नवीन मराठी म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

Submitted by Parichit on 20 December, 2018 - 01:07

घटनाच अशी घडली कि जीने एका नवीन मराठी म्हणीला जन्म दिला

म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी

अर्थ: एखाद्याचे कितीही मोठे नाव आणि कर्तृत्व असले तरी त्याच्याहून श्रेष्ठ असलेला कोणीतरी त्याचा कचरा करतोच.

कधी वापरायची: समजा तुमच्या एखादया ऑफिसमधल्या सहकाऱ्याला अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? पण प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून ते तो करणार. मग त्याला घेऊन त्याचे दु:ख हलके करण्यासाठी म्हणून बीअर प्यायला न्या आणि पिता पिता सांगा...

"नको रे वाईट वाटून घेऊ इतके. आम्हाला माहित आहे प्रमोशन मिळाल्याने तू साहेब झाला आहेस. पण हे बघ काही झाले तरी म्हणतात ना 'अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी'. त्यामुळे चालायचेच. नको मनाला लावून घेऊस. क्लायेंट तुला आपल्या घरचाच आहेस असे समजतो. म्हणून तर तुला पाणी भरायला बोलावले ना"

असे म्हटल्यावर त्याचे दु:ख नक्की हलके होणार म्हणजे होणार.

तर हे एक उदाहरण झाले. हि म्हण अशा अनेक प्रसंगी वापरता येईल. आता या म्हणी मागची घटना काय यावर जरा विचार करू.

घटना: काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुलोत्पन्न कन्या इशा अंबानी हिच्या शाही विवाह प्रसंगी झालेल्या मेजवानी प्रसंगी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वगैरे हे वाढप्याचे काम करत असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. बाकी सुपर डुपर हिरो हिरोईन मंडळींना अंबानींनी नाचून उपस्थितांचे मनोरंजन करायच्या कामाला लावले होते. ह्या प्रकाराची सोशल मिडीयावर खूपच चर्चा रंगली. याचे समर्थन करणारे म्हणाले "वाढप्याचे काम मुलीच्या घरचे आनंदाने करतात. अंबानी हे या दिग्गज कलाकारांना घरच्यासारखेच समजतात. म्हणून त्यांनी वाढप्याचे काम केले तर बिघडले कुठे?"

पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरांना प्रश्न पडतात कि हे सगळे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. जनतेमध्ये यांनी खूप आदर कमावला आहे. यांना इतके मिंधे बनायची काय गरज आहे. अशी कोणती मजबुरी असते यांची कि ह्यांना हि कामे करावी लागतात. जी जनता यांचा आदर करते त्यांचा सुद्धा हा अवमानच नाही का. बर "घरच्यासारखे समजतात" हे लॉजिक असेल तर अंबानी यांनी मोदी किंवा राहुल गांधी किंवा इतर मोठ्या नेत्याला घरचे समजून कामाला का नाही लावले. किंवा अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत.

भारतात एखादा/दी कलाकार कितीही जेष्ठ श्रेष्ठ असेल आणि लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले असले तरी उद्योगपती राजकारणी बिल्डर डॉन इत्यादी लोकांच्या मते त्यांना फार आदर नसतो हेच अनेकदा दिसून आले आहे. कारण अशा घटना आधी पण घडल्या आहेत.

१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.

तर मंडळी तुमचे काय मत आहे यावर?

765448-00-ambanis.jpg

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं, हे एखाद्या क्षेत्रात मोठी कामगिरी केलेल्या माणसाला, आयुष्याच्या सर्व क्षेत्रात मोठा / रोलमॉडेल मानणं हा प्रकार आपल्याकडे ज....रा जास्तच आहे. अंबानी च्या लग्नात जेवायला वाढलं म्हणून अमिताभ, आमिरखान, शाहरुख खान ह्यांच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही. त्यांचा अभिनय पहा, आवडला तर कौतुक करा, नाहीतर नावं ठेवा. उगाच एव्हढे मोठे अभिनेते असून अंबानीच्या लग्नात वाढपी झाले वगैरे भिंतीला तुंबड्या कशाला लावायच्या? अंबानी कुटुंब भारतातलं कदाचित सर्वात मोठं उद्योजक कुटुंब आहे. त्यांच्या यशाचं, श्रीमंतीचं कौतुक करण्याऐवजी, 'एव्हढा खर्च कशाला केला, अमिताभ ने वाढप्याचं काम का केलं' वगैरे फाटे कशाला फोडायचे? अंबानी काय आणी अमिताभ काय, त्यांना जे परवडतं, पटतं ते त्यांनी स्वतःच्या खाजगी कार्यात केलं, त्याच्याशी बाकीच्यांना काही घेणं-देणं असायचं कारण नाही.

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. बहुतांश जणांनी विरोधी मते नोंदवली आहेत. "मित्राच्या लग्नात चालते" "वाढप्याचे किंवा कोणतेही काम कमीपणाचे असते का?" "तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचे आयुष्य त्यांना जगू द्या" वगैरे भोवती सर्व प्रतिसाद फिरत आहेत. मूळ व्यापक मुद्द्याचा धाग्यात उल्लेख आहेच तरीही तो पोहोचलेला दिसत नाहीत. अर्थात दोष माझ्या मांडणीतच असेल म्हणून तेच दोन मुद्दे फक्त वेगळ्या शब्दात मांडतो. या धाग्या संदर्भात हा माझा शेवटचा प्रतिसाद.

१. आपण सर्वांनी फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. इथे बाजू उलट असत्या, म्हणजे लग्नकार्य बच्चन यांच्या घरचे आणि मुकेश अंबानी पाहुणे म्हणून आलेत. (बाकी ते राजस्थानी पद्धत वगैरे सगळे जसेच्या तसे आहे असे मानू). अशा सिच्युएशन मध्ये मुकेश अंबानी यांनी वाढप्याचे काम केले असते का?

२. फक्त अमिताभच नाही तर अमीर खान सुद्धा यात आहे. तसेच बॉलीवूडमधल्या इतर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली सेवा रुजू केली आहे (ते तिथे पाहुणे म्हणून नाही, तर आलेल्या पाहुण्यांची सेवा रुजू करायला गेले होते). मला कोणत्याही एखाद्या बलाढ्य उद्योगपतीचे, प्रमुख राजकीय नेत्याचे किंवा ख्यातनाम बिल्डरचे वगैरे उदाहरण द्या ज्यांनी एखाद्या कलाकाराच्या, खेळाडूच्या किंवा तंत्रज्ञाच्या घरच्या कार्यक्रमात ("आपलाच आहे" या भावनेने) सेवा रुजू केली आहे. आहे एकतरी उदाहरण? (हे लोक सेवा फक्त एखाद्या धार्मिक ठिकाणी रुजू करतात.पण तो पुन्हा वेगळा विषय आहे). हाच माझा मुद्दा आहे. वर्चस्व हे नेहमीच धार्मिक/राजकीय नेतृत्वाचे असते (आणि बिल्डर व उद्योगपतींची त्यांना मदत होत असल्याने त्यांचे). ज्या काळात दिलीपकुमार फिल्म इंडस्ट्रीवर अक्षरशः राज्य करत होते त्या काळात नरेंद्र मोदींना गल्लीतले काळे कुत्रे सुद्धा ओळखत नव्हते. आज त्याच दिलीपकुमारच्या पत्नीवर वयाच्या उत्तरार्धात "मला आणि माझ्या नवऱ्याला एका टुकार बिल्डर पासून वाचवा" म्हणून पदर पसरायची वेळ आली आहे! ह्याच दिलीपकुमारच्या ठिकाणी त्या काळातला एखादा राजकीय नेता किंवा उद्योगपती असता तर हिम्मत झाली असती का ह्या बिल्डरची? हीच कथा अनेक अभिनेत्यांची आहे.

त्यामुळे "सगळी कामे सारखीच" "आपल्या माणसाच्या कार्यात मदत करायला कमीजास्तपणा कसला" वगैरे सगळे म्हणायला गुळचट छान छान आहे. पण असे इतके थेट असते तर माधमातून इतकी चर्चा झाली असती का? मग? बात है तो बात है यार. बस्स इतकेच!

ता. क. आणि हो मला कसलीही गर्भश्रीमंत कुटुंब विषयी जळजळ असूया वगैरे झालेली नाही. गोड गैरसमज नसावा. कलाकार खेळाडू तंत्रद्न्य या लोकांनी कितीही आयुष्यभर खस्ता खाल्या आणि यश व समाजात मानसन्मान मिळवला तरी त्यांना राजकीय/धार्मिक/उद्योगपतींच्या चरणी जावे लागते हे कटुसत्य आहे, हा माझा मुद्दा आहे (निदान भारतात तरी. बाहेरचे माहित नाही). सचिन तेंडूलकर सत्य साई बाबाच्या चरणी गेला होता आणि लता दीदी भय्यू महाराजांच्या सेवेत गेल्या होत्या हा इतिहास आहे.

सर्व प्रतिक्रियांशी सहमत. लग्नात वाढणे काही काम करणे ही हलक्या दर्जाची, लश्कराच्या भाकर्‍या भाजायची, सन्मान नसणारी कामे समजायला मध्यमवर्गाने गेल्या वीस पंचवीस वर्षात सुरुवात केली. कोणाच्या घरी जाऊन हात लवायला नको अशी मानसिकता जोर धरु लागली. त्यातून स्वतःचा पैसा दाखवायला यातल्याच नवमध्यमवर्गीय नवश्रीमंतांनी कंत्राटे द्यायल सुरुवात केली कारण पाहुण्यांची संख्याही वाढू लागली. कुणाच्या लग्नात काम करायला न लागणे व कुणी नातेवाईक कामाला न लावणे हे श्रीमंत असण्याचे व प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. हीच ती मानसिकता आहे जी हा आजचा लेख आणि सांप्रत सोशल मिडियात इशा अंबानीच्या लग्नानिमित्त बघायला मिळाली.

अंबानी, अमिर खान, बच्चन ह्यांची पोरे एकाच शाळेत शिकतात, एकाच क्लबात जाऊन दारु पितात, ह्यां लोकांचे आपआपसात उठबस आहे. अंबानी ह्या सर्वांपेक्षा श्रीमंत आहे म्हणून इतर कमी श्रीमंत त्याचे नोकरच असतात असे समजणे ही टिपिकल चाळकरी सीने में जलनवाली विचारसरणी आहे.

अहो अंबानी अमिताभ कडच्या लग्नात वाढतील, भांडी घास्तील, सनई वाजवतील, किंवा नाही वाजवणार. तो सर्वस्वी त्या दोघांमधला प्रश्न नाही का? एका खाजगी समारंभात कुणी काय केलं याची उठाठेव या मंडळींशी काही संबंध नसलेल्या आपल्याला कशाला?

>>भिंतीला तुंबड्या कशाला लावायच्या?
Rofl

अमिताभ, आमिरवर जर खरच प्रेम असते तुमचे, त्यांच्या व्यवसायाविषयी आस्था असती तर असले धागे काढले नसते.
तुम्ही जे लिहताय त्यात अमिताभविषयी कळकळ कमी आणि अंबानींविषयी जळजळ जास्त दिसतीय Wink

मला कोणत्याही एखाद्या बलाढ्य उद्योगपतीचे, प्रमुख राजकीय नेत्याचे किंवा ख्यातनाम बिल्डरचे वगैरे उदाहरण द्या ज्यांनी एखाद्या कलाकाराच्या, खेळाडूच्या किंवा तंत्रज्ञाच्या घरच्या कार्यक्रमात ("आपलाच आहे" या भावनेने) सेवा रुजू केली आहे. आहे एकतरी उदाहरण>>>>>

असे किती लग्नसोहळे तुम्हाला तुमच्या घरात बसून बघायला मिळाले? याच दिवसात अजून पाच सहा हाय प्रोफाइल लग्ने झाली. त्यातल्या किती जेवणावळींचे फोटो तुम्ही बघितले, किती विडिओ तुम्ही बघितले? या लग्नाचे फोटो व विडिओ सोशल मीडियात शेअर करू देणे हा अंबानी कुटुंबाचा निर्णय होता म्हणून तुम्हाला तिथे अमिताभ वाढपी म्हणून वावरला हे दिसले. ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नात मुकेश अंबाणीने वाढले असेलही लोकांना, पण तुम्हाला तेव्हाचा एकतरी फोटो दिसला का? विडिओ तर दूरची बात. लग्न पूर्णपणे खाजगी बाब आहे हे बच्चन कुटुंबाने ठरवले व एकही फोटो बाहेर येऊ दिला नाही.

त्यामुळे जे तुम्हाला पाहायला मिळाले तेवढेच जगात घडले, जे तुम्ही पाहिले नाही, ते जगात घडलेच नाही या भ्रमात राहू नका.

आणि या लग्नात आनंद महिंद्रा सपत्नीक दारात उभा राहून पाहुण्यांचे स्वागत करत होता हे तुमच्या नजरेतून सुटले असावे. तो स्वतःच खूप मोठा बिझिनेसमन आहे, त्याला काय गरज सपत्नीक दारात उभे राहायची? की त्यालाही अंबाणीने जबरदस्ती कामाला लावले म्हणायचे?

बळी तो कान पिळी असा सुटसुटीत निश्कर्ष काढून ह्या धाग्याचं सूप वाजवू या का? >> नाही.... 'असतील शिते तर जमतील भुते' ही योग्य आहे.
शितं प्रेमाची की पैशाची... Uhoh पण जाऊद्या आप्ल्याला काय करायचं. Happy

आँ!!! परिचित तुमची २१.१३ ची पोस्ट वाचून हसू की रडू असे झाले मला
पण शेवटी ठरवले की हसूनच घ्यावे पोटभर Lol Rofl

१. आपण सर्वांनी फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. इथे बाजू उलट असत्या, म्हणजे लग्नकार्य बच्चन यांच्या घरचे आणि मुकेश अंबानी पाहुणे म्हणून आलेत. (बाकी ते राजस्थानी पद्धत वगैरे सगळे जसेच्या तसे आहे असे मानू). अशा सिच्युएशन मध्ये मुकेश अंबानी यांनी वाढप्याचे काम केले असते का? >> Lol आपलयाकडे व्यक्तिस्वातंत्र्य नावाचा एक प्रकार असतो. अमिताभ ने अंबानीच्या कार्यात जेवायला वाढले म्हणजे त्याची परतफेड म्हणून अंबानीने ही तसेच केले पाहिजे ही अपेक्षा हास्यास्पद आहे. Proud

२. फक्त अमिताभच नाही तर अमीर खान सुद्धा यात आहे. तसेच बॉलीवूडमधल्या इतर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली सेवा रुजू केली आहे (ते तिथे पाहुणे म्हणून नाही, तर आलेल्या पाहुण्यांची सेवा रुजू करायला गेले होते). मला कोणत्याही एखाद्या बलाढ्य उद्योगपतीचे, प्रमुख राजकीय नेत्याचे किंवा ख्यातनाम बिल्डरचे वगैरे उदाहरण द्या ज्यांनी एखाद्या कलाकाराच्या, खेळाडूच्या किंवा तंत्रज्ञाच्या घरच्या कार्यक्रमात ("आपलाच आहे" या भावनेने) सेवा रुजू केली आहे. आहे एकतरी उदाहरण? (हे लोक सेवा फक्त एखाद्या धार्मिक ठिकाणी रुजू करतात.पण तो पुन्हा वेगळा विषय आहे). हाच माझा मुद्दा आहे. वर्चस्व हे नेहमीच धार्मिक/राजकीय नेतृत्वाचे असते (आणि बिल्डर व उद्योगपतींची त्यांना मदत होत असल्याने त्यांचे). ज्या काळात दिलीपकुमार फिल्म इंडस्ट्रीवर अक्षरशः राज्य करत होते त्या काळात नरेंद्र मोदींना गल्लीतले काळे कुत्रे सुद्धा ओळखत नव्हते. आज त्याच दिलीपकुमारच्या पत्नीवर वयाच्या उत्तरार्धात "मला आणि माझ्या नवऱ्याला एका टुकार बिल्डर पासून वाचवा" म्हणून पदर पसरायची वेळ आली आहे! ह्याच दिलीपकुमारच्या ठिकाणी त्या काळातला एखादा राजकीय नेता किंवा उद्योगपती असता तर हिम्मत झाली असती का ह्या बिल्डरची? हीच कथा अनेक अभिनेत्यांची आहे. >> बरं मग? Proud

आणि अहो हा त्यांचा त्यांचा मामला आहे, तुम्ही का डोकं लावताय? काय होणारे त्याने? Uhoh

काय होणारे त्याने? Uhoh
>>> निरर्थक धाग्याद्वारे उगीच वादग्रस्त विधान / मुक्ताफळ उधळून प्रतिसाद वाढवत राहणे ---- ह्यसाठी होता हां अट्टाहास Proud

छान धागा !

हुमायूम नेचरचा एक गाढा अभ्यासक या नात्याने हे असे फोटो विडिओ वायरल होणे यात मला विशेष आश्चर्य वाटत नाही.

मिडलक्लास लोकांना एक समाधान मिळते जेव्हा अमिताभ शाहरूख आमीर वगैरे मंडळी अंबानीच्या पोरांच्या लग्नात नाचतात किंवा जेवण वाढतात.
ते खरे तर त्यांच्याशी फॅमिली रिलेशन राखून असतात. घरचे कार्य असल्याप्रमाणे सहभागी होत असतात. पण बघा कसे हे नोकरासारखे राबताहेत म्हणून काही लोकं स्वत:चे समाधान करून घेतात. आणि मग हे विडिओ फोटो वायरल करतात.
प्रत्यक्षात हे लोकं स्वताच्या आयुष्यात लूजर असल्याने त्यांची ती भावनिक गरज असते.

शाहरूख खान !
आजच्या तारखेला भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि जगातील दुसरया क्रमांकाचा श्रीमंत कलाकार.
याने मोठमोठ्या लोकांच्या लग्नात नाचून पैसे कमावून आपला आलिशान मन्नत बंगला बांधला आहे.
त्याच्यावरही टिका व्हायची.
पण आजच्या तारखेला रोज शेकडो लोकं मुंबई दर्शन करायला येतात आणि शाहरूखचा बंगला बघून नतमस्तक होतात.

मागे एका ईंटरव्यूमध्ये शाहरूखने आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत यावर मस्त कॉमेंट केली होती.
तो म्हणाला होता, "अरे यार शादी मे ही तो नाचते है. तुम्हारे यहा मैयत मे नाचते है क्या?
तुम अपने शादी मे बुलाओ मै नाचने आ जाऊंगा..
लेकिन मै पैसे लूंगा.
और वो मै बहोत तगडे लेता हू.
परवडत असेल तर बोला....

धिस ईज एस्सारके फॉर यू गाईज !

अवांतर - माझ्या माहितीनुसार लग्नात नवरयामुलीने आणि नवरयामुलाने मितवा गाण्यावर नृत्य आयटम सादर केले. पण शाहरूखचा मितवा की स्वप्निलचा हे मला कळले नाही. कोणाला काही आयडीया ?

प्रत्यक्षात हे लोकं स्वताच्या आयुष्यात लूजर असल्याने त्यांची ती भावनिक गरज असते. >> एकदम सही बोल्या ऋन्मेष भाऊ तुम...
हुमायूम नेचरचा एक गाढा अभ्यासक >> अँड यू हॅव माय अटमोस्ट रिस्पेक्ट फॉर दॅट सर.

शाहरूख, अमिताभ काय घेऊ बसलात.... बियोन्सेचा सुद्धा परफॉर्मन्स होता म्हणे.
बियोन्सेची आणि तिच्या नवर्‍याची श्रीमंती दोन शाहरूख (सॉरी ऋन्मेष पण हे सत्य आहे) आणि दोन बच्चन मिळून एवढी आहे.... तरी ऊबर मधला ईक्विटी स्टेक अजून धरलाच नाही.
आणि हिलरी क्लिंटन...
जाऊ दे आपल्याला काय ... आपण एक लूजरच.. नसतो तर मायबोलीवर पडिक असतो का? Proud

बियोन्सेची आणि तिच्या नवर्‍याची श्रीमंती दोन शाहरूख (सॉरी ऋन्मेष पण हे सत्य आहे)
>>>>>

नाही हो सॉरी कश्याला. उलट अंबानी परीवारातील लग्नामुळे माझ्यासारख्यांना बियोन्से हे नाव कळले. काहीतरी पंधरा कोटी घेतले तिने अशी बातमी वाचली होती.

हे शाहरूख, अमिताभ ते थेट बियोन्से जितके पैसे घेतात त्याच्या एक दशांश पैसे जरी मला कोणी दिले तर मी एक शतांश कपडे घालून त्यांच्या लग्नात नाचायला तयार होईन.
पण मला कोणी अशी ऑफर देणार नाही.
आणि म्हणूनच शाहरूख हा शाहरूख आहे आणि बच्चन हा बच्चन!

आजच्या तारखेला भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि जगातील दुसरया क्रमांकाचा श्रीमंत कलाकार.>> साफ चुक
Floyd Mayweather ($285 mil in pretax annual earnings), captures the top spot on Forbes’ 20th annual Celebrity 100 ranking of the world’s highest-paid celebrities (p. 106 in Forbes’ August 31, 2018 magazine issue). The boxer’s August 2017 fight versus Conor McGregor generated more than $550 million in revenue, with Money Mayweather earning $275 million, securing him the No. 1 spot for the second year since 2015. George Clooney ($239 mil) is in the No. 2 spot after British liquor giant Diageo purchased Casamigos, the tequila company Clooney cofounded, giving him the best annual take-home of his—or any actor’s—career. Kylie Jenner ($166.5 mil) returns to the list at No. 3, a significant jump from the 2017 newcomer’s spot at No. 59, followed by Judge Judy Sheindlin ($147 mil) at No. 4. Dwayne ‘The Rock’ Johnson, earning $124 million, rounds out the top five. The Rock (story p. 102) nearly doubled his 2017 $65 million payday, and his acting-related earnings are the largest ever recorded in the 20 years Forbes has tracked the Celebrity 100.
एवढच नाहितर फक्त भारतातल्या कलाकाराच्या यादित सॉरी शिरमन्त कलाकाराच्या यादित तो पहिल्या १० सुद्धा नाहिये.
१ सलमान खान
२ विराट कोहली
३ अक्षय कुमार
४ दिपिका पदुकोण
५धोनी
६ आमिर
७ बच्चन
८ रणविर सिन्ग
९ सचिन
१० अजय देवगण

Earnings आणि Net Worth दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
शिरिमंती नेट वर्थने ठरते अर्निंग्ज ने नाही.... आणि भारतासार्ख्या देशात सेलिब्रिटिजची खरी नेट वर्थ तुम्हाला हुडकून काढायची असेल तर.... गुड लक. जिथे आपल्या सरकारलाही ते शक्य नाही तिथे फोर्ब्स वगैरेंचे काय घेऊन बसलात.
शाहरूखची मागच्या वर्षाची 'सिने' अर्निंग दिपिका पेक्षा कमी असेल पण दिपिका त्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे म्हणणे म्हणजे... तौबा.. तौबा.

शाहरूख, बच्चन सारख्या लोकांची अ‍ॅन्युअल अर्निंग त्यांच्या जगभरातल्या ईन्वेस्टमेंटस मधून येते (ज्याचे लागेबांधे अंबानी, महिंद्रा आदी आणि अनेक ईंटर्नॅशनल (आठवा पनामा) प्रभ्रुतींपर्यंतही जातात)... सिनेमाचे/ अ‍ॅडचे मानधन वगैरे... वरखर्चाची तजवीज.

भारतासार्ख्या देशात सेलिब्रिटिजची खरी नेट वर्थ तुम्हाला हुडकून काढायची असेल तर.... गुड लक.>> नाही वो मला काय कप्पाळ पडलिये शोधायची
जिथे तिथे तुणतुण वाजत असत शाखाच म्हणून सहज गुगल केल तर वरची माहिती मिळाली

जॉर्ज क्लुनी पेक्षाही शाखा श्रिमन्त असेल का>> ते आता जॉर्ज भाऊची वाईन मधली आणि शाखा भाऊची आयपीएल मधली investment जशी मोजाल तसे बदलते बघा. पुन्हा जॉर्ज भाऊची सासुरवाडी लई बक्कळ मालदार आहे मग ते पण पकडले तर आपला शाखा अंमळ कमीच भरण असं वाटतयं बरं का.

जिथे तिथे तुणतुण वाजत असत शाखाच>> तुणतुणं नाही हो.. ते आपले ऋन्मेऽऽष भाऊ कधीमधी प्रेमानी जरा चार कौतुकाचे शब्द जास्त बोलतात तर तुम्ही आपलं जरा जास्तच चढवून सांगता.

Biggrin हायला म्हणजे तात्या आर्ग्युमेंट झालं. मी लय पैसे जमावल्यात (आणि लय वेळा बँकरपसी फाईल केल्येय) पण आम्ही नाही (सपीना येई तो) जा!!!

जरा चार कौतुकाचे शब्द जास्त बोलतात तर तुम्ही आपलं जरा जास्तच चढवून सांगता.>> मग कस करु म्हणता ? अस करा माबोच नाव बदलुन रुन्बोली करा !

अस करा माबोच नाव बदलुन रुन्बोली करा ! >> ही बेस.
एका पायावर तय्यार. लागलीच 100 सह्यांची मोहीम चालू करू.
माझ्या दोन सह्या.. कारण मी पाटील सुद्धा आहे.

माझ्या दोन सह्या.. कारण मी पाटील सुद्धा आहे. >> Rofl
तुम्ही पाटील आहात का पाटील 'सुद्धा' आहात? नक्की सांगा! Biggrin

तुम्ही पाटील आहात का पाटील 'सुद्धा' आहात? नक्की सांगा>> आता फोटू बघून तुम्हीच ठरवा की काय ते .. Wink
तुम्ही ठरवाल तसं आपल्याला काय पण चालतंय Proud

Earnings आणि Net Worth दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
>>>

अगदी बरोबर !

मी आणतो ना आकडे संपत्तीचे..
भारतात पहिल्या दहात नाही हे शक्य तरी होईल का?
आज तो भारतातील सर्वाधिक पसंत केला जाणारा आणि म्हणूनच सर्वाधिक विकला जाणारा चेहरा आहे. मोठमोठे प्रॉडक्टचे ब्रांड त्याच्या नावासोबत आपले नाव जोडून मिरवतात.
अगदी साधे ताजे ढळढळीत उदाहरण घ्यायचे झाल्यास ऑनलाईन शॉपिंगपासून जरा चार बोटे लांबच राहणारी लोकंही केवळ आणि केवळ शाहरूख सांगतो म्हणून आता बिग बास्केटच्या नादाला लागून फळं फुलं भाज्या मागवू लागले आहेत. हा विश्वास त्याने आजवर कमावला आहे आणि ती त्याची आजवरची सर्वात मोठी कमाई आहे. याऊपर माझ्यासारखे चाहते कमावणे हे भारतात किती कलाकारांना जमले आहे हे संशोधनाचा विषय होईल.
असो, त्याची पैश्यातली कमाई किती आहे, ईकॉनॉमिक टाईमसच्या भाषेत नेट वर्थ! शोधून देतो....

हा भास्कृन्मेष फार बोअर करतो आहे. मला आश्चर्य वाटतं की पूर्वी मी याची फॅन होते.

आणि ऋन्मेष आय डी संपला, त्याचा पासवर्ड विसरला सांगणारा एक धागा काढला होता ना? मला वाटलं ती भीष्मप्रतिज्ञा होती, पण तो तर फुसका बार निघाला. भास्करना ऋन्मेषचा मोह सुटत नाहीए. आणि त्यामुळे ऋन्मेषचा पूर्वीचा चार्म पण गेला

Richest actor in india

असे सर्च करा.
हा तक्ताच समोर येईल !

Shah Rukh Khan – Net worth: $600 million.
Amitabh Bachchan – Net worth: $400 million. ...
Salman Khan- Net worth: $200 million. ...
Aamir Khan – Net worth: $180 million. ...
Saif Ali Khan – Net worth: $140 million. ...
Kamal Haasan – Net worth: $100 million. ...

कमल हसन सुद्धा आहे. शाहरूख त्याच्या सहापट आणि सलमानच्या तिप्पट आहे Happy

आणि ही घ्या जगातली लिस्ट!

यात शाहरूख दुसरा आहे याचा मला एक भारतीय म्हणून अभिमान आहे .!

Jerry Seinfeld — $860 million. © eastnews.

Shah Rukh Khan — $550 million. © eastnews. ...

Tom Cruise — $480 million. © eastnews. ...
Tom Hanks — $470 million. © eastnews. ...
Johnny Depp — $440 million. ...
Mel Gibson — $400 million. ...
Tyler Perry — $400 million. ...
Jack Nicholson — $400 million. ...

"मला वाढप्याचासुद्धा मान मिळाला नाही" म्हणून तिळपापड झाला होता. हा धागा वाचून पापडाचा चुरा झाला हो, अगदी मसाला पापडाचीही शक्यता नाही.

वरती शा.खा.चा विषय चाललाय म्हणून,
--
शा.खा.चा झिरो नामक एक भयानक सिनेमा पाहून आताच चित्रपटगृहातून बाहेर आलोय. मेरठ मधे सुरु झालेली बऊवा ची प्रेमकहाणी आधी मुंबई मग अमेरिका व तिथून थेट मंगळ ग्रहावर संपते.
--

Pages