"I am OK"

Submitted by सा. on 21 November, 2018 - 19:03

"हे बघा बाबा, तुम्ही हट्ट सोडून द्या आता. तुमच्याकडे बघणारं आता घरी कोणी नाही. तुम्ही माझ्याकडे येऊन रहा"
"छेःछेः..जमणार नाही. तिकडचं लाईफ जमत नाही मला. कंटाळा येतो. मी इथेच बरा आहे"
"बरं ते जीवन संध्या..."
"हॅट! माझं स्वतःचं घर असताना मी तिकडे जाऊन राहू? काही धाड भरली नाही मला"
"अहो पण.."
"आता तो विषय नको"
"ठीक आहे मग..."
".."
"मी रोज फोन करत जाईन"
"बरं"
"फोन नाही जमला तर दर दिवशी एसेमेस तरी करत जाईन"
"बरं"
"न चुकता रिप्लाय देत जा"
".."
"रोजच्या रोज"
"काही अडचण असेल तर लगेच..."
"अरे हो हो हो"
.
.
.
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
.
.
.
"Siri, एसेमेस डॅड "Hi Dad, How are you?" एव्हरी डे ॲट सेव्हन एएम"
.
.
.
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
.
.
.
"Hi Dad, How are you?"
"Hi Dad, How are you?"
"Hi Dad, How are you?"
"बाबा काल तुमचा रिप्लाय आला नाही"
"अरे हो, सॉरी विसरलोच"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
.
.
.
"सिरी, एसेमेस दिनेश "I am OK" एव्हरी डे ॲट सेव्हन-फाईव्ह एएम"
.
.
.
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
"Hi Dad, How are you?"
"I am OK"
.
.
.
"हेलो, मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. दिनेश प्रधान आपणच का?"
"होय. का हो?"
"२९१ रमा निवास, गोखले रोड इथे राहत होते ते आपले वडील?"
"हो"
"त्यांच्याशी शेवटचा कॉन्टॅक्ट किती महिन्यांपूर्वी केलात?"
"महिने??!....आँ?!.....आज सकाळीच तर त्यांचा मेसेज आला होता. का हो, काय झालं?"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह!

छान.
पण बाबांचा फोन कोणी चार्ज केला? Happy

जमलीय.

चांगली संकल्पना
वरच्या प्रतिसादांची दखल घेता लिखाण अजून चांगले करण्यास वाव आहे.

फोन चार्जिंगवर असतो.
विजबिल ऑनलाईन ऑटो पेमेंट वर असतं.
वगैरे वगैरे.
वेळ मुद्दाम सारखी दिली, वाचक कन्फ्युज होऊ नये म्हणून. घटना नजिकच्या भविष्यातली आहे. एकीकडे गॅजेट्स आणि AI यांच्यावरचे अवलंबित्व वाढत जात असताना माणसांच्या जीवनाची नातीगोती, वास्तवाशी फारकत होत आहे यावरची एक टिप्पणी समजा. वरची सगळी टोकं वाचकांनीच जुळवून घेणं अपेक्षित आहे. हे सर्व लिहीत बसलो असतो तर या छोटेखानी कथेचा आशय पातळ झाला असता Happy

"Siri, एसेमेस डॅड "Hi Dad, How are you?" एव्हरी डे ॲट सेव्हन एएम, आयएसटी"

असे करता येईल.

Sad खडबडून जागे करणारी कथा. अभिनंदन ड्रॅकुला.

मुलाला मारलं असतं तर धक्का आणखी बसला असता आणि तो विचार जास्त वेळ डोक्यात घोळला असता का? टिपिकल मागची पिढी पुढची पिढी स्टिरीओटाईप भोवती कथा घोटाळण्यापेक्षा माणसामाणसातील संवादावर भर आला असता असं वाटलं.

टिपिकल मागची पिढी पुढची पिढी स्टिरीओटाईप भोवती कथा >>

लोक याला पिढीचे वळण देतात खरं. पण इथे तर ऑटोमेशनमुळे झालेला गोंधळ आहे.

कथा मस्त जमलीय.
अगदी मरण नाही पण एआय मुळे झालेले काही गैरसमज अनुभवात आहेत.

टिपिकल मागची पिढी पुढची पिढी स्टिरीओटाईप भोवती कथा घोटाळण्यापेक्षा माणसामाणसातील संवादावर भर आला असता असं वाटलं.>>>>

संवाद तुटलाय यावरच तर कथा आहे ना?

बापरे! Sad
मस्त कथा!जमलीये!
ती केस आठवली, त्या मुंबई मधल्या बाई १ वर्षापासून फ्लॅट मध्ये मृत होत्या ती... मलापण

असतात असे लोक, माझा शेजारी 2.5 वर्ष भारतात गेला नाहीय- तिकीट चा खर्च खूप होतो म्हणून. मला कळत नाही इतके वर्ष कसे काय राहू शकतात घरच्यांना भेटल्याशिवाय. पैसा वर घेऊन जाणार आहे का.

Pages