Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही भारतीय सेनेवरही
तुम्ही भारतीय सेनेवरही विश्वास ठेवत नाही. >> विरोधक लष्कराबद्दलच शंका घेत आहेत असे जनतेच्या मनावर बिंबवायचे.
ऑ! हे तर काँग्रेस स्वतःच सांगतं की सैन्यावर त्यांचा विश्वास नाहीच. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच आहे की सैन्याचे विशेष अधिकार काढुन घेऊ. Armed forces special powers act. भारतीय सैन्य या कायद्याचा दुरूपयोग करतं, ह्युमन राईट्सला धक्का पोचतो असा सूर अलगाववादी व पाकिस्तानचा असतो , आता काँग्रेसही तेच म्हणत आहे. सैन्यावर विश्वास असता तर अधिकार कमी करण्याची भाषा नसतीच.
२०१८ मध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांचंही वक्तव्य आहे की भारतीय सेना जितके टेररिस्ट मारते त्यापेक्षा जास्त सिव्हिलियन्स मारते. हे वाक्य लष्कर ए तोयबाने अर्थातच उचलून धरलं होतं.
Armed forces special powers
Armed forces special powers act. भारतीय सैन्य या कायद्याचा दुरूपयोग करतं, ह्युमन राईट्सला धक्का पोचतो असा सूर अलगाववादी व पाकिस्तानचा असतो , आता काँग्रेसही तेच म्हणत आहे.
अब्यास वाढवा, हे आश्वासन भाजपणेही दिले आहे.
https://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-amit-shah-removed-afspa...
अरूणाचल प्रदेश
Nation First, Party Next,
Nation First, Party Next, Self Last - लाल कृष्ण आडवाणी
कोटावर स्वतःचेच नाव, सोन्याच्या अक्षरांत, हज्जार वेळा कोरलेला सुट समोर आला. गुगलल्यावर दिसतो. पुढे त्या कोटाचे तब्बल चार कोटी मिळाले, गरिबांना वाटले. २० - २० तास काम करणारे पंतप्रधान, पुलवामा हल्ला झाला त्यावेळी पण महत्वाच्याच कामात व्यस्त होते.
https://www.telegraphindia.com/india/congress-ends-silence-critiques-gov...
पाच वर्षांच्या सक्तीच्या विश्रांती नंतर लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांचे अनमोल विचार ब्लॉग मधे मांडले आहेत.
In our conception of Indian nationalism, we have never regarded those who disagree with us politically as “anti-national". लाल कृष्ण आडवाणी
http://blog.lkadvani.in/nation-first-party-next-self-last/
60 वर्ष वय झाले की राजकारण
60 वर्ष वय झाले की राजकारण मधून व्यक्ती बाहेरच गेला पाहिजे शरीर साथ देत नाही .
अडवाणी बाहेरच जायला पाहिजेत.
काँग्रेस ल फक्त बुजगावणे लागत 70/80 वर्षाचं
ज्याची ना बुध्दी चालत ना शरीर
ज्याची ना बुध्दी चालत ना शरीर
आजकाल कॉंग्रेसींना अडवाणींचा
आजकाल कॉंग्रेसींना अडवाणींचा फारच कळवळा आलेला आहे.
मी काय म्हणतो त्यांच्याबद्दल एवढेच वाईट असेल तर सरळ पक्षात प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारीच द्यावी.
त्यांच्या अनुभवाचा झाला तर कॉंग्रेस ला फायदाच होईल.
सत्ता का मिळावी ? ती
सत्ता का मिळावी ? ती मिळाल्यानंतर काय करण्याची इच्छा आहे ?
कोणत्या पातळीला जाऊन वैयक्तिक हितसंबंध जोपासण्याची सक्ती आहे ??
हे घटक परिमाण म्हणून बघितले तर मोदींचे नाणे (भाजपाचे नव्हे !) हे अस्सल सोन्याचे आहे.
त्यांचा सत्ता मिळवण्याचा हेतू स्वतःची आणि स्वतःच्या चेल्याचपाट्यांची तुंबडी भरणे अजिबात नाही.
नोटबंदी चा निर्णय घेऊन त्यानी मी देशहिताच्या आड येणारे कोणतेच हितसंबंध मानत नाहीत हा संदेश स्पष्ट पणे दिलेला आहे.....थोडक्यात म्हणजे हा माणूस भ्रष्ट नाही....वैयक्तिक स्वार्थ बघणारा नाही.
....आणि मतदान करुन जो खरोखरच सरकार बनवण्याची कामगिरी पार पाडतो असा ग्रामीण भागातील मतदार आणि गरीबा वर्ग मोदींची हीच
क्षमता पुरेपूर जाणून आहेत.
योग्य वेळ येताच ते ठामपणे मोदींच्या पाठीमागे उभे राहणार यात शंका नाही.
ही माणसे कोणत्याही मतचाचणी,कलचाचणी यांसारख्या थिल्लर आणि उठवळ पोरखेळाला खिजगणतीतही धरत नाहीत.
म्हणूनच मी मोदी भाजपाला ३५०+ आणि NDA ४००+ मिळवून देणार असे गेली ३ वर्षे सांगतोय.
<< हे घटक परिमाण म्हणून
<< हे घटक परिमाण म्हणून बघितले तर मोदींचे नाणे (भाजपाचे नव्हे !) हे अस्सल सोन्याचे आहे. >>
-------- हे सोने खोटे आहे, नकली आहे.
https://geology.com/gold/fools-gold/
येथे fools gold बद्दल माहिती मिळेल.
कमी विकसीत / अविकसीत नजर अनेकदा FeS2 आयर्न सल्फाइड लाच सोने समजते... त्यातलाच प्रकार आहे.
<< त्यांचा सत्ता मिळवण्याचा हेतू स्वतःची आणि स्वतःच्या चेल्याचपाट्यांची तुंबडी भरणे अजिबात नाही. >>
------ अम्बानी, अडाणी आणि रिलायन्सची सोय बघणे हा आहे का ?
<< नोटबंदी चा निर्णय घेऊन त्यानी मी देशहिताच्या आड येणारे कोणतेच हितसंबंध मानत नाहीत हा संदेश स्पष्ट पणे दिलेला आहे.....थोडक्यात म्हणजे हा माणूस भ्रष्ट नाही....वैयक्तिक स्वार्थ बघणारा नाही. >>
------ सतत खोटे बोलणारा माणुस भ्रष्ट कसा नाही. ऑक्टोबर २०१४ मधे काळ्या पैसे धारकांची यादी सर्वोच्च न्यायालयात देतान का खळ क खळ केली ?
BSNL / HAL चा गळा घोटायचा आणि रिलायन्स चा फायदा बघायचा हा कुठला उफरटा न्याय आहे.
आर्थिक गैरव्यावहार करणार्या ललित मोदी , निरव मोदी, चोक्सी, माल्या यांना देशाबाहेर पळवण्यात कुणी मदत केली ?
भ्रष्टाचार करणार्या किती लोकांना अटक केली, खटले चालवले, शिक्षा झाली ? देशा बाहेर गेलेला किती काळा पैसा परत आणला ?
भ्रष्टाचारा विरुद्ध फार मोठी उदासिनता दाखवाणे हा पण मोठा भ्रष्टाचारच आहे.
<<....आणि मतदान करुन जो खरोखरच सरकार बनवण्याची कामगिरी पार पाडतो असा ग्रामीण भागातील मतदार आणि गरीबा वर्ग मोदींची हीच
क्षमता पुरेपूर जाणून आहेत.
योग्य वेळ येताच ते ठामपणे मोदींच्या पाठीमागे उभे राहणार यात शंका नाही. ही माणसे कोणत्याही मतचाचणी,कलचाचणी यांसारख्या थिल्लर आणि उठवळ पोरखेळाला खिजगणतीतही धरत नाहीत. >>
-------- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांत (पाच राज्यात ) दिसले आहे.
<<म्हणूनच मी मोदी भाजपाला ३५०+ आणि NDA ४००+ मिळवून देणार असे गेली ३ वर्षे सांगतोय. >>
---- India shining - II
बिन लग्नाचे , बिन संसाराचे ,
बिन लग्नाचे , बिन संसाराचे , ब्रह्मचारी , गर्ल फ्रेंड त्यागलेले, बायको सोडलेले , संसारातून उठलेले ....
इ इ अवतारी लोक इतरांचे, आम जनतेचे भले करतात, या भ्रमातून इथले लोक बाहेर येणे मुश्किल आहे,
गबबरसिंग , हिटलर ह्यांनाही अधिकृत बायको नव्हती.
मला तर 8 तास काम करून गप्प घरात जाणारे , संध्याकाळी मोघल गार्डनमध्ये फिरणारे , मोठे टास्क उदा निवडणूक वगैरे झाली की श्रमपरिहाराला फोरिणात फिरायला जाणारे लोक नॉर्मल वाटतात !
90 तास काम करतात म्हणे ! घरदार नाही, हॉटेलात जेवले की बिल म्हणे पगारातून देतात ! किती ते कौतुक !! लै एबनॉर्मल !!!
पर्सनल life टीका करणे हेच
पर्सनल life टीका करणे हेच योग्य असेल तर .
विधवेच्या नावा var मत का मागता असे विचारणार bjp पक्ष काही चुकीच विधान करत नाही
आता त्या आहेत विधवा , त्याला
आता त्या आहेत विधवा , त्याला कोण काय करणार ?
बायकामुले नाहीत , ह्याचे भांडवल भाजपेही करत असतातच की
Nation First, Party Next,
Nation First, Party Next, Self Last - लाल कृष्ण आडवाणी>>>>
हे अडवानीनी आधी स्वतःला सांगायला हवे.
भाजप व काँग्रेस यात मोठा फरक हा आहे की भाजप मध्ये पंतप्रधान होण्याची इच्छा कुणीही करु शकतो, जे सबळ आहेत ते होतीलही. पण जे निर्बळ आहेत ते आडून सुचवून, आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करू शकतात. आणि त्यांनी असे केले की अचानक इतरांना त्यांचा पुळका यायला लागतो.
काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याने हे थेर चालत नाहीत. तिथे सगळ्या निष्ठा फक्त व फक्त पक्षाध्यक्षांच्या पायी वाहायच्या असतात. ते बोलतील ती पूर्व. आता त्या जागेवर कायम गांधी कुटुंबातील कुणीतरी बसलेले असते व त्यालाच पंतप्रधान करायचे हा निर्णय एकमताने घेतला जातो यात त्यांचा काय दोष. त्यामुळे दुसरा कोणी जाहीर काय खासगीतही पंतप्रधान व्हायची इच्छा व्यक्त करू शकत नाही. कित्येक निष्ठावान नेते म्हातारे होऊन विस्मृतीत गेले, पण....
शास्त्रीनंतर जे बिगर गांधी पंतप्रधान झाले ते पक्षाध्यक्षांची पंतप्रधान होण्यात अडचण होती म्हणून. नाहीतर हे कधीही शक्य झाले नसते.
पंतप्रधान जाऊ दे, मुख्यमंत्री
पंतप्रधान जाऊ दे, मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली की त्यांचा खडसे होतो.
AFSPA बद्दल काँग्रेसच्या
AFSPA बद्दल काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पुरेशा स्पष्टपणे लिहिलेलं आहे. उगाच धुरळा उडवायची आणि पोस्ट पुलवामा प्रकरणाची साल AFSPA ला लावायची गरज नाही.
वायुदल प्रमुखांवर खरं तर भाजपचाच विश्वास नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हवाई हल्ल्यात किती लोक मेले हे सांगणं अशक्य आहे, तरी भाजपचे अध्यक्ष तीनशे लोक मेले असं सांगताहेत.
दुसरीकडे सैन्य प्रमुख , डीआरडीओ, इस्रो, नीति आयोग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सत्ताधारी पक्षाची भाषा बोलताना दिसताहेत.
पुलवामा हल्ल्यावर पुन्हा
पुलवामा हल्ल्यावर पुन्हा विषय वळवायचा का?
वेल. मागे कोणीतरी बीबीसी मराठीची लिंक दिली होती. त्यात एका विदेशी महिलेचा लेख होता. ज्यात तिने लिहिले होते की मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी पाकिस्तानची इच्छा आहे. त्या समर्थनार्थ तिने काही लॉजिकही मांडले होते. ते सर्वच काही पटण्यासारखे नव्हते. पण लेखात तिने मांडलेला एक मुद्दा लक्षवेधी होता.
भारतात सामान्य जनतेवर हल्ला झाला तर जनता शांतच राहते आणि सैनिकांवर हल्ला झाला तर पेटून उठतो. विकसित देशात याच्या नेमकी उलट परिस्थिती आहे. तिथे सैनिकांच्या शहीद होण्यावर जनता संयम पाळते पण एकही सिव्हिलियन जर शत्रूच्या हल्ल्यात ठार झाला तर ते खपवून घेतले जात नाही. हा विचार जास्त लॉजिकल आहे. काहीसं कार आणि बंपर सारखं आहे. अपघात झाला तर बंपरचं नुकसान झालं तरीही आपल्याला वाईट वाटतंच पण कार वाचली याचं समाधान असतंच की. तसंही बंपर हे कारला संरक्षण देण्याकरिताच असतं. तेही तुटू नये असं वाटलं तरी कोणी बंपर बाजूला काढून ठेवून डायरेक्ट कार अॅक्सीडेंटला एक्स्पोझ करत नाही.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेला हल्ला हा बंपरला काही न होता कार डॅमेज होण्याचा प्रकार होता. आणि असे हल्ले काँग्रेस राजवटीत अनेकदा झाले. मुंबईतल्या लोकलमध्ये बाँब्स्फोट होणे हे तर वेळापत्रकापेक्षाही नियमित घड्त होते.
तर भाजप राजवटीत झालेला पुलवामा हल्ला हा बंपर डॅमेज पण कार सुरक्षित अशा प्रकारातला होता. भाजप राजवटीत कार जास्त सुरक्षित आहे हे दिसून आले. अजून पाच वर्षे मिळालीत की योग्य ते संरक्षण करार होऊन चांगली आयुधे मिळतील आणि बंपरही मजबूत होईल आणि देश अगदी हमरसारखा फुलप्रूफ स्ट्राँग,.
( विशेष नोंद - पुलवामा हल्ल्यावेळी स्फोटके कुठून आली हे विचारणारे १९९३ च्या आणि २००८ च्या हल्ल्यावेळी स्फोटके कशी आणि कुठून आली यावर सोयीस्कर मौन बाळगत आहेत. काश्मीर सारख्या बॉर्डरवर असणार्या आणि फुटीर विचारांनी भारित असलेल्या लोकांच्या प्रदेशात स्फोटके येणे व त्यात सुरक्षा दले मृत्युमुखी पडणे आणि मुंबईसारख्या पाकिस्तानपासून दूरवरच्या भागात स्फोटके पोचून त्यात सामान्य जनता मृत्यूमुखी पडणे यातला फरक काँग्रेसी भूक्तांना समजत नसला तरी सूज्ञ जनतेला व्यवस्थित समजतो.)
{{{ दुसरीकडे सैन्य प्रमुख ,
{{{ दुसरीकडे सैन्य प्रमुख , डीआरडीओ, इस्रो, नीति आयोग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सत्ताधारी पक्षाची भाषा बोलताना दिसताहेत.
Submitted by भरत. on 7 April, 2019 - 09:13 }}}
गंमतच आहे. एखादा सरकारी संस्थेचा अधिकारी / प्रमुख सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन करतो तेव्हा सत्ताधारी नेत्यांना कशी अक्कल नाही हे लिहायचे आणि हे अधिकारी जर सरकारच्या बाजूने मत प्रदर्शन करीत असतील तर ते लगेच सत्ताधारी पक्षाची भाषा बोलतायत अशी आरोळी ठोकायची. भरतलॉजिक एका बूडावर स्थिर नाहीये हेच खरं.
कुणी मौन बाळगलेले नाही, ज्या
कुणी मौन बाळगलेले नाही, ज्या त्या केसमध्ये शिक्षा दिल्या आहेत, स्फोटके कशी आली , याचीही उत्तरे शोधली गेली आहेत, मोदींनी आता त्यांच्या काळातील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
बाकी , बम्परचे उदाहरण पटले नाही, कारण सैनिक हाही नागरिक असतोच,
अमेरिकण वर्तमानपत्रातील दाखल्या दिल्यावर दात काढणारे भाजपे पाकिस्तानी पेपरचा दाखला अभिमानाने देताहेत , हे पाहून गम्मत वाटली.
वो आपके है कौन ?
आधीच्या प्रतिसादात मोदींची
आधीच्या प्रतिसादात मोदींची सेना हे लिहायचं राहिलं. त्याबद्दल निवडणूक आयोगाने योगीं चा हलकेच गालगुच्चा घेऊन, पुन्हा असं नको कलू हा बाल, असं सांगितलंय.
२००१ चा संसदेवरील अतिरेकी
२००१ चा संसदेवरील अतिरेकी हल्ला हा बंपरवर होता की कारवर होता का कार मालकावर होता?
हल्ल्यात कोण गेले? कोणाला ठार
हल्ल्यात कोण गेले? कोणाला ठार करायचा उद्देश होता? तो सफल झाला की असफल?
उत्तर द्यायचे सोडून मीच
उत्तर द्यायचे सोडून मीच विचारलेले प्रश्न तुम्ही पुन्हा विचारत आहात.
संसद उडवायची होती. संसदेतील
संसद उडवायची होती. संसदेतील खासदार मारायचे होते. त्यांना वाचवताना सुरक्षा रक्षक मेले हे माहीती असूनही काहीच्या काही प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार?
बंपर काय करतो? सुरक्षा... त्याला काय म्हणतात? गार्ड
सुरक्षा रक्षक काय करतात? सुरक्षा... त्यांना काय म्हणतात? गार्ड
सगळं
केळंसंत्र सोलून दाखवावं लागतं काँग्रेसींना...<<संसद उडवायची होती. संसदेतील
<<संसद उडवायची होती. संसदेतील खासदार मारायचे होते. त्यांना वाचवताना सुरक्षा रक्षक मेले हे माहीती असूनही काहीच्या काही प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार? >>
-------- संसदेवर हल्ला झाला, अनेक सुरक्षा जवान मारल्या गेले. तेव्हा केंद्रात सत्ता भाजपाची होती, लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. हल्ला जैशने केला. हल्ल्यानंतर लोकप्रियतेचा % वाढला...
पुलवामा येथे हल्ला झाला, ४४ जवान हल्ल्यात मारल्या गेले, केंद्रात सत्ता भाजपाची, लोकप्रियतेला ओहोटी लागली होती. हल्ला जैशने केला... पुलवामा हल्ल्यानंतर घेतलेल्या चाचणीत पक्षाच्या लोकप्रियतेचा % वाढला...
जैशच्या म्होरक्या अटकेत होता.... कंदाहरच्या निमीत्ताने त्याला मोकळा सोडण्यात आले. त्याची सही सलामत सुटका करुन त्याला कंदाहरला नेणार्या विमानात त्यावेळचे देशाचे परराष्ट्र व्यावहार मंत्री खाशे जसवांतसिंग आणि आजचे nsa डोबाळ पण होते. सोबत अनेक कोटी रुपये भेट दिली. त्या वेळी "लोहपुरुष", जे आज अडगळीत टाकले गेले आहेत, लालकृष्ण आडवाणी देशाचे गृहमंत्री होते.
अडचणीत आलेल्या भाजपाला जैश मदत करतो.
Bjp च सरकार सत्तेवर आले की
Bjp च सरकार सत्तेवर आले की अतिरेकी पिसळतात.
आणि हल्ले करतात असे सुधा म्हणू शकतो .
बाकी पक्षांची सरकार त्यांना मित्र सरकार वाटतं असेल .
nsg कमांडोज कडुन सर्वोच्च
दोन वेळा आला प्रतिसाद....
nsg कमांडोज कडुन सर्वोच्च
nsg कमांडोज कडुन सर्वोच्च त्यागाची अपेक्षा करायची... देश/ नेते/ जनता अडचणीत आल्यावर त्यांनी प्राणाची बाजी लावायची , इतर वेळी त्यांना विसरायचे.
कॅमेर्याच्या समोर आलेल्या सुरक्षा रक्षकांना खडसावतांना आपले सर्वांचे आवडते नेते.
https://www.youtube.com/watch?v=SGFIWwoPe4M
दुसरी अजुन अस्वस्थ करणारी बातमी. साधाराणत: शक्य असेल तिथे लोकल नेत्यांनी हजेरी लावायला हवी. जिल्हा अधिकारी / पोलीस अधिक्षकांना हजर रहाणे असा प्रोटोकॉल आहे ना ?
https://www.northeasttoday.in/modi-nitish-skip-crpf-jawans-funeral-faces...
आपल्याच सेनेनं मारलेले रॉकेट
आपल्याच सेनेनं मारलेले रॉकेट लागून बडगाम येथे हेलिकॉप्टर कोसळलं व 6 जण मेले अशी बातमी होती.
लष्कराला पवित्र आणि सर्वात सत्यवादी हरीश चंद्र समजायची काही जरूर नाही. या देशात फक्त जनता सर्वोच्च आहे. लष्कराला सारखं लोणी लावून लावून संघी लोक काय कारस्थान करण्याचा प्रयत्न करतायत ते समजतं आम्हाला...
आपण F 16 पाडले याला आजतरी
आपण F 16 पाडले याला आजतरी कोणताही पुरावा नाही. आपण ते पाडले नाही असे दर्शविणारे अनेक पुरावे पाक ने सादर केले आहेत. एखदा त्रयस्थ निरिक्षक आज तरी पाक च्या बाजूनेच निर्णय देइल. हे खरेच हास्यास्पद होत चालले आहे.
आणी नसले पाडले तरीही फार मोठा अनर्थ झाला असेही नाही. बरेच भारतीय हा विषय प्रतिष्ठेचा का करत आहेत हे अनाकलनीय आहे. This is not a peeing contest. बालकोट हल्यात तीनशे लोक मेले या दाव्याचीही अशीच गत झाली.
दहा वर्षाच्या मुलाला हळूवार पणे व त्याच्या भावना न दुखावता आपण संगतो की अरे बाबा सँता क्लॉज वगैरी काही नसते. तसेच बर्याच भारतीयांना सांगायची वेळ झालिये की बाबानो बालकोट मध्ये तीनशे अतिरेकी मेले नाहीत व आपण F16 पाडले नाही.
https://economictimes
https://economictimes.indiatimes.com/news/defence/shot-down-pafs-f-16-du...
@रश्मी,
@रश्मी,
पाकिस्तानप्रेमी कॉंग्रेसी व त्यांचे समर्थक फक्त पाकिस्तानी मिडीया व तेथील आयएसआयने दिलेल्या बातम्यांवरच विश्वास ठेवतात. तेंव्हा तुम्ही दिलेल्या दुव्याचा काही एक उपयोग नाही.
E.T. ऐवजी, 'भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी एफ १६ पाडले' अश्या तर्हेची पाकिस्तानी वर्तमानपत्रात आलेल्या एकाद्या बातमीचा दुवा तुम्ही इथे द्या त्या बातमीवर लगेच त्यांच्या विश्वास बसेल.
Pages