Submitted by राणीराजा on 31 March, 2019 - 13:43
माझे दोन मोलर/ दाढा काढाव्या लागल्या. (एका साईडच्या) बाकीचे सर्व दात एकदम चांगले आहेत. मला विचारायच आहे कि हे दोन दात बसवावेच लागतील का? अक्कल दाढ नाही आहे. दोन दाढा काढल्याने गॅप आहे. धन्यवाद. मला शक्यतो फॉरीन ऑब्जेक्ट नको आहे तोंडात म्हणुन हा प्र्शन. गम्स बळकट झाल्यावर त्या साईडने थोड खाता येईल ना? कुणाचा प्रत्यक्ष अनुभव असाल तर लिहाल का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Same problem with my husband,
Same problem with my husband, folllowing this thread
दाढा चावण्यासाठी गरजेच्या
दाढा चावण्यासाठी गरजेच्या असतात. एका साईडने तुम्ही किती काळ खात रहाणार? तोंड दुखायला लागते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दाढा नसल्याने गॅप रहाते तिथे अन्न अडकते. चावता येत नाही. त्यामुळे चांगल्या डेंटिस्ट कडून ब्रीज बसवून घ्या. माझी एक दाढ नव्हती, त्यामुळे मी ब्रीज बसवला आहे. काहीच त्रास नाही.
त्यामुळे चांगल्या डेंटिस्ट
त्यामुळे चांगल्या डेंटिस्ट कडून ब्रीज बसवून घ्या>>
)
यातला 'चांगला' शब्द फ़ार महत्वाचा आहे. माझ्या आईने 3 वर्षापूर्वी ब्रीज बसवून घेतला होता . 4 महिन्यात तो साधा भात खाताना निखळून पाण्याबरोबर पोटात गेला. (Practically दात घशात गेले ) . आता gap आहे. पण हिरड्या कडक झाल्याने त्या साईडने पण खाता येते. ( डेंटिस्टच्या नावाने कानाला खडा
@मनिम्याऊ : बाप रे ! भयंकर
@मनिम्याऊ : बाप रे ! भयंकर अनुभव !
ऑपरेशन करून काढावे लागले का ते दात ?
ब्रिज बसवून घ्या. मी स्वतःवर
ब्रिज बसवून घ्या. मी स्वतःवर खूप ब्रिज वर्क करून घेतले आहे. गॅप राहिलेतर इतर दातांच्या सेटिंग वर परिणाम होउ शकतो. चांगला डेंटिस्ट निवडा हे मात्र बरोबर. फॉरिन ऑब्जेक्ट काय कन्सेप्ट आहे. जे गरजेचे आहे ते केले पाहिजे ना?!
मला संपर्क करा☺️☺️
मला संपर्क करा☺️☺️
पूल,पूल चिकि खाऊन निघणे,(हा आगाऊपणा माझाच.योग्य वॉर्निंग मिळालेल्या होत्या.)परत पूल, दात उपटणे, टायटॅनियम स्क्रू, टाके या सर्वांचा अनुभव आहे.दात उपटणे, ड्रिल करून आत टायटॅनियम स्क्रू हा वेदना वाईज सर्वात मोठा प्रकार.बाकीचे पेन स्केल मध्ये त्याच्या खालीच.
बाकी फॉरीन काय, इंडियन काय, कोणत्या तरी ऑब्जेक्ट ने शरीराचे काम नीट चालू राहिले म्हणजे झाले.
दातात गॅप राहिली तर बाकीचे
दातात गॅप राहिली तर बाकीचे दात विस्कळीत होऊन ती गॅप भरून निघते. विस्कळीत झालेल्या दातांमुळे अन्न चावण्यात बाधा येऊ शकते. हे खूप हळू होते, बरीच वर्षे जातात पण होतेच होते हा स्वानुभव. त्यामुळे गॅप भरून घेणे उत्तम.
गॅप राहिलेतर इतर दातांच्या
गॅप राहिलेतर इतर दातांच्या सेटिंग वर परिणाम होउ शकतो. >>>> हे सगळ्यांनीच लिहिलं आहे. स्वानुभव पण आहे, पण कळतं पण वळत नाही. मला डेंटिस्ट अजिबात आवडत नाहीत. तिरस्कार भीती वाटते त्या लोकांची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुदैवाने सगळे दात अतिशय निरोगी आहेत त्यामुळे त्यांना एवढी वर्षे टाळू शकले. पण एका गमतीदार अपघातात अर्धा दात गमावला आणि काही काळानंतर तो बिना आधार असल्यामुळे पूर्ण पडला. तरीही मी कित्येक वर्षे डेंटिस्ट टाळला. आता दातांमध्ये भरपूर गॅप्स तयार झाल्या आहेत. आता मी जागी होऊन डेंटिस्टकडे 2 सिटिंग्ज पूर्ण केली. अर्थात उशिर केल्याची किंमत मोजावी लागणार आहे.
सगळ्यांनी माझ्या अनुभवावरून धडा घेता आला तर पहा
चांगली डेंटिस्ट सुचवु शकते.
चांगली डेंटिस्ट सुचवु शकते.
पुण्यात असाल तर विजय फडके.
पुण्यात असाल तर विजय फडके. एरंडवणे. इन्कम टॅक्स ऑफिस जवळ.
मी स्वतः त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली आहे आणि अतिशय चांगला अनुभव आहे
अक्कल दाढ नाही आहे. दोन दाढा
अक्कल दाढ नाही आहे. दोन दाढा काढल्याने गॅप आहे. धन्यवाद. मला शक्यतो फॉरीन ऑब्जेक्ट नको आहे >>>![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
अक्कल दाढा येऊ द्या, आल्या की त्यातल्या दोन उपटून गॅप पडलेल्या दोन दाढांच्या जागी बसवून घ्या, नो फॉरेन ऑब्जेक्ट्स!
---------
अनेकांनी दिलेल्या सल्याप्रमाणे ब्रीज लावून घेणे उत्तम, तेही खूप जास्त टाइम गॅप न देता.
पुण्यात सहकार नगर जवळ यशवंत
पुण्यात सहकार नगर जवळ यशवंत चव्हाण नगर जवळ डॉ साने यांचे क्लिनिक होते.त्यांचा चांगला अनुभव आहे.आता क्लिनिक तिथे आहे का शिफ्ट झाले माहीत नाही.
त्या बिल्डिंग खाली गनबोटे फरसाण गट्टम्मा अश्या विचित्र नावाचे फरसाण दुकान आहे.
बाकी फॉरीन काय, इंडियन काय,
बाकी फॉरीन काय, इंडियन काय, कोणत्या तरी ऑब्जेक्ट ने शरीराचे काम नीट चालू राहिले म्हणजे झाले.
Submitted by mi_anu on 1 April, 2019 - 14:12>>>
अहो येथे 'फॉरीन ऑब्जेक्ट' म्हणजे शरीराच्या बाहेर तयार झालेला पदार्थ / वस्तू!!!
जोक होता हो ☺️☺️
जोक होता हो ☺️☺️
अहो येथे 'फॉरीन ऑब्जेक्ट'
अहो येथे 'फॉरीन ऑब्जेक्ट' म्हणजे शरीराच्या बाहेर तयार झालेला पदार्थ / वस्तू!!!
जोक होता हो ☺️☺️ >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ड्रिल करून आत टायटॅनियम
ड्रिल करून आत टायटॅनियम स्क्रू हा वेदना वाईज सर्वात मोठा प्रकार.>>>>> किती दाढा बसवल्या? माझ्या दाढेला ब्रिज बसवला होता.बरीच वर्षे डॉ.कडे न गेल्याने कॅपखालची दाढ किडून गेली होती.त्याजागी इम्प्लांट केलंय.पण ब्रिज काढावा लागल्याने गॅप आहे.डेंटिस्टने आधी सांगितले होते की त्यावर ब्रिज लावेन्,नंतर तो म्हणाला की नको ते बरोबर होणार नाही.१ खोटा आणि १ खरा दात यामधे ब्रिज नको म्हणून म्हटला.त्याच्याकडच्या फेर्याने मी कंटाळले होते .त्यामुळे २ वर्षे झाली.पणएकाच बाजूने खाल्ले जाते,आठवण झाली तर दुसर्या बाजूने खाल्ले जाते.विचार करतेय दुसरी दाढ बसवू की नको! एकतर हिरडीत ड्रिलिंगकेल्यावर्/टा़के घातल्यावर प्रचंड दुखते आणिदुसरां म्हणजे डेंटिस्ट प्रचंड महाग आहे.
हो.प्रचंड दुखते
हो.प्रचंड दुखते
मी ब्रिज निघाल्यावर परत बसवायचा कंटाळा केला.नंतर गेले तेव्हा ब्रिज साठी जे दोन ब्रिज च्या टोकाचे दात लागतात त्यातलं कोपऱ्यातलं टोक गेलेलं होतं.तेथे ड्रिल करून स्क्रू बसवला आहे.तो स्क्रू बसवून घातलेले टाके भूल उतरल्यावर बरेच दुखतात.डॉ ने दिलेली गोळी सेफर साईड(पेशंट ओळखीचा नाही वगैरे) एकदम सौम्य पेन किलर होती.त्याने काहीच झालं नाही.मग मी ब्रूफेन घेऊ का विचारलं फोन करून.डॉ नाही म्हणाले.मग अर्धा तास दुखून खरंच लोळले(एकटीच होते☺️☺️) आणि ब्रूफेन घेतेय म्हणून डॉ ना मेसेज केला आणि त्याला उत्तर न आल्यावर घेतली.दुखणं कमी आलं.(डॉ वैतागून 'खड्ड्यात जा' म्हणाले असावेत ☺️☺️) कदाचित इतर कोणाला कमी दुखेल पण.पेन कपॅसिटी प्रत्येकाची वेगळी असते.
आता हे अजून एका टोकाला करायचंय कळल्यावर परत गेले नाहीये.पण जावं लागेल.
पुण्यात सहकार नगर जवळ यशवंत
पुण्यात सहकार नगर जवळ यशवंत चव्हाण नगर जवळ डॉ साने यांचे क्लिनिक होते.त्यांचा चांगला अनुभव आहे.आता क्लिनिक तिथे आहे का शिफ्ट झाले माहीत नाही.
आहे..आहे आजच appointment होती तोपर्यंत तरी होते.>>हाहाहा
पुण्यात सहकार नगर जवळ यशवंत
पुण्यात सहकार नगर जवळ यशवंत चव्हाण नगर जवळ डॉ साने यांचे क्लिनिक होते.त्यांचा चांगला अनुभव आहे.आता क्लिनिक तिथे आहे का शिफ्ट झाले माहीत नाही.
आहे..आहे आजच appointment होती तोपर्यंत तरी होते.>>हाहाहा
पंचमहाभूतांपासून बनलेले दात
पंचमहाभूतांपासून बनलेले दात चालतील का? ते ही मिळतात हल्ली असं ऐकलं.
पंचधातू म्हणायचे का तुम्हाला?
पंचधातू म्हणायचे का तुम्हाला?
पंचमहाभूतांपासून तर सगळे
पंचमहाभूतांपासून तर सगळे भौतिक विश्व बनले आहे.
(No subject)
अग्गोबाई! दातांवरून
अग्गोबाई! दातांवरून वेदांताकडे ओघ वळतो आहे चर्चेचा!