खिला-रे एग्ज कॅफे, पुणे ... एक रिव्यू

Submitted by उपेक्षित on 27 November, 2018 - 02:06

खूप दिवस झाले अंडा भुर्जी खावीशी वाटत होती किंवा अस म्हणा अंड खूप दिवसा पासून खाल्ल नव्हत अर्थात घरी आपण करतोच पण बाहेरची चव ही काहीतरी वेगळीच असते....

मग विचार केला की आता जावं कुठ.. आणि त्यात आपल्या पुण्यात खास फॅमिली ला घेऊन जावं असं फक्त एग च कुठल हॉटेल किंवा कॅफे नाहीये रादर कमी आहेत म्हटलं इट आऊट वर जाऊन विचारावं की चांगली भुर्जी कुठे मिळेल.. बघतो तर काय इट आऊट वरच खिला-रे एग कॅफे ची पोस्ट दिसली.. जहा चाह वहा राह
झाल तर मग खाली पत्ता दिला होताच जवळच कर्नाटक हायस्कूल पाशीचा पत्ता होता आणि पोस्ट वाचून वाटलं की हा गडी पण खवैया असेल..

पत्ता शोधत शोधत गेलो... आत गेल्यावर बघितल तर हा फिल्मी किडा दिसला.. सगळे फिल्म चे डायलॉग याच्या कॅफे chya भिंती वर दिसले...
म्हंतल डायलॉग तर भारी आहेत पण खाऊ काय घलतो ते बघू त्यालाच म्हणटल बाबारे खूप दिवसा पासून बाहेरच अंड नाही खाल्ल काही तरी भारी आणि वेगळं दे

मग त्याने भरपूर नाव सांगितली अंडा घोटाळा, एग मेजिक,अंडा चिंबोरी आणि इतर त्यालाच सांगितलं तुझी स्पेशल आणि खास डिश दे मग एक १० मिनिटांनी अंडा घोटाळा समोर हजर झाला.....

डिश काय होती हे सांगणं खरच खूप अवघड आहे आणि त्यात ह्या बाबा ने काय केलं आहे हे सांगणं त्याहून अवघड आहे...
जो काही प्रकार याने केला होता तो खरच लाजवाब होता कांदा, लसूण आणि टॉमेटो ह्यांचा त्रिवेणी संगम हा बऱ्याच डिश मध्ये असतो किंबहुना सगळ्याच डिश मध्ये असतो पण ह्याने जो काही संगम आणि तडका ह्या तीन पदार्थांचा घडवला होता त्याला तोड नव्हती त्यात परत एंड हे आलच पण ते कसं आल हे सांगणं खूप अवघड आहे आणि त्यात ते मला ह्या ठिकाणी शब्दात मांडणं हे त्या हूंन ही अवघड आहे किंवा अस म्हणा की ते कोणालाच मांडता येणार नाही.
(अर्थात हे माझ व्यक्तिगत मत झालं कदाचित शब्दांचे जादूगार ते मांडतील ही...असो विषयांतर होतंय तो आपला विषय नाही)

सांगायचं हे होत डिश कशी होती तर अप्रतिम, लाजवाब आणि एकदम कडक आणि त्यात हाफ फ्राय याला तर तोड नव्हती, अगदी हवं ते आणि मागल ते अस सगळ डिश मध्ये होत.

सगळ्यात महत्त्वाचं आणि संगण्या सारखं म्हणजे कंजुषी हा प्रकार डिश मध्ये कुठेही नव्हता.

आणि सगळ्यात शेवटचा होम रन म्हणजे *लेमन टी आणि कोल्ड कॉफी, काय कमाल होती vaaaaaa... हे मात्र मला लिहिता येणार नाही ते तुम्ही एकदा जाऊन ट्राय करा..

अस म्हणतात की खूप कमी हॉटेल व्यावसायिकांना लोकांना खायला घालायला आवडत बऱ्याच लोकांचा विचार हा असतो की यातून पैसा किती येतोय आणि त्याच वेडा पायी हॉटेल जस सुरू होत तस लगेच बंद ही होत. पण जेंव्हा ह्या मालकाशी बोललो तेंव्हा कळलं की हा माणूस म्हणतो "पैसा नंतर आधी कस्टमर किती समाधानी झालाय ते जास्त महत्त्वाचं ते झाल की पैसा हा आपसूकच येतो"

खूप कमी लोकांना हे जमत, त्या खूप कमी आणि नगण्य लोकांना मधलाच हा एक जीव उगीच कोणाचं कौतुक करन हे आपल्याला जमत नाही आणि खाण्या chya बाबतीत तर ते जन्मात शक्य नाही मग तो कोणीही का असेना.

असो तर सांगणं इतकंच की सारखं सारखं जाऊन खाव अशी ही डिश आणि जागा होती त्यात फॅमिली साठी अशी एग्ज खाण्याची जागा आपल्या पुण्यात खूपच कमी किंवा नाहीच.. आणि त्यात ती मिळाल्याचं जास्त समाधान.

आता रेट म्हणाल तर तो ही अगदीच आपल्या खिशाला मानवेल असा....जरूर आणि आवरजून ट्राय करावी अशी जागा...

टीप :- 'विखी' आणि त्यांच्या पत्नी स्वतः सर्व पदार्थ तयार करतात आणि आग्रहाने खायला घालतात, व्यावसायिकपणा आहेच पण त्याचा अतिरेक नाहीये हे माझ्या आणि माझ्या पत्नीला आवडले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंडा/सुरत घोटाला नामक हा पदार्थ, खायचा असेल तर तो सुरतला जाऊनच खायला हवा. मुळचा सुरत मधील हा पदार्थ तिथल्या स्ट्रीटवरच खाण्यात मजा येते, अप्रतिम चव लागते ह्याची.

अरे वा मस्तच की. वाचकांसाठी खास अरे आय अ‍ॅम लायन म्हणून एक आहे बावधन साइडला जबरी सामि ष. अन्न प्रकार. खिमा, चिकन शागुती, मटण व फिश नीर दोसे वगैरे बरोबर देतत. प्लस सोल कडी.

ह्या कॅफेमध्ये झोमॅटो गोल्ड ऑफर आहे का ते पण लिहा. तरुणाईला ही माहिती लागते.

Eat out च्या पोस्ट वरचा त्यांचा पत्ता इथे डकवत आहे... जरूर भेट द्या आणि तुमचा अनुभव सांगा.

पत्ता- खिला-रे एग्ज कॅफे
किशोरी पार्क, कर्नाटक हायस्कुलच्या बाजूला, एरंडवणा-पौडफाटा, पुणे (चतु:शृंगी स्नॅक्स सेंटरच्या समोरच्या लेन मध्ये)
वेळ- सकाळी 11.30 ते रात्री 9.30
*दर चतुर्थीला बंद*