अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
हि साधी बिट्टी किंवा छोटी
हि साधी बिट्टी किंवा छोटी बिट्टी .. बरेच रंग असतात यात
याची फळं (बिट्ट्या ) आम्ही सागरगोटे नसतील तर सागरगोटे खेळायला घ्यायचो
काय रंग आहे जगू ताई तेरड्याचा
काय रंग आहे जगू ताई तेरड्याचा !!
उनाडटप्पू मस्तच !
शोभा१>> गुलाब तर अहाहा जीव कि प्राण आहे माझा
सर्वच फोटो आहाहा.
सर्वच फोटो आहाहा.
.
संकासुर
![5BAB48B0-3CBC-4A6E-BEE2-489058FBE9B8.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/5BAB48B0-3CBC-4A6E-BEE2-489058FBE9B8.jpeg)
.
![713F8107-979C-4954-9751-E54C7716CD4E.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/713F8107-979C-4954-9751-E54C7716CD4E.jpeg)
सुंदर फोटो
सुंदर फोटो
संकासुर. सुरेखच फोटोज
संकासुर. सुरेखच फोटोज
(No subject)
Kavita.. मस्त ग!
Kavita.. मस्त ग!
शाली,संकासुराचे फोटो अप्रतिम.
शंकासुर मस्तच शाली..
शंकासुर मस्तच शाली..
कविता, जास्वंद छानच..
आमचे धनेश १) २)
आमचे धनेश![](https://3.bp.blogspot.com/-fxRB8bMwguQ/XAETqe8msQI/AAAAAAAB0L0/N7SIcn6v41cjanmmEhOzpQIXIhyhu-GNACEwYBhgL/s640/DSC07560.JPG)
तुला काय करायच ते कर माझ मी बघेन च्या तोर्यात.
१)
२)
![](https://2.bp.blogspot.com/-AkRcd17h_ew/XAETqYUjgWI/AAAAAAAB0L4/ptc99IdQa_QjFbMewrA2nrD2xhcEpUKpwCLcBGAs/s640/DSC07564.JPG)
तुला काय करायच ते कर माझ मी
तुला काय करायच ते कर माझ मी बघेन च्या तोर्यात.>>>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
हे धनेश ढोलीऐवजी काटक्यांच घर
हे धनेश ढोलीऐवजी काटक्यांच घर ( कावळ्यासाखे) बांधतात का?
हा अजून एक संकासुर
हा अजून एक संकासुर
हा अजून एक संकासुर
डबल पोस्ट
अय्या कित्ती मस्त ग ! ते
अय्या कित्ती मस्त ग ! ते दुसऱ्या फोटोत पिल्लू ते का ? ते तर भारींचे !
संकासुर मस्तच .. रंग काय
संकासुर मस्तच .. रंग काय सुरेख आहे
मी भाजीपाला लावला आहे तिथे ही
मी भाजीपाला लावला आहे तिथे ही पाखरे खुप येतात आणि पाने खातात. ही भोपळ्याच्या पानांवर बसलेली.
![](https://4.bp.blogspot.com/-v6bAZl4dld0/XAefbiEiAJI/AAAAAAAB0SY/yJgMWNbHYyc0mzsZcwiViPGpfdCf8knQwCLcBGAs/s640/DSC07570.JPG)
पंधरा दिवसांनी प्रहार हे
पंधरा दिवसांनी प्रहार हे ऑर्गॅनिक औषध फवारते त्याने काही दिवस नाही येत पण परत चालू होतात.
रॉबिन उर्फ दयाळ. गोड गळ्याचा.
रॉबिन उर्फ दयाळ. गोड गळ्याचा.
![](https://1.bp.blogspot.com/-ADWFbRGu8Nc/XAo3Sz8w0AI/AAAAAAAB0Wg/dIbCW12dr5E8qy67K_8Tb_grHecJmqHDACLcBGAs/s640/DSC07296.JPG)
सकाळी फिरायला जातो त्या
सकाळी फिरायला जातो त्या बागेच्या तळ्यातील एक साधु महंत.
आहा! काय छान फोटो आहे कृष्णा!
आहा! काय छान फोटो आहे कृष्णा!
फोटो सर्वच अगदी आहाहा.
फोटो सर्वच अगदी आहाहा.
कृष्णा सुंदर फोटो.
कृष्णा सुंदर फोटो.
हे किडे पण ना स्वस्थपणे मिळत नाहीत. उलटच टांगायला लागल शेवटी.
![](https://4.bp.blogspot.com/-_ggKKBPWAKQ/XAo3OXRcDQI/AAAAAAAB0Vg/Kix2nyYKjSUZ1723VbsuCfT5HtW6qNbTACLcBGAs/s640/DSC07181.JPG)
आला आला हिवाळा रंग माझा वेगळा
आला आला हिवाळा
![IMG-20181217-WA0037_2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0037_2.jpg)
१
२
![IMG-20181217-WA0051.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0051.jpg)
![IMG-20181217-WA0056.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0056.jpg)
३
४
![IMG-20181217-WA0042.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0042.jpg)
![IMG-20181217-WA0043_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0043_0.jpg)
५
रंग माझा वेगळा
शेवंतीच शेवंती
शेवंतीच शेवंती
![IMG-20181217-WA0046.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0046.jpg)
(कविवर्य पु. शि. रेगे यांच्या शब्दांत)
तापल्या सोन्यासारखी
रसरशीत ती कांति
तिथे कशी ग फुलली
फिकी शेवंती!
पुष्कळातली पुष्कळ तू
![IMG-20181217-WA0048.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0048.jpg)
तू पण असली नवीनवेली
![IMG-20181217-WA0050.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0050.jpg)
गात्रे गात्रे रक्तपालवी
फुलाफुलांवर तुझीच कांती
कोमल खुलली
लाल तुझा अंगवठा
![IMG-20181217-WA0047.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0047.jpg)
लाल तुझ्या अंगी ताण;
लाल रक्ताच्या पेशींचा
किती केलास ग साठा?
पुष्कळातली पुष्कळ तू
![IMG-20181217-WA0054.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0054.jpg)
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी
सेवन्तीका
![IMG-20181217-WA0036.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0036.jpg)
गुलदाउदी
![IMG-20181217-WA0035.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0035.jpg)
चाहुल..
![IMG-20181217-WA0040.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG-20181217-WA0040.jpg)
मनिम्याऊ, वा मस्त फोटो,कविता!
मनिम्याऊ, वा मस्त फोटो,कविता!
व्वा!!
व्वा!!
सर्वच प्रचि एकसे बढ़कर एक!! :")
मनिम्याऊ, वा मस्त फोटो,कविता
मनिम्याऊ, वा मस्त फोटो,कविता >>> मम. आहाहा अगदी.
व्वा! सर्वच फोटो सुंदर!
व्वा! सर्वच फोटो सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निसर्गदेवता, रंगीबेरंगी साड्या नेसून नटलेय अगदी!
वा आज धाग्यावर शेवंती
वा आज धाग्यावर शेवंती मोहोत्सव आहे. खुप सुंदर फोटो एकदम फ्रेश वाटले.
सुप्रभात.
![](https://1.bp.blogspot.com/-_lNM3u9fwNg/XAo3Te4DoPI/AAAAAAAB0Wk/D6-C9DFJmWkPdA4BxuHQlcuUVLpa4F5UQCLcBGAs/s640/DSC07521.JPG)
Pages