घटनाच अशी घडली कि जीने एका नवीन मराठी म्हणीला जन्म दिला
म्हण: अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी
अर्थ: एखाद्याचे कितीही मोठे नाव आणि कर्तृत्व असले तरी त्याच्याहून श्रेष्ठ असलेला कोणीतरी त्याचा कचरा करतोच.
कधी वापरायची: समजा तुमच्या एखादया ऑफिसमधल्या सहकाऱ्याला अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? पण प्रोजेक्ट हातचा जाऊ नये म्हणून ते तो करणार. मग त्याला घेऊन त्याचे दु:ख हलके करण्यासाठी म्हणून बीअर प्यायला न्या आणि पिता पिता सांगा...
"नको रे वाईट वाटून घेऊ इतके. आम्हाला माहित आहे प्रमोशन मिळाल्याने तू साहेब झाला आहेस. पण हे बघ काही झाले तरी म्हणतात ना 'अंबानीच्या लग्नात बच्चन वाढपी'. त्यामुळे चालायचेच. नको मनाला लावून घेऊस. क्लायेंट तुला आपल्या घरचाच आहेस असे समजतो. म्हणून तर तुला पाणी भरायला बोलावले ना"
असे म्हटल्यावर त्याचे दु:ख नक्की हलके होणार म्हणजे होणार.
तर हे एक उदाहरण झाले. हि म्हण अशा अनेक प्रसंगी वापरता येईल. आता या म्हणी मागची घटना काय यावर जरा विचार करू.
घटना: काही दिवसांपूर्वी झालेल्या अंबानी कुलोत्पन्न कन्या इशा अंबानी हिच्या शाही विवाह प्रसंगी झालेल्या मेजवानी प्रसंगी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अमीर खान वगैरे हे वाढप्याचे काम करत असल्याची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. बाकी सुपर डुपर हिरो हिरोईन मंडळींना अंबानींनी नाचून उपस्थितांचे मनोरंजन करायच्या कामाला लावले होते. ह्या प्रकाराची सोशल मिडीयावर खूपच चर्चा रंगली. याचे समर्थन करणारे म्हणाले "वाढप्याचे काम मुलीच्या घरचे आनंदाने करतात. अंबानी हे या दिग्गज कलाकारांना घरच्यासारखेच समजतात. म्हणून त्यांनी वाढप्याचे काम केले तर बिघडले कुठे?"
पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पामरांना प्रश्न पडतात कि हे सगळे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. जनतेमध्ये यांनी खूप आदर कमावला आहे. यांना इतके मिंधे बनायची काय गरज आहे. अशी कोणती मजबुरी असते यांची कि ह्यांना हि कामे करावी लागतात. जी जनता यांचा आदर करते त्यांचा सुद्धा हा अवमानच नाही का. बर "घरच्यासारखे समजतात" हे लॉजिक असेल तर अंबानी यांनी मोदी किंवा राहुल गांधी किंवा इतर मोठ्या नेत्याला घरचे समजून कामाला का नाही लावले. किंवा अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत.
भारतात एखादा/दी कलाकार कितीही जेष्ठ श्रेष्ठ असेल आणि लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले असले तरी उद्योगपती राजकारणी बिल्डर डॉन इत्यादी लोकांच्या मते त्यांना फार आदर नसतो हेच अनेकदा दिसून आले आहे. कारण अशा घटना आधी पण घडल्या आहेत.
१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.
तर मंडळी तुमचे काय मत आहे यावर?
अरे काय चाल्लंय.
अरे काय चाल्लंय.
सोडा त्यांना.
त्यांनी त्यांच्या आयुष्याता एखाद्या क्षेत्रात ऊंची गाठली म्हणून त्यांच्या या सगळ्या गोष्टींची बातमी होऊन तुमच्यापर्यंत पोहोचते.
अभिषेक बच्चान यांनी केलेले ट्विट वाचले का? त्यांचे तसे जवळचे संबंध असतील म्हणुन केले असेल.
It is a tradition called "sajjan ghot". The brides family feeds the grooms family.
https://twitter.com/juniorbachchan/status/1074187587454205953
१. बॉलीवूडच्या कलाकारांना दुबईला नेऊन तिथल्या शहांनी किंवा डॉननी आपल्या कार्यक्रमात नाचवणे हे प्रकार फार पूर्वीपासून घडले आहेत.
>>
बॉर्र, मॉग? नक्की तक्रार काय आहे? यात काही चूक आहे का? रितसर पैसे घेऊन कला सादर करणे व जवळ्यच्या नात्यातल्या लग्नात नाचणे यात काही फरक आहे की नाही?
२. भारतात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात बॉलीवूडच्या कलाकारांना नाचवणे हे तर कॉमन आहे.
>>
मग त्यात चूकीचे काय आहे? त्यांचे अगंभुत टॅलेंट ज्यात आहे ती कला सादर करुन व्यावसाय करणे यात चूक काय आहे? ती कला एखाद्याला चांगीली येत असते म्हणुन बोलावतात ना?
३. काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात उद्योगपतीच्या घरच्या लग्नात व्हिडीओ शुटींग करण्याचे काम बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिले होते.
>>
बापरे. म्हणजे आता एखाद्याच्या लग्नात जाताना, आपण जो व्यवसाय करतो त्यातले कौशल्य अजिबात न वापरता मैत्री खात्यात काहीही करायचे नाही असा कायदा करावा की काय?
४. अजून एका बलाढ्य व्यावसायिकाच्या लग्नात बॉलीवूडच्या प्रख्यात कोरिओग्राफरला लग्नातले नाच बसवायला सांगितले होते.
>>
भाय तेरा प्रॉब्लेम क्या है भाय? ये ले थोडा बर्नॉल ले. लगा ले. आग थंडी हो जायेगी.
काहीतरीच. जगु द्या त्यांना. त्याचे खाजगी आयुष्य आहे.
अमिताभच्या त्यांच्याशी
अमिताभच्या त्यांच्याशी संबंधाची बॅकग्राउण्ड बहुधा अनेकांना माहीत नाही. इथे पाहा
https://www.youtube.com/watch?v=Z-TK0_u4J-4&t=164s
अमिताभने जे केले ते कोणीही करेल.
कै च्या कै धागा.
कै च्या कै धागा.
--
अभि_नव यांच्याशी सहमत !
Submitted by अभि_नव on 20
Submitted by अभि_नव on 20 December, 2018 - 12:02
अभि_नव, तुम्ही फार व्यक्तिगत घेतलेले दिसतेय. माझी पोष्ट इतकी तुम्हाला का बोचली हे अनाकलनीय आहे.
> भाय तेरा प्रॉब्लेम क्या है भाय? ये ले थोडा बर्नॉल ले. लगा ले. आग थंडी हो जायेगी.
मी फक्त सन्मानीय कलाकारांना मिळणारी वागणूक यावर लिहिले आहे. पण आपण हा सरळ सरळ माझ्यावर व्यक्तिगत हल्ला केलेला आहे. आग कुणाला लागली हे उघडच दिसत आहे. पण का लागली त्यांनाच माहित. अशा आगी ते लावून घेतात म्हणून ते स्वत:जवळ बर्नॉल बाळगून असतात अशी माहिती त्यांनीच दिली आहे असो. बाकी तुमचा प्रतिसाद आग आग झाल्याने चिडचिड करून लिहिलेला यापलीकडे अर्थ नाही. कारण तुम्हाला माझा मुद्दाच कळलेला नाही. पण मायबोली प्रशासन तुमच्या व्यक्तिगत हल्ल्याकडे दुर्लक्ष न करता गंभीर दखल घेईल अशी अपेक्षा.
> अमिताभच्या त्यांच्याशी संबंधाची बॅकग्राउण्ड बहुधा अनेकांना माहीत नाही.
अंबानींचे आणि बच्चन यांचे संबंध चांगले होते, कलाकार त्यांची कला सादर करतात कारण ते त्यांचे स्कील आहे तर लग्नात सादर केली तर बिघडले कुठे वगैरे मुद्दे नेहमी येतात. पण...
संबंध चांगले असतील तर बच्चन कुटुंबीयांच्या लग्नात अंबानी यांनी बस्ता खरेदी करण्याची वगैरे जबाबदारी घेतली होती का?
कारण अंबानी यांच्याकडे व्यवसायिक स्कील आहे आणि जवळीक असल्याने बच्चन यांच्या साठी त्यांनी काम करणे चुकीचे झाले नसते.
काही कलाकारांना विषयी माझ्यासारख्या सामान्य माणसाला अत्यंत आदर आहे. त्याचा राजकारणी आणि मुजोर लोकांनी केलेला अवमान याविरुद्ध लिहायचा मला अधिकार आहे. घटनेने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मला दिले आहे. मग त्यामुळे कोण कुठल्या फालतू दीडदमडीच्या उपटसुंभाची जळाली तरी मला फिकीर नाही.
घटनेने अभिव्यक्तीचे
घटनेने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मला दिले आहे. मग त्यामुळे कोण कुठल्या फालतू दीडदमडीच्या उपटसुंभाची जळाली तरी मला फिकीर नाही.
नवीन Submitted by Parichit on 20 December, 2018 - 12:25
<<
तुम्हाला जसे घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, घटनेने अमिताभ यांना ही दिले आहे. तुम्ही का असले लेख लिहून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करताय.
---
बाकी,
लग्नात जेवण वाढप्याचे ऑफिशल कंत्राट, अंबानी यांनी अमिताभ बच्चन यांना दिल्याची पक्की बातमी तुमच्याकडे आहे असे दिसते.
तुम्ही दिलेल्या चारही
तुम्ही दिलेल्या चारही उदाहरणांत त्या कलाकारांनी पैशासाठी ती कामे केली नव्हती का?
अमिताभच्या हाती कोणी जबरदस्तीने पातेलं आणि डाव (किंवा जे काही असेल) ते दिले का? की अमिताभला सांगितले तू हे हे वाढ आणि बिचार्याची नाही म्हणायची हिंमत झाली नाही?
यश जोहर (करण जोहरचे वडील) यांच्या अंत्यविधीची सगळी तयारी अनिल अंबानींनी केली होती.
> घटनेने अमिताभ यांना ही दिले
> घटनेने अमिताभ यांना ही दिले आहे. तुम्ही का असले लेख लिहून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करताय.
माझ्या लेखामुळे अमिताभ यांची नव्हे तर "ठराविक" लोकांची गळचेपी होत आहे ते इथे आलेल्या प्रतिसादांवरून दिसत आहे अहो आश्चर्यम. अंबानी विरोधात बोललो तर "यांना" का लागत असावे बरे?
अभि_नव, तुम्ही फार व्यक्तिगत
अभि_नव, तुम्ही फार व्यक्तिगत घेतलेले दिसतेय
>>
तुमच्या लेखाच्या निमित्ताने, या घटनेवर सर्व सोशल मिडीयात तुमच्यासारखी मतं असणा-या सगळ्यांना उद्देशुन एकत्रीत लिहिले आहे.
> तुम्ही दिलेल्या चारही
> तुम्ही दिलेल्या चारही उदाहरणांत त्या कलाकारांनी पैशासाठी ती कामे केली नव्हती का?
तेच तर मला सुचवायचे आहे. किंबहुना लोकांच्या मनात आदराचे स्थान असलेल्या कलाकारांकडून तरी हि अपेक्षा नाही. पैशासाठी कुठेही नाचायचे?
> अमिताभच्या हाती कोणी जबरदस्तीने पातेलं आणि डाव (किंवा जे काही असेल) ते दिले का? की अमिताभला सांगितले तू हे हे वाढ आणि बिचार्याची नाही म्हणायची हिंमत झाली नाही?
अर्थातच. अन्य कोणाच्या लग्नात त्यांच्या हाती जबरदस्ती पातेलं दिलं असतं तर नाही म्हणाले असतेच ना?
> सर्व सोशल मिडीयात
> सर्व सोशल मिडीयात तुमच्यासारखी मतं असणा-या सगळ्यांना उद्देशुन एकत्रीत लिहिले आहे.
बरं. मग तसे असेल तर तुमचे वाक्य तुम्हालाच लागू पडतेय म्हणायचे. आता कोणते ते विचारू नका. असो.
"अंबानी स्वत: बच्चन
"अंबानी स्वत: बच्चन परिवारातल्या लग्नात वाढप्याचे काम करतील का. असे प्रश्न आहेत."
हो!! अभिषेकच्या लग्नात अनिलचा व्हिडिओ असेल, लोकांच्या कारचे दरवाजे उघडताना.
आम्ही खुप टिका केली होती तेव्हा की रीलायन्स मधले डायरेक्टर्स येतायत आणि हा दार उघडायला.
कै च्या कै धागा.
कै च्या कै धागा.
--
अभि_नव यांच्याशी सहमत +१
<पैशासाठी कुठेही नाचायचे?>
<पैशासाठी कुठेही नाचायचे?> तुम्हांला त्यांनी कुठे नाचणे अपेक्षित आहे? असतील त्यांचे घरोब्याचे संबंध.
<अर्थातच> तुम्हांला अगदी आतल्या गोटातली माहिती आहे असे दिसते. तुम्ही हजर होतात का त्या समारंभात.
मी आणखी एक वाक्य लिहिलेलं. त्याला पास का दिला?
> तुम्हांला अगदी आतल्या
> तुम्हांला अगदी आतल्या गोटातली माहिती आहे असे दिसते. तुम्ही हजर होतात का त्या समारंभात.
प्रत्येक ठिकाणी हजरच असावे लागते असा आपल समज आहे का? माध्यमांवर जराही विश्वास नसणारे काही फार ठराविक लोक आहेत. उदाहरणार्थ: "कोण अमिताभ? कोण अंबानी? मी स्वत: नाही पाहिले त्यांना. माझा विश्वास नाही ह्या व्यक्ती अस्तित्वात आहेत यावर" अशी त्यांची भूमिका असते. आपण त्यापैकीच एक का?
> मी आणखी एक वाक्य लिहिलेलं. त्याला पास का दिला?
कोणते वाक्य? > यश जोहर (करण जोहरचे वडील) यांच्या अंत्यविधीची सगळी तयारी अनिल अंबानींनी केली होती.
हे वाक्य म्हणत असाल तर एखाद्याच्या मृत्यू प्रसंगी त्याला मदत करण्याची तुलना लग्नात वाढपी म्हणून काम करण्याशी होत आहे हे आपल्या ध्यानात आले नाही का? काय बोलणार यावर मी. पास देणेच योग्य ना.
मित्राच्या/जवळच्या
मित्राच्या/जवळच्या व्यक्तीच्या मुलीच्या विवाहसमारंभात जेवणावळीत पदार्थ वाढल्याने तो मनुष्य पगारी/कंत्राटी वाढपी होतो हे माहीत नव्हते.
चालू द्या तुमचं.
इथे कोणी अजून नेहमीच्या
इथे कोणी अजून नेहमीच्या व्यक्तीबद्दल साशंक झालं नाही?
संपूर्ण राजस्थानात ही प्रथा
संपूर्ण राजस्थानात ही प्रथा खरंच आहे, म्हणजे स्वतःच्या कुटुंबात / मित्रमंडळीत / जातीसमाजातील लग्नात श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी वाढप्याचे काम करणे (विशेषतः मुलीकडच्या). पिरामल कुटुंबाचे मूलस्थान राजस्थानात आहे, त्यामुळे ही प्रथा पाळली असावी.
अभिषेकने उच्चार चुकवला आहे पण प्रसंगानुरूप ह्याला 'आनंदगोठ', 'सजनगोठ', 'कुंवारी गोठ' किंवा नुसतेच 'गोठ' अशी नावे आहेत. त्यातही पंगतीला पाणी वाढणे आणि उष्ट्या पत्रावळी उचलणे ह्या कामांना विशेष प्रतिष्ठा आहे, त्यासाठी अहमहमिका असते. माझ्या परिचयातील अनेक राजस्थानी लग्नांत हे नेहमी घडतांना पाहिले आहे, मला तरी ते कमीपणाचे वाटले नाही.
आता मुकेशभाई - नीताबेन अमिताभच्या नातीच्या लग्नांत हे काम करतील का तर माहित नाही
इथे कोणी अजून नेहमीच्या
इथे कोणी अजून नेहमीच्या व्यक्तीबद्दल साशंक झालं नाही?
>>
ते बिचारे एवढे नवे नवे आयडी काढत असतात. त्यांची मेहनत वाया कशाला घालवा.
आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्
आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून - हा ह्या धाग्याचा मतितार्थ आहे.
निरर्थक धागा.
निरर्थक धागा.
कुणाच्या समारंभात स्वेच्छेने, हौसेने काम करणे आणि पैशांसाठी काम करणे यातील फरक कळु नये!
ह्या इथल्या आयडींचे काय घेउन
ह्या इथल्या आयडींचे काय घेउन बसलात? मिडियानेपण अशाच अर्थाच्या बातम्या दिल्या होत्या... लोक काय मिडिया दाखवते तेच डोळे झाकून गिरवतात आणि काहीच्या काही बरळत बसतात
ब्रेकींग न्युज सिंड्रोम!
पंगतीत अन्न वाढण्याचे काम
पंगतीत अन्न वाढण्याचे काम खालच्या दर्जाचे कधी पासून झाले?
मित्राच्या मुलिच्या लग्नात स्वेच्छेने/ आनन्दाने लोकांना आग्रह करकरून खाऊ घालणे म्हणजे पाय जमिनिवर असण्याचे लक्षण आहे. त्याची बातमी? अणि त्यावर इतके टिकेचे झोड?
मायबोलीवर लोकांच्या उठाठेवी
मायबोलीवर लोकांच्या उठाठेवी करण्याचे काम कधीपासुन सुरु झाले ?
अमिताभने वाढप्याचे काम केले ते दिसले, पण दुष्काळग्रस्त शेतकर्यांपासुन बर्याच जणांना आर्थिक मदत केली त्या विषयी धागा नाही निघाला कधी.
दक्षिणा, रश्मी.. यांना
दक्षिणा, रश्मी.. यांना अनुमोदन.
अमुक काम हलके, तमुक श्रेष्ठ अशी भावना ठेवू नये.
नाहीतर तुम्ही करत असलेले काम अत्यंत हीन नि अत्यंत हलक्या पद्धतीचे आहे असे सांगणारे लोक तुम्हाला भेटतील (च), मग कसे वाटेल?
उदा. <<<आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना? >>>
पण त्या बढती मिळालेल्या माणसाने म्हंटले मी मोठा, मा़झ्या हाताखाली तू. तू कर हे काम तर कसे वाटेल?
अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ
अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ म्हणून बढती मिळाली. आणि काही दिवसांनी एखाद्या मोठ्या क्लायेंटने त्याला आपल्या घरी पाणी भरायचे काम सांगितले. अगदी विहिरीतून पाणी शेंदायचे आणि घागरी खांद्यावरून आणून त्याच्या घरी पाणी भरायचे. तर या मित्राला प्रचंड वाईट वाटेल ना?>>>>>>
हे मित्राला ठरवू द्या. त्याला वाटेल किंवा वाटणार नाही. त्याच्या बाजूने त्याला न विचारता परस्पर ठरवण्याचा अधिकार तिसऱ्याच पार्टीने स्वतःकडे का घ्यावा?
अमिताभ, शाहरुख, आमिर ने नंतर आम्हाला वापरून घेतले हो असा गळा काढला तर समजू शकतो, पण ते तर आनंदाने वाढताना दिसतात.
आता सगळीकडे बुफे झाले म्हणून, नाहीतर आधी जेव्हा जेवणावळी उठायच्या तेव्हा सगळे वाढून झाले की गोडाचे ताट घेऊन घरचे रांगेतून फेरी मारायचे, खास पाहुण्यांना वाढले जायचे. नवरानवरीलासुद्धा असे फिरताना पाहिलेय व थट्टा मस्करी करत वाढूनही घेतलंय.
व्हिडिओत अमिताभ वगैरे गोड वाढतानाच दिसताहेत. हाडाचे वाढपी झाल्यासारखे मठ्ठा, मठ्ठा, मठ्ठा करत धावताना दिसत नाहीयेत.
व्हिडिओत अमिताभ वगैरे गोड
व्हिडिओत अमिताभ वगैरे गोड वाढतानाच दिसताहेत. हाडाचे वाढपी झाल्यासारखे मठ्ठा, मठ्ठा, मठ्ठा करत धावताना दिसत नाहीयेत.>>>>
लग्न कोणाचं, वाढलं कोणी, जेवलं कोण आणि त्रास कोणाला होतोय.
दक्षिणाला अनुमोदन.
>>व्हिडिओत अमिताभ वगैरे गोड
>>व्हिडिओत अमिताभ वगैरे गोड वाढतानाच दिसताहेत. हाडाचे वाढपी झाल्यासारखे मठ्ठा, मठ्ठा, मठ्ठा करत धावताना दिसत नाहीयेत.
साधना
साधना
बेगाने शादी मे मीडिया दिवानी.
बेगाने शादी मे मीडिया दिवानी.
पंगतीत वाढलं की लोकांच्या
पंगतीत वाढलं की लोकांच्या पोटात दुखू लागतं , मात्र नंतर हीच लोकं बुफे आल्याने आपली संस्कृती बुडती आहे असे सुद्धा धागे काढायला मोकळी
साधना, प्राची
Pages