२६ मे ला काय होणार

Submitted by नितीनचंद्र on 22 April, 2019 - 20:45

२०१९ चा डंका वाजत आहे २०१४ मधे गुगल वर सर्च करणारे कमी होते. आता एक्झीट पोल सोबत हे गुगल चे निरीक्षण पहा.

२०१९ च्या निवडणुकांच्या बाबतीत गुगलचा रिपोर्ट काय दाखवतो हे पहाण्यासाठी १ तास काढा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=853004728382235&id=222267095...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतमोजणी २३ ला आहे ना?
पत्रिका मांडताना वेळ चुकायला न को. बाकी कालच तुमची आठवण आली होती. का ते लिहितो थोड्या वेळात.

याहू, फेसबुक, ऑटोकॅड, विंडोजचे रिपोर्ट्स वेगवेगळे येताहेत.
कॅटिया च्या रिपोर्ट मधे भारतात पुतीनला बहुमत मिळताना दिसतेय. तर ओरॅकल ने किम जोंग चे सरकार येईल असे भाकीत केले आहे.

कॅटिया च्या रिपोर्ट मधे भारतात पुतीनला बहुमत मिळताना दिसतेय

>>

पूर्णपणे चूक. तुम्ही बहुतेक कॅटिया चा जुना सर्वे बघितलाय. आज सकाळी आलेल्या सर्वेनुसार शी जिनपिंग यांना बहुमत मिळणार आहे.

२६ की २३?
नितीनभाऊ भविष्य सांगता म्हणे. जरा डिटेल मध्ये सांगा बरं कोण किती कसा निवडून येईल ते. Wink

ज्यांच्या ड्यु डेट आहेत त्या गर्भवतींना कदाचित कळा येऊन मुलं होतील.
ज्यांचे सिझर करायचे ठरवलेच आहे त्यांना डॉक्टर मदत करतील....
बाकी आपलं नेहमीचंच....

धागाकरत्याने वर जी चर्चा पोस्ट केलीय, त्यात दाखवलेलं गूगल मीटर दुसरं तिसरं काही नसून गूगल ट्रेंड्स हेच आहे.
त्यात स्पष्ट दिसतंय, की सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या लोकसभेच्या नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी अव्वल स्थान पटकावून आहेत. गेल्या ३० दिवसांची आकडेवारीनुसार टक्केवारी -
१) नरेंद्र मोदी - ७५ ते ८०
२) राहुल गांधी - १० ते २५
३) प्रियांका गांधी - २ ते ४

लिंक - ( https://trends.google.com/trends/explore?date=today%201-m&geo=IN&q=%2Fm%...)

राहुल गांधींची आकडेवारी फक्त ३ राज्यात मोदींच्या तोडीस तोड आहे ते म्हणजे , केरळ (दोघांची ४४ टक्के), पुद्दुचेरी (दोघांची ४५ टक्के), आणि नागालँड (राहुल ५०, मोदी ४०).
प्रियांका आकडेवारीत राहुलच्याही जवळपास नाही, मोदींना टक्कर द्यायची गोष्टच सोडा.
गेल्या ९० दिवसांचा डेटा जवळपास हेच सूचित करतोय. काँग्रेसने राहुल गांधीच्या उमेदवारीसाठी केरळची का निवड केली, त्याचाही अंदाज यातून येईल.

या सगळ्या आकडेवारीतून मोदी लाट पुन्हा एकदा आली असं म्हणता येईल का?

@ भरत, तुम्ही पोस्टलेल्या लिंक मध्ये कुठल्यातरी UK based research group चा उल्लेख आहे, ज्याच नाव कुठेही जाहीर केलेलं नाही. तसच सर्वेमध्ये नेमके काय प्रश्न विचारले हेही नीटस सांगितलेलं नाही.

त्या लेखातल अजून एक निष्कर्ष - 'A significant majority of the electorate is voting for the Government’s leading Opposition party, the Indian National Congress (INC), whose leader, 48-year-old Rahul Gandhi, is witnessing a remarkable surge in popularity.'

गूगलच्या डेटा अनुसार दिसत असलेली राहुल गांधींची जेमतेम २०-२५ पर्यंतची टक्केवारी, ही remarkable कशी काय ठरते, हे मला अजूनही समजलं नाही.

बाकीचा लेखात अशाच मोघम वाक्यांची पेरणी केलेली आहे, आणि बहुतेक विधानां मागची नेमकी आकडेवारी नमूद केलेलीच नाही.

तेव्हा त्या सर्वेवर कितपत विश्वास ठेवायचा, हा एक मोठाच प्रश्न आहे.

गुगल ट्रेंडवरून इतके समजते तर इलेक्शन बंदच करायच्या की.

गुगलवर सर्च करताना त्या विषयाचा अभ्यासक अन विरोधक ,दोघेही तोच शब्द सर्च करणार ना ?

ग्रहताऱ्यांवरून अकलेचे तारे तोडण्यापेक्षा गूगल ट्रेंड किंचित सरस असतील ना? Wink
सर्व्ह करताना ही काय प्रश्न आणि कोणास विचारले याने जमीन अस्मानाचा फरक पडतो. इथे नावाचा सर्च हा निकष!

मला वाटले २६ मे टायपो आहे. पण निदर्शनास आणुन दिल्यावरही लेखकाने दुरुस्ती केली नाही म्हणजे त्यांना २६ मे च म्हणायचे आहे का? हा पण भविष्य वाणीचा भाग आहे का, की २३ ला नाही २६ लाच निकाल जाहीर होतील?

इतर निवडून आलेले लोक आहेत , त्यांना किती क्लिक भेटले असतील ?

आणि नेहरू , गांधी ह्यांचे क्लिक कुणाला जमा धरायचे ?

त्यांना वाटत असेल तसे , म्हणून त्यांनी 3 दिवस जास्त धरलेत

Proud

नुसते मोदी मोदी , शहाना सुद्धा संधी मिळायला हवी की स्किल दाखवायची

आणि नेहरू , गांधी ह्यांचे क्लिक कुणाला जमा धरायचे ?
नवीन Submitted by BLACKCAT on 28 April, 2019 - 07:49 >>>

अर्थातच राष्ट्रीय कॉंग्रेसला, पण ती तर कधीच संपली, आता आहे ती इंदिरा काँग्रेस.

इंदिरा , इंडिया आम्हाला सगळे सेमच , तुम्ही तसेही आमच्या पारटीत नाहीच.

संघ म्हणजे भाजपा नाही , भाजपा म्हणजे गोडसे नाही, इंदिरा म्हणजे इंडिया नाही.

नाही , नाही , नेति नेति नेति नेति .....

गुगल ट्रेंडवरून इतके समजते तर इलेक्शन बंदच करायच्या की.
>> गूगल तुमचा सर्च रिझल्ट मोजतं , मत नाही.

गुगलवर सर्च करताना त्या विषयाचा अभ्यासक अन विरोधक ,दोघेही तोच शब्द सर्च करणार ना ?
>> का विरोधकांना आणि विश्लेषकांना सर्च करायला फक्त मोदीच भेटतात का ? राहुल गांधीही आहे की तुल्यबळ विरोधक (म्हणजे बऱ्याच विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार) . विश्लेषक त्यांनाही सर्च करत असतीलच.

सर्व्ह करताना ही काय प्रश्न आणि कोणास विचारले याने जमीन अस्मानाचा फरक पडतो. इथे नावाचा सर्च हा निकष!
>> हो सर्वे करताना उत्तरं मिळवली जातात, आणि इथे गूगल वर लोकांनी स्वतःहून सर्च कुणाला केलंय त्याचा डेटा आहे. वरच्या मिडीयम च्या सर्व्हेत सगळा डेटा सोडा , सर्वे करणार्याच संस्थेचं नाव देखील जाहीर केलं नाही. किमान प्रत्येक निष्कर्षामागे ठोस आकडेवारी दिलेली नाही. फक्त significant rise , major issue
याप्रकारचे शब्द वाचायला मिळताहेत. अरे पण किती significant , किती टक्क्याने मेजर इशू ; हे सर्वे मध्ये का लिहिलं नाही, ते अजूनही अनुत्तरित आहे.

सकाळने घाई घाईत हाच सर्वे पकडून बातमी छापली होती (https://www.esakal.com/loksabha-2019/congress-will-get-213-seats-loksabh...) . ती अचानक का काढून टाकली , काय समजायला मार्ग नाही.

मनसेने मोदींचे व्हिडियो ज, फोटो शोधायला गुगल वापरलं. आणि मग लोकांनी. त्याचाच परिणाम
>> हम्म शक्य आहे. मनसे सारखा राष्ट्रीय पक्षाने नुसत्या महाराष्ट्रात आघाडी उघडली, अन मोदींची भारतातली सर्च टक्केवारी डायरेक्ट ७० वर जाऊन पोहोचली. नशीब मोदींच राजसाहेब रिंगणात उतरले नाहीत, नाहीतर भाजपाच महागठबंधनात जाऊन बसला असता.

आणि नेहरू , गांधी ह्यांचे क्लिक कुणाला जमा धरायचे ?
>> का वो, ते पण निवडणुकीला उभे आहेत का ?

Pages