"तो आला आहे" एक पोरगं रस्त्यावरून ओरडत पळत गेलं.
"पाण्यावरनं चालत येतोय अहो!" कोणीतरी आश्चर्याने उद्गारलं.
सगळे लोक हातातली कामं टाकून बघायला धावले.
तो पलिकडच्या किनार्यावरून येत होता.
शुभ्र दाढी. पायघोळ अंगरखा. डोक्यामागे प्रकाशाचे वलय.
किनार्यावर हीऽ गर्दी लोटली!
लोक टाचा उंच करून एकमेकांच्या डोक्यावरून पाहू लागले.
पाण्यावरून एक एक पाऊल टाकत तो येत होता.
गर्दी आश्चर्यचकित झाली.
गर्दी हर्षभरित झाली.
गर्दीने हात उंचावले.
"चमत्कार!" लोक उद्गारले.
"साधु!!... साधु!!..." लोक उद्गारले.
"हॅलेलुया!!..." लोक उद्गारले.
तो जवळ आला आणि त्याने किनार्यावर पाऊल टाकले.
"लोकहो, मी परतलो आहे" तो हात वर करून म्हणाला.
"ईश्वराचे राज्य पुन्हा आणण्यासाठी"
"गोरगरीब, रंजल्या-गांजल्या, दीनदुब......"
गर्दी मागे हटली.
सर्वांनी हात खाली घेतले.
आपण रेकॉर्ड केलेले अद्भुत दृश्य सगळ्यांच्या आधी युट्युब, फेसबुक,व्हॉट्सॅपवर अपलोड करण्यासाठी सर्वजण रेंज शोधायला धावले.
चमत्कार
Submitted by सा. on 2 December, 2018 - 16:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा हा मस्त!
हा हा मस्त!
मस्तच☺️
मस्तच☺️
भारीच
भारीच
मस्त!
मस्त!
मस्तच...शेवटची कलाटणी भारी
मस्तच...शेवटची कलाटणी भारी आहे
सहिच !!
सहिच !!
आवडलं.
आवडलंय !
आवडलंय !
आवडलं.
आवडलं.
मजेदार..
मजेदार..
आवडली.. मार्मिक..
आवडली.. मार्मिक..