अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
(No subject)
आजची काही फुले २) ३)
आजची काही फुले
![](https://3.bp.blogspot.com/-EBTWv5MsyJs/XFVH_aNyWCI/AAAAAAAB1-A/IRkq_mZsNVEF8klwsDOzwo7Skm72ZZpcwCKgBGAs/s640/20190202_074034.jpg)
२)
![](https://2.bp.blogspot.com/-8l9m-TS6W_k/XFVH_VFkrRI/AAAAAAAB1-A/X-k8jkxvFpc4wGPwl4LRMpO7HXafpL-qwCKgBGAs/s640/20190202_074023.jpg)
३)
![](https://3.bp.blogspot.com/-NybSZEuNQTI/XFVH_YprbmI/AAAAAAAB1-A/CYJaCmsuyjUlMXr_u44p2GFU1UOx7o-owCKgBGAs/s640/20190202_073933.jpg)
पळस मस्तच फुललाय. आमच्या
पळस मस्तच फुललाय. आमच्या शेतात एक पिवळ्या रंगाची फुले येणाऱ्या पळसाचं झाड आहे त्याची आठवण आली
आजची काही फुले>>>> बापरे
आजची काही फुले>>>> बापरे माझ्याकडे एखादं फूल आले तर मला धन्य वाटते.
शाली, नदीच्या पात्रातला फोटो झकास.
माहिती हवी आहे.. जाणकारांनी
माहिती हवी आहे.. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
सोनचाफ्याला फूल किती वर्षांनी येतं?
झाड कुंडीत आहे. 4 ft वाढलंय.सिड बड्स सारखं एक गुच्छ लागलाय. पण कळी येत नाहीये..
सोनचाफ्याला फूल किती वर्षांनी
सोनचाफ्याला फूल किती वर्षांनी येतं?>>>> जागूने सांगितल्याप्रमाणे १२ वर्षांनी फूल येते.कलम असेल तर लगेच येईल.माझ्याकडे माळ्याने कलम म्हणून आणले.पण १.५ वर्ष झाले तरी कळी आली नाही,म्हणून सोसायटीच्या आवारात लावायला दिले.तेही असेच ४ फूटावर वाढले होते.
@देवकी नर्सरी तून रोप आणलेले
@देवकी नर्सरी तून रोप आणलेले budding केलेले आहे.
कलम असेल तर येतील फुले.
कलम असेल तर येतील फुले. सुर्यप्रकाश मिळतोय ना व्यवस्थित?
हो
सुर्यप्रकाश मिळतोय ना व्यवस्थित?>> हो
खत, माती व्यवस्थित असेल तर
खत, माती व्यवस्थित असेल तर लागतील फुले.
खत, माती व्यवस्थित असेल तर
खत, माती व्यवस्थित असेल तर लागतील फुले.
हे काही सज्जन गडावरील क्लिक
हे काही सज्जन गडावरील क्लिक आहेत.
![1A749C60-2AAA-4708-AEC2-5B979628D902.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/1A749C60-2AAA-4708-AEC2-5B979628D902.jpeg)
![5F7F02C9-1129-415D-B27C-3C624CEBDED8.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/5F7F02C9-1129-415D-B27C-3C624CEBDED8.jpeg)
![475EE31E-DE3E-4D72-A88F-4B42435DFF4A.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/475EE31E-DE3E-4D72-A88F-4B42435DFF4A.jpeg)
1
2
3
सुंदर फोटो सगळेच
सुंदर फोटो सगळेच
आहाहा, सर्वच फोटो.
आहाहा, सर्वच फोटो.
सर्व फोटो आंखों की ठंडक
सर्व फोटो आंखों की ठंडक
सर्व फोटो आंखों की ठंडक
सर्व फोटो आंखों की ठंडक +११११११
@शालीजी पहिला फोटो उंदीरमारी आणि तिसरा करवंदीची कोवळी पालवी आहे असं वाटतंय. दुसरा फोटो कोणत्या फुलाचा आहे?? पंख मिटून बसलेल्या प-या आहेत असं वाटलं.
किट्टू नावांच्या बाबत अडाणी
किट्टू नावांच्या बाबत मी अडाणी आहे. जागुताई व्यवस्थित सांगु शकेल. उंदीरमारी हे नावही मी पहील्यांदा ऐकले. कोवळी पालवी करवंदाची आहे. दुसरा फोटो बहुतेक बियांचा आहे. ज्याच्या आत या होत्या त्याचा फोटो खाली देत आहे.
आणि खालील फुलांचे नावही मला माहीत नाही, पण खुप सुंदर होती.
आमच्या शेतातील घाटे.
आमच्या शेतातील घाटे.
![051D278B-F1BE-4562-8D1C-27F28B970DE2.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/051D278B-F1BE-4562-8D1C-27F28B970DE2.jpeg)
![76B53B14-1414-4E8F-BDF2-004055B53451.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/76B53B14-1414-4E8F-BDF2-004055B53451.jpeg)
![3591927F-A006-4BE5-AD19-71209FDA263B.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/3591927F-A006-4BE5-AD19-71209FDA263B.jpeg)
![A65FD692-0D62-4688-B0AF-FAE85C2748A2.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/A65FD692-0D62-4688-B0AF-FAE85C2748A2.jpeg)
आणि हे हरबऱ्याचे फुल.
ही मागील दारची केळ.
हा घड. जरा जवळुन.
सर्वांचे सर्व फ़ोटो मस्त!
सर्वांचे सर्व फ़ोटो मस्त!
इथे smyli कशा देतात? मी विसरले>>>>>>बाई हिला शिक्षा करा!
इथे खाली
TEXT FORMATS OPTIONS आहे , त्यात Textual smiley आहे , त्यात तुला सर्व स्मायली मिळतील.
शालीदा, काय सुंदर फोटो आहेत
शालीदा, काय सुंदर फोटो आहेत सगळेच.
बाई हिला शिक्षा करा!>>> शोभा
बाई हिला शिक्षा करा!>>> शोभा सहमत. पण आपल्या बाई फारच प्रेमळ आहेत. शिक्षा वगैरे करणं त्यांना जमायचे नाही.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
थॅंक्यु माणिक!
पण आपल्या बाई फारच प्रेमळ
पण आपल्या बाई फारच प्रेमळ आहेत. शिक्षा वगैरे करणं त्यांना जमायचे नाही. >>>>>>>>>त्या बहुतेक मलाच शिक्षा करतील
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शोभा संपर्कातुन मेल केली आहे.
शोभा संपर्कातुन मेल केली आहे.
हरब-याच्या फूलाचा फोटो
हरब-याच्या फूलाचा फोटो कित्ती सुंदर आलाय.
'किट्टू नावांच्या बाबत मी अडाणी आहे. जागुताई व्यवस्थित सांगु शकेल.'>>>> जागुताई सांग बघू
त्या ऑरेंज फुलाबद्दल आधी
त्या ऑरेंज फुलाबद्दल आधी चर्चा झाली होती. आता मला नाव आठवत नाही पण साधनाला माहित आहे त्याच नाव.
किट्टू ती परीची उपमा खुप छान वाटली. पण काय आहे नाही ओळखता येत.
उंदीरमारी माहित आहे. उंदीरमारीला दुसरे नाव गिरीपुष्प आहे. ह्यात मला अजूनपर्यंत दोन रंग दिसले आहेत. एक वरचा जांभळा आणि एक पांढरा. शेतात उंदरांचा त्रास कमी व्हावा म्हणून शेताच्या बांधांना ही झाडे लावतात तसेच ह्याची पाने पडूनही चांगले खत होते. घरात उंदरांचा त्रास असलेल्या ठिकाणी ह्याची पाने ठेवतात असे म्हणतात.
ते धायटीचे फुल आहे.
ते धायटीचे फुल आहे.
ते धायटीचे फुल आहे.>>> अरे
ते धायटीचे फुल आहे.>>> अरे देवा!
शोभा, मी पूर्वीसारखी नियमित
शोभा, मी पूर्वीसारखी नियमित इथे येत नसल्यामुळे विसरले हे खरं आहे, पण शिक्षा नको , मी येईन नेहमी इथे , एकवार माफी असावी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(No subject)
पोर्णिमा मस्त फुल.
पोर्णिमा मस्त फुल.
मॉर्निंग वॉकला आमच्या कडील तलावाभोवतालच्या गार्डनमध्ये हल्ली ही पांढर्या सावरीची फुले पडलेली असतात. फुल साधारण तगरीच्या फुलाच्या आकारा एवढ आहे.
![](https://3.bp.blogspot.com/-YHiUiUFeVZE/XGVJElvZRoI/AAAAAAAB2Gc/rApAEvAsIigi4LLgxfCSg_JvvlOuy62rACKgBGAs/s640/20190209_080004.jpg)
Pages