Submitted by माउ on 11 March, 2019 - 21:17
उजाड गावी रिते ऊन पाझरते आहे
तिची आठवण कुठे रिकामी फिरते आहे
भग्न नभाच्या काठावरती बसू पाहते
उगी पाखरू सांजेला सावरते आहे
तरंग कुठले मनावरी येऊन उजळले
तळ्यातला अंधार कुणी आवरते आहे
पुन्हा असावा दु:खाचा डोळा मिटलेला
पापणीवरी स्वप्न जुने थरथरते आहे
जीव जडावा तुझ्यापरी या रितेपणावर
मनात आता एकच इच्छा उरते आहे
-रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह! खुप सुरेख! छानच.
वाह! खुप सुरेख! छानच.
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्त आहे
मस्त आहे
अप्रतिम !
अप्रतिम !
मायबोलिवर माउ यांची कविता ऐसी
मायबोलिवर माउ यांची कविता ऐसी
मनात माझ्या रुंजी घालत फिरते आहे
धन्यवाद! शंतनू, हाहा!
धन्यवाद!
शंतनू, हाहा!
एकदम मस्त आहे
एकदम मस्त आहे
एकदम मस्त आहे
एकदम मस्त आहे
dhanyawad!
dhanyawad!
छान तरंग उजळले ?
छान
तरंग उजळले ?