माझा सुलेखनाचा प्रयत्न (कॅलीग्राफी)

Submitted by हरिहर. on 26 February, 2019 - 22:21

मराठी भाषा गौरव दिनाच्यानिमित्ताने केलेला हा कॅलिग्राफीचा प्रयत्न. पेपर ऐवजी आयपॅड प्रो आणि ब्रश ऐवजी अॅप्पल पेन्सील आहे. बाकी फाँट वगैरे माझे आहे. बॅकग्राऊंडचा काही भाग आणि पीस हे मात्र आंतरजालावरुन घेतले आहे. कुठे थांबावे हे कळाले नाही की कलाकृतीच काय प्रत्येक गोष्ट बिघडते. येथेही माझे तसेच झाले आहे. भरमसाठ कलर आणि टुल्स वापराचा अतिरेक झालाय. पण सर्वांना हे आवडावे.
.
माबो शुभेच्छा.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< भरमसाठ कलर आणि टुल्स वापराचा अतिरेक झालाय >>>
तुमच्या मताशी सहमत. वाचायला क्लिष्ट आहे.

शुभेच्छा...
सुरेख आहे की . मला तर आवडले खूप...

सगळ्यांचे धन्यवाद!

देवकी ‘श’ गंडलाय का? कॅलीग्राफीच्या नावाखाली थोडी सुट घेतली. Happy

उपाशी बोका एखादे साधेसे करुन येथे पोस्ट करेन.

michto कोणतेही फॉन्ट वापरले नाहीत. हाताने लिहिले आहे सर्व.

सुरेख Happy

* हाताने लिहिले आहे सर्व.* तुमचा हात तयार आहे, हें नक्की. मीं अचयुत पालवांचा जबरदस्त फॅन आहे व त्यांची अनेक प्रात्यक्षिक पाहिलीं आहेत. जरा काळ्या शाईने साधी कंपोझिशन करून बघा . खूपच फरक जाणवेल तुम्हाला व बघताना आम्हाला .
(' प्रयत्न ' म्हणालात म्हणून सुचवलं पण असला आगाऊपणा करायची माझी जुनी खोडही आहेच व ती हया वयांत मोडणं अशक्यच ! )

कॅलीग्राफी करताना पुर्ण मजकुरातील एखादा शब्द सुलेखनात लिहितात. रंगही साधरणत: दोन वापरतात. येथे मी प्रत्येक शब्दाला पकडून त्याचे सुलेखन केलं आहे. अतिउत्साहाचा परिणाम. आता पहिल्यापासुन सुरवात करेन.

चुक लक्षात आली पण आता सुधारणा करणे अवघड आहे. सांभाळून घ्या.
तसही मराठी मायबोलीला रच्याकने, धन्स, हाकानाका, भोआकफ, टडोपा इतकच काय अगदी मभादि देखील चालतेच की. Happy Light 1

जरा जास्त भडक झालंय, पण अक्षर सुरेख आलीत.
दुसरं पण छान जमलंय. त्यात जरा रंग टाकले की अजून छान वाटेल.

सुरेख जमलीयेत अक्षरं. पण स्वतःच्या नावाबाबत जरा आग्रही रहायला हवं.

आर्ती, भार्ती , मेघा अशा उच्चारांना कंटाळलेली - मेधा

द आणि म जोडण्याचे तिन प्रकार असतात साधारण. द च्या खालील दांडीलाच म जोडून घेतात. द आणि म यांच्यात तिरकी रेष मारतात किंवा द ची खालील दांडी म च्या दिशेने जरा जास्त झुकवतात. मी बदल करतो नक्की. ळ आणि य मध्येही असच काहीसं आहे.
प्रतिसादासाठी धन्यवाद!

छान

छान जमलीय कैलीग्राफी
______________
Submitted by शाली on 27 February, 2019 - 12:32

तो नावाचा भाग फोटोशॉप करुन एडिट करता येईल की Happy मग नवीन इमेज (संपादन कालावधीत) लेखनाचा मजकूर संपादित करुन पुन्हा देता येईल.