दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोफेसर सतीश देवपूरकर ह्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले>>>>>>>>>> भावपूर्ण श्रद्धांजली

प्रख्यात गायक मोहम्मद अजीझ यांचे २७ नोव्हेंबर २०१८ रोजी दु:खद निधन झाले. सोशल मिडिया आणि इतर माध्यमातून त्यांच्या निधनाची म्हणावी तितकी दखल घेतल्याचे दिसत नाही. दुर्दैवी योगायोग असा कि मोहम्मद अजीझ यांनी खूप पूर्वी गायिलेली दोन गाणी याच वर्षी काही कारणांमुळे पुन्हा गाजली:

१. दिल बहलता है मेरा आपके आजाने से: मध्य प्रदेशातल्या एका प्रध्यापकानी लग्नात केलेल्या डान्समुळे हे गाणे यावर्षी खूप गाजले

२. तू मुझे कबूल मै तुझे कबूल: "खुदा गवाह" मधले गाणे. श्रीदेवी च्या मृत्युनंतर माध्यमातून दाखवले गेले. अणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या झिरो चित्रपटामध्ये सुद्धा या गाण्याचा समावेश आहे.

श्रद्धांजली...
मय नेम इस लखन - अनिल कपूर चे सिग्नेचर सोंग.

नाही. खरे आहे!
कादर खानसाहेबांना श्रद्धांजली.

कादर खान यांचे दु:खद निधन!! Sad
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!

>>

Amen
अमिताभ ला त्याचं stardom लाभण्यात कादर खान यांची महत्वाची भूमिका होती. बऱ्याच चित्रपटांचे संवाद त्यांनी लिहिलेत.

हा माणूस गणिताचा प्रोफेसर होता, ह्यावर बऱ्याच वेळा विश्वास बसत नाही.

आणखी एक, मिथुन चक्रवर्ती ला सिने सृष्टीत आणणारे मृणाल सेन, ह्यांचाही मृत्यू ३० डिसेंबर रोजी झाला.

श्रद्धांजली. त्यांची एक वेगळीच शैली होती.
ही पात्रं(त्यांची स्टाईल) इतकी प्रसिद्ध की ऑगी कार्टून च्या हिंदी डबिंग मध्ये एका पात्राला कादर खान सारखा आवाज आहे.

कादर खान आणी मृणाल सेन या दोघा महान व्यक्तींना श्रद्धांजली. कादर खान हे कायम आपल्यातले वाटले. एक निर्गर्वी माणुस होते ते.

Very sad news Sad His comedy with Govinda and Johnny Lever will be remembered forever. Shradhdhanjali _/\_

मृणाल सेन, कादर खान, आचरेकर सर............

माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन.

श्रद्धांजली.

मृणाल सेन, कादर खान, आचरेकर सर............

माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन.

श्रद्धांजली.

'गजरा'कार किशोर प्रधान यांना विनम्र श्रद्धांजली! Sad
बालपणी आम्हाला दूरदर्शनवर नाट्यक्षेत्राची ओळख करून देण्यात किशोरजी यांचा मोठा वाटा होता.

मोठा अभिनेता !
कुठलेही अंगविक्षेप न करता विनोद निर्मिती करणारा कलावंत....
श्रद्धांजली !

त्यांची उणीव जाणवेल.ते खूप क्युट सिनियर सिटीझन होते.
तो जब वी मेट मधला खुली तिजोरी की तरह वाला सीन भारी होता.

Pages