सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर

Submitted by सान्वी on 29 August, 2018 - 05:38

धागा काढायला बराच उशीर झाला आहे. खरंतर मागच्या पर्वाचा भरगोस प्रतिसाद पाहता या पर्वावर लवकरच धागा येईल असे वाटले होते परंतु नाही आला अजून. आणि मला मायबोलीवर स्वतःचा पहिला धागा काढण्याची संधी मिळाली. असो.
तर कार्यक्रमाबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या वेळी सूत्रसंचालिका बदलून माझी आवडती स्पृहा जोशीला घेतलं आहे, त्यामुळे तीचे ओघवते सूत्रसंचालन आणि नेहमीचे कॅप्टन अशी मस्त भट्टी जमली आहे. सगळ्यात कहर म्हणजे ती छोटी मुले, zee वरील सारेगमप लिटिल चांप्स ची जादू परत अनुभवायला मिळते आहे. रटाळ मालिका च्या भाऊगर्दी मध्ये निरागस मुलांचे सूर सुखद वाटताहेत. तुम्हाला काय वाटतं?

Group content visibility: 
Use group defaults

ऑन अ साइड नोट - शाल्मलीने असा काय आय मेकप केला होता! भयंकर दिसत होती! हॅलोविन स्पेशल एपिसोड वाटत होता
<<
अगदी हेच म्हंटले मी , व्हँपायर सारखे कपडे मेकप असतो तिचा बरेचदा !
बाकी हा सिझन फक्त आणि फक्त मॉनिटरमुळे लक्षात राहिल Happy
स्पर्धकांपैकी मला स्वराली जिंकली तर आवडेल !
जितका दमदार सिझन सुरु झाला तितका स्पर्धकांचा ग्राफ म्हणावा तसा वर गेला नाही, कदाचित क्रिएटिव टिम/ साँग सिलेक्शन इ. चा दोष असु शकेल.
आदि, साहिल, अभिषेक, नेहा हे लोक अपेक्षेपेक्षा लवकर गेले आणि सक्षम, विश्वजा, सृष्टी यांना अपेक्षेपेक्षा पुढे नेलं !
डार्क हॉर्स ठरली मीरा ! ती एवढी चांगली गाते माहित नव्हत सुरवातीला, सर्वात जास्त ग्राफ तिचा उंचावत गेला.
उत्कर्ष सुरेख गातो पण आवाज फुटायच्या स्टेजमधे टफ गेली स्पर्धा त्याला.
काल जजेसनी ज्या क्रमात नावं घेतली फिनालेची , अगदी त्याच क्रमात निकाल लागलेला आवडेल !
१.स्वराली २.चैतन्य ३.मीरा ४.उत्कर्ष ५.अन्शिका आणि ६.सई.

Scripted असते हो .. रडणे वगैरे नाही drama असतो लोकांना गुंतवायला, बॅक ग्राउंड मुसीक टाकून. हर्षद चांगला ऍक्टर आहे. जमवतो मस्त.

अन्जू, त्या वरच्या लिंककरता धन्यवाद. त्या इतक्या लहान मुलाला चॅनलने स्वतःच्या मनोरंजनाकरता तिथेच का ठेवून घ्यावं? अधूनमधून बोलावून घ्यावं ना? अर्थात त्याच्या आईवडिलंनीही तो विचार करायला हवा कारण चॅनल त्यांना त्याबदल्यात काहीतरी देतच असेल.

खरं म्हणजे शुटींगव्यतिरिक्त घरी पाठवायला हवं ना, शुटींग आणि त्याआधी रिहर्सल ह्या व्यतिरिक्त जे दिवस मिळतील तेव्हा घरी जायला हवं.

मलाही युट्युबवर बघुन अगदी कसकसच झाल, हर्षद फार गोड ,निरागस आणी चुणचुणित मुलगा आहे, त्याला योग्य प्लॅटफॉर्म मिळाला तर फार पुढे जाइल त्याने या सिझनला बहार आणली खरी पण चॅनेल ने त्याच्याकडुनच जरा जास्त्च करुन घेतल, कुठेतरी त्याच्या निरागसतेला कॅश करण्याचा प्रय्त्न करत राहिले , प्र्त्येक एपीसोडला येणार्‍या गेस्ट नुसार त्याला गेटप देणे, वाक्य पढवुन घेणे जरा जास्त वाटले, गाण आणी पाठातर वादातित सुन्दर आहे त्याच.

अरे तो औरंगाबादचा आहे. सारखं येणं जाणं कसं झेपेल त्याला?? त्रास नाही का होणार?? आणि आठवड्यातला एक दिवस शुटींग आणि बाकी तीन चार दिवस रिहर्सल यात तो घरी जाऊन परत कधी येणार??

त्या भागानंतर स्पृहाने जेव्हा त्याच्या बाबांना तो खूप लहान आहे आणि त्याला आईची एवढी आठवण येत असेल परत नेणार असाल तर न्या वगैरे म्हटलं तर त्याचे बाबाचं परत जायला तयार नव्हते असं मला वाटलं. थोड्यावेळाने तो हे सगळं विसरुन जाईल, परत हसायला वगैरे लागेल अशा अर्थाचं बोलले होते.

त्याचे वडिल म्हणाले की आईला तो मिस करतो तसाच औरंगाबादला गेल्यावर ईथल्या मित्रांना मिस करेल. त्याला ईथे खेळायला, मस्ती करायला आवडतं. कलर्सने त्याचा खूप जास्त उपयोग करून घेतला याबाबतीत सहमत. तसेही कमी भाग राहिले आहेत, तर ते पूर्ण करूनच जाऊया असेही वाटले असेल किंवा काही करारही झाला असेल वाहिनीबरोबर.

त्याच्या आईने सांगितले की त्याला तान्हा भाउ झालाय नुकताच. ती फारच अशक्त दिसत होती. पाहुन काळजीच वाटली. तो मुंबईत जास्त मजेत असावा.

6 फायनलिस्ट मिळाले पण आता म्हणे खास लोकाग्रहास्तव अजून काही आठवडे हा कार्यक्रम चालू राहणार आहे!

२५डिसेंबरच्या भागात अंशिका चोणकरच्या गाण्याला परीक्षक अवधूत गुप्ते यांनी"नियम गेले खड्डयात " अस म्हणून गुण दिले जे दाखवले गेले.खरतर नियमानुसार गुण दाखवणे चुकीच आहे,अंशिका कितीही छान गायली असेल,तिच गाण परीक्षकांना आवडलही असेल पण तरीही अस लहान मुलांसमोर बोलण आणि नियम मोडण हे चुकीच आहे.परीक्षकाने त्याच्या मर्यादेत रहाव.

खरंच.... अप्रतिम गायलाय महेश. धुंदी उतरत नाहीये त्या गाण्याची. त्यांच्या गाण्यानंतर कार्यक्रम संपवला हे उत्तम केलं. नाहीतर दुसरं काहीच ऐकणं शक्य नसतं झालं. Happy

ज्यांनी कोणी कालचा भाग पाहिला नसेल त्यांनी महेशच्या गाण्यासाठी अवश्य पहा. अगदी शेवटी झालं गाणं.

मलापण वाटलं होतं की काल नवीन वर्षाच्या निमित्याने फिनाले असेल, पण मैत्रिणीकडून समजलं की फिनाले नव्हता.

ज्यांनी कोणी कालचा भाग पाहिला नसेल त्यांनी महेशच्या गाण्यासाठी अवश्य पहा. अगदी शेवटी झालं गाणं. >>> बघायला हवं voot वर.

पुढच्या सोमवारपासून साडेनऊला 'क्राईम स्टोरीज' दाखवणार होते ते कॅन्सल केल वाटत.

अजून एक - स्पृहाचे सूत्रसंचालनही दिवसेंदिवस खुलत चालले आहे. मस्तच.

ती इथे येण्यापूर्वी तिचे 'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटक पाहिले होते. त्यातल्या त्या व्यक्तिरेखेचे तिने सशक्तपणे साकारलेले भावनांचे हेलकावे बघून प्रत्येक प्रयोगानंतर हीची किती दमछाक होत असेल, असे एक प्रेक्षक म्हणून वाटून गेले होते. त्या नाटकातून तिने रजा घेतल्यानंतर तिला या मंचावर बघून सुखद आश्चर्य वाटले होते. तिचा प्रेझेन्स सुखद होता पण सुरुवातीच्या भागातले संचालन फारच कृत्रिम वाटायचे. आता स्पृहाचा तिचा असा एक सराईतपणा, सहजता, उत्फुल्लता दिसून येते.

महेश काळेचं कानडाचं सोलो वर्जन चांगलं होतं, पण हे गाणं मूळात ड्युएट असल्याने "ती" मजा आली नाहि. महेश काळे आणि राहुल देशपांडेचं वर्जन अगदि अप्रतिम आहे...

कालचं "येउ कशी प्रिया" आउटस्टँडिंग झालं. नांव आठवत नाहि त्या मुलीचं, अगदि जीव ओतुन गायली ती हे गाणं...

महेश आज अवधूतचा अवमान होईल असे का बोलला, गाणी लक्षात ठेवू नको वगैरे, त्यांची थोडीफार मतांतरे दिसतात पण मुद्दाम अवधूत जेे बोलला त्याच्या विरूद्ध बोलणे म्हणजे अतिच.
सुनीताबाईंची भूमिका करणा-या ईरावतीचं मराठी ईतकं वाईट आहे की ती आहे मनोहर तरीचं ईंग्रजी भाषांतर वाचते आणि अस्खलित मराठी बोलणारा महेश ते पुस्तक तिच्याकडे मागतो हे ऐकून कान धन्य झाले Uhoh

Pages