Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्रप्स, तुम्ही अमेरिकेत आहात
च्रप्स, तुम्ही अमेरिकेत आहात ना? इथून ही चॅनल्स दिसतात?
नाही सायो, मी इंटरनेट वर
नाही सायो, मी इंटरनेट वर पाहिलिय.
.pk साईट वर मिलेल तूम्हाला शोधला तर. जास्त डिटेल देत नाही.
अपहरण आवडली का सर्वांना ?
अपहरण आवडली का सर्वांना ?
मी सर्वात पहिल्यांदा इथे लिहीले होते. पण आउटस्टँडींग वगैरे नाही वाटली. काही प्रतिसाद मागे आहे.
Twisted आणि twisted2 बघून
Twisted आणि twisted2 बघून संपवल्या.
Next recommendations ????
Netflix वर The 100 चांगला
Netflix वर The 100 चांगला टीपी आहे.
Twisted 2 चे सर्व भाग युट्यूब
Twisted 2 चे सर्व भाग युट्यूब वर आहेत का?
मी jiocinema वर पाहिले.
मी jiocinema वर पाहिले.
Twisted मात्र YouTube वर
Twisted आणि twisted2 बघून
Twisted आणि twisted2 बघून संपवल्या.>>>>> काय मग रिव्ह्यू? बघाव्या की नाही?
Twisted चांगली आहे. पण मला
Twisted चांगली आहे. पण मला शेवट काही आवडला नाही.
Twisted आणि twisted2 , मला
Twisted आणि twisted2 , मला दोन्ही चांगल्या वाटल्या . थोड्या अ आणि अ आहेत . पण बर्यापैकी ग्रीपींग आहेत.
मी २ पहिल्यान्दा बघितली नंतर १ . तसा दोघांचा फारसा काही संबन्ध नाही .
निआ शर्माला मी पहिल्यान्दाच बघितलं. आवडली मला. आर्यन माथूर पहिल्या भागात जास्त छान वाटला . तो रायचंद मात्र नाही आवडला.
तिसरा भागही येइल बहुतेक.
Twisted चांगली आहे. पण मला शेवट काही आवडला नाही. >>> मलाही . २ वर्जन्स ऑफ स्टोरी मात्र भारी आवडलं.
एक twisted tales नावाची एरॉस
एक twisted tales नावाची एरॉस नाउ वर आहे. अगदी ५-५ मिन. चे भाग आहेत . धक्कातंत्रवाल्या गोष्टी. तीन पाहिल्या , तीन्ही supernatural प्रकारातल्या होत्या.
रच्याकने , ऑपरेशन कोब्रा बघायला घेउ का??? पहिला भाग फार विनोदी वाटला.
"The Trip" छान आहे.
"The Trip" छान आहे.
वेबमालिकांची पण इतकी भरमार
वेबमालिकांची पण इतकी भरमार आहे की ओपन केल्यावर एव्हढे पर्याय पाहून कुठलाच पाहून होईना सध्या. आपण जी मालिका पहायला सुरू करावी ती नेमकी फालतू निघेल त्यापेक्षा चांगली असेल तीच पहावी या विचाराने कुठलीच पाहून होत नाही.
इथल्या रिव्ह्यूवर मदार आहे आता.
प्राईम वर पाच सहा
प्राईम वर पाच सहा महिन्यांपूर्वी McMafia पाहिली होती. खिळवून ठेवते मालिका. हाताळणी संथ आहे मात्र त्या मालिकेला ती योग्य आहे. रशियन माफिया, त्याचे मुंबई कनेक्शन्स (इथे नवाजुद्दीनने त्याचा नेहमीचा भावखाऊ रोल केला आहे), जगभरात त्यांची वर्चस्व स्पर्धा आणि यातून बाहेर पडू पाहणारा एक्स माफियाचा मुलगा. यातून नाट्य चांगले गुंफले आहे. पटकथा घट्ट आहे. फाफटपसारा नाही.
अंगावर येणारी हिंसा नाही. अगदी डिसेंट वातावरणातले माफिया आणि त्यांच्याकडून घडणारी भयानक कृत्ये हा भाग प्रभावी आहे. पाहण्यासारखी वाटली. आता प्राईम बंद केलेले असल्याने तिथे आहे कि नाही कल्पना नाही. त्यानंतर लगेचच स्मोक पाहिली. साधारण प्लॉट सारखाच. उत्कंठावर्धक आहे. पण McMafia आधी पाहिली असेल तर स्मोक भिडणार नाही. यात हिंसा मोठ्या प्रमाणावर आहे.
सध्या नेट्फ्लिक्स वर फार्गो
सध्या नेट्फ्लिक्स वर फार्गो आणी अमझौन वर four more shots बघतोय.
फार्गो बघू का ?
फार्गो बघू का ?
ऑपरेशन फायनल सापडला नेफ्लि वर. आता थोड्या वेळाने बघत बसणार आहे फिरून आल्यावर.
फार्गोचे पहिले दोन ही सीजन
फार्गोचे पहिले दोन ही सीजन छान आहेत, पहिला सीजन उत्तमच आहे, खूप आवडला होता.
सिरीज संथ, विचित्र, निराशात्मक वाटू शकते, पण तशी दिग्दर्शनाची शैली आहे. पहिला सीजन तरी बघावा.
फार्गो..मला तरी सन्थ नाही
फार्गो..मला तरी सन्थ नाही वाटत. शैली मस्त आहे.
काल झाला एकदाचा पाहून ऑपरेशन
काल झाला एकदाचा पाहून ऑपरेशन फिनाले. उत्कृष्ट सिनेमा.
स्त्रीलिंग पुल्लिंगी
स्त्रीलिंग पुल्लिंगी वेबसीरीज बघा ... मराठी किती बोल्ड झालीये ते कळेल
कशावर ?
कशावर ?
किरणुद्दीन - youtube वर सगळे
किरणुद्दीन - youtube वर सगळे भाग आहेत
धन्यवाद.
धन्यवाद.
स्त्रीलिंग पुल्लिंगी वेबसीरीज
स्त्रीलिंग पुल्लिंगी वेबसीरीज बघा >>>> मी बघायला सुरूवात केली होती. पण बळंच त्या मुलीला फॉरवर्ड दाखवायचंच आहे म्हणून तिच्या तोंडी शिव्या, तोकडे कपडे, सिगरेट ओढणारी असं काहीबाही दाखवलंय. कथेच्या ओघात न येता ओढूनताणून बोल्ड दाखवायचा आव ... अजिबातच अपिल झाली नाही.
म्युनिच झाला पाहून. ठीक आहे.
म्युनिच झाला पाहून. ठीक आहे. स्पिलबर्ग असूनही.
ऑपरेशन फिनाले मात्र मस्तं.
झोया अख्तरची वेब्सिरीज येणार
झोया अख्तरची वेब्सिरीज येणार आहे. मेड इन हेवन. प्राईम वर.
रीच वेडिंग्ज, वेडिंग्ज प्लॅनर्स वर आहे.
ग बॉ बघताना जाहिरात आलेली. बोल्ड आहे असं वाटलं.
It's not that simple चे
It's not that simple चे दोन्ही सिझन्स बघून झाले आज, पहिला नाही आवडला पण दुसरा छान आहे, स्वरा भास्कर पहिल्यांदा बघितली ह्या सिरीजमध्ये ती ही आवडली.
Twisted 1 आवडली होती, पण 2 चे सगळे भाग नाहीयेत तुनळीवर, अन पे करून बघायची इच्छा नाही. एखादी दुसरी चांगली वेबसिरीज असेल तर सांगा
स्त्रीलिंग पुल्लींग असं नाव
स्त्रीलिंग पुल्लींग असं नाव आहे मालिकेचं. कॉलेजच्या मुलांना आवडेल. आईचं काम भारी केलंय. वयात आलेल्या मुलींच्या आया हा एक वेगळाच विषय आहे. लॅबवाल्या मुलाने ओव्हरअॅक्टींग केलीय आत्तापर्यंत. नाही तर एकूण ठीक ठाक आहे मालिका.
सिल्लिंग- पुलिंग (लिहीता येत
सिल्लिंग- पुलिंग (लिहीता येत नाहीये आणि कंटाळा पण आलाय) काल पळवत बघितली, बकवास आहे एकदम. काही अर्थच नाही. नविन वर्षाच्या रात्री कुणी काही पाजून रेप केला तर ती पोलिस केस आहे हे मुळात कळायला पाहिजे. नुसता रेप नाही तर गॅंग रेप. ती पल्लवी अगदी साधी काकूबाई दाखवली आहे मग रात्रभर बाहेर काय राहते, दारू काय पिते. ते तर राहूच द्या, गॅंग रेप झालाय याचं तिला काहीच वाटत नाही तर दिवस गेलेत याचं तिला वाईट वाटतं
शिव्या, छोटे कपडे, सेक्स, दारू, सिगारेट, कंडोम, डीनए टेस्ट हे दाखवलं की झाली वेबसीरीज, कथा नसली तरी चालेल असा बनवणा-यांचा समज दिसतो, कैच्याकैच. आणि ते समलिंगी पण घुसवायचा बाष्कळ प्रयत्न केला आहे
भजं झालंं डोक्याचं, आज काहीतरी सेन्सीबल बघून उतारा करावा लागेल.
मूव्हिन्ग आउट चा दुसरा सीझन
मूव्हिन्ग आउट चा दुसरा सीझन कोणी बघितलाय का? कसा आहे?
ह्याचा प्रोमो बघितलाय. ऋषी सक्सेना डॅशिन्ग दिसलाय. गिरिजा ओक छान दिसते. माउली मध्ये हिने रितेश देशमुखच्या आईची भुमिका का केली कुणास ठाऊक?
Pages