अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किमयागिरी अर्थात हेमवती विद्येबद्दल कोणाच्या माहितीत/ऐकण्यात खरा प्रसंग आहे का एखादा ?
१९४२ साली बिर्ला हाऊस दिल्ली येथे कृष्णपाल शर्मा यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोनं तयार केलं होत... त्याचा साग्रसंगीत वृत्तांत वाचायला खालील टाइम्स ऑफ इंडिया ची बातमी पहा
https://timesofindia.indiatimes.com/home/sunday-times/deep-focus/The-cur...

माझ्याकडे आहे सोन तयार करण्याची माहिती, मी ती एकाला दाखवली पण तो म्हणाला यात स्फोटक द्रव्ये खूप आहेत
आणि सोन किती तयार होईल, होईल कि नाही, झालं तर ते विकणार कस
म्हणून प्रयोग नाही करून पहिला

माझ्याकडे आयुर्वेदातील रसशास्त्रावरची जुनी/नवी बहुतेक सर्व पुस्तके आहेत ज्यात शेकड्याने असे प्रयोग आहेत . तुम्हाला काल जी निळावंतीची दोन पाने दिली ती पण याच संबंधित आहेत. काही तंत्रग्रंथात पण असे प्रयोग मिळाले जे इतर पुस्तकांत नाहीत . यावरची बरीच हस्तलिखिते पण आहेत संस्कृत मधली ... पण हे सर्व असूनही काही उपयोग नाही . कारण हि गुरुमुखी विद्या असून प्रत्येक प्रयोगात काही गुपिते असतात जी कुठेच छपलेली नाहीत म्हणून माझा प्रश्नच असा होता कि प्रत्यक्षात असे प्रयोग यशस्वी झालाय का कोणाच्या माहितीत ?माझ्या माहितीतील काही नाथसंप्रदायाच्या लोकांनी बराच वेळ घातला आयुष्यातला पण कोणालाही म्हणावं असं यश नाही मिळाल. एक भावसार म्हणून गृहस्थ होते धुळे भागातील त्यांच्या माहितीत कोल्हापूर भागातील एक सत्पुरुष होते ज्यांच्या जवळ हि विद्या होती आणि त्यांनी काही काळ तेथे घालवला पण नंतर मधेच ते स्वामीजी निवर्तल्याने याना नाईलाजाने घरी यावं लागलं . हि ६० च्या दशकातील गोष्ट आहे म्हणजे आजची कथाच नको विचारायला .. त्या भावसरानी बरेच खरे प्रयोग मिळवले पण ते बरेच क्लिष्टसाध्य आहेत . आता त्यात एक घटक म्हणून पांढरा पळस लागतो एका प्रयोगात पण हा फारच दुर्मिळ वृक्ष आहे पूर्वीपासून .. त्यातल्या पारा,गंधक,मेनशील ,सोमल ह्या प्रत्येकाची शुद्धी ठराविक पद्धतीनेच व्हावी लागते नाहीतर शून्य उपयोग होतो .. कोणत्याही पुस्तकात हे दिलेले नसते . भावसरांकडे नित्यनाथच्या ग्रंथातील एक खरा प्रयोग होता ज्यात गोमुत्राचा वापर आहे एका टप्प्यावर पण ते गोमूत्र केवळ तांबड्या गायीचे आणि तीही ठराविक वनस्पती खाऊ घालून मिळवलेले असे अपेक्षित आहे जे त्या पुस्तकांत नाही .. थोडक्यात जो प्रत्यक्ष यशस्वी प्रयोग करू शकतो त्याच्याकडूनच हे शिक्षण शक्य आहे . भावसारांचे एक मित्र जे नगरचे होते त्यांच्याकडून हि माहिती पुढे आली अजूनही हि एक दोन ऐकीव उदाहरणे आहेत कोकणभागातील वैद्यांची ..

आता नाथपंथीयांत हि विद्या भटक्या साधुंकडे खात्रीशीरपणे आजही आहे पण ज्याच्या प्रारब्धात तो योग असेल त्यालाच मिळणार मग भलेही आपण कितीही वेळ देऊ त्यासाठी .. प्रत्येक नाथसिद्धांच्या समाधीजवळ एक वृक्ष असतो . कोणता ते तुम्हीच ओळखा आता .. तर ह्या वृक्षाचा कोणत्याही आयुर्वेदिक ग्रंथात उल्लेख नाही पण त्याच्या योगे ज्या सिद्धी मोठे मोठे जपतप करून मिळत नाहीत त्या सहज शक्य होतात मग त्यात धातुवाद हि आला .. धातुवाद म्हणजे धातू रूपांतरणाची विद्या . भावसरांकडे ह्या झाडाचे प्रयोग होते पण दुरुपयोगाच्या भीतीने त्यांनी नाही सांगितले कोणाला .. नवनाथ भक्तिसार हा मूळ ज्या गोरक्ष किमयागार ह्या ग्रंथावरून बनला आहे त्यातली किमया म्हणजेच हि विद्या .. असं म्हणतात कि ज्ञानेश्वरांनी मूळ ज्ञानेश्वरीत २७ ओव्यांमध्ये हि विद्या वर्णन केली होती पण तिचा त्या काळातील कापालिक संप्रदायिकांनी दुरुपयोग सुरु केल्याने एकनाथ महाराजांनी तंत्र विषयक सगळ्या ओव्या गाळून सुधारित ज्ञानेश्वरी समाजापुढे आणली .. शेवटी महाराष्ट्रात नाथसंप्रदायाची धुरा त्यांनीच पुढे सांभाळली .. गहिनीनाथांचा मार्ग हा भक्तिमार्ग असल्याने पुढे तोच वारकरी संप्रदाय म्हणून पुढे आणला गेला कारण मूळ नाथसंप्रदायचं जप/तप हे बराच क्लिष्ट साधन सामान्य लोकांना कधीच जमलं नसत .. तरीही कानिफनाथांच्या रूपाने पैठण च्या मठात सर्व मूळ रूपात चालूच होत पण गुप्तपणे ... बरच मोठा भाग आहे हा सर्व लिहायला नंतर कधीतरी

>> असं म्हणतात कि ज्ञानेश्वरांनी मूळ ज्ञानेश्वरीत २७ ओव्यांमध्ये हि विद्या वर्णन केली होती
ज्ञानेश्वरांना सोडा यातुन. ते आध्यात मार्गातले. ते या अश्या विद्यांमधे नव्हते.

@ जिद्दु :- पूर्णपणे सहमत
उगीच नाही सोन्याचा धूर निघायचा भारतात.. असो. यावरून एक कथा आठवली
एका माणसाला कळते कि अमुक एका व्यक्ती जवळ सोनं तयार करण्याची विद्या आहे . तो त्या व्यक्तीच्या इथे कामाला लागतो
त्याचा विश्वास संपादन करून त्याच्या सोनं तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन तो स्वतःही त्याच्या बरोबर सोनं तयार करतो
नंतर त्या माणसाला असे वाटते कि आत्ता आपणाला सर्व जमत आहे तर हि नोकरी सोडून स्वतःच सोनं बनवू. म्हणून गुरूला न सांगताच तो तिथून
निघून घरी येतो व सोनं तयार करण्याची सामग्री आणतो,पण तेच प्रमाण व प्रकीर्या करून हि सोनं तयार नाही होत.. तो गोंधळतो असं कस झालं
तो वारंवार प्रयोग करतो पण यश नाही येत.. शेवटी थकून,हार मानून परत गुरु जवळ येतो व सर्व प्रकार कथन करतो.. गुरु त्याला म्हणतो
तू सगळं बरोबर केलंस फक्त एक गोष्ट राहून गेली जी मीही तुला कधी सांगितली नाही ती हि कि...प्रत्येक वेळेला सोनं तयार करण्याच्या प्रयोगात
वापरणारा चाकू हा नवीन व कुणीही वापरलेला नसला पाहिजे...

असच होत... काही प्रयोग असे आहेत ज्यात ज्या वनस्पती सांगितल्या आहेत त्या नावाने आता कोणी ओळखत तर नाही वा त्या आता नामशेष हि झाल्या आहेत..

<उगीच नाही सोन्याचा धूर निघायचा भारतात.> अगदी ,अगदी.
या धाग्यावर खरंच अत्यंत उपयुक्त माहिती मिळत आहे. ज्यांना या गोष्टींत रस आहे आणि विश्वास आहे, त्यांनी एकत्र येऊन यावर संशोधन करायला हवं आणि भारताला पुन्हा पूर्वीचे सोन्याचे दिवस आणून द्यायला हवेत.

पण भरत आजकाल सर्व चाकू चाचण्या करून, गुणवत्ता सिद्ध झाली की मग पॅक करून विकतात. थोडक्यात आपण नविन म्हणून जे चाकू विकत घेतो, ते चाचण्यांसाठी वापरलेले असतात. त्यामुळे नवा कोरा चाकू आणला तरी प्रयोग तडीस जात नाही.

तेवढं सोपं नाही ते. चाकू बनवायला तुम्ही धातूची पट्टी घ्यायला गेलात की तुम्हाला जुनी वापरलेली पट्टीच घासून गुळगुळीत केलेली मिळते. छोट्या फाऊंडरीत ऑर्डर देऊन बनवून घेतली तर तिथेही रिसायकल्ड धातू पासूनच बनवून देतात. जमिनीतील धातू ओअर काढून त्याचे विशुद्धीकरण करून मिळवलेल्या धातू पासून बनवावा लागेल. असा धातू SAIL मधून अथवा चीन वरून मागवावा लागेल (त्यात चीन अथवा निर्यात केलेला चालतो की नाही याचीही शंका आहे.) या कंपनीत रिटेल मध्ये विकत नाहीत शेकडो टनांची ऑर्डर द्यावी लागेल. तेव्हा ते कसे परवडणार? अशा अनेक प्रॅक्टिकल समस्या असतात.
असो, एवढे पूरे आहे सध्या सोने का बनवता येत नाही हे सांगण्यास.

अहो मानव, त्या जॉन स्नो आणि गेंड्रीला बोलवून घ्या पाहू. एक ड्रॅगनस्टोन शोधेल, एक लोखंड ओतून चाकू बनवेल. मग काय सोन्याचा धुरच धूर! फक्त त्यांच्या मागोमाग एक वेताळाची पालखी, जत्रा पण येते, त्यापासून सावध Proud

कशाला सोन्या च्या मागे लागायचे? त्यापेक्षा कष्टाची भाकरी बरी. By the way, भुते संपली का? भूत कथा सोडून गूढ कथा सुरु झाल्या आहेत.

@ प्रसन्न हरणखेडकरः
बरोबर आहे, नोव्हेंबर संपत आला म्हणजे हिंजवडी-चाकण-पिं.चि भागात आता अप्रेझल्स चे वारे वाहु लागले आहेत... शुभशकुन हो हा... किमान १५-२०% रेझ मिळेल हो >> तुमच्या तोंडात साखर(खरे तर जो पदार्थ आवडतो, तो ) पडो..
असं झाल तर तुम्हाला बाशा ची ट्रीट Happy
पण आमची कम्पनी कर्मचार्‍याना गरीब ठेवण्यासाठी प्रसिध आहे..... त्यामुळे फार अपेक्षा नाहीत.... असो..

चाकू नवीनच आणि कुणीही न वापरलेलाच पाहिजे. मग बघा सोन्या चा कसा आणि कुठून कुठून धूर निघतो ते!

नमस्कार.
मी नाशिक येथे राहतो. एका छोट्याश्या कंपनीत जॉबला आहे.
मला लहानपणापासून ज्योतिषशास्त्र आणि गूढ विद्यांची आवड आहे.
मला नाशिक येथे कुणी ज्योतिषवर्ग घेत असतील तर प्लिज माहिती द्यावी.
धन्यवाद....

@ अज्ञातवासी ,
माझ्या अल्पज्ञानाने मी नवीन ज्योतिष शिकू इच्छिणाऱ्यांसाठी youtube वर बेसिक पासूनचे विडिओ टाकत आहे
youtube वर #dyangangajyotish टाका म्हणजे मिळतील व अभिप्राय कळवा

<<उनाडटप्पू>>
धन्यवाद.. मला सुरवातीपासूनच असे वाटते कि ज्योतिष हे सर्वांनी शिकावे.. पण बाहेर जे अव्वाच्या सव्वा फी घेऊन शिकवतात व
ते शिकलेले ज्योतिषी दोनचार भविष्य खरे ठरले कि स्वतःला ब्रह्मदेव समजतात व जातकाला लुबाडायला पाहतात त्यामुळे ज्योतिषशात्राची प्रतिमा जनमानसात
काही प्रमाणात का होईना मालिन झाली आहे... म्हणून मी ठरवलं कि स्वतः शिका व अनुभवा मग ठरावा हे शास्त्र आहे कि नाही ते..म्हणून हा व्हिडिओ प्रपंच ..पण निदान ठराविक लेवल पर्यंत तरी शिका व पूर्वेग्रह बाळगून शिकू नका एवढीच विनंती

धागा अगदीच बंद पडतोय...भुते ख्रिसमस च्या सुट्टीला गेली का?? >>>> बोकलतने सगळ्या भुतांचा नायनाट केल्यामुळे कोणाकडे किस्से उरलेच नाहीत, हा धागा बन्द पडला आहे

<<बोकलतने सगळ्या भुतांचा नायनाट केल्यामुळे कोणाकडे किस्से उरलेच नाहीत, हा धागा बन्द पडला आहे>>
गुड.. मग आता बोकालत समर्थकांनी इकडे फिरकू नये हि विनंती

Pages