Submitted by रिव्हर्स स्वीप on 27 May, 2019 - 15:50
मला मायबोली.कॉम वरील एका सदस्यावर कायदेशीर कारवाई - बदनामीचा खटला - करायची आहे. त्या संदर्भात मायबोलीवरील कायदेतज्ञांकडून माहिती हवी आहे.
१. मायबोली वरील एखाद्या आयडीवर कायदेशीर कारवाई करायची असल्यास काय प्रोसिजर आहे ?
२. अशा कायदेशीर तक्रारीत तो आयडी आणि मायबोली प्रशासन यांना प्रतिवादी करता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक सदस्याची पोस्ट हे वैयक्तीक मत असले तरी साईटवर आलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी अंतिमत: प्रशासनाची असते.
३. ही तक्रार सायबर सेलकडे करावी लागेल का रीतसर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवावा लागेल?
ही माहिती लवकरात लवकर मिळाल्यास बरे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीवरील कायदेतज्ञांकडून
मायबोलीवरील कायदेतज्ञांकडून माहिती हवी आहे.
??
कायदेतज्ञ नाही, पण प्रथम प्रशासनाकडे तक्रार केली का?
प्रशासन निष्पक्षपणे कारवाई
प्रशासन निष्पक्षपणे कारवाई करेल/करते आणि त्यात पारदर्शकपणा ठेवेल/ठेवते हां फार मोठा भ्रम आहे.
मायबोलीचे ऍडमीन प्रशासन
मायबोलीचे ऍडमीन प्रशासन कारवाई करण्याबाबत सध्या फारच उदासीन दिसत आहे असे वाटते. मागे अश्याच एका धाग्यावर (धाग्याचा exact विषय किंवा धागाकर्ता आठवत नाहीपण तो धागा आयआयटी कानपूर च्या कोणत्यातरी उपक्रमावर होता) 'हेला' नामक आयडी ने हिंदू धर्म आणि ब्राह्मण जातीविषयक खालच्या दर्जाची टिप्पणी केली होती. विषय काहीही असला तरी हा हेलानामक आयडी एकतर हिंदू मुस्लिम विषयावर येऊन हिंदुविरोधी टिप्पणी तरी करतो नाहीतर ब्राह्मण जातीवर हीन दर्जाची भाषा वापरतो. आयआयटी कानपूर च्या धाग्यावर सर्व चर्चा मी वाचली होती. धाग्याकर्त्याने प्रतिसादातून ऍडमीन ला लक्ष्य घालण्याची विनंती केली होती परंतु ऍडमीन ने आयडी वर कोणतीही कारवाई ना करता फक्त हेला आणि धाग्याकर्त्याचे प्रतिसाद काढून टाकले होते.
हे फक्त एक उदाहरण झाले. आजपण तुम्ही हेला या आयडीचे प्रतिसाद पहा कोणत्यापण धाग्यावर. जास्तीतजास्त प्रतिसाद फक्त हिंदू मुस्लिम विषयावर भडकाऊ किंवा ब्राह्मण जातीवर विखारी टीका करणारे आणि कोणताही पुरावा ना देता फक्त विष ओकणारे असतात.खरंतर अश्या आयडी वर कारवाई झालीच पाहिजे. मला वाटते मायबोलीचे नियम बरेचसे शिथिल करण्यात आले आहेत आणि म्हणूनच हेला सारखे आयडी अजूनही लिखाणातून विष पसरवत आहेत.
ऍडमीन ने एकदा त्यांचे मागच्या काही आठवड्यातले वेगवेगळ्या धाग्यांवरचे सर्व प्रतिसाद वाचावेत आणि त्वरित निर्णय घ्यावा ही प्रशासनाला विनंती.
रिव्हर्स स्वीप, सोडुन द्या;
रिव्हर्स स्वीप, सोडुन द्या; नॉट वर्थ इट. हे ट्रोल्स, बॅड एलिमेंट्स कर्मधर्मसंयोगाने अड्डा नामक वंचित धाग्याचे आजीवन सभासद आहेत, यावरुनच त्यांचं जीवितकार्य काय आहे/असेल याची कल्पना करा. जगाला दाखवायला हे भले लिबरल, समाजवादाची घोंगडी पांघरतात पण प्रत्यक्षात दंडवते, पै, गोरे, जोशी यांच्या सारख्यांच्या चपलेशेजारी उभं रहाण्याची देखील यांची लायकि नाहि. तर ते असो...
माबो प्रशासन हि तारेवरची कसरत आहे. दे आर रनिंग धिस वेब्साइट, अॅट द सेम टाइम ट्राइंग नॉट टु गेट इन्टु ट्रबल. हे लक्षात घेता त्यांच्याकडुन ताबडतोब कारवाईची अपेक्षा करणं हे प्रॅक्टिकल नाहि. मी म्हणतो कि कायदेशीर कारवाई पासुन तर फार दूर राहिलेलंच बरं, कारण तुम्हा-आम्हाला विनाकारण माबो गोत्यात आलेली चालणार नाहि. तेंव्हा एक जबाबदार माबोकर म्हणुन आपणंच ह्या ट्रोल्स कडे संपुर्ण दुर्लक्ष करणे हि बेस्ट स्ट्रॅटजी आहे. थोडा वेळ ते उड्या मारतील, पण कोणिहि भीक घालत नाहि हे पाहुन आपोआप चूप होतील. बघा पटतंय का...
रिव्हर्स स्वीप काय करतील हा
रिव्हर्स स्वीप काय करतील हा त्यांचा निर्णय असेल. कायदेशीर कारवाई थोडीशी बोल्ड स्टेप असेल परंतु चुकून कोणी तक्रार केलीच तर माबो गोत्यात येईल हे नक्की. निदान तेवढा विचार करून तरी कारण प्रशासनाने माबोच्या वाचाळवीरांवर खास करून ज्या आयडीच्या पोस्टी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या आणि खोटी बातमी देणाऱ्या असतात त्यांच्यावर कारवाई करावी.
असे दोन तीनच आयडी आहेत
असे दोन तीनच आयडी आहेत कायदेशीर कारवाई मध्ये myboli ला त्रास होवू शकतो आणि ते चुकीचं आहे.
त्या पेक्षा आपण सर्व मिळून अशा प्रवृत्तीच्या आयडी ना सरळ करू शकतो .
बाकी , व्हाट्सएप वगैरेवरून
बाकी , व्हाट्सएप वगैरेवरून घाण मेसेज टाकले तर पोलीस कारवाई करता येते , तसेच हेही, वेब साईट हे माध्यम असते , त्यामुळे त्यांना वेठीस धरण्यापेक्षा आयडी वर तक्रार करा,
भाजपाच्या लोकांना उर्मिला मातोंडकर , कुणीतरी कश्यप वगैरे प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे , गांधी नथुराम पुतळा लाल पाणी वगैरे प्रकरणातही पोलिसांनी अटक केली
क्रियेवीण मायबोली खरडता व्यर्थ आहे ,
माझे आत्ताच एका ओळखीच्यांशी
माझे आत्ताच एका ओळखीच्यांशी बोलणे झाले. त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे सर्वप्रथम तक्रार पोलिसात करावी लागेल. पोलिसांनी सुचवल्यास सायबर सेल कडे जात येईल परंतु हे सोपस्कार generally पोलीस पार पडतात किंवा आपल्याला मदत करतात. मिळालेल्या माहितीनुसार तक्रार झाल्यास वेबसाईट काही काळ बंद राहू शकते किंवा वेबसाईट सर्वांसाठी फक्त रीड-ओन्ली मोड मध्ये राहू शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणालाच नवीन धागे काढता येणार नाहीत अथवा प्रतिसाद देता येणार नाहीत. अगदी ऍडमीनला देखील परवानगी शिवाय कोणतेही बदल करता येणार नाहीत. केल्यास सखोल चौकशी होऊ शकते. चौकशी दरम्यान आयडी चे सर्व लिखाण तपासले जाते आणि त्याविरुद्ध ऍडमीन कडे तक्रार करायची सोय असल्यास (जी मायबोलीमध्ये आहे) किती तक्रारी आल्या हे देखील पाहिले जाते. जर मजकूर खरोखरच आक्षेपार्ह असेल तर ऍडमीन ने कारवाई का केली नाही हेही विचारले जाते व अगदी गरज पडल्यास ऍडमीन वर पण कारवाई होऊ शकते. चौकशीत ऍडमीन त्या व्यक्तीला प्रत्यक्ष ओळखते का हेही विचारले जाते आणि तिथून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. नसल्यास सायबर सेल ची मदत घेऊन IP ID ने व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न केले जातात.
असे सुचवण्यात आले की तक्रार करायचीच असल्यास तक्रारदाराने सुद्धा सबळ पुरावा बरोबर ठेवावा. संपूर्ण page चे स्क्रीनशॉट ज्यामध्ये असे आक्षेपार्ह विधाने आणि मजकूर असेल तो चालू शकतो.
असे काय नाही , फेसबुक ,
असे काय नाही , फेसबुक , व्हाट्सपवर काय आले तर ते लिहिणार्यावर कारवाई होते , वेबसाईत बंद होत नाही , नाहीतर एव्हाना फेसबुकचा मालक तुरुंगात बसला असता,
मायबोली वेबसाईटच्या मालकांनी निपक्षपणाने काम चालवले आहे , त्यांचे कार्य वादातीत आहे , त्यामुळे आयडीवर सायबर सेल वर तक्रार करा.
असे काय नाही , फेसबुक ,
असे काय नाही , फेसबुक , व्हाट्सपवर काय आले तर ते लिहिणार्यावर कारवाई होते , वेबसाईत बंद होत नाही , नाहीतर एव्हाना फेसबुकचा मालक तुरुंगात बसला असता ---> फेसबुक ही अमेरिकेतील कंपनी आहे भारतातील नाही. प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात. आपल्याकडे तक्रार झाली की वेबसाईट वर स्टे येतो. आक्षेपार्ह मजकूर असलेल्या अश्या कित्येक वेबसाईट बंद झालेल्या आहेत भारतात. आणि वेबसाईट चे nature पाहता पूर्ण बंद होणार नाही परंतु मी वर म्हणल्याप्रमाणे काही काळ बंद राहू शकते चौकशी पूर्ण होईपर्यंत (किंवा रीड-ओन्ली मोड वर जाऊ शकते).
मालक स्वतःच असे धागे कुलूप
मालक स्वतःच असे धागे कुलूप लावून ठेवू शकतात
"मायबोली वेबसाईटच्या मालकांनी
"मायबोली वेबसाईटच्या मालकांनी निपक्षपणाने काम चालवले आहे"---> याबाबत मलाही खात्री वाटत असली तरी गेल्या काही दिवसात/महिन्यात अनेक तक्रारी येऊनही काही आयडी अजूनही तसेच आहेत आणि आक्षेपार्ह मज्कूर बिनबोभाटपणे टंकत आहेत. निदान कारवाई नसेल करायची तर ऍडमिन ने अश्या आयडींना जाहीरपणे समज तरी द्यावी.
ती ऑलरेडी दिली गेलेली आहे ,
ती ऑलरेडी दिली गेलेली आहे , मोठा प्रदीर्घ लेख आहे , त्यावर .
आता निवडणूक जिंकल्या हरल्याचा उन्माद आहे , तो ओसरला की होईल,
नोटबंदी ,काळा पैसा ह्यावर वाद खेळणारे दोन्ही पक्ष बिट कोईन वर मात्र एकत्र चिंता करत आहेत , हे पाहिले ना ?
माझ्यामते मायबोली प्रशासन
माझ्यामते मायबोली प्रशासन अजिबात गुंतणार नाही हे पाहायला हवे व त्यामुळेच कुठेही तक्रार वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नये
मुळात येथील ट्रोलिंग डोक्यापर्यंत जाऊच देऊ नये
मायबोली प्रशासन अधून मधून विखारी पोस्ट्स टाकणाऱयांना उडवत असतेच, ते आणखी काय करणार? सदस्य स्वतः काहीच जबाबदारीने वागणार नाहीत का?
रिव्हर्स स्वीप, तुम्हाला झालेला मनस्ताप नक्कीच समजू शकतील सगळे, पण विनंती आहे की आपल्या प्रत्यक्ष आयुष्यावर काही परिणाम होईल इतके महत्व या सदस्यांना देऊ नका
कुठला धागा हे कळू शकेल का?
कुठला धागा हे कळू शकेल का?
नेमका काय कंटेंट आहे?
काहीही असलं तरी फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून सोडून द्यायला हवं. तुम्ही त्या आयडीना इग्नोर मारु शकता. हा जास्त प्रभावी उपाय आहे!
"काहीही असलं तरी फ्रीडम ऑफ
"काहीही असलं तरी फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून सोडून द्यायला हवं"---> फ्रीडम ऑफ स्पीच च्या नावाखाली प्रतिष्ठित व्यक्तीविरोधात जातपात, धर्म यांच्या नावाखाली धादांत खोटी आणि पराकोटीची विधाने करणे, जाती आणि धर्मविषयक भडकाऊ, विषारी पोस्ट टाकणे, हा दखलपात्र गुन्हा होऊ शकतो आणि तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते.
१. मायबोली वरील एखाद्या
१. मायबोली वरील एखाद्या आयडीवर कायदेशीर कारवाई करायची असल्यास काय प्रोसिजर आहे ?
सर्वप्रथम तुमच्या तक्रारीसन्दर्भात सर्व माहिती आणि पुरावे (वेबलिन्क्स, स्क्रीनशोट्स इ) सेव्ह करुन ठेवा.
२. अशा कायदेशीर तक्रारीत तो आयडी आणि मायबोली प्रशासन यांना प्रतिवादी करता येईल का? माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक सदस्याची पोस्ट हे वैयक्तीक मत असले तरी साईटवर आलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी अंतिमत: प्रशासनाची असते.
तो आयडी आणि मायबोली प्रशासन यांना प्रतिवादी करावे लागेल.
३. ही तक्रार सायबर सेलकडे करावी लागेल का रीतसर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवावा लागेल?
तुमच्या घराजवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोन्दवावी लागेल. त्यासोबत खालील वेब साइट्स वर पण तक्रार करा:
https://cybercrime.gov.in/cybercitizen/home.htm
https://www.mhpolice.maharashtra.gov.in/Citizen/MH/index.aspx
(जालावरुन मिळालेली माहिती)
असे दोन आयडी आहेत जे नेहमीच
असे दोन आयडी आहेत जे नेहमीच जातीयवादी आणि विखारी लिहतात.... पण त्यांना जास्त भाव देउ नका!
पिढ्यानपिढ्या पेरलेला द्वेष असतो तो आणि अशी अनेक माणसे वास्तव जीवनात पण आजूबाजूला दिसतात
हे लोक सांगून सवरुन सुधारण्यातले नसतात (मुख्य म्हणजे असे किती लोकांना समजावत फिरणार)
उन्हे उनके हाल पर छोड दो.... जास्तच झाले तर एखादी टपली मारायची पण याउपर जास्त किम्मत द्यायची नाही
आपले मन:स्वास्थ तर बिलकुल ढळू द्यायचे नाही
They are not worth it!
करून बघा. झक मारली आणि मुम्बै
करून बघा. झक मारली आणि मुम्बै पाहिली याचा अनुभव घ्या. मायबोलीचे काहीही वाकडे होनार नाही. हा एक प्लॅट फोर्म आहे. तुमच्या एकून पोस्ट वरून तुम्हाला कायद्याचे ज्ञान कमी आणि उत्साहच जास्त आहे. ' त्या' आयडीचे काहीही वाक्डे होनार नाही. एकदा सायबर क्राइमची व्याख्या वाचून घ्या. आणि हो खर्चाची तयारी ठेवा. हे स्टेटची केस नाही. तुमची वैयक्तिक केस आहे. वकील बिकील पाहिलाय का? पोलीस स्टेशन कधी पाहिलेय का आतून ? तुम्हाला शुभेच्छा ...
(No subject)
चला, या धाग्यामुळे काही महान
चला, या धाग्यामुळे काही महान आय डिंचे ड्यु आय डी कळू लागले आहेत
आत्ता मला धाग्याचा उद्देश समजला
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/70072
वाचनीय धागा
अवांतराबद्दल क्षमस्व
वाचनीय धागा
वाचनीय धागा
अवांतराबद्दल क्षमस्व
Proud
Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2019 - 13:49 >>>
शोचनीय धागा आहे तो.. वाचनीय काय? उगाच खर वाटुन काही लोक हुरळुन जातील.
>>वाचनीय धागा<<
>>वाचनीय धागा<<
तगडा एक्सपिरिअन्स है बाबा उनको
फेसबुक ही अमेरिकेतील कंपनी
फेसबुक ही अमेरिकेतील कंपनी आहे भारतातील नाही. >>> मायबोली देखिल अमेरिकन कंपनी आहे की
मायबोली ही अमेरिकन कंपनी आहे.
मायबोली ही अमेरिकन कंपनी आहे.
१८-४-२०१९ रोजी , कंपनी ऑफ रजिस्ट्रार, पुणे यांच्या अधिकृत पत्राप्रमाणे , मायबोली (भारत) या कंपनीचे बंद करण्याबद्द्लचे सर्व कायदेशीर टप्पे पूर्ण झाले असून ती आता अस्तित्वात नाही.
अमेरिकन सरकारच्या ज्युरिडिक्शन मधे येणारे सर्व कायदे पाळणे मायबोलीला बंधनकारक आहे आणि मायबोली नेहमीच ते पाळत आली आहे.
नवीन Submitted by webmaster>>
नवीन Submitted by webmaster>>> ही नवीनच माहिती मिळाली. धन्स!
वाचनीय धागा
अवांतराबद्दल क्षमस्व
Proud>>> कुलुप लागलेलं दिस्तंय या धाग्याला...
>>>अमेरिकन सरकारच्या
>>>अमेरिकन सरकारच्या ज्युरिडिक्शन मधे येणारे सर्व कायदे पाळणे मायबोलीला बंधनकारक आहे आणि मायबोली नेहमीच ते पाळत आली आहे.
वेबमास्टर सर,
मायबोली हा शब्द आणि संकेतस्थळ दोन्ही मराठी आहेत. त्याला अमेरिकन कायदे लागू आहेत. याची अर्थातच उघड कारणे असणारच!
पण मग भारतातून, भारताबद्दल किंवा कशाहीबद्दल लिहिणाऱ्यांच्या मतांना, मतमतांतरांना, भावनिक गुंतवणुकीला काहीच किंमत नाही असे मानावे का? तसे असल्यास ही राजकीय धुळवड म्हणा किंवा इतर सगळेच लोकप्रियता (चांगल्या अथवा वाईट अर्थाने) खेचणारे धागे म्हणजे प्रशासनासाठी व अमेरिकन मायबोलीकरांसाठी (अनुक्रमे) निव्वळ स्थळ चालू ठेवणारे व मनोरंजनाचे धागे ठरतात का? शिवाय, मग परदेशस्थ मायबोलीकरांनी भारतीय घडामोडींवर बोलणेच बंद का करू नये? तसेच, उलटही!
तिकडे बसून इकडच्यांची अक्कल काढणाऱयांना तिकडच्या कायद्यात काही तरतूद आहे का चाप लावण्याची?
परकीय भूमीवरील लोकांनी आपापसात केलेले विखारी ट्रोलिंग हे एखाद्या कक्षेत येते की ते दुर्लक्षणीय ठरते? इथे जातपात, धार्मिक विधानांवरून एखाद्याच्या प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडल्या तर त्याला मायबोलीचे कोणीही जबाबदार नाही असे समजायचे का?
जर माझा tone किंचितही उद्धट किंवा उपरोधिक वाटला तर प्रतिसाद दुर्लक्षित करावात ही विनंती! माझ्याकडून मी प्रामाणिकपणे विचारत आहे.
अमेरिकन कायदे उदार आहेत.
अमेरिकन कायदे उदार आहेत. त्यामुळे मायबोलीने जे पाऊल उचलले ते आवडले. भारतात कशाला कशाचे वळण लागेल आणि मायबोलीच बंद पाडण्याबाबत दबाव आणतील सांगता येत नाही.
मंदार जोशी नावाचे एक थोर
मंदार जोशी नावाचे एक थोर विद्वान होते, कोथरूड निवासी
त्यांनी मायबोली विरोधातच सायबर सेल कडे तक्रार केली होती इथे आंतकवादी विचार पसरवले जातात म्हणून
शेवटी संचालकांनी त्यांना मांजर पोत्यात घालून सोडतात तसे आयपी अड्रेस सकट बॅन केले
पण तरीही ते इतके थोर आहेत की या ना त्या प्रकारे ते प्रकट होत राहतात
इतका निगरगट्ट व्यक्ती आकख्या आयुष्यात पहिला नव्हता
Pages