Submitted by गिरिश सावंत on 20 October, 2009 - 11:20
१९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला. भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्या त्यांनी लिहिल्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म.. कधीकाळी मी त्यांच्या
ह्म्म.. कधीकाळी मी त्यांच्या कादंब-या वाचत असे. रिवॉर्ड माझी आवडती कादंबरी होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
आणि माझं 'युवर अटेन्शन
आणि माझं 'युवर अटेन्शन प्लीज'. बाकीच्या कादंबर्या काही ग्रेट नाही वाटल्या मला.
बाबा कदम यांच्या लेखनाची
बाबा कदम यांच्या लेखनाची पहिली जाहीर प्रशस्ती आचार्य अत्रे यांनी केली होती. तिथूनच मराठी साहित्यात एक दमदार आणि ग्रामीण कस असलेली लेखनरेषा ठळक उमटली. बाबा कदम यांच्या कादंबर्या वाचकांच्या पसंतीत अग्रक्रमावर राहिल्या. साधी सोपी आणि मनाचा ठाव घेणारी प्रत्ययकारी भाषा. कारकीर्दीची सुरवात सरकारी वकील (पोलिस प्रॉसिक्युटर) म्हणून केल्याने लेखनातील तपशीलांच्या बारकाव्यांचे ठेवलेले भान. बाबा कदम यांना आदरांजली.
कोल्हापुरचे सुपुत्र बाबा कदम
कोल्हापुरचे सुपुत्र बाबा कदम याना आदरांजली.
त्यांची 'कंपॅनियन' मला खुप आवडली होती.
बाबा कदम हे आमच्या गावी
बाबा कदम हे आमच्या गावी कुरुंदवाडमध्ये बरीच वर्षे कोर्टात नोकरी करत होते, असे मी ऐकून आहे.... कोर्ट, कोल्हापूर परिसर हा त्यांच्या कादंबर्यांचा मुख्य विषय... भालू छान आहे.... कादंबरी वाचून पिक्चर काढला, का पिक्चर बघून एकेक सीन जसाच्या तसा कादंबरीत लिहिला, अशी शंका यावी, इतपत चांगली ..
श्रद्धांजली...
माझंही बाबा कदम यांचं 'युवर
माझंही बाबा कदम यांचं 'युवर अटेन्शन प्लीज' हे फेव्हरिट पुस्तक आहे. त्यामुळे ते गेल्याचं वाचून वाईट वाटलं.
कोल्हापुरचे सुपुत्र बाबा कदम
कोल्हापुरचे सुपुत्र बाबा कदम याना माझी आदरांजली.
त्यांचे भरपूर लिखाण मी लहानपणी वाचले होत. 'शेवटचे स्टेशन' मला खुप आवडली होती.
शरद
बाबा कदम हा
बाबा कदम हा माझ्यासारख्यांच्या अनेक चांगल्या वाचनीय क्षणांची रेफरंस फ्रेम आहे. मी त्यांच्या अनेक कादंबर्या अनेकदा वाचल्यायत...
त्यांना माझी आदरांजली !!!! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !!!
बाब कदम आणि व्.पु. हे १५-२०
बाब कदम आणि व्.पु. हे १५-२० वर्षा पुर्वि
चान्गलेच प्रसिध्द होते. बहुदा कदम त्याआधिचे असतिल
ग्रामिण नायकांचे रगेल चित्रण त्यांच्या लेखनात असे.
पुर्वि आण्णाभाउ साठे( फकिरा) व हल्लि चे बोधे हे त्या टाइप चे लेखन करतात.