परवा घरी आलेल्या छोट्या पाहुण्याला बिझी ठेवण्यासाठी केलेली कलाकुसर.
तयार खेळण्याचा यूट्यूब व्हिडिओ
लागणारे साहित्य :
रिकामा पिझ्झा बॉक्स.
थोड्या बांबूच्या कामट्या.
पेपर कटर.
पेन्सिल, पेन, रंग, ब्रश,फेविकॉल.
सुई-दोरा.
क्रमवार (कला)कृती
१. खालील चित्रात दिल्याप्रमाणे पुठ्ठा कापून माकडाचे पार्ट्स बनवावेत.
२. हा फोटो रंग दिल्यानंतर. सोबत स्केचपेन स्केलची कल्पना येण्यासाठी.
३. क्राफ्ट वायर वापरून माकडाचे हातपाय जोडले. या ऐवजी सुई-दोरा वापरूनही करता येते. उद्देश खांदे अन कमरेत मोकळेपणे फिरणारे सांधे तयार करणे हा आहे.
४. बांबूच्या कामट्यांचा इंग्रजी एच आकार बनवून आपण तयार केलेले माकड्/पहिलवान दोर्याने टांगण्या पूर्वी.
५. हा अजून एक छोटुकला बनवलाय. यात बांबू स्किवर्स, कुल्फीची काडी अन थोडा पिझ्झा बॉक्सचा पुठ्ठा पायांकरता असा ऐवज वापरलेला आहे. हा फक्त करंगळीइतकाच उंच आहे.
कुल्फीच्या काड्या पाण्यात १५-२० मिनिटं भिजत ठेवल्या की कापायला सोप्या जातात अन तडकत नाहीत.
बांबूच्या काड्यांऐवजी प्लॅस्टिकच्या पट्ट्या देखिल वापरता येतील. व्हिजिंटिंग कार्डचा कागद पैलवान बनवायला आयडियल आहे. बिनखर्चिक खेळणे बनले अन पाहुण्याला २ दिवस पूर्ण एंगेज ठेवले.
मस्त.
मस्त.
मस्त आहे हे प्रकरण.... बनवून
मस्त आहे हे प्रकरण.... बनवून खेळून बघायला हवे.
बांबूच्या कामट्यां ऐवजी फुलझाडूच्या काड्या चालतील का?
भारीच ! करुन पहायला हवं..
भारीच !
करुन पहायला हवं..
छान तयार केलाय !!!!
छान तयार केलाय !!!! कुल्फीच्या काड्या पाण्यात १५-२० मिनिटं भिजत ठेवल्या की कापायला सोप्या जातात अन तडकत नाहीत. >> धन्यवाद माहितीसाठी. करून बघेन नक्की.
मस्तय हे
मस्तय हे
मस्तच
मस्तच
छान हस्तकला. फोटोही छान दिले
छान हस्तकला. फोटोही छान दिले आहेत.
मस्त!
मस्त!
कसलं प्रो बनलंय.मस्तच.
कसलं प्रो बनलंय.मस्तच.
मस्त बनवलंय! आवडलं.
मस्त बनवलंय! आवडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच जमला आहे प्रकार. छोटा
भारीच जमला आहे प्रकार. छोटा पाहुणा खुश झाला असेल या वेगळ्या आणि त्याच्या समोर क्रिएट झालेल्या टॉयवर. क्युट दिसतं आहे
भारी आहे हे! खर्चिक , महागाचे
भारी आहे हे! खर्चिक , महागाचे वगैरे नाहीच, शिवाय मुलांबरोबर असले उद्योग करणे हे एकदम बेस्ट क्वालिटी टाइम !!
फारंच सुंदर.
फारंच सुंदर.
मस्त!
मस्त!
झकास एकदम!
झकास एकदम!
मस्त, एकदम नीटस काम झाले आहे
मस्त, एकदम नीटस काम झाले आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)