Submitted by सुप्रिया जाधव. on 25 March, 2019 - 02:48
हक्कांसाठी लढते आहे
धारातिर्थी पडते आहे
रंग लावल्यावर दुनियेचे
दुनिया रंग बदलते आहे
ज्याला हल्ली धूसर दिसते
त्याच्यासाठी सजते आहे
दगड पायथ्याचा झाले मी
वरून कोठे दिसते आहे ?
राखही नाही, मागमुसही !
कापरापरी जळते आहे
पुढे जायचे ठरवत बसते
उभे राहता खचते आहे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा ! सुरेख..
व्वा ! सुरेख..
आवडली न् भिडली !
मनापासुन धन्यवाद आनंद
मनापासुन धन्यवाद आनंद
>>>रंग लावल्यावर दुनियेचे
>>>रंग लावल्यावर दुनियेचे
दुनिया रंग बदलते आहे>>>सुंदर शेर!