Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37
स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.
त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सतीश राजवाडे ने direct केलंय
सतीश राजवाडे चं direction आहे म्हणजे बघायला पाहिजे. आणि सिद्धार्थ चांदेकर साठी सुद्धा ..
मधुरा देशपांडे.
मधुरा देशपांडे.
मी बघितले दोन भाग, मला फार काही उलगडा झाला नाहीये. टायटल song फार गोड. अमृता acting जबरदस्त. काल अमृता स्वप्नील सीन्स आवडले, डायलॉग्ज छान होते, तरल. सिद्धार्थचं charactor थोडं रूड वाटलं पहिल्या सीन ला. त्या दोघांचे सीन्स काही भावले नाहीत कालचे. साडेआठच्या मालिकेत विषय बोल्ड हे common झालंय पण इथे एका विवाहित स्त्रीचे विवाहबाह्य संबंध, नवऱ्याला माहिती असलेले. एरवी पुरुषांचे दाखवतात मालिकेत हा फरक. पण सीन्स बोल्ड नको दाखवायला असं वाटतं मात्र.
स्वप्नील ok, मधुरा अति गोड गोड overacting करते नेहेमीच, असं माझं मत. मला अमृता आणि सिद्धार्थ चांगला अभिनय करतील असं वाटतंय एकंदरीत पण त्यांचे romantic सिन्स बोअर वाटले मला. दोघांनी पाट्या टाकल्या.
काही वेगळं दाखवलं तर बघेन विवाहबाह्य संबंध आणि त्याच्या अवतीभवती फिरली तर नाही बघणार. फार बोअर वाटतं.
सतीश राजवाडे चं direction आहे
सतीश राजवाडे चं direction आहे म्हणजे बघायला पाहिजे. >>> डायरेक्शन उमेश नामजोशी. संकल्पना बहुतेक सतीश राजवाडे, ते आता स्टार प्रवाहचे हेड झालेत आणि त्यांना चंद्रशेखर फणसळकर यांच्या कथेवर पिक्चर काढायचा होता पण पिक्चरपेक्षा सिरीयल जास्त चांगली होईल हे त्यांच्या मनात आलं, इति स्वप्नील जोशी.
अमृता मला खूप आवडते glamrous अभिनेत्री आहे, अभिनय उत्तम करते मुळात. पण इथे काही वेळा इतकी खप्पड का दिसते कळत नाही, काही वेळा गोड दिसते. सिद्धार्थ पण मला खूप आवडतो. ह्या दोघांसाठी बघतेय मी.
डायरेक्शन उमेश नामजोशी.
डायरेक्शन उमेश नामजोशी. संकल्पना बहुतेक सतीश राजवाडे, >>> - हो , बदल केला आहे.
नाही आवडले तिनही भाग
नाही आवडले तिनही भाग
काव्या कमालीची आत्मकेंद्रीत वाटली ,फक्त स्वतःचा विचार करणारी ,स्वतःवर प्रेम करणारी
हिला विश्वासही हवा आणि निखिलही आयुष्यातून जायला नकोय
कुणाच्याही भावनांची किंमत नाहीये तिला
त्यावर चर्चा करण्यासाठी हा
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा >>> चर्चा ऐवजी चिरफाड असा बदल करा. सर्व मालिका त्याच मार्गाने जातात.
काव्या कमालीची आत्मकेंद्रीत
काव्या कमालीची आत्मकेंद्रीत वाटली ,फक्त स्वतःचा विचार करणारी ,स्वतःवर प्रेम करणारी >> bossy nature.. प्लस सायको वाटली..जे हव ते मिळवणारीच.. नवरा म्हणजे अगदीच साने गुरुजींच्या शाळेतला वाटला.. एकवेळ कोणी विबास होता..ती चुक म्हणू आणि पुढे जाऊ हे तरी तर्क सुसंगत वाटत.. पण इकडे बायको म्हणजे अमृता नवर्यला सांगतेय की मी नाही विसरु शकत निखिल ला.. आणि लग्न पण हवय..असं खरच घडत का.??
सिद आणि अमृता का वेगळे झाले.
सिद आणि अमृता का वेगळे झाले. ट्रेनमध्ये पोस्टर लावली आहेत जाहिरात करायला, चुकीचं मराठी आहे जाहिरातींमध्ये. स्वप्नील जेवढा प्रसिद्ध लेखक दाखवलाय ते बघून चेतन भगतची आठवण येते, मराठीत आहे का कोणी नेम-फेमवाला तरूण लेखक. मधुराचा आॅर्डरवाला केक अगदी घरगुती वाटत होता. ती मधुरा डोक्यातच जाते, गोग्गोड सगळं अजीर्ण होईंपर्यंत. सिद चिकणा दिसतो. तोच एक डोळ्यांना गारवा आहे या मालिकेत, अमृृृृता कुपोषित वाटते आणि स्वप्नील अतिपोषित. हुश्श, खूप पिसं काढली आज.
एपिसोडमधे दर दोन मिनीटांनी
एपिसोडमधे दर दोन मिनीटांनी 'जीवलगाऽऽऽऽऽऽ' असं का किंचाळतायत? जाम बोर होतंय ते!
सतिश राजवाडेची गुंतता हृदय हे
सतिश राजवाडेची गुंतता हृदय हे मस्त होती. पण त्यात सुद्धा विबासं च दाखवले होते.
याचे २ एपि पाहिले. पण अजून काही खास नाही वाटली.
rmd+111111
rmd+111111
हे कुठे पाहता येईल?
हे कुठे पाहता येईल?
टायटल सॉन्ग छान आहे ( साज ये
टायटल सॉन्ग छान आहे ( साज ये गोकुळी मधील काही पिसेस मोडिफाइड करुन वापरल्यासारखे वाटतात, गायिकेचे उच्चार स्पश्ट नाहित) अम्रुता स्टायलिश पण खप्पड दिसते , ती अतिव बारिक आहे, तिचे आणि सिद्धार्थचे सीन नाटकी वाटले,
नवर्याला बायकोचे अफेअर माहितेय ,ब्रेकप डे, नाव सगळ माहितीये हे सगळ अति रन्जित वाटत. स्वप्निलच ते ओठाच बारिक चन्बु करुन बोलण फार विचित्र वाटतय पण मुपुमु पेक्षा बरय.
मधुराच साबा-साबुन्च कौतुक डोक्यात जात होत, थोड रिअल आणी टोन डाउन काहि का दाखवत नाही हे लोक?
सिद्धार्थ मात्र एक नबर दिसतो, त्याने थोड वेट पुट ऑन केलय बहुधा पण असाच छान वाटतोय.
अमृृृृता कुपोषित वाटते आणि
अमृृृृता कुपोषित वाटते आणि स्वप्नील अतिपोषित >>> अगदी अगदी.
तिला इतकं खप्पड का दाखवलं काय माहिती. ती मला आवडते actually पण तिला इथे नीट सादर केलं नाहीये. तिने काम चांगलं केलंय पण. तो विश्वास का बायकोला भाव देतोय, ती निखीलमध्ये गुंतलीय पण आता तिचा इगो दुखावलाय आणि ती निखीलला हे नातं पुढे न्यायचं नाहीये तर लादायचा प्रयत्न करतेय. हे बरोबर नाहीये. समहाऊ ह्यांना काय दाखवायचं आहे नक्की हे मला काही अजूनही लक्षात आलेलं नाहीये.
सिद्धार्थ मात्र एक नबर दिसतो, त्याने थोड वेट पुट ऑन केलय बहुधा पण असाच छान वाटतोय. >>> थोडं वेट कमी व्हायला हवं असं वाटलं मला पण तो आवडतो मला. मधुराचा रोल मिताली मयेकर ला द्यायला हवा होता असं वाटतं मला, ती चांगला अभिनय करते. मग चांदेकर तीन family मेम्बर्स असते सिरीयलमध्ये . तिचे आणि सिद्धार्थचं लग्न होणार आहे आणि सिद्धार्थची खरी आई त्याची आई आहे इथे.
अमृृृृता कुपोषित वाटते आणि
अमृृृृता कुपोषित वाटते आणि स्वप्नील अतिपोषित. >>>
असं कसं, मिताली असेल त्याची
असं कसं, मिताली असेल त्याची बायको तर तो विबासं करायला तयारच होणार नाही
Hotstarवर नविन एपिसोड सकाळीच
Hotstarवर नविन एपिसोड सकाळीच अपलोड होतो..रात्री 8.30 पर्यंत थांबायची गरज नाही..
आज जिवलगा चा 1 भाग बाबांमुळे
आज जिवलगा चा लेटेस्ट भाग बाबांमुळे पाहिला... बाबा म्हणाले स्व जो लेखक आहे यात.. अस असेल तर मग मला तो संजय दत्तचा शब्द पिक्चर आठवला... त्यात तो लेखक असतो ,त्याच्या स्टोरी साठी त्याच्या बायकोला,ऐश्वर्या राय ला तिच्या स्तुडेंट शी अफेयर करायला लावतो... नंतर ती खरंच त्याच्या पाशी attract होते .. मग संजय दत्त ठरवतो की मी जे लिहेन तसंच या दोघांच होईल.. तो लिहितो की जेव्हा त्या स्टुडंट ला खरं कळतो तेव्हा तो आत्महत्या करतो.. actual मध्ये अस होतं नाही , मग त्याची बायको त्याला खोट सांगते की त्याने तू लिहिल्याप्रमाणे आत्महत्या केली.. मग संजय दत्त ला गिलिटी वाटायला लागतं आणि तो स्क्रिझोफेनिक होतो... मग त्याची बायको त्याला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करते... हुश्श...
अस काहीसं... म्हणजे स्व जो मुद्दाम ह खा ला त्याच्याशी अफेयर करायला सांगत असेल त्याच्या पुस्तकासाठी... पण ते खरं खरं होईल असं काहीसं... एन्ड ते कसाही बदलू शकतात ...
नटुकाकी, पहिला भाग
नटुकाकी, पहिला भाग बघितल्यावर मलाही हेच वाटले होते, पण कालचा एपी मध्ये सिद्धार्थ, हर्शदाला बोलतो कि तुला भिती नाही वाटत का की हे तुझ्या नवर्याला कळले तर, तेव्हा ती असे काहीच बोलत नाही
नाही आवडली मलाही पहिल्या
नाही आवडली मलाही पहिल्या भागापासून च ते दर दोन सेकंद ने मागे जीवलगा ss जाम irritate झालं. अमृता चा मेकप गंडलाय आणि अभिनय सुध्दा. खूप लाऊड झालाय. काय तर म्हणे जीवलगा . तिचं फक्त स्वतावर प्रेम वाटतंय. स्वजो इतका मजबूर नवरा का बनलाय फक्त for money ? Never expected that. त्याचा मुंबई पुणे चा hangover उतरला नाही असे वाटते. एकटा सिद् तेवढा ओअॅसिस आहे हा पोरगा 'निळ्या' असल्या पासून च मनात बसलाय त्याच्यासाठी काही दिवस बघेन.
हा पोरगा 'निळ्या' असल्या
हा पोरगा 'निळ्या' असल्या पासून च मनात बसलाय Happy त्याच्यासाठी काही दिवस बघेन.>> +111111111111111
अमृृृृता कुपोषित वाटते आणि
अमृृृृता कुपोषित वाटते आणि स्वप्नील अतिपोषित. >>> Rofl
अगदी अगदी
हा पोरगा 'निळ्या' असल्या पासून च मनात बसलाय Happy त्याच्यासाठी काही दिवस बघेन.>> +100%
अमृताचे काही सीन्स मला आवडले
अमृताचे काही सीन्स मला आवडले मात्र, काही लाऊड आहेत नक्कीच.
तिला इतकं लुकडी दाखवायची गरज काय होती, खप्पड दिसतेय हे तिच्या लक्षात येत नाही का.
स्वप्निल मधुरा नसते आणि वि बा सं ऐवजी गोड अमृता (खप्पड नसलेली) आणि सिद्धार्थ यांची वेगळी लवस्टोरी बघायला आवडली असती. भले वयात अंतर असुदे . हे काही फार बघेन असं नाही.
सिद्धार्थ अग्निहोत्रपासून आवडतो. ती प्रवाहची बेस्ट सिरीयल होती.
आत्ता तरी ती निखीलमध्ये
आत्ता तरी ती निखीलमध्ये गुंतलीय आणि तो तिला हवाच आहे असं आपल्याला दाखवलं आहे. आता ते नवरा सांगतोय म्हणून वागतेय, असा turn देतायेत की काय माहिती नाही.
निखीलची आई आणि बायको दोघी डोक्यात गेल्या मात्र.
अख्खी सिरीयलच माझ्या डोक्यात
अख्खी सिरीयलच माझ्या डोक्यात गेली.. एकच भाग पाहिला. उगाच काहीतरी चकाचक दाखवायचा प्रयत्न केलाय. काहीतरी मेलोड्रामा आणून शेवटी नवरा/ बायकोच्या नात्याचं उदात्तीकरण करणार.
विबासंवरची गुंतता हृदय हे आवडली होती. एकदम प्रॅक्टिकल.
स्वजोचा 'स' ला श म्हणणं जामच
स्वजोचा 'स' ला श म्हणणं जामच डोक्यात जातं. राजन भिसे चे पण बरेचसे उच्चार आवडत नाहीत. फारच वरणभात टाईप्स बोलत असतो.
शब्द सारखी असेल मालिका तर मग
शब्द सारखी असेल मालिका तर मग काही खरं नाही, बघणंच बंद करावं लागेल.
स्वजो एकेकाळी आवडायचा मला, पण दुनियादारी पासून जाम डोक्यात गेलाय. ( तो पिक्चर काढणारे, त्यात काम करणारे आणि चांगल्या विषयाची माती करणारे सगळेच डोक्यात गेलेत actually)
स्वजोचा 'स' ला श म्हणणं जामच
स्वजोचा 'स' ला श म्हणणं जामच डोक्यात जातं. >>+१
सिद्धार्थची आई अती करते आहे
सिद्धार्थची आई अती करते आहे असं वाटायला लागलंय. किती ते बाळाचं रडगाणं! त्या दोघांना ठरवूदे की!! इतकं मधेमधे कशाला? हाच मुद्दा मुंपुमुं३ मधेही डोक्यात गेला होता.
प्राजक्ता, कुठे पहातेस?
प्राजक्ता, कुठे पहातेस?
Pages