संक्रांतीची माहिती-
वाहन - सिंह
उपवाहन - हत्ती
वस्त्र - पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे , म्हणून पांढरे वस्त्र घालायचे नाही.
शस्त्र - भृशुंडी
वयाने बाल आहे.
वासा करिता चाफ्याचे फुल घेतले आहे.
अन्न भक्षण करित आहे.
प्रवाळ रत्न धारण केले आहे.
दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे, ईशान्य दिशेस पहात आहे, म्हणून पूर्व पश्चिम वाणववसा करणे.
मुहूर्त - सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यंत आहे.
पूजेचा विधी
मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांमध्ये धन-धान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते यानंतर गृहिणी एकमेकांनी वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्टचिंतन करतात. पुजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणला जातात. या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते.
मकरसक्रांतीचे पौराणिक महत्त्व
मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन झाले पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छाने त्याग केला होता. दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता. उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.
मकर संक्रांत हा सण ३ दिवस वेगवेगळ्या प्रकाराने साजरा होणारा सण. १४ जानेवारीला भोगी त्यानंतर १५ जानेवारीला मकर संक्रांत आणि १६ जानेवारी रोजी किंक्रांत हा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात या सणाचं महत्व वेगळं आहे.
संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.
या तीन दिवसी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो. (मकर संक्रात: का घालतात काळ्या रंगाचे कपडे?)
मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-
जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते. संक्रांत ही पौष शुक्ल ६ ह्या तिथीला असते. (मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा)
मकर संक्रांत:-
मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. ह्या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून, दागिने, नाकात नथ घालून तयार होवून बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात.
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), १ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी. पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये. (भोगी म्हणजे काय? भोगीच्या दिवशी खातात हे खास पदार्थ)
संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते. मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.
मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.
संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.
संक्राती संकलित माहिती असे
संक्राती संकलित माहिती असे शीर्षक द्याल का. माहिती खरच चांगली आहे.
सुरूवातीला ते save होत नव्हत
सुरूवातीला ते save होत नव्हत
छान माहिती
छान माहिती
छान माहिती.
छान माहिती.
परंतु "संक्रांत ही पौष शुक्ल ६ ह्या तिथीला असते" हे मात्र बरोबर नाही. यंदाचीच तिथी बघा बरं कॅलेंडर मध्ये काय आहे ती. तसेच गेल्या दोन वर्षांची तिथी बघा म्हणजे लक्षात येईल.
बोरन्हाणीची लहानपणी खूप मजा यायची. ती बोरं, उसाचे तुकडे, पेरूच्या फोडी... अहाहा!
कुठून कॉपी पेस्ट केलीये
कुठून कॉपी पेस्ट केलीये त्याचे त्यांना क्रेडिट तरी द्या तळटीप
इथे पहा आणि तिथे पहा अशा ओळी वेबलिंक्स आहेत, त्या काढता आल्या तर पहा
चांगली माहीती.
चांगली माहीती.
अजून भोगी म्हणजे काय त्याचा उलगडा झाला नाही लेखात.
नविन नवर्यांनाही संक्रांतीत हलव्याचे दागिने घालून एक सोहळा करतात.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/lifestyle-news/makar-sankranti-2017-marathi-poo...
असो. बाकी "संकलित" शोधायला गूगलून २ मिनिटे लागतील पण तितका वेळ खर्चायची इच्छा नाही.
छान माहीती.
छान माहीती.