"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
कालच नेटवर अजून एक सिद्धांत
कालच नेटवर अजून एक सिद्धांत वाचायला मिळाली. वेडा राजा (मॅड किंग) हाच नाईट किंग आहे. आतापर्यंत मॅड किंगचा उल्लेख फक्त संभाषणातुनच आलेला आहे. अपवाद फक्त एका वेळेस अगदी थोड्या सेकंदासाठी चित्रीकरण आहे. जेमीने मॅड किंगला मारल्यानंतर त्याचे काय झाले, मॅड किंगला जाळले किंवा पुरले याचा काहीच उल्लेख कुठेही नाही.
नेड अंबर आणि मानवी अवयव भिंतीवर ज्याप्रकारे सर्पिलाकार मांडले होते तशीच रचना सीझन ३ च्या तिसऱ्या भागात घोड्यांच्या मुंडक्यांची केली होती. आता जर टार्गेरियन घराण्याचे चिन्ह बघितले तर ते तीन तोंडाचा ड्रॅगन असून सर्पिलाकार आकारात आहे. टार्गेरियन घराण्यातील लोकांना आगीपासून काहीही होता नाही. ज्याप्रमाणे डॅनेरिस आगीतुन दोनदा सुखरूप बाहेर येते त्याचप्रमाने नाईट किंगही आगीपासून सुरक्षित राहतो. ड्रॅगनला त्याब्यात ठेवण्याची कला फक्त टार्गेरियन घराण्यातच आहे आणि नाईट किंगने डॅनेरिसच्या ड्रॅगनला पुर्नजीवित करुन त्यावर ताबा मिळवला आहे.
जेंव्हा चिल्ड्रेननी व्हाईट वॉकर तयार केले आणि नंतर मॅड किंगलाही व्हाईट वॉकरमध्ये रूपांतर केले त्यानंतर मात्र नाईट किंगने स्वत:च्या क्षमता वाढवून मुडद्यांची सेना उभारली. मॅड किंग हा स्वभावतःच क्रूर आणि खुनशी असल्याने हे सहज साध्य करू शकला.
नाईट किंगला आता त्याचे सर्व राज्य परत मिळवायाचे असून त्याने दक्षिणेकडे आक्रमण करण्यासाठी प्रयाण केले आहे.
अर्थात हा सर्व अंदाज.
मॅड किंगचं नाईट किंग >> भारी
मॅड किंगचं नाईट किंग >> भारी थेअरी आहे
I am waiting for an old
I am waiting for an old friend>>.. हे बहुधा टिरीयन साठी असावं.का ?. त्यानं bran ला मदत केलेली तो पडल्यावर.. विशेष प्रकारचं खोगीर तयार करणे आणि निदान तो हिंडू फिरू शकेल असं पाहणे इ . ( पहा ..बास्टर्ड,क्रिप्पल अँड ब्रोकन थिंग्स )
गेन्ड्री आणि आर्या चा जोड कसा काय जुळवायला बघतात ? कसला फालतू आहे तो तिच्या मानानं
ओल्ड फ्रेंड जेमीच असावा
ओल्ड फ्रेंड जेमीच असावा
आर्याने गँड्रीला स्पेसिफिक वेपन करून मागितलेय. ते डिझाइन भाल्यासारखे दिसत होते, जे तिचे नेहमीचे वेपन नाही. ते आइस ड्रॅगन साठी कामी येईल का?
मॅड किंगचं नाईट किंग >> भारी
मॅड किंगचं नाईट किंग >> भारी थेअरी आहे >> होय ! +१
ओल्ड फ्रेंड जेमीच असावा >>
ओल्ड फ्रेंड जेमीच असावा >> कस्काय ?
सेर्सी ने ड्रॅगनच्या विरुध्द
सेर्सी ने ड्रॅगनच्या विरुध्द काही वेपन तयार केले होते. त्याचे पुढे काय झाले/ होईल?
एकदा वापरले ते वेपन. ब्रॉन ने
एकदा वापरले ते वेपन. ब्रॉन ने ड्रोगॉन ला जखमी पण केले होते. मला तर वाटले होते की आता खाल ड्रोगो सारखीच त्याची गत होणार. पण कालच्या नव्या भागात तर ठीक दिसला.
ते वेपन ड्रोगॉन ने तोडले असले तरी नवे बांधणे काहीच अवघड नाही त्या कायबर्न ला. पण सर्सी ने आर्मी पाठवलीच नाहीये सध्या तरी फ्रन्ट वर त्यामुळे कसे वापरेल तिलाच माहित.
त्या गोल्डन आर्मी चा पण रोल कसा असेल काही कळत नाही. फार काही मेनासिंग वाटले नाहीत अरायवल च्या सीन मधे तरी.
ओल्ड फ्रेंड नाईट किंग असावा.
ओल्ड फ्रेंड नाईट किंग असावा.
मॅड किंग नाइट किंग कसा असेल?
मॅड किंग नाइट किंग कसा असेल? त्याला जेमीने मारलं ना? आणि तेव्हा तो ओल्डर दिसत होता. ज्याला चिल्ड्रन ऑफ द फॉरेस्टनी 'मारलं' तो माणूस यन्गर दिसत होता.
सर्सी ला हत्ती का पाहिजेत पण?
सर्सी ला हत्ती का पाहिजेत पण?!
>>> सर्सी ला हत्ती का पाहिजेत
>>> सर्सी ला हत्ती का पाहिजेत पण?!
हो, ते काही कळलं नाही.
बरं, आठेक हजार वर्षांत कोणी न
बरं, आठेक हजार वर्षांत कोणी न पाहिलेले व्हाइटवॉकर्स आत्ताच का परत आलेत?
सीझन १ एपिसोड १मध्ये नेड म्हणाला होता की हजारो वर्षांत कोणी पाहिलेलं नाही व्हाइट वॉकर्सना, तेव्हा मॅड किंग = नाइट किंग हे काही टाइमलाइनमध्ये बसत नाही.
>>मॅड किंग नाइट किंग कसा असेल
>>मॅड किंग नाइट किंग कसा असेल?<< +१
टाइमलाइन जुळत नाहि. नाइट किंग हजारो वर्षांपुर्वि बनवला गेलेला आहे; याउलट मॅडकिंग काहि वर्षांपुर्विच मारला गेलाय. नाइट किंग मध्ये मल्टिपल वर्जन्स नाहित (नसावेत)...
मला स्वतःला ब्रॅन = नाइट किंग
मला स्वतःला ब्रॅन = नाइट किंग थिअरी जास्त आवडलीये पण ही मॅड किंग= नाइट किंग थिअरी केवळ " टार्गॅरियन्स व्यतिरिक्त कुणीही ड्रॅगन वर बसू शकत नाही" या समजावर आधारित बनवली गेली असावी.
टाइम लाइन बद्दल - नाइट किंग हजारो वर्षापूर्वी बनवला गेलाय की पहिला व्हा. वॉ. हजारो वर्षापूर्वी बनला?
>>> नाइट किंग हजारो
>>> नाइट किंग हजारो वर्षापूर्वी बनवला गेलाय की पहिला व्हा. वॉ. हजारो वर्षापूर्वी बनला?
ओह हम्म... दॅट्स अॅन एट सीझन क्वेश्चन!
>>टाइम लाइन बद्दल - नाइट किंग
>>टाइम लाइन बद्दल - नाइट किंग हजारो वर्षापूर्वी बनवला गेलाय की पहिला व्हा. वॉ. हजारो वर्षापूर्वी बनला?<<
नाइट किंगने सगळे व्हाइट वॉकर्स बनवले, आणि त्यानंतर त्या व्हाइट वॉकर्सनी आपापले झांबीज (वाय्ट्स) बनवले. जॉन/डॅनीला अशी स्ट्रॅटजी बनवावी लागेल कि त्यांनी केवळ नाइट किंगला उडवलं कि सगळी अन्डेड सेना पत्त्यासारखी कोसळेल...
एकूण व्हाइट वॉकर्स हा भलताच
एकूण व्हाइट वॉकर्स हा भलताच ग्रे एरिया आहे.
तो प्रश्न अशासाठी की जर हजारो
तो प्रश्न अशासाठी होता की जर हजारो वर्षापूर्वी बनला तो पहिला व्हा वॉ असेल तर त्यांना आणि इतर वाइट्स ना मोटिवेशन नाही हल्ला करण्याचं, म्हणून ते बसले वॉल च्या पलिकडे. पण जर मॅड किंग समहाऊ नाइट किंग बनला असेल तर तर टाइम लाइन मॅच होते. आत्ताच का? याचं उत्तर बर्यापैकी मिळतं कारण मॅड किंग कडे मोटिव आहे. आयर्न थ्रोन परत घेण्याचा.
हो, मेक्स सेन्स.
हो, मेक्स सेन्स.
>>म्हणून ते बसले वॉल च्या
>>म्हणून ते बसले वॉल च्या पलिकडे. <<
आय थिंक, अन्डेड आर्मी वॉल पलिकडे रोखण्यामागे ब्रँडन स्टार्क सिनियर (?) याने उभारलेला मॅजिक स्पेल होता. शिवाय नाइट वॉचची निर्मितिच या कारणासाठी झाली होती. त्या मॅजिक स्पेलची धार कशी कमी होत गेली वा व्हाइट वॉकर्सची ताकद कशी वाढत गेली याचे धुरसट संदर्भ दिलेले आहेत...
राज, ते अन्-डेड असं लिहा बघू.
राज, ते अन्-डेड असं लिहा बघू.
आता राहुदे, दुसरा अर्थ हि
आता राहुदे, दुसरा अर्थ हि लागु होतोय...
(No subject)
आय थिंक, अन्डेड आर्मी वॉल
आय थिंक, अन्डेड आर्मी वॉल पलिकडे रोखण्यामागे ब्रँडन स्टार्क सिनियर (?) याने उभारलेला मॅजिक स्पेल होता. शिवाय नाइट वॉचची निर्मितिच या कारणासाठी झाली होती. त्या मॅजिक स्पेलची धार कशी कमी होत गेली वा व्हाइट वॉकर्सची ताकद कशी वाढत गेली याचे धुरसट संदर्भ दिलेले आहेत...>>> +१
मॅड किंग=नाईट किंग ही थिअरी नाही पटत. टाईमलाईन मुळे.
त्या ओशा, ओल्ड नॅन्स तसेच इतर काही लोकांच्या बोलण्यात असे संदर्भ आहेत की टार्गॅरियन्स वेस्टरॉसला यायच्या सुमारे ८००० वर्षांपूर्वी long night, which lasted for generations आली होती. तेव्हा सर्वप्रथम व्हा वॉ चा हल्ला झाला होता ज्याला children of forest आणि first men यांनी एकत्र येवून लढा दिला, इति जॉन स्नो.
आणि children of forest च्या म्हणण्यानुसार या लाँग नाईटच्या आधी first men पासून त्यांचे व त्यांच्या old god of the forest चे संरक्षण करता यावे म्हणून त्यांनी नाईट किंग बनवला.
आता हे व्हा वॉ सुमारे ८००० वर्षांनी आत्ताच का परतलेत तर सिटाडेलच्या माहितीनुसार इतक्या वर्षांनंतर प्रथमच ती लाँग नाईट आलीये. स्टार्क्सचे वर्ड्स winter is coming असायचं कारणही हेच की त्या लाँग नाईट्च्या वेळी चिल्ड्रन ऑफ फॉरेस्ट बरोबर लढणारे first men म्हणजेच सध्याचे स्टार्क्स/नॉर्दर्नर्स.
व्हाइट वॉकर्स आणि नाइट किंग
व्हाइट वॉकर्स आणि नाइट किंग हा सगळ्यात कमी डेवलप झालेला भाग आहे कादंबरीत आणि सिरीजमध्ये पण माझ्या मते. बाकी राज्ये, पात्रे व त्यांचे ताणतणाव जितक्या बारकाईने येतात त्या तुलनेत व्हावॉ आणि नाकिं यांची काहीच पार्श्वभुमी व त्यांच्या क्रियेमागील उद्देश स्पष्ट होत नाही.
अर्थात होडोर्/होल्ड द डोअर या प्रसंगानंतर मार्टिनबाबांच्या प्रतिभेला साष्टांग नमस्कार घातला आहे. त्यांनी कुठून काय काय डोक्यात जोडून ठेवलय माहिती नाही. साँग ऑफ आइस अँड फायर असे पुस्तकांच्या मालिकेचे नाव सुरुवातीपासून असल्याने हे हिममानव (व्हावॉ) फारच महत्त्वाचा घटक आहेत पण ते डेवलप केलेले नाही.
सीझन ८ मध्ये बॉलीवूडचा कोणी दिग्दर्षक गेला आहे की काय अशी शंका आली, विशेषतः डेनिरीस आणि जॉन स्नो सैनिक युद्धाची तयारी करत असत्ताना गुलुगुलु गप्पा मारतात ते दृष्य. बॉलीवूडी दिग्दर्षक मुख्य असता तर तिथे एक गाणं पण आलं असतं, आणि मागे नॉर्दर्नर मुलींचा कवायत डान्स!
वा वा, इथे येऊन सगळ्या
वा वा, इथे येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. ऑलरेडी खुप मीम्स यायला लागलीयेत.
(No subject)
त्यावरून हे आठवलं :
वर कोणितरी नणंद्/भावजयांचा
वर कोणितरी नणंद्/भावजयांचा त्रिकालाबाधित मुद्दा आणलेला आहेच
>>>
सान्साची भावजय प्रियांका चोप्रा ना?
भावजय नै ओ. जाऊ बै आहेत त्या.
भावजय नै ओ. जाऊ बै आहेत त्या.
Pages