सोनचाफा

Submitted by mrunal walimbe on 16 January, 2019 - 12:04

सरोज आज खूपचं आनंदात होती. तिच्या हातात अंगणातल्या चाफ्याची फुले होती. तिच्या हातातल्या चाफ्याचा सुगंध जसा सर्वदूर पसरला होता तशीचं तिच्या मुलांची किर्ती सर्वदूर पसरली होती याचाचं तिला अप्रूप वाटतं होतं. आज हा समारंभ गावकऱ्यांनी तिच्या चं मुलांसाठी आयोजित केला होता.त्याचंच समाधान तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वहातं होतं. इतक्यात तिच्या चं गौरी ने हाक मारली अक्का तिथं काय करतीसं गं तू पुढे ये ना तुझ्या मुलांचं कौतुक बघायला... तशी सरोज उठली अन् पुढच्या रांगेत जाऊन बसली.
आज खरचं सरोजला तिने घेतलेल्या निर्णयाचं खूप बरं वाटतं होतं . अगदी आयुष्याचं कृतकृतार्थ झालं असं वाटतं होतं. या एवढ्या आनंदाच्या क्षणी तिच्या डोळांच्या कडा नाही म्हणायला थोड्याश्या पाणवल्या होत्या.तिला आज अजिंक्यची राहून राहून आठवण येतं होती. अजिंक्य जिथे कुठे असेल तिथून हे सारे बघत असेल अन् त्याच्या नेहमीच्या ढबीप्रमाणे गालातल्या गालातं हसतं असेल याची तिला मनोमनं खात्री होती.
सरोजं एक छोट्याशा खेड्यातील अगदी लाजाळू अन् नाजूक बांध्याची साधीशी मुलगी होती.अभ्यासातं हुशार असल्याने तिच्या वडिलांनी दहावी नंतर तिला शहरात काँलेजला अँडमिशन घेऊ दिली. लहानपणापासून चं तिला शिक्षिका व्हायचे होते त्यामुळे तीने आर्ट्सला अँडमिशन घेऊन डी ए ड केले.याचं दरम्यान तिच्या चं नात्यातलं अजिंक्य ने तिला मागणी घातली...
अजिंक्य ही हुशार अन् कष्टाळू मुलगा होता. त्याला military ची लहानपणापासून चं आवड होती. त्यामुळे तो graduation नंतर short commission वर military तं join झाला होता.
सरोजच्या बाबांनी विचार केला नात्यातला माहितीतला मुलगा अन् घरबसल्या चालून आलेलं स्थळ आहे नाही कशाला म्हणा. तरीही त्यांनी सरोजचे मतं घेतलं तीही होचं म्हणाली कारण तिला माहित होते की तिच्या माघारी तिच्या दोन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी बाबांवर आहे.
सरोजचं लग्न झालं ,सासूबाई तिचं खूप कौतुक करायच्या एकचं नणंद होती तिला तीही थोरली त्यामुळे तीही लहान भावाची बायको म्हणून हिचं कौतुक चं करायची. एकूणचं माहेरपेक्षा सरोजची सासरीचं जास्त बडदास्त ठेवली जातं होती. तसा अजिंक्य चा स्वभाव खूप मायाळू प्रेमळ अन् समोरच्या वर छाप पाडणारा होता.सरोजला तर त्याने मागणीचं घातल्याने त्याला ती खूप आवडली आहे हे तिला आधीचं कळले होते. परंतु तिला शाळेत नोकरी करायची होती अन् हे अजिंक्य ला कसे विचारावे हेचं तिला कळतं नव्हते. अजिंक्य एक महिन्याच्या सुट्टीवर आला होता. अजून तशी त्याची सुट्टी बाकी होती.
एक दिवस सकाळी ती चाफ्याची फुले काढतं होती. एवढ्यात अजिंक्य तेथे आला अन् तिला म्हणाला तू रोज चाफ्याची ही फुले काढतेसं पण केसांतं अजिबात माळतं नाहीसं सारी देवांनाचं वाहतेसं असे का? यावर तिने त्याच्यावर नजर रोखतं उत्तर दिले चाफ्याची फुले डोक्यात माळून केसांची शोभा वाढविण्यापेक्षा ती देवाला अर्पण करुन देव्हाऱ्याचे सौंदर्य वाढवण्यातं अन् देवांचे आशिर्वाद घ्यायला मला जास्त आवडते. आणि चाफ्याच्या घमघमाटाने सारं घर पण कसं प्रसन्न अन् गंधित होऊन जाते. तसं तिच्या अगदी जवळ येतं तो म्हणाला अरे वा मास्तरीणं बाई खूप छान बोलतातं अन् बोलताना चेहऱ्यावर येणाऱ्या तेजाने तर अगदी एकटक पहावेसं वाटतयं की... तशी ती लाजून पळणार इतक्यात त्याने तिचा हात धरला तशी तिला काहीच सुचेना पण मग दोन सेंकदात ती म्हणाली खरं तर मला विचारायचे होते तसं त्यानं नजरेनचं विचारलं काय ?
...मला इथं शाळेत नोकरी करायची आहे मी करु? तसं तो झट्दिशी म्हणाला एवढचं ना करं की...तसंही सुट्टी संपली की मी field वर जाणार तुला तिथे नेताचं येणार नाही त्यामुळे तू अन् आईचं इथं असणार . तू करं नोकरी अन् असे विद्यार्थी घडवं की ज्यांची किर्ती दूरवर पसरेलं अगदी तुझ्या या चाफ्याच्या सुगंधासारखी...
अजिंक्य सुट्टी संपवून कामाला जायला निघाला तेव्हा गावातील बरीचंमातब्बर मंडळी त्याला भेटायला आले नातेवाईक ही आले ती साऱ्यांची सरबराई करत होती पण मनातल्या एका कप्प्यात मात्र कुठेतरी हुरहूर होती तिच्या अन् अखेर तो क्षण आला त्याने तिच्या डोळ्यात पाहून bye म्हटले तिनेही मन घट्ट करुन त्यासं निरोप दिला अन् इथली काळजी नको असे डोळ्याचे आश्वासन....
तिने शाळेतल्या मुख्याध्यापकांना भेटून तिची सर्व सर्टिफिकेट स् दिली अन् शाळेत नोकरी करण्याचा मानस बोलून दाखवले. ते खूप भारावून म्हणाले अहो madam एवढी छान शिक्षिका आमच्या मुलांना मिळते ही त्यांचे भाग्यचं म्हणायचे... मग तिची नोकरी चालू झाली...
एक दिवस गावात बातमी आली गावच्या एका चांगल्या सुविद्य कुटुंबातील तीन मुले सोडून बाकी सारे लोक रोड अँकसिडेंट मधे गेले. सगळ्या गावावर शोककळा पसरली. त्याचं दिवशी अजिंक्यचा फोन आला हे सांगायला की दहशतवादी हल्ल्यामुळे तो आता पुढे field वर चालला आहे आणि दोन तीन दिवस तरी आता त्याला फोन करता येणार नाही. तसं तिला थोडसं धस्स झालं पण तरीही तिने गावातला सारा प्रसंग त्याला सांगितला अन् म्हणाली तुम्ही तिथं देशासाठी लढतं आहात ना तर मी इथं त्या पोरक्या मुलांना आपलसं करुन त्यांचं पालकत्व स्वीकारु का... तिकडून अजिंक्य ने उत्तर दिले अरे वा बायको तू तर माझ्याचं तोंडचं वाक्य बोललीस. मस्तच best luck तुला तुझ्या या धाडसी निर्णयाची पूर्तता करण्यासाठी.....सरोजने तिच्या सासूबाईंना तिचा निर्णय सांगितला. खरं तर ज्या मुलांचं पालकत्व सरोज घेणार होती ती तर तिच्या सासूबाईंसाठी मुलीच्या चं मुलांसारखी होती. मग काय सरोज ने त्याची पूर्तता करण्याचा चंगचं बांधला.
असाचं आठवडा गेला सरोजला अजिंक्य चा फोन लागतं नव्हता तिला आता थोडी शी चिंता वाटू लागली होती.. उलट सुलट बातम्या ही कानावर येतं होत्या .. तिला काहीच कळतं नव्हते अन् अचानक ती बातमी आली अजिंक्य हुतात्मा झाल्याची सरोजच्या पायाखालची जमीन सरकली.. ती खूप सैरभैर झाली पण मग सासूबाईंकडे
पाहून तिनं स्वतः ला सावरलं... अन् मग या तीनं मुलांवर चं तिनं सगळं लक्ष केंद्रित केलं होतं...
आजमितीला त्यातील थोरला सुहास military तला कर्नल झाला होता. दोन नंबरचा अनिल सी ए झाला होता. अन् छोटीशी गौरी उत्तम gynecyac झाली होती. या साऱ्या मुलांना आपल्या या अक्काविषयी खूप आत्मीयता होती. सगळ्या गावात एकाच घरातील सगळी मुले एवढी मोठी उच्पदस्थ असल्याचं हे एकच उदाहरण होतं अन् त्यातं ती तशी पोरकीम्हणून गावानं हा समारंभ ठेवला होता...
जेव्हा सरपंचांनी या मुलांना गुच्छ देऊन त्यांच्या सत्कार केला तेव्हाच मोठ्या सुहासने म्हणले सरपंच काका मला आम्हा भावंडाच्या वतीने थोडेसे बोलायचे आहे...

देवकीने जन्म दिला कृष्णासं
यशोदेने सांभाळले त्यासं
ज्या आईने दिला जन्म
ती आठवतं नाही आम्हासं
जिने सांभाळले आम्हासं
त्या अक्काच्या चरणी
वहातो ही सोनचाफ्याची फुले आम्ही
अन् मागतो देवाकडे एकचं मागणं
या फुलांच्या सुवासासमं
आमच्या अक्काची आम्हावरं
अशीचं माया राहू दे उदंड
अन् सरोजला काही कळायच्या आतं या तिन्ही मुलांनी खरोखरचं तिला दंडवत घातला होता.
हे दृश्य पाहून सरपचंच नाहीत तर सारे गौरव समारंभाला आलेले दिड्मूढ झाले होते...

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults