"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची..
गजाननाची आरती चालू होती. पुण्यात आल्यापासून दररोज मी गजाननाची आरती करत असे व त्यांनतर माझं दिवसाच कामकाज सुरू होई."
'तसंही मला जास्त काम नसे. श्वेता टेक्नॉलॉजीे फक्त मोठ्या बिजनेसलाच टेक्नॉलॉजी पुरवत असे आणि त्यामुळे काम कमी आणि पैसा जास्त असं सूत्र होतं. तसही काही असेल तरी आमची २४ जणींची टीम आपापल्या क्षेत्रात पूर्णपणे पारंगत होती. जरी मी एम डी असले तरीही आमच्यात सलोख्याचे संबंध होते."
"आमचा नफा खूप जास्त होता. पण आम्ही त्यातील फक्त १० टक्के भाग ठेवत असू आणि बाकी सर्व विधवा परितक्त्या महिलांसाठी दान करत असू."
"वयाच्या अवघ्या बविसाव्या वर्षी मी राजघराण सोडलं आणि पंचविसाव्या वर्षी १८ कोटींची कम्पनी उभारली. मात्र स्वतःसाठी नाही तर फक्त ज्यांना कुणी नाही त्यांच्या कल्याणासाठी!"
आतापर्यंत फक्त बाई बोलत होत्या आणि मी ऐकत होतो. पण यातून मला दोन गोष्टी कळल्या...
१. ही व्यक्ती पूर्णपणे माझ्या वडीलांसारखी आहे.
२. तिला माझ्या वडीलांविषयी काहीतरी गूढ माहिती आहे.
"अनघा माझी जिवाभावाची मैत्रीण. मी चेन्नईहून पुण्यात तिच्याबरोबरच आले. तिचे वडील पुण्यातील मोठे बिल्डर होते. माझं पाहिलं ऑफिस चक्क त्यांनि मला गिफ्ट केलं आणि मी त्याना महिन्याभरात त्याच्या दुप्पट रक्कम रिटर्न गिफ्ट दिली."
... रश्मीने एम आर व्ही ला २ कोटी रुपये दिले होते आणि त्याने महिन्याभरात चार कोटी तिला परत केले....
कुठेतरी रेषा समांतर चालल्या होत्या...
....आणि त्याच रश्मीची मुलगी आज मला नाही म्हणत होती...
"दिवस जात होते. अनघाच्या आयुष्यात प्रियेश आला. तो होताच, पण दोघे आता एकेमेकांशिवाय राहू शकत नव्हते. आणि तो अपघात झाला आणि प्रियेश...."
बाई थांबल्या. त्या उठल्या आणि एक नक्षीदार कपाटातुन एक फ्रेम बाहेर काढली.
प्रियेश आणि अनघा.
किती सुंदर जोडी होती ती....
"...माझी मैत्रीण खचली होती. तुटलि होती. तिला समजावण्याचे सगळे प्रयत्न संपले होते."
"...आणि तिने बऱ्याचदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता."
सुसायडल टेंडन्सी...
"नाईलाज म्हणून तिला रिजनल मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. दिवसामागून दिवस जात होते. उपचार चालू होते पण हाती काहीच लागत नव्हतं...
मला तिला सोडून राहणं शक्य नव्हतं. पण मला असं एका ठिकाणी राहणंही शक्य नव्हतं. म्हणून मी तिला दर रविवारी संध्याकाळी भेटायला जात असे."
"अशीच एका संध्याकाळी मी तिला भेटायला गेले पण...
...ती तिथे नव्हती...."
आरंभम भाग १ - http://www.maayboli.com/node/62739
आरंभम भाग २ - http://www.maayboli.com/node/62771
पुढील भाग कुठे आहे?*
पुढील भाग कुठे आहे?*
गौरी माफ करा. पुढचा भाग
गौरी माफ करा. पुढचा भाग लिहिला नाही.
पण असं वाटतंय की लिहावा परत . धन्यवाद. नवीन भाग लिहिल्यावर तुम्हाला विपु करेन....
पु .भा . प्र .
पु .भा . प्र .
नमस्कार, कृपया पुढील भाग टाका
नमस्कार, कृपया पुढील भाग टाका लवकर।।।
ह्याचं काय झालं पुढे?
ह्याचं काय झालं पुढे?
किल्ली, काय उत्खनन चालवलंयस
किल्ली, काय उत्खनन चालवलंयस
पुढे लिहीलं नाहीये का?
पुढे लिहीलं नाहीये का?
काय उत्खनन चालवलंयस>>>
काय उत्खनन चालवलंयस>>>
कामाला लावतेय लेखकाला
गूड
गूड
ओ किल्ली मॅडम,
ओ किल्ली मॅडम,
कशाला जुनी पापे उकरून काढतायेत!
कशाला जुनी पापे उकरून
कशाला जुनी पापे उकरून काढतायेत>> तुम्हाला त्रास द्यायला
Pudhe liha ki .... Waiting...
Pudhe liha ki .... Waiting...... Evdh Chan lihit Astana madhech tumhi adnyatvasat ka br jata..
(No subject)