Submitted by स्वाती_आंबोळे on 28 November, 2018 - 14:56
ठिकाण/पत्ता:
Joseph J. Sweeney Auditorium,
380 Cranbury Rd, East Brunswick, NJ
हा उर्दू शायरी, ग़ज़ल, कव्वालीचा कार्यक्रम आहे, कलाकार पुण्यातली मुलंमुली आहेत आणि कार्यक्रम फार सुंदर होतो असं सगळं ऐकून आहे, त्यामुळे मी जाणारच आहे.
सुख़न या शब्दाचं नेमकं भाषांतर करणं अवघड आहे.
भाषा/शब्द/काव्य असे अर्थ गूगल केल्यावर सापडले.
मला ‘काव्य’ हाच एक अर्थ माहीत होता.
(ग़ालिबच्या या सुप्रसिद्ध शेरामुळे :
हैं और भी दुनिया में सुख़नवर बहुत अच्छे
कहते हैं कि ग़ालिब का है अंदाजे़ बयाँ और)
यूट्यूबवर या दोन क्लिप्स पाहिल्या आणि उत्कंठा वाढली:
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, December 9, 2018 - 15:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या इथे येत्या शनिवारी आहे
आमच्या इथे येत्या शनिवारी आहे. मी जाणार आहे. उर्दू शब्द फारसे कळत नाही. पण असल्या (फालतू) कारणासाठी एक चांगला कार्यक्रम चुकवणार नाही.
अरे वा, कसा वाटला नक्की लिही.
अरे वा, कसा वाटला नक्की लिही.
मला जितक्या क्लिप्स पाहिल्या त्यात त्यांचं सादरीकरण आवडलंय - भाषेचा लहजा मस्त पकडला आहे, सिलेक्शनही छान वाटतंय.
<<लहजा मस्त पकडला >>
<<लहजा मस्त पकडला >>
म्हणजे नक्की काय पकडलयं?
काहीतरी छान वाटतंय... बघतो...
काहीतरी छान वाटतंय... बघतो...
<<लहजा मस्त पकडला >>
<<लहजा मस्त पकडला >>
म्हणजे नक्की काय पकडलयं?>>
please go and clap through
please go and clap through all the kawwalies. it is an interactive session. boys are terrific and good singers. urdu is fun. we do need such programmes more than ever in these times. they also read out some text. and poems. and you get to eat paan .
आणखीन एक शेर आठवला
आणखीन एक शेर आठवला
वो हीज्र की रात का सितारा वो हम न फसहन सुखन हमारा
सदा रहे उसका नाम प्यारा सुना है कल रात मर गया वो
हो, सुंदर आहे हा कार्यक्रम.
हो, सुंदर आहे हा कार्यक्रम. नक्की जा.
सुख़न म्हणजे कथन करणे आणि सुख़नवर म्हणजे कवी/शायर.
मस्त टीम आहे, ओम भूतकर,
मस्त टीम आहे, ओम भूतकर, नचिकेत देवस्थळी ही त्यातल्या त्यात माहीत असलेली नावे. सद्या अमेरीका दौरा सुरु आहे त्यांचा. यू ट्यूब वर व्हिडीओ आहेत बरेच. जश्ने रेख्ता मध्ये नियमित सहभाग असतो असे दिसले.
सुप्र
सुप्र
सांभाळून रहा.
सांभाळून रहा.
फार उर्दू शब्द बाहेर ऐकू आले तरी कुणितरी येईल गन घेऊन! नाहीतर पोलिस.
नंद्या... Duplicate आहेत सगळे
नंद्या... Duplicate आहेत सगळे.. त्यामुळे बंदूक्/पोलिस आले तरी ते सुध्दा Duplicate असतील..
अरे वा वा, धन्यवाद सर्वांना.
अरे वा वा, धन्यवाद सर्वांना.
मॅगी, शब्दार्थ सांगितल्याबद्दल स्पेशल थँक्स.
अमा, पान खिलवतात प्रेक्षकांना? खरंच की काय?
पशुपत, खरंच की! हमनफ़स, हमसुख़न!