Submitted by सान्वी on 29 August, 2018 - 05:38
धागा काढायला बराच उशीर झाला आहे. खरंतर मागच्या पर्वाचा भरगोस प्रतिसाद पाहता या पर्वावर लवकरच धागा येईल असे वाटले होते परंतु नाही आला अजून. आणि मला मायबोलीवर स्वतःचा पहिला धागा काढण्याची संधी मिळाली. असो.
तर कार्यक्रमाबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. या वेळी सूत्रसंचालिका बदलून माझी आवडती स्पृहा जोशीला घेतलं आहे, त्यामुळे तीचे ओघवते सूत्रसंचालन आणि नेहमीचे कॅप्टन अशी मस्त भट्टी जमली आहे. सगळ्यात कहर म्हणजे ती छोटी मुले, zee वरील सारेगमप लिटिल चांप्स ची जादू परत अनुभवायला मिळते आहे. रटाळ मालिका च्या भाऊगर्दी मध्ये निरागस मुलांचे सूर सुखद वाटताहेत. तुम्हाला काय वाटतं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>ती एक उंच मुलगी जी मागच्या
>>ती एक उंच मुलगी जी मागच्या वेळेला डेंजर झोन मधे होती ( जिला फस्ट क्लास मिळालेला) ती मला फार समजुतदार वाटते.>> तन्मयी. शोधू मी कुठे कशी म्हटलं तिने गेल्या आठवड्यात.
कालंच वणवा....गाण फार मस्तच
कालंच वणवा....गाण फार मस्तच गायल गेले पण मुलांच्या गीत निवडी विषयी सजग रहायला हवं असं नेहमीच वाटतं.
पूनम तुमचं आणि वैभव सरांचे अभिनंदन.छान होतय लेखन.
ऊपग्रह वाहिनीचा वेगळा विभाग
ऊपग्रह वाहिनीचा वेगळा विभाग असतांना ललित लेखनात हे धागे का ऊघडतात लोक?
ह्या आठवड्यात गाण्यांची निवड
ह्या आठवड्यात गाण्यांची निवड कै च्या कै आहे ! लहान मुलांचा कार्यक्रम आणि त्यात गाणी कुठली तर "देही वणवा पिसाटला" आणि "मालवून टाक दीप " !!
एकंदरीत हे पर्व फार आवडत नाहीये. तेजश्री प्रधान च्या स्पृहा जोशी हा बदल खूप चांगला आहे मात्र!
ह्या आठवड्यात गाण्यांची निवड
ह्या आठवड्यात गाण्यांची निवड कै च्या कै आहे ! लहान मुलांचा कार्यक्रम आणि त्यात गाणी कुठली तर "देही वणवा पिसाटला" आणि "मालवून टाक दीप " !!
<
हो फार खटकली ही गाणी , त्यात अजुन एक ‘रात्री अर्ध्या रात्री असं सोडून जायाचं नाय’, का देतात अशी गाणी
स्वराली छान गाते पण तिला तिच्या जॉनरची सुफी गाणी जास्तं सुट होतात, सध्या उर्मिला धनगर जी सिलेक्ट करायची तीच गाणी देतायेत!
गाण्यांच्या निवडीबद्दल सहमत.
गाण्यांच्या निवडीबद्दल सहमत. कोणाच्याच डोक्यात आले नाही का हे ?!! तो गोडुला हर्षल सोडला तर या वेळी मजा आली नाही. मोहे रंग दो लाल हे आवडले मला. त्यात पण वादकांचे फार कौतुक पुन्हा एकदा.
सगळ्यात मला अवधूत आणि शाल्मलीच्या वारेमाप कौतुकांचा कंटाळा येतो. इतके बोलतात अन सगळ्यांना डोक्यावर घेऊन नाचतात की एका गाण्यापेक्षा दुसरे चांगले झाले की वाईट हे कळत पण नाही. महेश बरोबर बोलतो पण अवघड बोलतो बर्याचदा, मुलांना त्याचा फीडबॅक कळत असेल का असा प्रश्न पडतो.
बर मला महेश चा कुर्ता फार आवडला
छोटया सूरवीरांची अजून म्हणावी
छोटया सूरवीरांची अजून म्हणावी तशी छाप पडत नाहीय.
व्हर्सटाईल न गाण्याचा ट्रेण्ड सुरुय का सध्या??. एक मुलगा फक्त कव्वालीच गातो, एक फक्त लोकगीत/भजनच गातो, मुलींमध्ये पण फक्त उडत्या चालीची गाणी गाणाऱ्या किंवा सुफी गाणाऱ्याच मुली आहेत..
थोड्या फार फरकाने सगळ्याच singing reality shows मध्ये हेच आहे..
@हायझेनबर्ग तुमचा प्रश्न
@हायझेनबर्ग तुमचा प्रश्न अतिशय रास्त आहे. मी उपग्रह वहिनी मधेच लिहिण्याचा प्रयत्न केला पण खुप प्रयत्न करूनही मला जमले नाही म्हणून शेवटी ललित मध्ये लिहिला. लेखनात नवीन असून पहिलाच धागा आहे. आता जमेल का धागा हलवायला?
आजचा भाग पहिला का? चैतन्य ने
आजचा भाग पहिला का? चैतन्य ने कैलाश खेर च सैया गाणं खूप सुरेख म्हटलं .
तन्मयी. शोधू मी कुठे कशी
तन्मयी. शोधू मी कुठे कशी म्हटलं तिने गेल्या आठवड्यात.
>>
हो बरोबर! ती लवकरच जाईल असं वाटतंय आता पण ती शिकेल आणि फार पुढे जाईल असंही वाटतंय. सिन्सिअर वाटते.
मला अजुनही चैतन्य, उत्कर्ष, अंशिका, साहिल आणि सृष्टी सोडुन कोणाचीच नावं- चेहरे लक्षात नाहीयेत.
आज या आठवड्यातले एपिसोड बघेन. मला आपली मराठी वर नाही सापडले
मुलांसाठी गाणीचा मुद्दा पटतोय मला पण ती मुलं मग वेगळे वेगळे प्रकार कसे गाणार? कायम बालगीत, भक्तीगीत किंवा प्रेमाची गाणीच उरतील का त्यांच्यापुर्ती (माहीत नाही)?
सा रे ग म प च्या लिटिल चॅप्म्स मधे कसं असायचं? आता अजिबात आठवत नाही. छोटीशी मुग्धा, आर्या, कार्तिकी आणि रोहीत मात्र लगेच डोळ्यासमोर येतात. मी लहान असेन आणि कानसेन नसेन म्हणुन असेल कदाचित पण प्रथमेशची गाणी नाही आठवत.
काल अजुन एक गोष्ट खटकली,
काल अजुन एक गोष्ट खटकली, अवधूतने छोट्या विश्वाजाला गाण्याचा ऑरा वगैरेच उदाहरण देताना भलत्याच ट्रॅकवर गेला, डॉ काशीनाथ घाणेकर सिगारेट ओढायचे, सिगारेटच्या धुराने येण्याची वातावरणनिर्मिती करायचे नाटकातल्या एंट्री आधी हे उदहारण दिलं, पोरगी थोडी कनफ्युज दिसली अवधूत बोलताना !
लहान मुलीशी बोलताना सिगारेटचा धूर वगैरे इनॅप्रोप्रिएट वाटलं , घाणेकरांचा किस्सा बाकी इंटरेस्टींग असला तरी !
लेखनात नवीन असून पहिलाच धागा
लेखनात नवीन असून पहिलाच धागा आहे. आता जमेल का धागा हलवायला?
>>> राहू दे हो ललित मधेच, पटकन दिसतो अपडेट ☺️
मी उपग्रह वहिनी मधेच
मी उपग्रह वहिनी मधेच लिहिण्याचा प्रयत्न केला पण खुप प्रयत्न करूनही मला जमले नाही म्हणून शेवटी ललित मध्ये लिहिला. लेखनात नवीन असून पहिलाच धागा आहे. आता जमेल का धागा हलवायला? >> हरकत नाही. अॅडमिनना विपूमध्ये विनंती केल्यास ते नक्की धागा हलवून देतील.
डॉ. घाणॅकरांच्या किस्स्याचं
डॉ. घाणेकरांच्या किस्स्याचं (लाल्या - अश्रुंची झाली फुले) वर्णन अवधुतने अगदि त्याच्या डोळ्यासमोर घडल्यासारखं केलं. तो त्यावेळेला हाफ प्यांटित तरी असेल का याची शंका आहे...
महेश काळेची बॉडिलँग्वेज, अभिप्राय देण्याची स्टाइल सुरेश वाडकरांसारखी आहे. वाडकरहि गुण देताना हात आखडता घ्यायचे काय?..
गाण्याच्या सेलेक्शनबाबत माझी तक्रार त्याच्या जॉनरं ऐवजी कांप्लेक्सिटीवर आहे. कठिण गाणं ताकदिनं गाण्याचं कौशल्य रिअर्सल मध्येच दिसुन यायला हवं, आणि त्यानुसार ते गाणं द्यावं/न द्यावं याचा निर्णय पडद्यामागे घेतला जावा - हि अपेक्षा. उगाच प्रयोगाखातर जड गाण्याचं शिवधनुष्य उचलुन ते पोटावर पाडुन घेण्यात काहि हशिल नाहि. "मालवुन टाक दीप..." वर न बोललेलंच बरं...
लहान मुलीशी बोलताना सिगारेटचा
लहान मुलीशी बोलताना सिगारेटचा धूर वगैरे इनॅप्रोप्रिएट वाटलं >>> बरोबर आहे तुझं. अगदी सिनेमाचे प्रमोशन असेल येणाऱ्या तरीही ( घाणेकरांवर मराठी पिक्चर येतोय). मी एपिसोड बघितला नाहीये पण वाचून, डीजे तुझं बरोबर आहे असं वाटतंय.
धूर सोडला का अवधूत ने ?
धूर सोडला का अवधूत ने ?
अवधूतचा किस्सा काय आहे?
अवधूतचा किस्सा काय आहे?
अरे नाही नाही, अवधूत नव्हता
अरे नाही नाही, अवधूत नव्हता स्मोक करत, त्याने घाणेकरांचा किस्सा सांगितला, ते एंट्री घेण्याआधी कशी वातावरणनिर्मिती करायचे ते !
काशीनाथ घाणेकर लाल्याचा रोल करायचे तेंव्हा त्यांच्या एंट्रीसाठी म्हणे पब्लिक येडं व्हायचं, ते एंट्री करण्या आधी विंग मधे स्मोक करत थांबायचे आणि स्टेजवर पब्लिकला फक्तं धूर दिसायचा, पब्लिक धूर दिसल्यापासूनच टाळ्या शिट्ट्या सुरु करायचे, मग थोड्या वेळानी घाणेकर एंट्री मारायचे.
Btw, अवधूत हे सुबोध भावेच्या अपकमिंग सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजिबात नव्हता बोलत, एका स्पर्धक मुलीला सांगत होते कि तिच्या एंट्री आधी कशी गाण्याची वातावरणनिर्मिती तयार होते ते.
अवधूतने छोट्या विश्वाजाला
अवधूतने छोट्या विश्वाजाला गाण्याचा ऑरा वगैरेच उदाहरण देताना भलत्याच ट्रॅकवर गेला, डॉ काशीनाथ घाणेकर सिगारेट ओढायचे, सिगारेटच्या धुराने येण्याची वातावरणनिर्मिती करायचे नाटकातल्या एंट्री आधी हे उदहारण दिलं, >> प्रमोशनचं होतं ते. काल प्रोमो पण दाखवून झाला.
गाण्यांच्या निवडीबाबत सहमत.
मला विश्वजा सगळी गाणी एकाच प्रकारे म्हणते असं वाटतं.
काल कोण गेलं?????
काल कोण गेलं?????
Btw, अवधूत हे सुबोध भावेच्या
Btw, अवधूत हे सुबोध भावेच्या अपकमिंग सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजिबात नव्हता बोलत, एका स्पर्धक मुलीला सांगत होते कि तिच्या एंट्री आधी कशी गाण्याची वातावरणनिर्मिती तयार होते ते. >>> अच्छा ओके.
काल कोण गेलं????? >> तन्मयी
काल कोण गेलं????? >> तन्मयी घाडगे नाशिकची.
काल कट्यारीसाठीच्या गाण्यात सईने मजा आणली. पिया बावरी तिच्या वयाच्या आणि आकाराच्या मानाने कठीणचं होत. तरी मधले बोल फारच छान म्हटले.
ओह यु.एस मधे नाही दाखवला
ओह यु.एस मधे नाही दाखवला सिनेमाचा प्रोमो सुनध्यान प्रोग्रॅम मधे.
काल कट्यारीसाठीच्या गाण्यात
काल कट्यारीसाठीच्या गाण्यात सईने मजा आणली. पिया बावरी तिच्या वयाच्या आणि आकाराच्या मानाने कठीणचं होत. तरी मधले बोल फारच छान म्हटले>>>>1000 खरच फार सहज गाते ती.
तिचे बाबा मात्र विचित्र नाचत होते. असो.
तिचे बाबा मात्र विचित्र नाचत
तिचे बाबा मात्र विचित्र नाचत होते. असो.>>>कधी ते चष्म्यावलेच ना? ते नाचताना नाही पहिलं मी
कधी ते चष्म्यावलेच ना? >>>>
कधी ते चष्म्यावलेच ना? >>>> त्या लग्नाळू गाण्यावर नाचले ते. विचित्र होत खरं
ओके तेव्हा मी किचन मधलं आवरत
ओके तेव्हा मी किचन मधलं आवरत होते
असु दे ना, dance like nobody
असु दे ना, dance like nobody's watching, असा प्रकार होता. आपली करमणुक, त्यांचा व्यायाम.
काल कोण गेलं????? >> तन्मयी
काल कोण गेलं????? >> तन्मयी घाडगे नाशिकची.
>> वाटलंच होतं
dance like nobody's watching >> खरंच ना! कोणाच्या जजमेंट्स आणी कमेंट्स कडे लक्ष न देता आयुष्य असं जगता आणि एंजॉय करता आलं पाहिजे
गेल्या आठवड्यात कोण गेले
गेल्या आठवड्यात कोण गेले बाहेर अन कट्यार कोणाला मिळाली????
Pages