भारतासारख्या सर्वात मोठया लोकशाही प्रधान देशातील निवडणुकीकडे साऱ्या जगाच लक्ष वेधल गेलय.सत्ता कुणाला मिळणार हे आजतरी सांगता येणार नाही कारण भारतीय मिडिया एकांगी बातम्या देतांना दिसत आहे आणि सामान्य जनताही या निवडणुकीकडे उदासिनतेने पहातांना दिसत आहे .आम्ही काय केल हे सांगण्यापेक्षा विरोधक कसे नालायक आहेत हेच सांगण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत विकास हमिभाव ,शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, अर्थ व्यवस्था या प्रश्नांपासून भाजप पळ काढत असुन राष्ट्रवाद पुलवामा आणि सरजिकल ष्ट्राईक याभोवतीच भाजप निवडणुक फिरवू पहात आहे आणि विरोधक जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक नेवुन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा
वेळी सोशल मिडीयाचा भरमसाठ वापर होत आहे काहीच न मिळालेला ग्रामीण भाग विरुद्ध आधिक हवे अस मानणारा मध्यमवर्गीय अशी ही निवडणूक रंगवण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत मागील निवडणूक जो जाहिरनामा प्रसिद्ध केला त्याचे नावही सत्ताथारी काढायला तयार नाहीत मागिल निवडणूकीत ज्यि अण्णा हजारेंचा भाजपने वापर करुन सत्ता मिळवली त्यांनाही भाजपने अडगळीत टाकले आणि मोदी आणि राष्ट्रवादाभोवति ही निवडणूक केंद्रित करण्याचा आटापिटा भाजपने चालवला आहे.मोदींनी केलेल्या टिकेकडे आणि विरोधकांनी केलेल्या टिकेकडे जनता करमणूक म्हणून पहात आहे एक मात्र खरे आहे की भाजप असो वा विरोधक कुणासाठीही ही निवडणूक सोपी राहीलेली नाही.
2019ची भरकटलेली निवडणूक.
Submitted by ashokkabade67@g... on 13 April, 2019 - 12:13
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
टूथ पेस्ट म्हणजे कोलगेट हे
टूथ पेस्ट म्हणजे कोलगेट हे समजणारी जनता ज्या देशात आहे तिथे लोकशाही आहे असे तुम्ही कसे समजता
अण्णांचे नाव कशाला घेतलंत? ते
अण्णांचे नाव कशाला घेतलंत? ते बिचारे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी उपोषण करतात.भाजपच्या काळात वजनात वाढ झाली नाही म्हणून उपोषण केले नाही. एकदा केले पण वजन बरोबर आहे म्हणल्यावर उपोषण लगेच सोडले.