बऱ्याच दिवसाने घरी जायचं म्हंटल कि पॅकिंगला आपोआपच वेग येतो आणि त्यात जर फॅमिली टूर ला जायचं असेल तर दुधात साखर..
तसंच आज माझं झालेलं १८ च पुणे यवतमाळ बुकिंग कॅन्सल करून १७ ला केलं होत कारण आता एक दिवस पण इथे थांबायचं म्हणजे १ वर्षासारखं वाटलं असत मला..६ ची गाडी होती मी दुपारी ३ पासूनच सगळं आवरून बसले होते. ५.३० ला संगमवाडीला पोचले..आभाळ आलेलं होत माझी गाडी लागलेली होती मी माझी सीट शोधून सामान ठेवलं आणि निवांत बसून घेतलं..थोड्यावेळात बस निघाली ती सोबत पावसाच्या सरी घेऊनच..
मी घरच्या वाटेने जातेय त्यात पाऊस आणि सोबतीला माझ्या आवडीची निवडक गाणी..हाच काय तो मी वाट पाहत असलेला आनंदाचा परमोच्च क्षण..
रात्री ९ ला गाडी थांबली मी सोबत आणलेला टिफिन खाल्ला आणि छान झोपी गेले सकाळी उठल्यावर मी माझ्या विदर्भात असणार याचा किती आनंद होत होता हे तर आता इथे शब्दात पण मांडता यायचं नाही मला..
सकाळी उठले तेव्हा ७ वाजले होते मी विंडो मागे सारून बाहेर पाहिलं पण इकडे मात्र सगळं कोरडठणं होत ,पावसाच्या काही खुणा नव्हत्या सगळी जंगलं निष्पर्ण ,ओसाड; नदीपात्र सुकलेली..मन खट्टू झालं.
९ ला गाडी यवतमाळ ला पोचली मी पटकन सामान आवरून समोर गेली आणि माझ्या स्टॉपला उतरले. बाबा आधीच तिथे थांबून होते खूप छान वाटलं. प्रवासाचा क्षीण कधीच निघून गेला होता..
घरी आले तर आई दारातच उभी होती तिच्या गोड गुलाबी चेहऱ्यावरचं सुंदर हास्य पाहून आयुष्यात आपल्याला सगळं मिळालंय बस्स आता कशाचीच गरज उरली नाही असं सुद्धा एकदा वाटून गेलं..आईला घट्ट मिठी मारून मी ६ महिन्याने माझ्या घरात प्रवेश केला खूप प्रसन्न वाटलं घरात खूप बदल झाले होते नवीन सोफा नवीन झुंबर नवीन टेबलं..सगळं घर अगदी नवं नवं..माझ्या खोलीत पण भरपूर बदल केले होते..छान वाटलं..
मी पटकन अंघोळ केली आणि आईच्या हातच चविष्ट जेवण करून बाहेर गार्डन मध्ये आले..
सुकलेली झाड, पाण्याची टंचाई किती तीव्र आहे हे सांगत होती मी बाहेरच्या टाकीतून थोडं पाणी घेऊन माझ्या आवडत्या गुलाबाच्या झाडाला घातलं. त्या सुकलेल्या झाडावर एक कोवळं सुंदर गुलाबाचं फुल उमललं होत इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते आनंदाने फांदीवर डोलत होत.."ताई थँक यु..! खूप तहान लागली होती आता कसं मस्त वाटय.." ते इवलस फुल माझ्याकडे पाहून खुद्कन हसून बोललं..मला त्याच खूप कौतुक वाटलं..
आपल्याला कसं जमत नसेल बरं असं प्रतिकूल परिस्थितीत उमलायला..?
मला त्याचा हेवा वाटला आणि मग माझंच हसू सुद्धा आलं.
आज मी त्या इवल्या गुलाब फुलाकडून जीवनाचा खूप मौल्यवान पाठ शिकले होते, जो आयुष्यभर मला पुरणार होता..
आईने मला घरात बोलवले आणि मी उद्याच्या तयारीला लागले एक वेगळाच उत्साह आणि चेहऱ्यावर नवीन खूप काहीतरी मौल्यवान गवसल्याचा आनंद घेऊन..
छान लेखन आहे.
छान लेखन आहे.
आवडलं. घरची ओढ.. इ वर्णन
आवडलं. घरची ओढ.. इ वर्णन रिलेट झालं.
मी सुद्धा पुण्यावरून निघतांना असाच विचार करायची की उद्या झोप उघडल्यावर आपल्या विदर्भात असेन
धनयवाद सिद्धी आणि srd..
धनयवाद सिद्धी आणि srd..
सुरवातीला मी माझ्या गावी ऐवजी माझ्या विदर्भात असच शब्दप्रयोग केला होता..पण नंतर वाटले हा संपूर्ण महाराष्ट्रच आपला आहे त्यामुळे विदर्भ म्हंटले तर वाचनाऱ्याला आपण संकुचित विचार केल्यासारख वाटेल..म्हणून वाक्यरचना बदलली..
अर्थातच महाराष्ट्र आपला आहेच.
अर्थातच महाराष्ट्र आपला आहेच.. पण विदर्भा बद्दल soft corner असणारच ना वैदर्भिय व्यक्तिला
@srd.. हो अगदी बरोबर आहे..
@srd.. हो अगदी बरोबर आहे..
तुम्ही पण विदर्भातील आहात हे वाचून छान वाटले..
मी घरच्या वाटेने जातेय त्यात
मी घरच्या वाटेने जातेय त्यात पाऊस आणि सोबतीला माझ्या आवडीची निवडक गाणी..हाच काय तो मी वाट पाहत असलेला आनंदाचा परमोच्च क्षण..
>>वाह .. मस्त
धन्यवाद च्रप्स..
धन्यवाद च्रप्स..