मेलेला लसूण खाल्ल्यास कर्करोग होऊ शकतो का?

Submitted by Mi Patil aahe. on 13 January, 2019 - 03:25

मेलेला लसूण ( पाकळ्या) खाल्ल्याने कर्करोगाशी गाठ पडते असे २आठवड्यांपूर्वी मी ऐकले तर त्यात तथ्य , विज्ञान किती?
कोणी सांगेल का?
स्वययंपाकात मेलेला लसूण ( पाकळ्या) वापरू नये, वापरल्यास क्यान्सर होतो असे जे मी ऐकलं ते खरं आहे का?
कृपया माहिती द्या!!!!
मेलेला (लाल ,विटकरी रंगाचा) लसूण म्हणजे,जो पांढरा शुभ्र रंगाचा नसतो तो----
वाळलेला लसूण. जो मातीत पुरला तर कोंब येत नाहीत असा.
मेलेला लसूण म्हणजे काय? हे कळलं असेल तर उत्तर द्या.
हा प्रश्र्न विचारायचे कारण निर्माण झाले म्हणून हा प्रश्र्न विचारला गेला आहे, कृपया याची नोंद घ्यावी.हा टाईमपास किंवा मनोरंजनाच्या उद्देशाने विचारला गेलेला प्रश्न असावा किंवा आहे असे जर आपणास वाटत असेल तर तुमच्या सारखे निर्बुद्ध, निरर्थक, फुटकळ तुम्हीच!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही राहू द्या हो किरणुद्दीन
मी तुम्हाला नाही विचारले, ज्यांना माहीत आहे त्यांना विचारले आहे.

तसं वर लिहीलेलं नाही ना.
ही जागा मायबोलीची आहे म्हटल्यावर प्रतिसाद तर सगळेच देणार.

आता प्राणवायु हा ही कर्करोगकारक (carcinogen) आहे एवढेच ऐकायचे बाकी राहीले आहे. Happy Happy Happy Happy Happy

कुठे ऐकले?>>>
हे विचारणे राहू द्या म्हटले!!!

पुढील धागा
-- लसुण मरतो म्हणजे नक्की काय होतं ? मग कांदा बटाटा पण मरत असतील का !

मेलेला लसूण म्हणजे काय, हेच तुम्हाला ठाऊक नाही, असे वाटते.
मग तुम्ही काय देणार माझ्या प्रश्नाच उत्तर????
पण विनोद निर्मिती मात्र छान जमली आहे, बरं!!!

कुठे ऐकले?>>>
हे विचारणे राहू द्या म्हटले!!! >>>>>>>>

अरेच्चा ! या हिशेबाने तुमचे सगळेच प्रश्न राहू द्या कॅटेगरीतले नाहीत कॉय ?

पुढील धागा
-- लसुण मरतो म्हणजे नक्की काय होतं ? >>>. मला खरंच हा प्रश्न विचारायचा आहे? मला कळलंच नाही मेलेला लसूण म्हणजे काय असतं

अशा प्रकारे कुठलाही शिळा झालेला अन्नपदार्थ खाल्ला तर कर्करोग होण्याची शक्यता वाढते. होईलच अशी खात्री नाही.

"मेलेला लसूण" शब्दप्रयोग प्रथमच वाचला. उत्सुकतेपोटी गुगलून पाहिले. गुगलला सुद्धा हा शब्दप्रयोग फक्त इथेच आढळला.
उलटपक्षी लसूण हा कर्करोग प्रतिबंधासाठी वापरला जातो असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे. जुन्या लसणामुळे अन्नविषबाधा होते असा उल्लेख आढळतो.

मेलेला (लाल ,विटकरी रंगाचा) लसूण म्हणजे,जो पांढरा शुभ्र रंगाचा नसतो तो----
वाळलेला लसूण. जो मातीत पुरला तर कोंब येत नाहीत असा.

आम्ही लसूण पाकळी जी लेचीपेची पारदर्शक झालेली असते, रंग पिवळसर असतो तिला मेलेली म्हणतो. पण खायची का नाही ते माहीती नाही, अशी पाकळी अगदी क्वचित असते लसणीच्या गड्ड्यात. कधीतरी अशी पाकळी एखादी मिळत असल्याने ती टाकून देते. आमच्याकडे फार लसूण लागत नाही, चार सहा महीन्यांनी कधीतरी एखादी पाकळी एखादवेळा मेलेली मिळते. एरवी लसणीच्या पाकळ्या चांगल्याच असतात.

बरोबर आहे, मेलेल्या लसणाची पापं खाल्लेल्या माणसाला लागणार किंवा लसणाला एकटयला जायला नको वाटत असेल आणि इतका उग्र वास असूनही आपल्याला तोंडी लावतोय म्हणजे आपल्यावर त्याचे प्रेम आहे असे त्याला वाटत असेल आणि मग त्याला आपल्यासोबत चलायला म्हणून आग्रह करत असेल

मला खरे तर हेच कळलं नाहीये की काय खाल्ले असता इतके प्रश्न पडत असतील?

बरेच चायनीजवाले मेलेल्या कोंबड्या वापरतात. फार स्वस्तात पडतात. त्याचे चिकन लॉलीपॉप बनवतात. ते सुद्धा जीवाला चांगले नसते.