जखमा भळभळल्यावर ___

Submitted by Kirti d tekale on 19 February, 2019 - 21:10

जखमा थोड्या भळभळल्यावर ..!
खऱ्या वाटल्या कळवळल्यावर..!

भरते का मन कधी कुणाचे?
अशा पाकळ्यां चुरगळल्यावर ..!

भान जगाचे उरते कोठे
त्याच्या मिठीत विरघळल्यावर ..!

उदास होतो जीव जरासा,
मनी आठवण सळसळल्यावर ..!

कसा तुला मी विसरू आई,
माया घरभर दरवळल्यावर ...!

प्रेम वाढते लाख पटीने,
विरहामध्ये तळमळल्यावर __|

प्रेमाला ही उधाण येते
झरा आतला खळखळल्यावर __|

सौ. किर्ती ज्ञानेश्वर टेकाळे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults