साहित्याचे निकष यावर माझे मत

Submitted by हर्ट on 28 October, 2009 - 03:14

नमस्कार

या फलकावर तुम्ही चांगल्या साहित्याची निवड करताना कुठले निकष लावता यावर लिहा. ज्यानी त्यानी विचारविनिमय करुन आपापले मत प्रामाणिक होऊन मांडावे. स्पष्टीकरण देता आले तर अजून छान. अलिकडे मायबोलिवर चांगल्या कवितांची निवड होते आहे. पुढे कधीतरी आणखी कुठल्या तरी साहित्यप्रकारचीही निवड केली जाईल. त्यावेळी इथली बहुसंख्य मते विचारात घेता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचनापुर्वी तर साहित्य चांगलं आहे की बरं हे ठरवणं मुष्किल असतं. त्यामुळे साधारणपणे वैयक्तिकरित्या मी तरी ऐकिव माहीती, वाचिव परिक्षणं यांचा आधार घेते. चांगल्या साहित्याची व्याख्या ही व्यक्तीसापेक्ष आहे. कुणाला कुणी लेखक आवडत असेल आणि त्याने काहीही लिहिलं तर ते उत्तम साहित्य, कुणाला विशिष्ट विषयात रस असेल तर अशा पद्धतीने त्यांच्या मते त्या विषयावरची सर्व पुस्तकं ही उत्तम साहित्यात मोडत असतील .
माझ्या वैयक्तित मतानुसार चांगल्या साहित्याची निवड करताना लेखक, साहित्याचा विषय, प्रस्तावना, शेवटच्या पानावरचं पुस्तकाचं विवरण, आणि काही अंशी पब्लिशिंग एजंट ह्या महत्वाच्या बाबी आहेत. पुस्तकाची पान संख्या, टाईप, किंमत, या गोष्टी ही महत्वाच्या आहेत पण खूप नाही.

लेखक - प्रस्थापित असेल तर साहित्याची निवड करणं तसं बर्‍यापैकी सोप्पं होतं, त्याच लेखकाची पुर्वी येऊन गेलेली पुस्तकं, त्यांचा अभ्यास, भाषा शैली, आणि त्यावरील प्रभुत्व, मांडण्याची पद्धत.

प्रस्तावना - उत्तम असेल तर वाचक पुस्तक लगेच स्विकारतो. मला स्वत:ला कमीत कमी शब्दातली प्रस्तावना आवडते. घडाभर तेल नमनालाच घातलं असेल तर...? Sad कठिण वाटते पुस्तक वाचायला.

शेवटच्या पानावरचे विवरण - हे बहुधा प्रकाशकाचे असावे, त्यात संपुर्ण पुस्तकाचा सारांश आणि मुख्यपृष्ठ ही आकर्षक असावं.

पुस्तक पान संख्या - मध्यम असेल तर उत्तम, वाचनात गॅप पडला तर खुप मोठे पुस्तक वाचण्याचा कंटाळा केला जातो. (५००-६०० पानी पुस्तकं मी तरी टाळते) याचा अर्थ असा नाही की ते उत्तम साहित्य नाही, कदाचित या सवयीने मी एखाद्या उत्तम साहित्याला मुकले असेन. Sad

किंमत, भाषा शैली, मांडणी - सगळंच चांगलं आणि सोप्पं हवं. गौरी देशपांडेंची पुस्तकं २-३ वेळा वाचल्याशिवाय समजत नाहीत (निदान मला तरी :()

१. साहित्यातील विचार (असल्यास) स्पष्टपणे, सुसंगतरीत्या मांडलेला असावा.
२. अलंकारिक फाफटपसारा शक्यतो कमी असून आशयाला महत्त्व असावे.
३. कविता असेल तर त्यात टिंबे टिंबे (....) कमी असावीत Happy
४. वाचकांना आनंद मिळेल, विचार करावयास लावेल असे लेखन असावे.
५. लिखाणात (इतरांच्या लेखनाच्या तुलनेत) वेगळेपणा असावा. लेखनात व्यक्त झालेल्या विचारांची अनुभूती वाचकांस यावी..

माझ्या पोस्टमध्ये मला अजून लिहायचं होतं वेळे अभावी लिहू शकले नव्हते.
दुर्वास नी लिहिलेल्या सर्व मुद्द्यांना अनुमोदन.

वाचताना जे मनाला भावते आणि गुंग करून टाकते ते साहित्य. जेव्हा वाचकाला जाणवतं की 'अरे मलाही असंच वाटतंय. माझ्या भावनांची या लेखकाच्या भावनेशी एकतानता आहे.' तेव्हा खरे सूर जमतात. म्हणूनच रंजन हा कोणत्याही साहित्याचा मूलभूत निकष ठरावा.