झोपेचे सोंग घेतलेल्या शहराचे Matrix

Submitted by विजयकुमार on 31 January, 2019 - 04:23

जळत्या सिगारेट सारखा
दिवस भुर्रकन संपतो
आणि उरलेल्या राखेचे
काजवे होऊन भिरभिरतात
सा-या शहरभर ,
नाल्याकाठच्या SRA status
न मिळालेल्या झोपडीतले
घासलेटचे दिवे
आशाळभूत नजरेने
tower च्या दिव्याकडे
बघत राहतात......

शहर तसे झोपलेले असते
पण अर्धवटश्या निद्रेत
बुर्जीपाव च्या गाड्यावरचा
करकाराट,
Indian Chinese गाड्यावरचे
चिनी म्हणून मिरवणारे
fusion जेवण रिचवत
दारुडे अच्छे दिन येणार
गात असतात........

लाल बत्तीच्या वस्त्या,
railway शेड च्या मागच्या जागा,
मूत वाहणा -या मुता-या,
कुटूंबत्यागल्या
वखवखलेल्या जीवांनी
ओसंडून वाहतात,
त्या मुतारीतली खर
सर्वदूर शहरावर
पसरलेली असते,
अगदी गगनचुंबी
झगमगलेल्या Tower सुद्धा ......

बाटलेले रस्ते,
हिणवलेले गेलेले street Lights ,
नियमाची काशी कारणा-यांना
बघून उबेलेले Signals चे
खांब, सारे सारे
टक्क जागे असतात
पापे बघत
मग कुणी being human
humanity सोडून wild
होतो,
आणि चिरडतो
Secularism ला .....

कुठे बावचळलेले , भरकटलेले
काही अभागी
फिरस्ते रस्ते तुडवतात,
हातात A K ४७ घेऊन
बेदरकारपणे
रक्तात नाचतात,
तेव्हा नवीन संप्रदाय
उदयास येतो
घोषणा होते नव्या धर्माची
मेणबत्ती संप्रदाय,
त्यांचा प्रेषित असतो
उच्चभ्रू ,
उदघोष होतो , जयजयकार होत,
मागच्या वेळी
मेलेले किडे खिन्न होतात......

झोपेचे सोंग घेतलेले
शहर बघत असते
अगतिकतेने,
असह्य मरगळतेने ,
काही करू शकत नाही हि भावना
पराकोटीला पोहचते ,
अचानक प्रकाश पसरतो
सारे सारे शहर
जागे होते
आभासी जीवन जगण्यासाठी ......

विजयकुमार कणसे ,
मुंबई , २३ जानेवारी ,२०१७

Group content visibility: 
Use group defaults

पोचलं
हताशा, वैफल्य भावना जागृत केलीत.

भारी.
विजयकुमार हे जबरदस्त कवी आहेत. त्यांची चर्च ही कविता ऑलरेडी व्हायरल झालेली आहे.

भारी.