नागिण [हरपिस ]

Submitted by प्रभा on 3 December, 2014 - 04:31

आम्हाला जपानला येवुन दीड महिना झाला. एक महिना खुप आनंदात गेला. त्यानंतर माझी मान सारखी अकडायची. खुपच त्रास होत होता. फोमच्या गादी, उशीने असेल म्हणुन मानेचे , हाताचे व्यायाम करुन बघितले. पण काहीच आराम नाही. उलट त्रास वाढतच होता. नंतर खांदा, व उजवा हात खुपच दुखायला लागला. असह्य वेदना-- सहनच होईना. येथे मेडिकल प्रॉब्लेम. काय कराव कळेना.. पेन-किलरचाहि उपयोग होईना. हातावर रॅश दिसायला लागली. शेवटी जापनीज डॉ. कडे गेलो. ते म्हणाले 'हरपिस ' आहे. ट्रीटमेंट चालु केली. आता थोडा आराम आहे. एव्हड भयानक दुखण प्रथमच अनुभवते. मानेपासुन तळ-हातापर्यंत जळाल्यासारख्या जखमा, बर्निंग-पेन. औषध चालु आहेच. आत ५ ता. ला भारतात परत जायचय वेदनेसह.. केव्हा आराम पडेल कळत नाही. मान, खांदा दुखतोच आहे. येथील डॉ. म्हणतात. पुढची ट्रीट्मेंट भारतात घ्या. काय काळजी घ्यावी लागेल/ कश्यामुळे होतो हा आजार, कुणाला कल्पना आहे का. कळल तर बर होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आज्जीला (वय ८१, डायबेटीस आहे ) डाव्या हाताला अचानक सुज आणि पुरळ यायला लागले....स्कीन स्पेशलिस्ट नी नागीणीचं निदान केलं ....गेले १ महिना औषधे घेउन आता ते पुरळ वगैरे सगळं गायब झालयं आणि त्वचा पूर्वीसारखी झाली आहे...

पण अजुनही तिला त्या हातावर सुज दिसते आहे..आणि आतुन खुप दुखतय जळजलत असं म्हनते आहे....रात्ररात्र दुखण्यामुळे झोप येत नाही असं म्हणते...आज तर " हाडाच्या डॉक कडे न्या , मला फ्रॅक्चर असेल" असं हट्ट धरुन बसली म्हणुन तिच्या समाधानासाठी आम्ही ते ही केलं...एक्स रे वगैरे काढुन फ्रॅक्चर नाही हे तिला पटवुन दिलय...

.या वेदना कशा कमी करता येतील....हे बर व्हायला वेळ लागतो असं कुठेतरी वाचले....आम्ही फर हेल्पलेस फील करतो आहे....
ईथले डॉक्टर प्लीज मदत करु शकतील का.....होमिओपॅथीची मदत घ्यावी का ?

तुमच्या स्किन स्पेशलिस्टना दाखवा.
पोस्ट हर्पेटिक न्यूराल्जिआ आहे. वर मी त्याची घरगुती ट्रीटमेंटही लिहिलेली आहे.

मलाही सुमारे १० वर्षापूर्वी नागिण झाली होती. Acyclovir हे एकच Alopathic औषध यावर आहे. गोळ्या, इन्जेक्षन्स आणि क्रीम मध्येही तुम्हाला हेच कन्टेण्ट सापडतील.

अतिशय वेदना ह्यात होतात आणि त्वचेच्या आत खाज येते जी वरुन खाजवुनही पुरी होत नाही.
एखादी नर्व्ह हा वायरस पकडतो आणि त्याच वाटेने पुढे पुढे व्रण येत रहातात. पूर्वी अशी समजूत होती की गळ्याभोवती नागिण झाली आणि तिने वेढा पुर्ण केला की रोगी दगावतो, किम्बहुना नागिण हे नावच त्यावरुन पडले/ठेवले आहे, मात्र त्यात काहीही तथ्य नाही. रोगी दगावलाच तर इन्फेक्शन आणि अपूरी रोग प्रतिकारक शक्ती ह्यामुळे. लक्शात घ्या की कोणतेही Untreated Infection हे प्राणघातक असतेच अगदी साधे सर्दी खोकल्याचे Viral इन्फेक्शन सुद्धा.

माझ्या बाबतीत त्याचे कारण नर्व्ह विकनेस च्या आजारात न्युरालोजिस्ट नी मला पुन्हा predenisolone (Steroid) ची दिलेली Treatment. आधिच्या skin specialist नेही पुर्ण कोर्स नुकताच केला होता आणि त्याने काही परिणाम न झाल्याने न्युरो ल रेफर केले होते, तो त्यांना दाखवलाही होता, तरिही त्यांनी तो पुन्हा करायला भाग पाडले. साधारण ३०मिग्रॅ चा डोस असताना हा आउट्ब्रेक झाला.

स्टेरॉईड ट्रीट्मेंट्नेही आपली Immune system suppress होते त्यामुळे हेही अजून एक कारण आहे जे वरच्या चर्चेत आले नाहीए. तसेच हल्ली डॉक्टर अनेक आजारांवर स्टेरॉईड प्रिस्क्राईब करताना दिसतात. जसे की अस्थमा, न्युरोलोजिकल पेन, आर्थ्रायटीस, इ. ह्या रोगात फक्त Acute म्हणजे अकस्मात येणार्‍या लक्षणांसाठीच ही मर्यादित कालावधीसाठी द्यावयाची असतात, तसेच पेशण्ट्ची पुर्ण हिस्ट्री, त्यातील धोके माहित करूनच ही देने अपेक्षित असते. काही वेळा पेशण्ट ही ट्रीटमेण्ट अर्धवट सोडतात. ती टेपर पद्धतीनेच थाम्बवायची असतात. त्यामुळे अनेक दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. असो. विषय थोडासा भरकटला.

स्टिरॉईड्सबद्दलची बरीच नवी माहिती समजली.
आता अनेक वाचक आपापल्या डॉक्टरांवर चाप ठेवायला या माहितीचा उपयोग करू शकतील.
धन्यवाद किरण.

मला हल्ली मे महिन्यातच नागीण झाली होती. सुरुवात प्रचंड पाठदुखी आणि हातदुखीने झाली मग पुरळ उठले आणि तापही खूप, अंगदुखी खूप. १५ दिवस antivirus गोळ्या घ्यायला लागल्या, सहा-सहा तासाने एक गोळी.

मी बरी व्हायच्या आतच मुलाला कांजिण्या झाल्या. संसर्ग झाला त्यालाही. पण आमच्या डॉक्टर मला म्हणाल्या की लहानपणी तुम्हाला कांजिण्या आल्या असतील तर आता नागीण नको होती व्हायला.

नागीण संसर्गजन्य असते का? तसच कुटुंबातील सदस्यांना झाली म्हणून आपल्याला पण होईल अशी शक्यता असते का?
माझ्या बहिणीला आणि वडिलांना झाली होती काही वर्षांपूर्वी. शिन्ग्ल्स आणि हर्पेस एकाच आहे का?
शिन्ग्ल्स साठी मिळणारी लस घेतल्यास किती उपयोग होतो भविष्यात?

पण आमच्या डॉक्टर मला म्हणाल्या की लहानपणी तुम्हाला कांजिण्या आल्या असतील तर आता नागीण नको होती व्हायला.
<<
हे असं जर डॉक्टर म्हणत असेल, तर कृपया डॉक्टर बदला.
तुम्हाला कांजिण्या झाल्या *नाहीत* तर नागीण होऊ शकत नाही.

शिन्ग्ल्स आणि हर्पेस एकाच आहे का?
<<
शिंगल्स = हर्पिस सिंप्लेक्स. = शीण उभरणे.
नागीण = हर्पीस झोस्टर.

दोन्ही हर्पीसच असलेत, तरी वेगळे आहेत.

तुम्हाला कांजिण्या झाल्या *नाहीत* तर नागीण होऊ शकत नाही. >>>> Kindly please elaborate for my knowledge. कारण मला असं वाटत होतं की हे दोन पूर्ण भिन्न एकमेकांशी काहीच संबंध नसलेले डिसीज आहेत.

Pages