आहे उसंत कोठे ?
आहे उसंत कोठे ? लिहिण्यास चार गझला
पोटात भूक जळता होती पसार गझला
मरगळ मनात असता रुसतात शब्द सारे
कलमेतुनी न झरती माझ्या चुकार गझला
हाती धनुष्य त्याच्या, सावज समोर आले
आक्रंद त्या जीवाचा, थिजती अपार गझला
ते विश्व भावनांचे इतिहास आज झाले
आठव बनून आता छळतात फार गझला
राणास ना उमगली मीरा झपाटलेली
त्याने दिल्या विषाच्या, बनतात धार गझला
जेंव्हा वसंत फुलतो, धरती नटून असते
आकारती नवेली शब्दात नार गझला
शायर उदंड झाले बरसात शायरीची
लावून "सेल" आता द्याव्या उधार गझला
विषयात रंगण्याचे आता विषय कशाला ?
झाल्या वयस्क , उतरण करतात पार गझला
आयुष्य सांज वेळी खुश मी वळून बघता
वस्त्रास जीवनाच्या होत्या किनार गझला
श्रध्धांजली वहाया आले कुणीच नाही
मज अलविदा करूनी झाल्या फरार गझला
"निशिकांत" शब्द धुंदी लोका तुझी कळेना
सांगून जीवनाचे जातात सार गझला
निशिकांत देशपांडे मों. न. ९८९०७ ९९०२३
वाह...फार सुंदर..
वाह...फार सुंदर..
आहे उसंत कोठे ? लिहिण्यास चार गझला
पोटात भूक जळता होती पसार गझला> मस्त! सुरुवात दमदार झालिये..
थिजती अपार गझला, होत्या किनार गझला> मस्त! सुंदर खयाल आहे...
शायर उदंड झाले बरसात शायरीची
लावून "सेल" आता द्याव्या उधार गझला..> वाह!
श्रध्धांजली वहाया आले कुणीच नाही
मज अलविदा करूनी झाल्या फरार गझला> दुसरी ओळ खूप सुंदर..पहिली अजून complex करता आली असती...
पूर्ण गझल मस्त! आवडली..:)
माउ, मनापासून आभार दिलखुलास
माउ, मनापासून आभार दिलखुलास प्रतिसादासाठी.