Submitted by सुप्रिया जाधव. on 15 February, 2018 - 00:47
एक आठवण ताजी होता होता
तिचीच झाले माझी होता होता
गारपीट अश्रूंची गालांवरती
ऋतू कोपले राजी होता होता
माझ्यातुन मी केव्हा निसटुन गेले ?
कळले नाही त्याची होता होता
लढता लढता आत्मसमर्पण केले
थकून गेले झाशी होता होता
जन्मठेप ठोठवली मी इच्छान्ना
जरी वाचल्या फाशी होता होता
साय दुधाहुन जास्त गोड का असते ?
समजुन चुकले आजी होता होता
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह् व्वा व्वा! शेवटचे तीन
वाह् व्वा व्वा! शेवटचे तीन शेर खासंच!
छान ताई
छान ताई
वा क्या बात.. सुंदर
वा क्या बात.. सुंदर
साय दुधाहुन जास्त गोड का असते
साय दुधाहुन जास्त गोड का असते ?
समजुन चुकले आजी होता होता
व्वाह!!! अप्रतिम...
साय दुधाहुन जास्त गोड का असते
साय दुधाहुन जास्त गोड का असते ?
समजुन चुकले आजी होता होता
व्वाह!!! अप्रतिम... >>>> +999
कीत्ती छान लीहील आहेस ग !
कीत्ती छान लीहील आहेस ग !
शेवट्च कडव सोडुन बाकी सगळ रीलेट झाल !
छान
छान
खूप छान
खूप छान
खूपच सुंदर रचना
खूपच सुंदर रचना
मस्त आहे कविता...दुसरं तिसरं
मस्त आहे कविता...दुसरं तिसरं कडवं खूप आवडलं ।
साय +साखर = एकदम गोड गोड
साय +साखर = एकदम गोड गोड
खुपच मस्त
खुपच मस्त