मटण पाव किलो. (त्यातही थोडं फॅट काढून टाकल्याने सुमारे २०० ग्रॅमच असावे. मसाले व इतर प्रमाण त्याच हिशोबाने आहे) धुवून, तुकडे करून, हवे तसे ट्रिम करून घेणे. लहान तुकडे लवकर शिजतात.
खडे मसाले :
लवंग २
काळे मिरे ४-५
नखाएवढी दालचिनी
अर्धा चमचा जिरं
एक हिरवी वेलची
अर्धी लहान सुकी लाल मिरची
१ चमचा आलं + १ चमचा लसूण पेस्ट.
एक टमाटा भाजून त्याची साल काढून पेस्ट करून.
दीड मध्यम कांदा, चिरून, तळून. (हा माझ्याकडे रेडीमेड होता)
दही : १-२ चमचे, फेटून.
(आंबटपणा जास्त, तर दही कमी घ्या. टमाटा व दही दोन्ही आंबट असतील तर फायनल चव बिघडेल.)
१-२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून. (वरील फोटोत नाहीत. गार्निशिंगची कोथींबीरही नाही.)
सुके मसाले :
जिरेपूड
धणेपूड
हळद
लाल तिखट
मिरेपूड
फोटोनुसार क्लॉकवाईज, हे सगळे मसाल्याच्या डब्यातला उलुसा चमचा असतो, ते २-२ भरुन. रफली सपाट टीस्पून. मिरेपूड कमी घेतलीय.
कसूरी मेथी
मीठ.
साजुक तूप.
छोट्या प्रेशर कुकरमधे आधी तूप गरम केले.
त्यात सगळे खडे मसाले परतून घेणे. १५-२० सेकंदात होतात.
त्यात आलं+लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाऊन रंग पालटेपर्यंत परतणे.
त्यात मटन घालून परतावे. मटनाचा रंग बदलून ऑफ व्हाईट झाला की थोडे मीठ घालावे. भरपूर पाणी सुटते, ते सुकेपर्यंत परतायचे आहे. भुना गोश्त आहे. ते खरपूस भुनणे गरजेचे आहे. मटन घालण्याआधी गॅस मोठा करणे, अन मोठाच ठेवणे.
पाणी सुकले, की सुके मसाले घालावे, पुन्हा परतावे. खाली लागत असेल तर थोडेसे(च) पाणी घालून परतावे. या स्टेपला गॅस कमी. नाहीतर जळेल.
यात तळलेला कांदा व फेटलेले दही व हिरवी मिरची घालून पुन्हा थोडं परतावे.
हे सगळं एकंदर सुमारे ८-१० मिनिट परतल्यानंतर त्यात अर्धा पेला (सुमारे १००-१२५ मिलि) पाणी घालून उकळी येऊ दिली, अन कुकरला झाकण लावून एक शिटी काढली. गॅस मंद करून सुमारे १५ मिनिटं मटन गळेपर्यंत शिजवले.
वाफ काढून टाकून झाकण उघडावे.
पाणी जास्त असेल तर थोडे आटवून त्यात टोमॅटो प्युरी घालून परतणे. मटनाचा अंदाज पाहून झाकण ठेवून शिजू देणे.
थोडी कसूरी मेथी, मिठाची चव अॅडजस्ट करणे.
शॉर्टकट टेस्टी भुना गोश्त तय्यार आहे.
हा अंगच्या रश्श्यातला प्रकार आहे. नुसते चमच्याने खायलाही छान लागते. सोबत पोळी/नान/भात आपापल्या चॉईसनुसार घेणे.
कुकर वापरायचा नसेल, तर मटन शिजायला अर्धा तास किंवा जास्त लागू शकतो.
मस्त वाटतंय.करून पहायला हवे.
मस्त वाटतंय.करून पहायला हवे.
आवडेल अशी पाकृ
आवडेल अशी पाकृ
Ahaahaa!
Ahaahaa!
ड्राय आयटम आहे.थोडी थिक
ड्राय आयटम आहे.थोडी थिक ग्रेवी हवी असेल तर काय वापरता येईल? भाताबरोबर भारी लागेल हे. दालचा टाईप थोडी ग्रेवी असेल तर.
फोटो भारी आहे . पैकीच्या
फोटो भारी आहे . पैकीच्या पैकी मार्क !
( बाकी कोथिंबीर जssss रा बारीक कापून शिवरायला हवी होती. अजून प्रोफेशनल फोटो आला असता . )
चांगली आहे पाक्रु ! पण आम्ही
चांगली आहे पाक्रु ! पण आम्ही तुमच्या काकुंच्या ' बोटी 'तल्या ! आपलं ते हे (फणस) घालून सेम भाजी केली होती... फोटो काढायचा राह्यला नाहीतर झब्बु देता आला असता.
जाईशी सहमत !
थोडी थिक ग्रेवी हवी असेल तर
थोडी थिक ग्रेवी हवी असेल तर काय वापरता येईल?
<
पाणी. टमाटे शिजल्यानंतर थोडं गरम पाणी घालून एक वाफ
छानच आहे रेसीपी. मला बोलवायचं
छानच आहे रेसीपी. मला बोलवायचं ना गरम पोळ्या घेउन आले असते. अकेले क्युं खाना?!
वॉव... या वीकेंड ला करुन बघेन
वॉव... या वीकेंड ला करुन बघेन... (आज कार्तिकी एकादशीचा उपास सुरु असताना असा विचार मनाला शिवला... पाप...पाप...! )
छान दिसतय. सोपं नी झटपट पण
छान दिसतय. सोपं नी झटपट पण आहे. दीड तास नाही लागणार कुकराच्या रेसिपीला अगदी मटण धुण्यापासून सुरुवात केली तरी असं वाटतय.
भाकरी पाहिजे.
भाकरी पाहिजे.
कशाबरोबर खाल्लेत?
मस्तय.
मस्तय.
मी इथली रेसीपी वाचून करते त्यात टमाटा नाहिये पण अगदी बाकी सेमच आहे.
छान आहे रेसिपी! फोटो पण मस्त.
छान आहे रेसिपी! फोटो पण मस्त.
उलुसा हा शब्द प्रथमच वाचायला
उलुसा हा शब्द प्रथमच वाचायला मिळाला. यापूर्वी ऐकला होता त्यालादेखील अनेक वर्षें झालीत. इवलासाच्या तुलनेत जास्त गोड वाटतो.
फोटो सहीच आलाय.
फोटो सहीच आलाय.
घरात मांसाहार व्यर्ज असल्याने ओळखीच्या रेस्टॉरंटात खाण्यात येईल.
घरात मांसाहार व्यर्ज असल्याने
घरात मांसाहार व्यर्ज असल्याने ओळखीच्या रेस्टॉरंटात खाण्यात येईल.
Submitted by मानव पृथ्वीकर on 20 November, 2018 - 13:38
अनोळखी रेस्टॉरंटात खा म्हणजे घरी समजणार नाही.
भारी दिसतंय.
भारी दिसतंय.
रेसिपी योग्य व्यक्तींकडे पोचवण्यात येईल.
रेसिपी योग्य व्यक्तींकडे
रेसिपी योग्य व्यक्तींकडे पोचवण्यात येईल.
>> म्हनजे मेल कूक कडे का?
अहो अनोळखी रेस्टॉरंटात मटनाची
अहो अनोळखी रेस्टॉरंटात मटनाची ग्यारंटी नसते.
आमच्या घरातल्या शेफकडे.
आमच्या घरातल्या शेफकडे.
(अ कुक इज अ कुक - मेल फीमेल काय बघायचं त्यात म्हणते मी! )
अ कुक इज अ कुक - मेल फीमेल
अ कुक इज अ कुक - मेल फीमेल काय बघायचं त्यात म्हणते मी! Proud )
>> बुरसट भारतीय मनोवृत्ती ...
बिपिनजी, खाणे व्यर्ज नाही.
बिपिनजी, खाणे व्यर्ज नाही.
ओळखीच्या रेस्टॉरंटात: जिथे कूक सांगितल्याप्रमाणे करून देतो. काही मराठमोळ्या भाज्या पण करवून घेतो तिथे.
एखादी रेसिपी आवडली आणि कुठेही जाऊन नावाने खाल्ली त्यात मजा ती काय?
इथे कुक कुक करू नका. तुम्ही
इथे कुक कुक करू नका. तुम्ही आगगाडी आहात का तसं करायला? (मानव हे तुम्हाला नाही. तुमचा प्रतिसाद आत्ता बघितला.)
आरारा रेसिपी मस्त आहे, मटणाऐवजी दुसरं काहीतरी घालून करायचा विचार करतो आहे.
सोया चंक्स करा. किंवा सुरण.
प्रतिसाद दोनदा पडला.
भाचा, सोया चंक्स करा. किंवा
भाचा, सोया चंक्स करा. किंवा सुरण.
>> सोया चंक्स करा. किंवा सुरण
>> सोया चंक्स करा. किंवा सुरण
आणि त्याला भूना सोया किंवा भूना सुरण म्हणा, (आणि 'भूना सोया'वर आणखी जोक्स मारू नका!) त्यांच्या भावना दुखावायला नकोत.
सॉरी आ.रा.रा, तुमच्या रेस्पीवर टीपी केला जरा.
हो आ. रा. रा., करून बघतो
हो आ. रा. रा., करून बघतो येत्या काळात. धन्यवाद.
सॉरी आ.रा.रा, तुमच्या
सॉरी आ.रा.रा, तुमच्या रेस्पीवर टीपी केला जरा.
<<
इबा, सॉरी कशाला? माझ्या रेस्प्या टीपीसाठी फेमस आहेत. तशीही गप्पाटप्पा केल्याशिवाय जेवणात मजा येत नाही
टीपीसाठी फेमस असल्या तरी
टीपीसाठी फेमस असल्या तरी टीपीपी मुळे त्या इनफेमस होतील का?
भाचा, फिर भटकाया...
भाचा, फिर भटकाया...
Pages