दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव (वय 91) यांचे मंगळवारी पहाटे दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मराठीतील अनेक प्रसिद्ध गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे. यामध्ये 'तुझे गीत गाण्यासाठी', 'भातुकलिच्या खेळामधली', 'तुझे गीत गाण्यासाठी', 'जीवनात ही घडी अशीच राहू दे', 'या जन्मावर या जगण्यावर', 'अखेरचे येतील माझ्या', 'कुठे शोधीसी रामेश्वर' अशा गाण्यांचा समावेश आहे. मराठी संगीतक्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रतिभावंत महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_

लालन सारंग. श्रद्धांजली.
काळाच्या पुढे जाऊन सखराम बईंडर करताना उभयतांनी जे भोगले ते वाचून आदार दुणावला होता.

दोन-तीन दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात एका सोमाली मुस्लीमाने दारु पीऊन व अमली पदार्थ घेउन एका निरपराध व्यक्तीला ठार केले. लगेचच एका मुस्लीमाने आमचा धर्म शान्ततावादी आहे त्याचा या घटनेशी सम्बन्ध जोडु नका असे सान्गितले. या धर्माचे लोक जेम्व्हा असे हिम्सात्मक काम करतात तेम्व्हा प्रत्येकवेळी हेच सान्गितले जाते. ऑस्ट्रेलियात हे लोक निर्वासित म्हणून आले आहेत आणि काही काम न करता बसून फक्त सरकारकडून पैसे घेउन आपली कुटुम्बे वाढवत बसतात.

या धाग्यावर वाद घालायची इच्छा नाही. तरी तुम्ही लिहिलेली घटना दुर्दैवी असली तरी गुन्हेगाराच्या धर्माचा आणि गुन्ह्याचा ओढून ताणून जोडलेला संबंध दुर्दैवी आहे आणि मुद्दाम खोडसाळपणा केलेला आहे.
अमली पदार्थ आणि दारूच्या आहारी असताना केलेल्या गुन्ह्यात ऑस्ट्रेलियातील ख्रिश्चन व्हाईट्सचे प्रमाण किती आहे याचा एकदा नक्की तपास करा.

ऍलेक पदमसी - निधन 17 नोव्हेंबर 2018
आश्चर्य आहे यांच्या मृत्यूचा काहीच कुठेच उल्लेख नाही आला माबोवर. बापमाणूस होता फिल्म, थिएटर आणि जाहिरात विश्वामधला. मला गांधी सिनेमानंतर मोहम्मद अली जीना उल्लेख आला की डोळ्यासमोर व्यक्ती म्हणून पदमसिंचाच चेहरा येतो.
आपल्याला आवडणाऱ्या लिरील, हमरा बजाज,
सर्फवाल्या ललिताजी ही सगळी लिंटास क्रिएशन्स ऍलेक पदमसीची. कामसूत्र कपल, MRFचा मसल मॅन यांनीच तयार केले होते. आणि आपल्या लहानपणी आवडणार करमचंद सुद्धा.

श्रद्धांजली !!

टवणे सर, दिगोची काकांच्या म्हणण्यात दुर्दैवाने काही प्रमाणात तथ्य आहे. गुन्हेगाराचा पासपोर्ट रद्द केला गेला होता यावरून तुम्हांला कल्पना यावी.
या घटनेत एक सामान्यातील असामान्य व्यक्ती मारली गेली.
अवांतर - त्या दिवशी मी त्या घटनास्थळी निव्वळ दोन तास आधी जाऊन आले होते. घटना घडली त्यावेळी फक्त 8 मिनिटांच्या अंतरावर होते. तुम्ही त्या घटनेचे uncensored फुटेज बघितले का?
अशाच प्रकारची घटना त्याच रस्त्यावर जानेवारी 2017 मध्ये घडली होती. गुन्हेगार ऑस्ट्रेलियन होता. त्याने गजबजलेल्या फुटपाथवर भरधाव वेगाने गाडी घातली होती. त्यात 6 माणसं मारली गेली. त्यालाही आत्ताच शिक्षा सुनावली गेली आहे.

त्या दिवशी मी त्या घटनास्थळी निव्वळ दोन तास आधी जाऊन आले होते. घटना घडली त्यावेळी फक्त 8 मिनिटांच्या अंतरावर होते. >>> ओहह वत्सला, थँक गॉड. बाकी त्या घटनेबद्दल आणि अशा घडणा-या सर्व घटनांबद्द्ल वाईट वाटतं आणि रागही येतो.

मराठी आंतरजालावरील प्रख्यात लेखक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या मित्रवर्य बोका - ए - आझम अर्थात ओंकार पत्की यांचे आज दुर्धर आजाराने निधन झाले . भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांनी लिहिलेल्या मोसाद व स्केअरक्रो या लेखमाला लोकप्रिय व वैशिष्ट्यपूर्ण होत्या . बोकाजी आपण सदैव स्मृतीत राहाल .

ओंकार पत्कींना भावपूर्ण श्रद्धांजली.
देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सोसण्याची बळ देवो.
त्यांची मोसाद लेखमाला अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावी होती.

अरे बाप रे Sad Sad
मी मागच्या एक-दीड वर्षापासून त्यांच्या मोसाद लेखमालेच्या पुढच्या भागाची वाट पाहत होतो... वाईट झालं... त्यांना श्रद्धांजली __/\__

Pages