दारू प्यायला सुरूवात कशी करावी ? मार्गदर्शन / क्लासेस ची माहिती हवी आहे.

Submitted by पाटलीण बोवा on 21 January, 2019 - 20:30

अनेक जण दारू पितात. ज्यांना नव्याने दारू प्यायला सुरूवात करायची आहे त्यांनी सुरूवात कुठून आणि कशी करावी ?
काय काळजी घ्यावी ? पिण्याचे किती प्रकार असतात ?
दारू पिण्याचे काही नियम असतात का ?
बायकांनी दारू पिण्याला सुरूवात कशी करावी ?
पुरूषांनी दारू प्यायला कशी सुरूवात करावी ?

कृपया योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे ही नर्म विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया सुरू करू नका. दारू हा केवळ अंमली नव्हे तर व्यसनी पदार्थही आहे. कुणी दारूवर कंट्रोल करतात तर कुणाला दारू कंट्रोल करते. दारू कंट्रोल मध्ये कशी ठेवावी याच्या कसल्याही ट्रिक्स वगैरे नसतात, ज्यांची होत नाही ते जंगजंग पछाडतात पण नाही होत.
तेव्हा नसेल सुरू केली तर टाळलेले बरे.

बाकी अर्थात आपली मर्जी.

स्कंद पुराणात विषकन्यांचा उल्लेख आढळतो.
लहानपणापासून आधी थेंब थेंब आणि मग चमचा चमचा विष प्यायला सुरुवात केली तर हळूहळू विषप्रतिकार शक्ती वाढू लागते. एक दिवस बाटली बाटली सहज ढोसू शकतो.
तरी विष जास्त झाल्यास एखादे सावज हेरून हलकासा चावा घ्यायचा. जास्तीचे विष तिथे उतरते.

बाकी विषकन्याच का असायच्या? विषकुमार का नाही? व्हाई शूल्ड गर्ल्स हॅव ऑल द फन हा स्वतंत्र धाग्याचा विषय झाला. माझ्या जुन्या धाग्यात यावर चर्चा करू शकता..

>>>>>>का असायच्या? विषकुमार का नाही?>>>>हा प्रश्र्न भारीय!!! स्त्री-पुरुष समानता वाद्यांनी,या प्रश्नाला, अजून का नाही उचलून धरले????
प्रश्र्नच आहे????

>> बाकी विषकन्याच का असायच्या? विषकुमार का नाही?

एका प्राचीन राजाविषयी पूर्वी वाचले होते. राजकुमार असल्यापासून त्याला विषाचे थोडे थोडे डोस देत त्याला एकदम विषप्रुफ करून सोडले होते. कोणी विषप्रयोग करू नये म्हणून. विष इतके भिनले होते त्याच्या अंगात कि अंगावर एखादी माशी बसली तरी ती मरत असे.

मला तर याचेच आश्चर्य वाटते की कोणत्या ही प्रकारची नशा न करता,
इथे धागे काढायला इतके विविधढंगी, विविधरंगी विषय सुचतातच कसे एकऐकाला.
--
बाकी दारु कशी प्यायची व का, ह्याचे उत्तर तुम्हाला इथे मिळेल.

धागा धागा अखंड विणुया, प्याला प्याला रिचवत झिंगुया

सोमरसाचे अखंड दालन, घुटके घुटके घेत बसु या
ईंद्रासूर तो पियक्कड पहिला, नाम तयाचे मुखी घेऊ या
कष्ट जरी का होता दुजांना, वेटरला मग दोन हाणु या

धागा धागा अखंड विणुया...

धागा धागा अखंड विणुया, प्याला प्याला रिचवत झिंगुया

सोमरसाचे अखंड दालन, घुटके घुटके घेत बसु या
ईंद्रासूर तो पियक्कड पहिला, नाम तयाचे मुखी घेऊ या
कष्ट जरी का होता दुजांना, वेटरला मग दोन हाणु या

धागा धागा अखंड विणुया...>>>>>
Rofl
काय ती काव्यप्रतिभा!!

सस्मित, धन्यवाद !! अगं मीच लिहीले. Happy कधीतरी जमते असे, मी कवयत्री नाही तेवढी प्रतिभा पण नाही. पण मला असे विनोदी लिहायला आवडते. Proud

धागा धागा अखंड विणुया, प्याला प्याला रिचवत झिंगुया

सोमरसाचे अखंड दालन, घुटके घुटके घेत बसु या
ईंद्रासूर तो पियक्कड पहिला, नाम तयाचे मुखी घेऊ या
कष्ट जरी का होता दुजांना, वेटरला मग दोन हाणु या

धागा धागा अखंड विणुया...>>>>> टाळ्यान्चा कडकडाट

मला वाटतंय जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला ग्राइपॉटर ऐवजी चमचा चमचा देशी दारू पाजली तर त्याची ती सहन करण्याची क्षमता वाढेल आणि त्या विषकन्या मोठ्या झाल्यावर जशा विषाचे ग्लासच्या ग्लास रचवायच्या तसं ते बाळ पण मोठा झाल्यावर कितीही प्यायला तरी मी पिलीच नाही अशा अविर्भावात सगळीकडे वावरले. यामुळे या देशाचे अनेक प्रश सुटतील जसे कि प्यायल्यावर माणूस वेडीवाकडी गाडी चालवणार नाही. फुटपाथवर झोपलेल्या माणसांच्या अंगावर गाडी चढवणार नाही. दारूच्या नशेत बायकोला मारहाण करणार नाही. फक्त लग्नात जे नागीण गाण्यावरचा डान्स पाहायला जातात त्यांचं करमणुकीचं साधन बंद होईल.

अट्टल दारुबाज अजूनही आलाच/आलीच नाही का? येईल येईल त्याचे/तिचे दुसरीकडचे क्लासेस चालू असतील--- रीकाम्या वेळेत चक्कर टाकेल!!! धीर सोडू नका!!!!!

मला वाटतंय जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला ग्राइपॉटर ऐवजी चमचा चमचा देशी दारू पाजली तर...
>>>>>

ग्राइपॉटर काय असते हे.. हॅरी पॉटर आईकून आहे.

असो, हे पोलिओ डोस सारखे सरकार पाजणार का? दो बूंद जिंदगी के.. अमिताभच्या जागी सलमान वा संजय दत्त जाहीरातीत. तसेही सरकारला दारूबद्दल एक विशेष जिव्हाळा आहेच. आणि संतांनी म्हटल्याप्रमाणे दारू वाईट नसून तिचा अतिरेक वाईट असतो.

कुठलीही गोष्ट वाईट नसून अतिरेक वाईट असे म्हणतात.
चोऱ्यामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार, गांजा, हशीश, ब्राउन शुगर, केसीएन इत्यादी इत्यादी सारे प्रमाणात करावे, त्यांचा अतिरेक करू नये. अतिरेक करायचा असल्यास तो ही प्रमाणात करावा. कित्ती सोपं आहे सगळं.

मानव, पाणी आपल्याला आवश्यक आहे. ते जितकं जास्त प्याल तितके फायदे अधिक.
असंच प्रथिने, जीवनसत्व, खनिजे यांबद्दलही म्हणता येईल.
ड जीवनसत्त्व पैदा करण्यासाठी रोज दहा ते चार उघड्याने उन्हात फिरावे.

नवीन Submitted by भरत. on 23 January, 2019 - 09:07 >>>>. Lol Lol

भरत, तुमच्या पोस्टचं हसू आलं, पण पृथ्वीकरांची पोस्ट उपहासात्मक आहे. अगदी पहिली पोस्ट वाचा, त्यात कळकळीने लिहिलं आहे.

मीरा, गधडे >>>>> Lol

आता आय डी उडल्यावर चालेल की, आता काही माझ्या पोस्टने प्रोत्साहन मिळत नाही. आणि भरत यांच्या रिप्लायला मला टाळता आलं नाही.

तुम्हाला भरत यांची पोस्ट कशी वाटली मग? Wink Proud >>>>> पृथ्वीकरांच्या पोस्टच्या दुप्पट उपहास भरला आहे, पण मला शर्ट न घालता फिरणाऱ्या लोकांची कल्पना करूनच हसू आलं. मला गोष्टी लगेच visualize करायची सवय असल्याने जरा जास्तच हसू येतं Proud

हा धागा विनोदी भागात असायला हवा आहे खर तर Lol

आता आय डी उडल्यावर चालेल की, >>> आयडीचा पुनर्जन्म झाला नसेल कशावरून Wink

Pages