Submitted by सुप्रिया जाधव. on 16 March, 2019 - 04:02
तस्वीर तरही
बेफिजींचे आभार मानून...
धरेशी तोडले नाते, नभाशी सोयरिक नाही
धडाडीने परंतू भाग त्यातिल व्यापला काही
असे अंगांग माझे दागिन्यांनी ह्या जखड़लेले
ज़णू बांधून पायी शृंखला हत्ती झुले शाही !
कुणी लाथाडतो ताटातले पक्वान्नही ताजे
कुणी मासा शिजवतो तुंबल्या नाल्यात सडलाही
जणू निष्पर्ण एकाकी उभा मी वृक्ष माळावर
कुणी चिटपाखरूही आश्रयाला यायचे नाही
खुबीने पार कर तू बोगदा हा
गैरसमजांचा
जिव्हाळ्याने उजळतिल बघ दिशा अंधारल्या दाही
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप आवडली.
खूप आवडली.