Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणीतरी तो काळा झगा आणि
कुणीतरी तो काळा झगा आणि तन्मणी वाला फोटो द्या, हेडर ला लावते
गजा-राजनंदिनी लग्नाचाही फोटो
गजा-राजनंदिनी लग्नाचाही फोटो लावा.
का पहाता रे ठेवा नाव
का पहाता रे ठेवा नाव
गादा ?! खिक्क.
गादा ?! खिक्क.
गादा ... ईईईईई.. कसं वाटतंय
गादा ... ईईईईई.. कसं वाटतंय ते..
का पहाता रे ठेवा नाव
का पहाता रे ठेवा नाव
नवीन Submitted by मेधावि on 10 May, 2019 - 16:18>>>>सोबत कपाळावर हात मारणारी बाहुली पण टाका....
आपल्या सर्वांची प्रतिनिधी म्हणू तिला
नविन धागा काढला. वॉव!
नविन धागा काढला. वॉव! वरचे फोटो छान आहेत.
सुलूचे " ढगात" पाठवणे पण भारी होते >>>>>>>> ही गपाची लॅन्गवेज आहे. पुभामध्ये हा दासाला लवकरच ढगात पाठवणारेय अस दिसतय.
काल नन्दू ' दासा आपल्या नवर्याशी वाईट वागतात' अशी आसाकडे तक्रार सुद्दा कित्ती लाडिकपणे करत होती. राग तर तिच्या डोळयात मुळीच दिसत नव्हता.
मूर्ख मुलीच्या हट्टामुळे हतबल झालेला करारी बाप नाहीच जमला.. >>>>>>>>> रवीन्द्र महाजनी किव्वा रमेश देव हवे होते दासा म्हणून. परवाचे गपाला झापताना दासाने म्हटलेले डायलॉग्ज रवीन्द्र महाजनीकडून ऐकताना जबरदस्त वाटल असत.
नन्दूच्या रोलसाठी स्पृहा जोशीसुद्दा चालली असती. सेन्सिटिव्ह, साधी तितकीच करारी.
१. जालींदर जेल के अंदर कसा गेला.
२. रानं का व कशी गेली.
३. ईशा ला सगळे कळल्यावर तीने विस चे काय केले.
४. विस चे काही झाल्यावर ईशा चे काय झाले.
आणखी बरेच प्रश्न आहेत योग,
१. विस सारख सारख पुण्याला का जातो?
२. विकु सरन्जामे कसा काय झाला?
३. जयदीपची अवस्था कशी व का झाली?
४. मुळात जालिन्दर विसबरोबर बिझनेस पार्टनरशिप करायला होकार तरी का देतो? माणूस दुधाने तोण्ड पोळल की ताक सुद्दा फुन्कून पितो म्हटल.
५. प्रॉपर्टीचा काय लोचा आहे?
खरे तर हे संप प्रकरण म्हणजे गजा, विलु व युनियन लिडर मिळुन खेळलेला डाव असावा असे वाटते. दासं चा विश्वास मिळवण्या साठी.. वगैरे.. >>>>>>>>>> अस जर असत तर गपा तिकडे मारामारी करुन आला नसता. कामगारान्शी नीट वागून, त्यान्चा इमोशनल सपोर्ट मिळवून दासान्ना इम्प्रेस केल असत. एक्च्युअली युनियनवाले संप करणारच नव्हते, दासान्नी त्यान्ना संप करायला लावला. त्यान्ना बघायच होत, गपा कस हॅन्डल करतो सगळ.
आता हया सम्पानिमित्त, नन्दूला सुद्दा विक्याच खर रुप हळूहळू कळू लागलय, कळतय पण वळत नाही अस झालय तिच.
लगे च झेंडे ला पण जॉब लागला. >>>>>>>> विक्याने बॉस झाल्यावर दादागिरी सुरु केलीये. परान्जप्याची सगळी कामे झेण्डेला दिली.
एकतर गजाकडे असे काही गुणच दिसले नाहीत ज्याने राजू इंप्रेस व्हावी. >>>>>> अगदी अगदी. काल तिला नवीन शोध लागला, गपा नवीन टेक्नॉलॉजी हाताळण्यात हुशार आहे म्हणे. त्यात कसली आली आहे हुशारी, लहान बाळालासुद्दा जमेल ते.
बर्याच महिन्यान्नी काल रॉमेन्टिक सीन दिसला काल.
मला तर स्नेहलताबाईपण दिसायला सोज्ज्वळ पण गजाच्या बाजूने असाव्या असे वाटतेय प्रॉपर्टी लेकाला मिळावी म्हणून. >>>>>>>>> मलाही. त्या दिवशी ( आसा बेशुद्द पडल्या तेव्हा) उगाच नाही विस आसाला ' मग सगळच ईशाला सान्गाव लागेल' अशी धमकी देत होता.
जावयाचा पायगुण चान्गला नाही, हा घरात आल्यापासून घरात भाण्डणे सुरु झाली, कामगार सम्प करतात. एवढ सगळ कळून सुद्दा आसाच ' जावई माझा भला' चालूच आहे.
फक्त दासानी काय तो नाईट ड्रेस घातलेला. >>>>>>>> सरन्ज्याम्याकडे एकटे दासाच सेन्सिबल वागत आहेत प्रत्येक बाबतीत. ( जयदीप अजून लहान आहे.).
मला ते अंबाबाई वालं मुझीक खूप आवड्तं आता काहीतरी व्हनार व्हनार असा फील येतो. >>>>>>>>>> +++++++२२२२२२२
या मोबाईल ला या कथेत काम असणार बहुतेक. रानं ईबेबी ला कॉल करणार असावी. >>>>>>> व्हॉट अ आयडिया ज्योति!
परवा नन्दूने गपाला सीईओ केल, काल दासा त्याला टॉप मॅनेजर म्हणाले. गपा नक्की काय झालाय, सीईओ की टॉप मॅनेजर ?
फक्त दासानी काय तो नाईट ड्रेस
फक्त दासानी काय तो नाईट ड्रेस घातलेला.>>त्याना ढगात जाण्याआधी आपला वोर्दरॉब संपवायचा असेल वापरुन..संवादात नाही तर कपड्यात तरी नाविन्य
Bdw हे 2000 पोस्ट झाल्यावर
Bdw हे 2000 पोस्ट झाल्यावर नविन धागा का काढायचा असतो मला सांगाल का कोणी?..मी मायबोली वर आधी वाचनमात्र होते
रोज प्रतिसाद देत नाही,पण इथली
रोज प्रतिसाद देत नाही,पण इथली धमाल रोज वाचते.अशक्य लिहिताहेत सर्व!
धन्यवाद नवीन धाग्याबद्दल
धन्यवाद नवीन धाग्याबद्दल किल्ली
बाय द वे, ते देवळातील लग्नानंतर आता राजनंदिनी कोठे राहणार चा वाद एकदम बसंती च्या टांग्यासारखे "वहाँ किसके घर जाना है ये तो बताना ही पडेगा, कि बसंती उस घरको ले चलो. अगर हमको ये नही पता कि तुमको जाना कहाँ है तो हम तांगा रोकेंगे कहाँ, और अगर हमने तांगा नही रोका तो तांगा रूकेगा कैसे?" असे आयत्या वेळेस गुरूजींसमोर का वाद घालत होते? आता गजाशी लग्न करणार म्हंटल्यावर मग राहणार कोठे वगैरे आधी घरी काहीच बोलणे नाही झाले का? इंग्रजीत We cross the bridge when we get there म्हणतात तसे सर्व निर्णय त्या त्या पुलाजवळ आले की घेतात असे दिसते.
ती तरूण राजनंदिनी पाहता हिंदी पिक्चर मधे मुळात म्हातार्या नायकाचे तरूणपण दाखवतात तशीच ती वाटते. आणि कृत्रिम स्टाइलने बोलण्यात बकेट लिस्ट मधल्या माधुरीला टक्कर देइल शितु.
>>आणखी बरेच प्रश्न आहेत योग,
>>आणखी बरेच प्रश्न आहेत योग,
@सुलू_८२
हो बरोबर आहे.. पण आणखी प्रश्ण विचारले तर ते लोक ऊत्तरा दाखल मालिका लांबवतील म्हणून नाही विचारले...
बाकी एक 'सर'... पात्रं झोपल्या पासून ईतर गोतावळा (निमकर जोडपे, मायरा, टिल्लू कं, चाळ, ऑफीस कं..) देखिल गायबला आहे..
फॉर अ चेंज ही शांतता बरी वाटते आहे. enjoy this silence while the बाळ is still sleeping..!
रच्याकने: ते मानबा प्रकरण अजून सुरूच आहे असे प्रोमोज वरून दिसतय.. कम्माल आहे. या लेखकाची गुर्हाळ क्षमता पाहता तुपारे गुर्हाळ अजून एक दोन वर्षे चालवू शकेल. बहुदा सुभा ने दम दिल्यामूळे लवकर बंद होतय. ईशा च्या जागी एखादी हटके व लोकप्रीय, हॉट वगैरे नायिका असती तर सवता सुभा ऊभा करून (courtesy फारेंड) पुढे चालवले असते यांनी.
या निमित्ताने माबो करांनी तुला 'का' पाहते रे याचे ऊत्तर मात्र द्यायला हवे, बाफ च्या नावाला धरून.
माझ्यापुरते: काय नविन गोंधळ घालतात ते बघायला.. आणि मग ईथे पिसा पिशी खेळायला..
शितुच्या ऐवजी घेता येण्या
शितुच्या ऐवजी घेता येण्या सारख्या हिरवीणी
भार्गवी चिरमुले
पूर्वा गोखले
सई रानडे -साने
गिरिजा ओक
प्रिया मराठे
स्प्रुहा जोशी(हिचा उल्लेख वर आलाच आहे)
मधुरा वेलणकर
यापैकी माझी फेवरेट पूर्वा गोखले.
आत्ताची अंबाबाई आहे ( मुलगी
आत्ताची अंबाबाई आहे ( मुलगी झालेली )>>>>>>> आधीच्या धाग्यावरून कॉपी केलेय.
तरी परत वयाचा झोल. ती मुलगी असेल ८-१० वर्षाची आणि जर २० वर्षाचा काळ गेलाय तर ती बाई ३०-३५ हवी. सध्याची अंबाबाई ५०+ वाटते.
सध्याची अंबाबाई ५०+ वाटते.
सध्याची अंबाबाई ५०+ वाटते. Proud>> हा रोल मला नक्की करता येइल. तो देवीचा जग्ग इशाच्या डोक्यात घालून पळून जाईन. आई अंबा बाई काय ते बघून घेइल. मग इशाच पुनर्जन्म म्हणजे स्कार्लेट विडो किंंवा आर्या स्टारक होईल. मग ती गजाच्या पोटात सुरी खुपसेल. सब मंगल हो
जावेगा.
दादा साहेब म्हणजे टायविन लेनिस्टर.
इशा आर्या स्टार्क जास्त बोलायचे काम नाही. तलवार सुर्या चालवायच्या.
जयदीप थिऑन
गजा रामसी बोल्टन
विल्या युरोन ग्रेजॉ य
आसा सरसी
इशाचे आईबाप नेड स्टार्क कैटलिन स्टार्क.
आई अंबा बाई सर्वांचे बघून घेइल.
आजचा भाग हहपुवा होता. शितूने
आजचा भाग हहपुवा होता. शितूने गाऊनवर पांढरी ओढणी घेतली आहे असं सारखं वाटत होतं. केस हायलाईट करायची पद्धत होती का तेव्हा. दासा काहीतरी आॅफर आहे गपासाठी असं म्हणाले ना, ते तसं काहीच बोलले नाहीत. हे घे पाच कोटी आणि चालता हो माझ्या मुलीच्या आयुष्यातून, असं ते काहीतरी म्हणतील असं वाटलं होतं. आसानी दासाला मुद्दाम चुकीचं औषध दिलं का. पण मग ते गपाला का सांगितलं मूर्खासारखं. दासाची शुद्ध हरवलेली असताना सगळे नुसते बघत का होते आणि हात चोळल्याने माणूस बरा होतो का. दासा ढगात आणि आता नंदूची वेळ भरणार लवकरच.
तो देवीचा जग्ग इशाच्या
तो देवीचा जग्ग इशाच्या डोक्यात घालून पळून जाईन. आई अंबा बाई काय ते बघून घेइल>>
एकतर गजाने औषध बदलल,आणि बिल
एकतर गजाने औषध बदलल,आणि बिल आसांच्या नावावर फाडल किंवा इनहेलर लपवून डासा गेले, पाटलाने खोटे रिपोर्ट बनवून घेतले आणि आसांना खिशात घातल.
म्हणजे पाटील नकळत खुनी झालाच की,कारण बाळाला आठवत आहे म्हणजे पाटलाच पोरगच जबाबदार आहे.
आता बाळ असत तर कस रडल असत.
एकतर गजाने औषध बदलल,आणि बिल
एकतर गजाने औषध बदलल,आणि बिल आसांच्या नावावर फाडल किंवा इनहेलर लपवून डासा गेले>>>>गेले?? म्हणजे एकदम ढगात??? खरंच की काय??
पाटलाचा पोरगा खुनी, आसांच्या नावे बिल...
कधी दाखवलं...
कालचा भाग अधून मधून पाहण्याचे भाग्य लाभले (पूर्ण नाही पहावा लागला)..
पुभा मध्ये दाखवलं आहे का?
मला जानेभी दो यारोमधला
मला जानेभी दो यारोमधला ध्रुतराष्ट्र आठवला ,
"अरे ये क्या हो रहा है ???"
लगेचच दासा पार ढगात गेले पण.
आता आसा अडचणीत येणार .
मग नंदूचा नंबर.
शाळा चालू व्हा यच्या अगोदर बहुतेक मालिका संपवणार
लोकहो, सर्व बदल केले आहेत.
लोकहो, सर्व बदल केले आहेत..अजून काही सूचना??
स्ने ल मॅडम अगदीच गोगलगाय
स्ने ल मॅडम अगदीच गोगलगाय निघाल्या की... सुभा च्या कटात सामील होण्यासाठी महत्वपूर्ण बळी ठरल्या बिचार्या गोगलगाय बाई... तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणार ही बया अजून 20 वर्षे
चला.... दासा अध्याय सुफळ
चला.... दासा अध्याय सुफळ संपूर्ण...... झाला काल की आज व्हायचाय?
उत्कंठावर्धन बिंदूला आणून संपवला का कालचा शिमगा?
@ किल्ली --- प्रेक्षक प्रतिनिधी डोके-आपटू-भावली राहिली
बाकी एक 'सर'... पात्रं झोपल्या पासून ईतर गोतावळा (निमकर जोडपे, मायरा, टिल्लू कं, चाळ, ऑफीस कं..) देखिल गायबला आहे.. >>>>>.
@ योग ---- सर्र पात्र मागल्या जन्मात बागडतय त्यामुळे या जन्मातल्या सवंगड्यांना सुट्टी....
मान्बाचे ८००+ भाग पिदवतायत लोकांना त्यामानाने याचे ३०० झाले तरी लोक स्वस्तात सुटले म्हणायचे
दादा साहेब म्हणजे टायविन लेनिस्टर...................................
इशा आर्या स्टार्क जास्त बोलायचे काम नाही. तलवार सुर्या चालवायच्या.
........................................इशाचे आईबाप नेड स्टार्क कैटलिन स्टार्क.
आई अंबा बाई सर्वांचे बघून घेइल. >>>>>
@अमा ----- यासाठी फॉर अ चेंज मदर मेरींना यावे लागेल. अंबाबाईंसाठी थोडे अनफॅमिलिअर टास्क होईल ते.
आणि ईशा तलवार सुर्या चालवणार? कशा चालवायच्या ते यायला लागतं, शिकायला लागतं कम से कम......
बटर नाईफने विसला मारायचा प्रयत्न करेल आणि तलवारीने अंडं कापेल कालियातील परवीन बाबी सारखे.
https://youtu.be/6xOXN3EJEDE?t=223
राजनंदिनी कोठे राहणार चा वाद एकदम बसंती च्या टांग्यासारखे .............असे आयत्या वेळेस गुरूजींसमोर का वाद घालत होते? >>>>>>>
@ फारएण्ड ---- ज्यांना टांगा नीट चालवून योग्य मुक्कामी न्यायचाय ते आधी बोलतात्, विचार करतात इत्यादि. टांगा पलटी घोडं फरार सिच्युएशनसाठी कशाला हवाय इतका विचार.....
मालिका पलटी केड्या फरार मोडमध्ये जाणार सर्व.
@ तुरू --- २०००+ प्रतिसाद झाल्यावर धागा चालू ठेवल्यास सर्वरवर जास्त लोड येतो, असे वाचले होते स्पष्टीकरण. जिथे छायाचित्रे वगैरे अपलोड होतात (उदा निसर्ग गप्पा) तिथे अजून लौकर बंद करतात धागा १०००च्या आसपास.
ती भावली कशी द्यायची ते मला
ती भावली कशी द्यायची ते मला माहिती नाही
धन्यवाद कारवी for
धन्यवाद कारवी for explaination
तुपारे टिम मधल कोणीतरी हा
तुपारे टिम मधल कोणीतरी हा धागा वाचतय हे नक्की. काल ' ढगात पाठवण्याचा' डायलॉग डिट्टो उचलला.
झाला काल की आज व्हायचाय? >>>>>>> काल झाला. पण पुभा बघून माझ कन्फ्यूजन झालय. दासाचा खून नक्की कोणी केला, विस की आसाने? खर तर विसने झेण्डेबरोबर ऑलरेडी दासाचा खून करण्याचा प्लॅन केला होता. ते म्यूट करुन दाखवल. त्याच्याआधीच दासाला अॅटेक आला. विसने इनहेलर लपवला की नाही, कधी ते काही कळले नाही. मग प्रश्न असे पडतात की:
१. आईसाहेबान्नी मुद्दामहून चुकीची औषधे दिली का? म्हणून विस त्यान्ना ब्लॅकमेल करतोय?
२. जर विसने चुकीची औषधे तिकडे ठेवली असतील तर आईसाहेबान्ना ते कळल कस नाही? का न वाचता, टेन्शनमध्ये चुकून त्यान्च्याकडून ती औषधे दिली गेली?
असो.
परवा नन्दूने गपाला सीईओ केल, काल दासा त्याला टॉप मॅनेजर म्हणाले. गपा नक्की काय झालाय, सीईओ की टॉप मॅनेजर ?>>>>>>> काल ऐकल, दासा टॉप मॅनेजर नाही, टॉप मॅनेजमेण्टमधला/ मॅनेजमेण्टमधला टॉप माणूस म्हणाले.
केस हायलाईट करायची पद्धत होती का तेव्हा. >>>>>>>>> स्टोरी ९७ मधली दाखवलीय. दिल तो पागल है ( १९९७) मध्ये माधुरी आणि करिश्माने केस हायलाईट केले होते.
नन्दूला हाका मारताना प्रत्येकवेळी 'राजनन्दिनी' इतकी लाम्बलचक हाक का मारतात सगळे? आसान्नी कित्ती टाईमपास केला हाका मारत. दासाच्या जागी कुणीही असता त्यानेही जागीच प्राण सोडले असते की. नुसत 'नन्दिनी' म्हणून हाक मारायची ना.
वीस वर्षाआधी विस आक्रमक होता, आणि झेण्डे शान्त. आता उलट झालय.
हो बरोबर आहे.. पण आणखी प्रश्ण विचारले तर ते लोक ऊत्तरा दाखल मालिका लांबवतील म्हणून नाही विचारले... >>>>>>>++++++११११११११
अमा, तुपारे- गॉट कनेक्शन मस्त
दासान्नी मला सरन्जामे आडनाव दिलय हे सान्गताना विस घळाघळा रडण्याच नाटक करत होता. रडताना त्याचे अर्धेअधिक डायलॉग्जच कळत नव्हते. मात्र रडताना सुभा रिएलिस्टिक वाटला.
शितुला नन्दू जमायला लागलीये हळूहळू.
बटर नाईफने विसला मारायचा प्रयत्न करेल आणि तलवारीने अंडं कापेल कालियातील परवीन बाबी सारखे. मालिका पलटी केड्या फरार मोडमध्ये जाणार सर्व. >>>>>>>>>>
बाकी एक 'सर'... पात्रं झोपल्या पासून >>>>>>>> बाळ शेवटी 'खाली डोक वर पाय' ची अॅड करायला येते.
काल कोणी टायटल सॉन्ग नोटीस केल का? गाण्याच्या शेवटी नन्दू विस- ईशाकडे प्रेमाने बघत स्माईल देतेय. आता ह्याचा अर्थ काय समजायचा?
डासांना गपा ने मारलं
डासांना गपा ने मारलं
आणि आळ आसा वर, आसा नि रीपोर्ट उघडून वाचायची तसदी घेतली नाही
ती भावली कशी द्यायची ते मला
ती भावली कशी द्यायची ते मला माहिती नाही >>>>>
मलाही नाही माहीत. पण आर्यांनी दिल्यात न २ मागच्या धाग्यात. शेवटी शेवटीच आहेत. ६० च्या पुढेच सापडतील बहुतेक. त्या सेव इमेज करून मग त्या jpgs इथे बाकी फोटो लावलेत तसे लावता येतील. प्रतिमाश्रेय आर्यांना देऊन. बघा होतय का.
शितुला नन्दू जमायला लागलीये हळूहळू. >>>> काय उपयोग, जाईल उद्या परवा....मग आहेच पुन्हा जुनी ब्याद
आज बाळाला दाखवल,ती तर पुस्तक
आज बाळाला दाखवल,ती तर पुस्तक वाचत आहे,मग तिला कस काय आवत,केड्या,काय पागल समजतोस काय आम्हाला,
आज त्या बाळाला नेमक काय एक्स्प्रेशन द्यायच होत कुणाला कळल का?
कारण आज तिचा आधीपेक्षा जास्त मख्ख चेहरा होता.
@UP>>>अचूक निरिक्षण!!! द
@UP>>>अचूक निरिक्षण!!! द मख्खेस्ट!!!
डासांना गपा ने मारलं>>>> गप्पी मासे पाळा...
डासांना पळवून लावा..
असलं काहीतरी आठवायला लागतं...
कहर आहे फ्लॅशबॅक.... अजून नंदू चा नंबर...
ईशा चा जन्म...
तरुण ई आई कोण करेल?...
बाळाचे बालपण.. त्या अष्टम्या...
.... एकूणच ष्टोरी कितीही जोरात पळवली तरी गटांगळ्या काही चुकणार नाहीत... सतत शोधत रहा रानोमाळ लॉजिक!!
Pages