाखवत असेल. या धाग्यावर तर तोही नाही. कारण नुसती चर्चा करून काहीच उपयोग नाही हे सर्वाना माहित आहे. तुमचा असल्या विडिओ वर विश्वास असेल तर पुढचे प्रयत्न करा. इथे फक्त चर्चा करून (ते करण्यातपण कोणीही स्वारस्य दाखवत नाही हा मुद्दा वेगळा) दुसरा कोणीतरी action घेईल या भ्रमात राहू नका.
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. विचारे मना तूंचि शोधूनि पाहे.
"एकापेक्षा जास्त आयडीज बाळगताना दुप्पट तिप्पट वेळ जातो" --> एवढं माहिती आहे म्हणजे तुम्ही ड्यू आयडी वापरता हे कबुल करता तर
बाकी तुमच्याकडे चर्चा करायला कोणी आले नसेल तर ड्यूआयडी ने स्वतःशीच चर्चा सुरु ठेवा. तेवढेच तुम्हाला समाधान.
व्हिडीओ न पाहताच >> बलं बलं..
व्हिडीओ न पाहताच >> बलं बलं..
पाहिला असेल तरी पाहिला हे कबूल करणे तसे अवघडच आहे. दुखणे तसे आहे.
समजू शकतो.
>>हाब ने केलेली विनंती खरंच
>>हाब ने केलेली विनंती खरंच मनावर घ्या<<
अहो पालथा घडा गॅंगचे सभासद आहेत ते.... एव्हढे तळमळीने त्यांना काही सांगायला जाउ नका..... उलट तुम्हालाच ऐकुन घ्यावे लागेल!
एव्हढ्या मोठ्ठ्या पोस्टी लिहत बसायच्या नाहीत हो.... दोन चार ओळींची टपली बास्स होती ह्यांना.... किल्ली दिल्यासारखे दिवसरात्र चालू रहातात मग!!!!
ट्रोल चालु झाले ४० पैसे वाले.
ट्रोल चालु झाले ४० पैसे वाले.
कोहं-सोहं, कशाला चिखलात दगड
कोहं-सोहं, कशाला चिखलात दगड मारताय भाऊ?
ट्रोल चालु झाले ४० पैसे वाले.
ट्रोल चालु झाले ४० पैसे वाले.
Submitted by पकौडेवाला on 1 June, 2019 - 09:04 >>>
तुझ्या प्रमाणिकपणाला खरंच दाद द्यावीशी वाटते. आजपर्यंत कुठल्याही ट्रोलने अशी कबुली दिली नसेल.
>>आजपर्यंत कुठल्याही ट्रोलने
>>आजपर्यंत कुठल्याही ट्रोलने अशी कबुली दिली नसेल.<<
नोटबंदी नंतर वीरोधी
नोटबंदी नंतर वीरोधी पक्षांचे पैसे गेले म्हणुन डान्स करणारे ट्रोल ! उपचाराची गरज आहे बाळाला! हा हा हा
नोटबंदीचा परिणाम : लोकसत्ता,
नोटबंदीचा परिणाम : लोकसत्ता, दि. एक जून
लोकसत्ता !
लोकसत्ता !
तरुण भारत वाचणारे आले वाटतं
तरुन भारत / टणाटण प्रभात वाचणारे आले वाटतं
(No subject)
किल्ली बसलेली आहे..... चालू
किल्ली बसलेली आहे..... चालू दे आता!
पीळ संपला की पुढची किल्ली देतो
कोणता आयडी वापरुन किल्ली दिली
कोणता आयडी वापरुन किल्ली दिली ते लक्षात ठेवा म्हणजे झाले..!
सामना माकड म्हणतय यांना आणी
सामना माकड म्हणतय यांना आणी हे बसलेत किल्ल्या देत
https://www.maharashtranama
https://www.maharashtranama.com/india/modis-cabinet-has-8-ministers-with...
अफजलखान भारताचा
अफजलखान भारताचा ग्रुहमंत्री झाला ! काय दिवस आणले आहेत ! अरेरे !
Pages