Submitted by निशिकांत on 21 February, 2019 - 23:59
वागल्याने तू अशी, माझे हसे झाले
अन् तुला जे पहिजे होते तसे झाले
वादही होते सखे गेले विकोपाला
समजुतीने बोलल्याने शांतसे झाले
प्रश्न "आ" वासून दिसले फालतू सारे
हे कसे झाले असे अन् ते कसे झाले?
मुखवट्यांची काय ती किमया किती सांगू!
लांडगे जे कालचे, वरुनी ससे झाले
फक्त एखादाच मूषक पूजला जातो
"श्री" कृपेने भाग्य त्याचे छानसे झाले
जाण बघता चिमुरड्यांची वाटते, माझे
नातवानंतर कदाचित बारसे झाले
मी घृणा माझी करोनी फोडले तेंव्हा
एक होता कैक तुकडे आरसे झाले
स्वप्न होते, अष्टपैलू मी हिरा व्हावे
ज्या क्षणी जळलो चितेवर, कोळसे झाले
का असे इर्शाद म्हणता ऐकुनी गझला?
यार हे "निशिकांत" कौतुक फारसे झाले
निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! प्रत्येक शेर भारी! मस्तच
वाह! प्रत्येक शेर भारी! मस्तच!
अन् तुला जे पाहिजे होते..
अन् तुला जे पाहिजे होते..
शाली, रामकुमार आभार अपणा
शाली, रामकुमार आभार अपणा दोघांचेही प्रतिसादासाठी.