Submitted by माउ on 7 April, 2019 - 00:25
(मी एवढ्याचसाठी हे श्वास घेत आहे)
तो भास काळजाचे श्वासात देत आहे
रस्त्यावरी विखुरली शकले जुन्या मनाची
कुठल्या नव्या ठिकाणी पाऊल नेत आहे?
तो ऐकवून स्वप्ने आला नभास बहुधा
पाऊस आज पडतो वेड्या नशेत आहे..
डोळ्यांमधील भाषा वाचून घेत गेले
इतके अबोल गाणे माझ्यात येत आहे
आकाश तारकांचे उतरून आत आले
तो चंद्र आज बहुधा माझ्या कवेत आहे
-रसिका
०४/१७/२०१९
(तरही गझल: मतला सुप्रिया जाधव )
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तो ऐकवून स्वप्ने आला नभास
तो ऐकवून स्वप्ने आला नभास बहुधा
पाऊस आज पडतो वेड्या नशेत आहे..
भारीच! सगळ्याच ओळी खुप सुंदर.
रस्त्यावरी विखुरली शकले
रस्त्यावरी विखुरली शकले जुन्या मनाची
कुठल्या नव्या ठिकाणी पाऊल नेत आहे?
>>>>>
वा!!!! आवडलं!!!!
रास्तेपे बिखर गये टुकडे पुराने दिलके,
कहा नये रास्तोपर पैर ले जा रहे है!!!
धन्यवाद!
धन्यवाद!
रास्तेपे बिखर गये टुकडे पुराने दिलके,
कहा नये रास्तोपर पैर ले जा रहे है!!!> मस्त!
आकाश तारकांचे उतरून आत आले
आकाश तारकांचे उतरून आत आले
तो चंद्र आज बहुधा माझ्या कवेत आहे>>
सुंदर लिहिलंय.. आवडली
रस्त्यावरी विखुरली शकले
रस्त्यावरी विखुरली शकले जुन्या मनाची
कुठल्या नव्या ठिकाणी पाऊल नेत आहे?
>>>>>
वा!!!! आवडलं!!!!
रास्तेपे बिखर गये टुकडे पुराने दिलके,
कहा नये रास्तोपर पैर ले जा रहे है!!!
>>>>>> मस्त गझल्,मस्त प्रतिसाद!
सहीच ! तो ऐकवून स्वप्ने आला
सहीच !
तो ऐकवून स्वप्ने आला नभास बहुधा
पाऊस आज पडतो वेड्या नशेत आहे..>> हे विशेष आवडलं .. पण सगळेच छान आहेत
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
रास्तेपे बिखर गये टुकडे
रास्तेपे बिखर गये टुकडे पुराने दिलके,
कहा नये रास्तोपर पैर ले जा रहे है!!!
भारीच अज्ञातवासी! जमले तर पुर्ण कविताच अनुवादीत करा ना. आवडेल वाचायला.
शालीदा बघतो प्रयत्न करून!
शालीदा बघतो प्रयत्न करून! चुकीच्या हिंदीसाठी आधीच माफी!
स्वैर अनुवाद!
हम बस इसिलीये सांस ले रहे,
वो ख्वाब दिल के सांस मे दे रहे!
रास्तेपे बिखर गये टुकडे पुराने दिलके,
कहा नये रास्तोपर पैर ले जा रहे!
शायद बादलो को आये सपने सुनाके,
पगले बेहोश बनकर बरस रहे!
आंखो की जबां पढते गये,
इतने बेजुबान गीत आज मेरे मन मैं!
तारोंका आसमाँ जमीन पै उतर रहा,
आज वो चांद मेरे आहोश मैं!
माउ,
माउ,
मूळ मिसरा (मी एवढ्याचसाठी हे श्वास घेत आहे) तुमचा आहे ना? सुप्रियाचाही असाच एक मिसरा असल्याचे आठवते.
गझल छान झाली आहे.
अज्ञातवासी, गझलमधले तांत्रीक
अज्ञातवासी, गझलमधले तांत्रीक मला काही समजत नाही. ते बेफीजी सांगु शकतील.
स्वैरानुवाद अतिशय सुरेख जमला आहे.
शायद बादलो को आये सपने आये सुनाके,
पगले बेहोश बनकर बरस रहे!>>> येथे 'आये' दोनदा आले आहे. 'शायद बादलो को आये सपने सुनाके' असं हवय का?
सुरेखच जमला आहे अनुवाद!
शालीदा, मला गझल मधलं काहीही
शालीदा, मला गझल मधलं काहीही कळत नाही पण बऱ्याचदा रिलेट होतात. तरीही प्रयत्न करून बघितला.
आणि आये चुकून दोनदा झाला होता. तो काढला आहे.
खूप खूप धन्यवाद!
बेफीजी, मिसरा त्यांचाच आहे.
बेफीजी, मिसरा त्यांचाच आहे..म्हणूनच तरही गझल म्हणले आहे..त्यांची परवानगी घेऊनच पोस्ट केली आहे
तो ऐकवून स्वप्ने आला नभास
तो ऐकवून स्वप्ने आला नभास बहुधा पाऊस आज पडतो वेड्या नशेत आहे..... खुप मस्त...
क्या बात है....
क्या बात है....
निव्वळ अप्रतिम
निव्वळ अप्रतिम
सहीच
सहीच