माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायनली राधाक्का भानावर आल्या. आता ऑफीस जॉईन कराय्चे म्हणत आहेत. >>>>>>>>>>>

काय गंमत आहे का मनात आलं हिने कंपनी विकत घेतली, मनात आल ही ऑफिसला जाणार नाही म्हणते.

मला हा ट्रॅक कळला नाही, गुरु कंपनी काबीज करायला बघतो म्हणून दुखावून जाऊन ही ऑफिस सोडते का सासू म्हणाली म्हणून गुरुला चांस देत्ये ? त्या केसमधे हिने लक्ष ठेवायला जायला हव ना गुरुवर.

ह्यातल्या आनंदने भेटी लागी जीवाची पटकथा मात्र मस्त लिहीलीय. अजूनपर्यंत तरी चांगली जातेय, मधेच कधीतरी स्लो वाटत असली तरी.

परवा 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये अनिता दाते आली होती तिच्या आई- वडिलान्सोबत. तिचे व़डिल खुप बोलके आहेत. अनिता म्हणे कमीत कमी शब्दात एखाद्याचा अपमान करते म्हणे.

हो माझी आई मला सांगत होती, अनिताची आई म्हणाली की ती पाहुण्यांना चहा वगैरे विचारत नाही, फार आग्रह करत नाही.

आगपुर च्या लोकांना कंपनी चालवता येत नाही. नवी शनाया बेक्क्कार आहे. काहीच येत नाही तिला.
गुरू शनाया किती वेळ ज्वेलरी शॉप मध्ये असतात नक्की? राघिका घरी येउन सासूला घेउन त्याच दुकाना येइपरेन्त? की लगेच परत लपवा लपव
थापा वगैरे. हाउ स्टुपिड. दीड वर्शामागे साडी खरेदीस असेच झाले होते.

राधाक्का म्हणे गुरुतल्या वाईट प्रवृत्तीचा नाश करून त्याला चांगला सद्गुणाचा पुतळा बनविणार आहे!
आता हा सुंभ जळाला तरी पीळ सोडेल काय?

काल मी शेवटी शेवटी जराशी पाहिली त्यात गुरोबा आता सौमित्रविरुद्ध/ आणि त्याच्यावरुन बहुतेक राधिकाविरुद्धपण आईचे कान भरणार आहे. Sad
इतक्या खालच्या पातळीवर उतरलेल्या नीच माणसाला राधाक्का कशी बरे सुधरवणार (म्हणायला एका रात्रीत सुधारेल) आणि तो सुधारलेला दाखवला तर ते कोणालाही पटण्यासारखे नसेलच.
बादवे शनाया कशी काय राधाक्काला मदत करतेय?? राधिकेने तिला पैसे देऊ केले की काय??

सुंभ कसला शुंभ आहे तो
आणि राधाका शुंभीण >>>>>> Rofl

राधिकेने तिला पैसे देऊ केले की काय??>> पैसे आणि धमकी >>>>>> कसली धमकी?

धन्स, मी_ आर्या Happy बादवे, शनायाला कुणीतरी बाई मदत करत असते. ति तिच्याशी सतत फोनवर बोलत असते त्या ट्रॅकच काय झाल?

मागे घटस्फोट केस सुरु झालेली त्याचं काय झालं. मोठ्या मोठ्याने channelने add करून दोन तासाचा भाग एका रविवारी ठेवला होता खूप मागे, त्याचा प्रोमो दाखवायचे सारखा news channel वरही. ती पाच वर्ष कोर्टात चालणार का केस.

तो बाजूलाच पडलाय. ते कोण अजून समजलेलं नाहीय. >>>> धन्स.

तो बाजूलाच पडलाय. ते कोण अजून समजलेलं नाहीय.

मागे घटस्फोट केस सुरु झालेली त्याचं काय झालं. मोठ्या मोठ्याने channelने add करून दोन तासाचा भाग एका रविवारी ठेवला होता खूप मागे, त्याचा प्रोमो दाखवायचे सारखा news channel वरही. ती पाच वर्ष कोर्टात चालणार का केस. >>>>>> केडयाला स्मृतिभ्रन्न्श झालाय वाटत. हल्ली बर काही विसरत चाललाय तो.

काल थोडासा भाग नजरेस आला. राधाक्का आणि शनाया एकमेकान्ची चक्क ग्गोड, हसत खेळत बोलत होत्या फोनवर. Uhoh त्यान्च एकमेकीन्शी हसून खेळून बोलण जेन्युईन वाटत होत. ह्या मैत्रिणी झाल्यात की काय?

मला काय वाटतय माहितीये, अशीच तिच्याशी मैत्री करुन, त्याच्याशी गोड बोलून राधिका तिला सुधरवते अस दाखवायला हव. शनायाला तिच्या कलाने घेत, तिच्या आयुष्याविषयी, तिच्या स्व्पनाविषयी जाणून घ्यायला हव. तिच्या मर्मावरती बोट ठेवायला हव आणि तेही प्रेमाने, कुठलीची लेक्चरबाजी न करता. सवत माझी लाडकी मध्ये नीना कुळकर्णी वर्षाला तिची चूक कुठलाही आक्र्स्ताळेपणा न करता, तिचा द्वेष न करता दाखवते तस. ते हात पिरगळण, भैताड म्हणण, कामे जबरद्स्तीने/ धाक दाखवून करवून घेण हयाच्यापेक्षा हि आयडिया बरी आहे.

एकवेळ ती शनाया सुधारेल, पण तो गुरु काही सुधारणार नाही. Angry

सौमित्र आणि राधिकाचं जुळवायला हवं असं मालिकेतल्या पात्रांना वाटू लागलंय.
शनायाच आपले प्लान्स राधिकाला कळवतेय असा संशय गुरूला आलाय (त्याच्या हुशारीमुळे नाही. राधिकाच्या वहिनीच्या सांगण्यावरून)
सौमित्र आणि सरिता यांच्यात ओव्हरअ‍ॅक्टिंगची स्पर्धा सुरू आहे.
आनंदला डॉ दीक्षित डाएट फॉलो करायची तीव्र गरज आहे.

Pages